व्हीएस न्युज - कोल्हापूर, सांगली या महाराष्ट्रातील दोन सधन जिल्ह्यांना प्रलयकारी महापुराचा तडाखा बसला असल्यामुळे दोन्ही जिल्ह्यांत शेतीचे तसेच जनावरांचे, प्रापंचिक साहित्याचे आतोनात नुकसान झाले आहे. देशात कोठेही आपत्ती ओढवली तर, सढळ हाताने मदत करणाऱ्या या दोन्ही जिल्ह्यांना आज मदतीची गरज आहे.
या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथील तांदुळवाडी,घोटावळे , फूलेवाडी ,वाघूर्डे ,दोनवडे या गावांमध्ये तसेच माने हाॅल येथे पूरात बेघर झालेल्या बांधवांनसाठी पिंपरी येथील मातोश्री संस्थांचे संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर आणि त्यांच्या सहकाऱ्यंनी मदतीचा हात पुढे केला आहे.
यामध्ये पूरग्रस्त कुटुंबाला लागणाऱ्या सर्वे खाद्य वस्तू बरोबर पाण्याच्या बाटल्या,टूथपेस्ट,ब्रश,साबण,भांडी,कपडे, पांघरणे, बेडसीट, चादर या सर्व वस्तू पूरबाधितांची प्रत्यक्ष भेट घेऊन देण्यात आल्या.
पूर्गग्रस्तांसाठी मदतीस गेलेल्या मातोश्री संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कोल्हापूर पासून ६५ किलो मिटर अंतरावर असणाऱ्या तांदुळवाडी गावाजवळील रस्त्यावर पिंपरी येथून नेलेल्या मालवाहतूक ट्रॅक रस्ता काच्चा असल्यामुळे कलंडला असल्यामुळे दुर्घटनेला सामोरे जावे लागले. अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
गणेश आहेर यांनी दिलेल्या माहितनुसार ट्रॅक बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांची मोठी मदत लाभली, जे.सी.बी च्या साहाय्याने ट्रक बाहेर कडण्यात आला. धीर आणि जिद्द न सोडता घेतलेला वसा पूर्ण करूनच घरी परतलो असल्याची माहिती गणेश आहेर यांनी दिली.
यावेळी तांदूळवाडी गावचे सरपंच सिध्दार्थ कांबळे,वाघूर्डे गावचे कृष्णाकांत शिक्रे (उपतालूका प्रमूख, शिवसेना) गावातील सरपंच संगिता पाटील,पोलीस पाटील,खंडू शिरसाठ,दिपक कांबळे,प्रकाश झा,रविकिरण घटकार. गोरख पाटील,प्रदिप दळवी,नरसिंग माने, सचिन जाधव, अकूंश कोळेकर, माऊली जाधव,दत्ता गिरी,बाळासाहेब गायकवाड,मारूती म्हस्के,निलेश भोरे,छञपती यूवा प्रतिष्ठाण काळेवाडी उपस्थित होते.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002