व्हीएस न्युज - लोनी काळभोर वाक वस्ती येथे पुणे-सोलापूर मार्गावरट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात कारमधील ९ महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कारमधील प्रवासी हे यवत येथील रहिवासी होते. हे सर्वजण रायगडला सहलीला गेले होते. सहलीवरून घरी परतत असताना लोणी काळभोर येथे काळाने या तरुणांवर झडप घातली.
पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास इर्टीका कार ही यवतच्या दिशेने जात होती. लोनी काळभोर वाक वस्ती येथे कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या मधील दुभाजकावरून पलीकडच्या मार्गावर कार गेली. त्याच वेळेस शहराच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने कारला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रकने कारला सुमारे शंभर फूट फरफटत नेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघातानंतर कारमधील मृतदेह बाहेर काढणे अडचणीचे झाले होते. यामधील सर्व मृतदेह ही यवत परिसरातील रहिवासी आहेत. सर्वांना लोणी पोलिसांनी ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले असल्याची माहिती लोणी काळभोरचे सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर यांनी दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
अपघातात मृत झालेल्यांची नावे:
शुभम रामदास भिसे (वय १९)
विशाल सुभाष यादव ( वय २०)
निखिल चंद्रकांत वाबळे (वय २०)
अक्षय चंद्रकांत शिगे ( वय २०)
ऋषिकेश गणेश यादव ( वय २०)
अक्षय भरत वायकर ( वय २२)
नूरमोहम्मद आबास दाया ( वय २२)
परवेज अशपाक आतार ( वय २१)
जुबेर अजीज मुलाणी (वय २१)
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002