Breaking News

जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम |
V. S. News
महापालिकेची शिष्यवृत्ती योजना ;विदयार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरु

व्हीएस न्यूज-दहावीसाठी १५ हजार रुपये तर बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी २५ हजार रुपयांचे शैक्षणिक अर्थसाहाय्य या योजनेअंतर्गत देण्यात येते.

महापालिकेची शिष्यवृत्ती योजना

पुणे : महापालिकेच्या वतीने इयत्ता दहावी आणि बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत देण्यात येणारे अर्थसाहाय्य विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू करण्यात आली. एकूण सात हजार ८७९ विद्यार्थ्यांना १४ कोटी रुपयांची रक्कम आरटीजीएस पद्धतीने वितरित करण्यात येणार आहे.

इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद अर्थसाहाय्य योजना आणि इयत्ता बारावीमधील विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अर्थसाहाय्य योजना महापालिकेकडून राबविण्यात येत आहे. शहरात राहणाऱ्या, इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत खुल्या गटातील ८० टक्क्य़ांपेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी, महापालिका शाळेत किंवा रात्र प्रशालेत शिकणारे विद्यार्थी तसेच मागासवर्गीय प्रवर्गातून ७० टक्क्य़ांपेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरतात. तसेच चाळीस टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांनी ६५ टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळविल्यास त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येतो.

दहावीसाठी १५ हजार रुपये तर बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी २५ हजार रुपयांचे शैक्षणिक अर्थसाहाय्य या योजनेअंतर्गत देण्यात येते. त्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूदही करण्यात आली आहे.

सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षांतील योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी ३० नोव्हेंबर ही अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत होती. या मुदतीमध्ये नऊ हजार ८६२ विद्यार्थ्यांचे अर्ज महापालिकेच्या समाज विकास विभागाकडे प्राप्त झाले. त्यापैकी सात हजार ८७९ अर्ज अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत पात्र ठरले.

महापौर मुरलीधर मोहोळ आणि आयुक्त शेखर गायकवाड यांच्या उपस्थितीत अर्थसाहाय्य वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेता धीरज घाटे यांच्यासह समाज विकास विभागाचे विभाग अधिकारी सुनील इंदलकर या वेळी उपस्थित होते. पुढील आठवडाभरात हा निधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. यंदा शिष्यवृत्ती अर्थसाहाय्य वाटपाला काही कारणांमुळे विलंब झाला. मात्र पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यात शिष्यवृत्ती दिली जाईल आणि त्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

...Read More

V. S. News
खळबळजनक !पुण्यात तरुणाचा बाथरूममध्ये गुदमरून मृत्यू

व्हीएस न्यूज- फ्लॅटच्या बाथरुममध्ये हा २९ वर्षीय इसम मृतावस्थेत सापडला.


गॅस गिझरमुळे पुण्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. पुण्यात कोथरुडमध्ये ही घटना घडली. मंगळवारी संध्याकाळी फ्लॅटच्या बाथरुममध्ये हा २९ वर्षीय इसम मृतावस्थेत सापडला. रामराजे किशोर सकपाळ असे मृत व्यक्तीचे नाव असून, चार दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे.

ससून हॉस्पिटलमध्ये मंगळवारी त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक अहवालात गुदमरुन रामराजे याचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. कोथरुड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी ही माहिती दिली. रामराजेंच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.

पोलीस आणि फायर ब्रिगेडचे कर्मचारी तिथे पोहोचले. दरवाजा तोडून त्यांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केला. त्यावेळी बाथरुममधून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले. बाथरुमचा दरवाजा तोडला, त्यावेळी रामराजे जमिनीवर पडलेले होते. रामराजेंच्या बाथरुममध्ये एलपीजीवर चालणारा गिझर आहे. तिथल्या खिडक्या बंद होत्या. गिझरमधून विषारी वायू गळती झाल्यामुळे रामराजे यांचा गुदमरुन मृत्यू झाला असावा अशी शक्यता प्रतिभा जोशी यांनी बोलून दाखवली.

...Read More

V. S. News
धक्कादायक बाब ;पुण्यातून तब्बल १५० चाईल्ड पोर्नोग्राफी व्हिडीओ इंटरनेटवर अपलोड ,दोघांना अटक

व्हीएस न्यूज -पुणे पोलिसांच्या सायबर सेलने यांसदर्भात दोन जणांना अटक केली आहे. सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पुण्यातून ही घटना घडल्याने आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.

पुणे शहरातून गेल्या दीड वर्षात चाइल्ड पोर्नोग्राफीचे तब्बल १५० व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर सेलने यांसदर्भात माहिती दिली असून दोन जणांना अटकही केली आहे. या संदर्भात खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पुण्यातून ही घटना घडल्याने आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.

या प्रकरणी पोलिसांनी राजकिरण पट्टीलाल (वय २४, रा. गुरुवार पेठ) आणि मनोजकुमार झल्लर सरोज (वय १९, रविवार पेठ) या दोन आरोपींना ताब्यात घेतला आहे. हे दोघेही मोल-मजुरी करुन आपली उपजीविका भागवतात, असे पोलिसांनी सांगितले.

पोलीस महासंचालक कार्यालयाने अशा प्रकारच्या व्हिडिओंबाबतची माहिती पुणे पोलिसांनी कळवली होती. त्यानंतर पुणे पोलिसांच्या सायबर सेलने हे व्हिडिओ कुठून आणि कसे अपलोड झाले याचा तपास केला. दरम्यान, पुण्यातून हा प्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे. तपासामध्ये लॅपटॉप आणि मोबाईलमधील इंटरनेटच्या माध्यमातून हे व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे पोलिसांच्या हाती सोमवारी यासंदर्भातील लिंक आल्या होत्या. त्यानुसार कुठल्याही आयपी अॅड्रेसवरुन हे व्हिडिओ अपलोड करण्यात आले होते याचा शोध पोलिसांनी घेतला. यामध्ये पुण्यातून १५० क्लिप्स अपलोड झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, यापूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये चाइल्ड पोर्नोग्राफीप्रकरणी ५ गुन्हे दाखल आहेत. तर पुण्यात दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे.

...Read More

V. S. News
आलिशान दुचाकी चोरी करणारी जोडी जेरबंद ,चार मोटार सायकल जप्त ; दिघी पोलीस ठाणे तपास पथकाची कामगिरी.

व्हीएस न्यूज - दिघी पोलीस ठाणे तपास पथकाकडून आलिशान दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक करण्यात आली व त्यांच्या कडून ३ लाख २५००० किमतीच्या एकूण चार दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या . सलमान अन्वर सय्यद (२०) रा. शितळा देवी मंदिर जवळ ,गल्ली क्र - २ ,बोपखेल पुणे , अरबाज हाकीम शहा (२०) रा. गवळीवाडा खडकी बाजार, खडकी ,पुणे, यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दिघी येथील परांडेनगर परिसरात रात्रीच्या वेळेस दिनांक -२८/०१/२०२० रोजी रिक्षा मधून रेकी करून केटीएम आर.सी २०० ( एम एच -१२-आर बी -६४२४) हि गाडी चोरून घेऊन जाताना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी दिघी ,तळेगाव आणि आळंदी येथून एकूण चार गाड्या चोरल्या असल्याची कबुली दिली . सलमान आणि अरबाजला आलिशान गाड्याची आवड असून या गाड्या त्यांनी स्वतःला वापरण्याकरिता मौजमजेसाठी चोरल्याचे सांगितले.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई , पिंपरी चिंचवड अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , परिमंडळ- १ च्या पोलीस उप आयुक्त स्मिता पाटील ,सह पोलीस आयुक्त राम जाधव ,दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली दिघी पोलीस तपास पथकाचे सह.पोलीस निरीक्षक अजितकुमार खटाळ , पोलीस उपनिरीक्षक अशोक तरंगे ,पोलीस कर्मचारी राजेंद्र मोरे ,वसंत गायकवाड ,दिनेश डोमाळे हेमंत आव्हाड ,गणेशभूषण गोसावी, चंद्रकांत जाधव ,शशिकांत नांगरे ,रवी नांदे ,विजय पाटील ,मोहन घुगे यांनी केली.


पुढील तपास सह-पोलीस निरीक्षक अजितकुमार खटाळ करीत आहेत .

...Read More

V. S. News
आळंदी ; एका अल्पवयीन मुलाने चार वर्षीय चिमुरडीवर केला बलात्कार

व्हीएस न्यूज - हिंगणघाट येथील महिलेवरील हल्ल्याची घटना ताजी असतानाच एका चार वर्षाच्या मुलीवरील बलात्काराच्या घटनेनं आळंदी हादरले. चार वर्षाची मुलगी बाहेर खेळत असताना 14 वर्षाच्या अल्पवयीन आरोपींनं तिला मोबाईल दाखवून घरात बोलावलं आणि अत्याचार केला. मुलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर झालेला प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ वर्षीय अल्पवयीन आरोपी आणि पीडित चिमुकली हे एकाच इमारतीत राहतात. आरोपी हा आई-वडील आणि भावासह तळ मजल्यावर राहतो, तर चार वर्षांची मुलगी पहिल्या मजल्यावर राहते. तळमजल्यावर चिमुकली एकटीच खेळत होती. तेव्हा आरोपीने मोबाईल दाखवून चिमुकलीला घरामध्ये बोलावले आणि तिच्याबरोबर बलात्कार केला. यानंतर आरोपी घरातून पळून गेला. दरम्यान, चिमुकली रडत घरी गेली. तिच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता. मुलगी पडली असं तिच्या आईला वाटलं. मात्र तिच्या शरीरावरील जखमा बघितल्यानंतर तिच्या सोबत काही अघटित घडलं असल्याचा संशय त्यांना आला. असं कोणी केलं आहे, असं आईनं मुलीला विचारलं. त्यावर ‘दादा’ ‘दादा’ इतकंच चिमुरडी म्हणत होती. त्यानंतर मुलीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वैद्यकीय अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चिमुकलीवर अद्यापही पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास घडली.

फोटो व्हायरल केल्यानं आरोपी सापडला-

घटनेनंतर अल्पवयीन आरोपी पळून घरातून पळून गेला. त्यानंतर जवळच्या शेतात जाऊन झोपला होता. तोपर्यंत आळंदी पोलिसांनी आरोपीच्या तपासाठी पथके रवाना केली. काहींनी त्याचा फोटो व्हायरल केला. दुसऱ्या दिवशी (4 फेब्रुवारी) आरोपी नाश्ता करण्यासाठी शेताच्या बाहेर आला तेव्हा एकाने पोलिसांना फोन करून आरोपीबद्दल माहिती दिली. पोलिसांनी तातडीने जाऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

...Read More

V. S. News
पिंपरी ; हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४व्या जयंती निमित्त भव्य सजावट व रक्तदान शिबिराचे आयोजन.

व्हीएस न्यूज - बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड शहर मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर यांच्या माध्यमातून पिंपरी येथिल शगून चौकात भव्य आकर्षित सजावट करून जयंती उत्सहात साजरी करण्यात आली.पिंपरी चिचवड च्या नागरिकांसाठी बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन करण्यासाठी चिंचवड शहर मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर यांनी सुंदर व्यासपीठ निर्माण करून दिले.

या वेळी शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबूकसवार, जिल्हाप्रमूख गजानन चिंचवडे, शहरप्रमूख योगेश बाबर, शिवसेना शहरसंघटिका उर्मिला काळभोर, चिंचवड विधानसभा संघटिका आनिता तूतारे, पिंपरी विधानसभा संघटिका सरिता साने, स्वरूपा खापेकर, वैशाली कूलथे, शिल्पा आनपण, वैभवी घोडे, शैला पाचपुते,अनूजा शिंदे, नयना होले, गूलाब गरूड, रोमी संधू, माधव मूळे, संतोष सौदनकर, सावल तोतानी, नितिन घोलप, राष्टवादी काँग्रेस उपाध्यक्ष रमेश नखाते, ग्राहक संरक्षण शहराध्यक्ष गणेश जाधव, वाहतूक आघाडी अध्यक्ष रूपेश यादव, शाम काळे, मिलींदराजे भोसले, दर्शन देसले व सर्व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मातोश्री सामाजिक संस्था कार्याध्यक्ष गोरख पाटील,उपाध्यक्ष प्रदिप दळवी, संघटक अंकूश कोळेकर,उपाध्यक्ष गणेश पाडूळे, माऊली जाधव, रविकिरण घटकार, विशाल बाविस्कर, मारुती म्हस्के, बाळासाहेब गायकवाड,दत्ता गिरी, अदिक भोसले, संजय गायके अक्षय घटकार, संतोष हिवाळे, दिपक भक्त, नारायण खूशलानी, जितेंद्र चौधरी, यांनी आयोजन केले.

रक्तदान शिबिराचे आयोजन...

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वाय सी एम हाॅस्पिटल मधील रक्तपेढी यांच्या माध्यमातून हा उपक्रम थेरगांव येथील शनीमंदिर येथे पार पडला.

या शिबिरात अनेक नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी सहभाग घेतला, मोठ्या संख्येने शिवसैनिक व मातोश्री सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी रक्तपेढीत ६० पिशव्या जमा करण्यात आले.

या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर, प्रहार संघटनेचे संजय गायखे,यांनी केले होते.या कार्यक्रमाला पिंपरीगावातील नगरसेवक संदिप वाघेरे यांनी देखील रक्तदान केले व कार्यक्रमाचे कौतूक केले.

या वेळी गूलाब गरूड, संदिप कापसे, नितीन घोलप, डाॅ योगेश कूलथे, सूदर्शन देसले, निखील येवले, स्वरूपा खापेकर, जिल्हा संघटिका अनिता तूतारे, चिंचवड विधानसभा संघटिका सौ शिल्पा आनपण, रहाटणी विभाग संघटिका वैशाली कूलथे, भाग्यश्री म्हस्के उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजक गोरख पाटील, बाळासाहेब गायकवाड, मारूती म्हस्के, रविकिरण घटकार, गणेश पाडूळे, माऊली जाधव, अधिक भोसले,नरसिंग माने, अक्षय घटकार, दिपक भक्त, दत्ता गिरी, यांनी केले.

...Read More

V. S. News
कामगारांच्या राष्ट्रीय संपात पुण्यात हजारोंचा सहभाग कामगार विरोधी कायदे रद्द करा : डॉ. कैलास कदम

व्हिएस न्युज - कंत्राटी कामगार कायदा, ‘निम’ कायदा असे कामगारांच्या न्याय हक्कांवर गदा आणणारे कायदे केंद्र सरकारने रद्द करावेत. 2016 साली केंद्र सरकारने लागू केलेला ‘एनसीएलटी’ (NATIONAL COMPANY OF LAW TRIBUNAL) कायदा रद्द करुन पुर्वीचाच ‘बीआयएफआर’ (BEAURO OF INDUSTRIAL FINANCIAL RESTRUCTCURE) हाच कायदा अंमलात आणावा. या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या मान्य झाल्याशिवाय कामगार संघटना संयुक्त कृती समिती माघार घेणार नाही. असे प्रतिपादन कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिले.

बुधवारी, देशातील सर्व संघटीत, असंघटीत कामगारांचा देशव्यापी सार्वत्रिक संप पुकारण्यात आला होता. या संपात देशभरातील बारा राष्ट्रीय कामगार संघटनांसह इंटक, आयटक, एचएमएस, सीटू, एआययूटीसीयू, टीयूसीसी, एसईडब्ल्यूए, एआयसीसीटीयू, एलपीएफ, यूटी यूसी, या देशभरातील संघटनांसह सर्व क्षेत्रातील संघटीत, असंघटीत कामगार संघटना देखील सहभागी झाल्या होत्या. यानिमित्त पुणे जिल्ह्यातून विविध ठिकाणांहून हजारो कामगार रॅलीने वाकडेवाडी पुणे येथील कामगार आयुक्त कार्यालयाजवळ जमले होते. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत लॉंग मार्च काढण्यात आला. यानंतर झालेल्या सभेत डॉ.कदम बोलत होते.

यावेळी माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, भारतीय कामगार सेनेचे जनरल सेक्रेटरी डॉ. रघुनाथ कुचिक, इंटकचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. म.वि.अकोलकर, सीटूचे पुणे जिल्हा अध्यक्ष अजित अभ्यंकर, विमा कामगार संघटनेचे चंद्रकांत तिवारी, श्रमिक एकता महासंघाचे दिलीप पवार, बँक एम्प्लॉइज फेडरेशन विश्वास जाधव, विमा कामगार संघटना चंद्रकांत तिवारी, नर्सेस फेडरेशनच्या सुमन टिळेकर, थिटे मॅडम, पुणे जिल्हा डिफेन्स कॉर्डिनेशनचे शशिकांत धुमाळ, बँक कर्मचारी संघाचे सुनिल देसाई, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाचे उदय भट, एआयबीईए संघटनेचे दिपक पाटील, पोस्टल एम्प्लॉइज युनियनचे रघुनाथ ससाणे, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे किशोर ढोकले, अंगणवाडी सेविका संघटनेच्या शुभा शमिम, पिसाळ मॅडम, नगरसेवक अजित दरेकर, माजी नगरसेवक मारुती भापकर, कॉंग्रेस पदाधिकारी संगीता तिवारी, सचिन आडेकर, रमेश अय्यर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जगताप, इंटक पुणे जिल्हा सेक्रेटरी मनोहर गडेकर, आयटकचे व्ही.व्ही. कदम, अनिल रोहम, सीटूचे पुणे जिल्हा सचिव वसंत पवार, कामगार नेते अनिल औटी, किरण मोघे, दत्ता येळवंडे, संतोष खेडेकर, संतोष पवार, स्वप्निल बारमुख, चारुदत्त वैरु, सुभाष वाघमारे, मोहन पोटे, नवनाथ नाईकनवरे, किरण भुजबळ, विठ्ठल गुंडाळ, सुरेश सरडे, विजय राणे, संदिप अहिरे, गिरीष मेंगे, शशिकांत महांगरे, गोरख दोरगे, वसंत बुचडे, डॉ. ज्ञानेश्वर मोटे, शांताराम कदम, यशवंत सुपेकर, सचिन कदम आदींसह हजारो कामगार बंधू भगिनी उपस्थित होते.

डॉ. रघुनाथ कुचिक म्हणाले की, बहुराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक देशात आली पाहिजे हीच कामगारांची भूमिका आहे. परंतू, कंपन्या उभ्या राहत असताना कामगार कायद्याचे व कामगारांच्या सुरक्षिततेचेदेखील पालन झाले पाहिजे. सेवा व उत्पादन क्षेत्रातील अनेक बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्या ‘कामगार’ ही संज्ञाच रद्द करण्याचे धोरण राबवित आहे. कामगारांचे हित डावलून भांडवलदारांसाठी केंद्र सरकार अनूकूल कायदे करीत आहे. उच्च शिक्षितांना मल्टी नॅशनल कंपन्या, व्यवस्थापक, सहव्यवस्थापक, अधिकारी, पर्यवेक्षक अशा पदांवर नेमूण त्यांना व्यवस्थापनात घेतात. त्यामुळे हे कामगार हक्कांपासून डावलले जातात. डॉ. बाबा आढाव म्हणाले की, कष्टकरी कामगारांची सामाजिक सुरक्षितता धोक्यात आली आहे. असंघटीत कामगारांना नोकरीची शाश्वती नाही. त्यांना किमान वेतन देखील मिळत नाही. हे केंद्र सरकार कष्टक-यांच्या घामाला योग्य मोल देत नाही. आता किमान वेतन 21 हजार रुपये मिळालेच पाहिजे. तोपर्यंत माघार नाही.

अजित अभ्यंकर म्हणाले की, बहुराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक देशात आली पाहिजे हीच कामगारांची भूमिका आहे. परंतू, कंपन्या उभ्या राहत असताना कामगार कायद्याचे व कामगारांच्या सुरक्षिततेचेदेखील पालन झाले पाहिजे. सेवा व उत्पादन क्षेत्रातील अनेक बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्या ‘कामगार’ ही संज्ञाच रद्द करण्याचे धोरण राबवित आहे. कामगारांचे हित डावलून भांडवलदारांसाठी केंद्र सरकार अनूकूल कायदे करीत आहे. उच्च शिक्षितांना मल्टी नॅशनल कंपन्या, व्यवस्थापक, सहव्यवस्थापक, अधिकारी, पर्यवेक्षक अशा पदांवर नेमूण त्यांना व्यवस्थापनात घेतात. त्यामुळे हे कामगार कामगार हक्कांपासून डावलले जातात. त्यांची सामाजिक सुरक्षितता, नोकरीची शाश्वती संपुष्टात येते. याला सर्व कामगार संघटनांचा विरोध आहे. याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठीच आजचा राष्ट्रीय संप पुकारण्यात आला आहे. देशातील सर्व प्रमुख कामगार संघटनांनी एकत्र येऊन गेली काही वर्षे सातत्याने अर्थव्यवस्थेचे जनविरोधी उदारीकरण, खाजगीकरण, बाजारीकरण तसेच रोजगाराचे कंत्राटीकरण यांच्या विरोधात संघर्ष चालविला आहे. अनेक अखिल भारतीय संप तसेच अन्य संघर्षांच्या कृती करून कामगार कष्टकर्‍यांना एका मंचावर आणून लढ्यात उतरविले आहे. त्याचा परिणाम म्हणून वरील प्रक्रियांची गती काही प्रमाणात रोखण्यात यश आलेले असले तरीदेखील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने आता मात्र सर्व मर्यादा सोडून देशाला आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावरच उभे केलेले आहे. बेरोजगारीच्या खाईमध्ये देशाची तरूण पिढी तसेच कोट्यावधी श्रमिक भरडला जात आहे.

या सभेनंतर कामगार संघटना संयुक्त कृतीसमितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्यासह शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी जयश्री कटारिया यांना निवेदन दिले.

...Read More

V. S. News
विरोधकांचे आरोप बिनबुडाचे : बबन झिंजूर्डे स्व.शंकर आण्णा गावडे कर्मचारी महासंघ पॅनेल (निवडणूक चिन्ह बॅट)

व्हिएस न्युज - पिंपरी चिंचवड महानगपालिका कर्मचारी महासंघाची दि. १८/०७/२०१९ च्या मा.औदयोगिक न्यायालयाच्या निर्णयानुसार १९ वर्षामध्ये पहिल्यांदा गुप्त मतदान पध्दतीने निवडणूक जाहिर करण्यात आली आहे. सदर निवडणूक केवळ एका पदाधिका-यास सन २०१८ साली खजिनदार पद न मिळाल्याने मा.कामगार आयुक्त पुणे यांचे परवानगीने पदाबाबतचा वाद मा.औदयोगिक न्यायालयात उपस्थित करणेत आला होता.

जे कर्मचारी महासंघाच्या कार्यपध्दतीवर आरोप करतात तेच महाशय मागील ११ वर्ष “खजिनदार” पदावर काम करित होते. पुन्हा त्यांना खजिनदार पद पाहिजे होते. ते न मिळाल्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला आणि त्यांच्या हेकेखोरपणामुळे महासंघाची निवडणूक लागली. या निवडणूकीसाठी होणारा सर्व खर्च कर्मचारी महासंघाच्या खात्यातुन म्हणजेच कर्मचा-यांच्या वर्गणीतून होणार आहे. हे एक प्रकारे कर्मचा-यांचे आर्थिक नुकसान आहे. मा.औदयोगिक न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया राबविणेसाठी मा.उपनिबंधक कामगार आयुक्त कार्यालय पुणे यांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे. व त्यांनी ३ महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पुर्ण करावी असे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार निवडणूक आधिका-यांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करित कर्मचारी महासंघाचे बुक्स ऑफ अकांऊंट, सभासद नोंद यादी ताब्यात घेऊन प्रक्रिया सुरु केली.

कोणत्याही संस्थेच्या निवडणूका होतात त्याचा खर्च त्या संस्थेच्या खात्यातुन केला जातो. निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत ते पदाधिकारी काळजीवाहू म्हणून काम पाहतात. सर्व निवडणूकांमध्ये मतदार/सभासद नोंद यादी असते तीच ग्राहय धरली जाते. संस्थेचे आर्थिक व्यवहार प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत स्थगित केले जातात. या कायदेशीर बाबींना विरोधक प्रशासक नेमला, भ्रष्टाचार झाला असा चुकीचा आरोप करित आहेत. सन २०१८-१९ पर्यंतचे कर्मचारी महासंघाचे लेखा परिक्षण झाले असून टिका करणा-यांच्या कार्यकालापर्यंतचे लेखापरिक्षण पुर्ण झालेले आहेत. त्यात कोणतेही आक्षेप नाहीत. विरोधकांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत ते आम्ही फेटाळत आहोत, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ निवडणुक प्रचारार्थ स्व. शंकर (आण्णा) गावडे कर्मचारी महासंघ पॅनलच्या वतीने शुक्रवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पॅनल प्रमुख शशिकांत उर्फ बबन झिंजूर्डे यांनी केले.

महासंघाचे कामकाज

सदर निवडणूकीमध्ये गेल्या १९ वर्षापासुन अध्यक्ष श्री.शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांचे अनेक प्रश्न कामगारांच्या एकजुटीने सोडविण्यात यश मिळालेले आहे. सन १९९९ साली स्व.शंकर आण्णा गावडे, बाबा बागल, शशिकांत झिंजुर्डे व इतर बरेच कार्यकर्ते यांचे एका विचारांमुळे व १४ संघटनांचे एकत्रिकरण करुन मान्यता प्राप्त कर्मचारी महासंघाची स्थापना सन २००० साली करण्यात आली आहे. ५ वा वेतन आयोग १०% वेतनश्रेणी, ६ वा वेतन आयोग, ७ वा वेतन आयोग या आर्थिक फायदयांच्या मुद्यांसह आरोग्य कर्मचा-यांचे प्रश्न, पदोन्नतीबाबत सततचा पाठपुरावा कामगारांसाठी आरोग्यदायी वैद्यकीय योजना, कर्मचा-यांच्या सेवा प्रवेश व शर्ती तयार करुन घेण्यास प्रशासन व पदाधिका-यांबरोबर समन्वय साधणे व सदर अहवाल शासनाकडे पाठविणे व मंजुरीबाबत पाठपुरावा करणे, राज्यातील महानगरपालिकेंच्या जकातीचा प्रश्न सोडविणे, लाड/अनुकंपा समितीच्या शिफारशींच्या बाबत पाठपुरावा करणे इ. व इतरही अनेक प्रश्न सोडविण्यात यश प्राप्त झाले आहे.

धन्वंतरी स्वास्थ्य योजना

कामगारांच्या जिव्हाळयाची असणारी धन्वंतरी स्वास्थ्य योजना ही सुरु करणेमध्ये कर्मचारी महासंघाने २००७ पासुन सातत्याने प्रयत्न केले होते. त्यास सप्टेंबर २०१५ ला ही योजना सुरु करणेस यश प्राप्त झाले आहे. धन्वंतरी स्वास्थ्य योजना अत्यंत प्रभावीपणे व चांगल्या पध्दतीने तयार केली गेली होती. तथापि सन २०१५ ते नोव्हेंबर २०१९ अखेर जवळपास १८,४५६ लाभार्थींवर रक्कम रु.७९,८३,३०,३५२/- इतका खर्च झालेला आहे. यापैकी अदयापही ११ कोटींची बिले अदा करणे बाकी आहे. सदर खर्चाचा विचार करता तात्कालीन मुख्य लेखापरिक्षक व मुख्य लेखा अधिकारी यांनी समिती योजनेतील सभेमध्ये सुचविलेप्रमाणे सदरची योजना विमा कंपनीमार्फत राबविणेबाबतचा प्रस्ताव पुढे आला. त्यानुसार श्री.शशिकांत झिंजुर्डे यांनी “विमा कंपनीने धन्वंतरी योजनेच्या अटी शर्तींवरच ही योजना विमा कंपन्यांनी राबविणेत यावी यासाठी विनंती केली”. धन्वंतरीमध्ये दरवर्षी अंदाजे २० कोटीपर्यंतचा खर्च होत असल्याने निविदा पध्दतीने मध्यस्थाची नेमणूक करुन त्यांचेमार्फत विमा कंपन्यांना धन्वंतरी योजनेच्या धर्तीवर विमा सुविधा पुरविणेकामी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल प्रसिध्द करणेत आलेले होते. त्यामध्ये खालीलप्रमाणे जास्तीच्या वैद्यकीय सुविधा अंर्तभुत करणेत आलेल्या आहेत.

कर्ममाचारी व कुटूंबियांसाठी ओपीडी सुविधा.

1) प्रति कुटूंब र.रु.५०००/- दुर्धर आजारांसाठी औषधे मिळतील. तसेच याव्यतिरिक्त मोठया आजारांसाठी अधिक आवश्यकता असल्यास मा.आयुक्त सो यांचे मान्यतेने र.रु.१ कोटी बफरमधून औषधे देण्यात येतील.

2) प्रति कुटूंब वार्षिक र.रु.३ लाखांचा विमा उतरविणेत आलेला आहे. तथापि र.रु.३ लाखावरील जीवघेण्या आजारासाठी र.रु.५ कोटी बफरमधून मा.आयुक्त सो यांचे मान्यतेने उपचार मिळणार.

3) सेवेतील अधिकारी व कर्मचा-यांसाठी र.रु.५ लाखाचा अपघाती विमा.

4) रुग्णालयातुन डिसचार्ज झालेनंतर आवश्यकता असलेस ३० ते ६० दिवसांची औषधे योजनेतून उपलब्ध होणार.

5) बोन मॅरो ट्रान्स्प्लांन्टच्या सुविधेसह इतरही दुर्धर आजारांचा यात समावेश आहे.

6) शिक्षण मंडळातील सेवेतील व सेवानिवृत्त अंदाजे १८०० ते १९०० शिक्षकांचा विमा योजनेमध्ये समावेश करणेत आलेला आहे.

7) सदर वैद्यकीय उपचार हयात असेपर्यंत असून त्यात सेवानिवृत्तांना वयाची अट नाही.

कामगार भवन

कामगार भवनाच्या उभारणीसाठी मनपाकडून जागा प्राप्त झाली असून कामगारांच्या बोनसमधून सन २००४ - ०५ पासून कपात केलेली रक्कम बांधकामासाठी वापरणेत येणार आहेत. सदर भवनासाठी कै.शंकर आण्णा गावडे स्मृती भवन समिती स्थापन केलेली असून त्यामध्ये महापालिकेतील पदसिध्द अतिरीक्त आयुक्त, सहा. आयुक्त प्रशासन, सहा.आयुक्त भुमी जिंदगी, सहा.आयुक्त कामगार कल्याण विभाग, मुख्य लेखाधिकारी असे पाच व महासंघाचे अध्यक्ष, खजिनदार, महासचिव व एक कार्यकर्ता असे चार, मिळून एकूण नऊ लोकांची समिती रजिस्टर केलेली आहे. यामध्ये महापालिकेतील अभियंत्याच्या मदतीने सदर भवनाचे डीएसआर रेटप्रमाणे इस्टिमेट तयार करुन राज्यातील तीन प्रमुख वर्तमानपत्रामध्ये निविदा प्रसिध्द करुन, त्यानुसार एल १ निविदा धारकास १० टक्के कमी दराने काम देण्यात आलेले आहे.

सातवा वेतन आयोग

सातवा वेतन आयोगामध्ये सहाव्या वेतन आयोगाशी समकक्ष वेतनश्रेण्या तयार करणेत आल्या असून कर्मचा-यांच्या विविध भत्यांमध्ये वाढ करुन सदरचा प्रस्ताव शासनाकडे जुन २०१९ ला मान्यतेकामी पाठविणेत आलेला होता. त्याबाबत श्री.शशिकांत झिंजुर्डे यांनी सतत पाठपुरावा करुन वेतन श्रेण्या मंजुर करुन घेऊन वेतन आयोग लागू करुन घेतला आहे. सदर वेतन आयोगातील फरक कर्मचा-यांना रोख स्वरुपात १ जानेवारी व १ जुलै याप्रमाणे ५ हप्त्यांमध्ये देणेबाबत मान्यता घेतली आहे. याकामी अर्थसंकल्पात फरकासाठी तरतुदही करणेत आलेली आहे. याचा लाभ सेवेतील व सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी तसेच शिक्षण मंडळातील सेवेतील व सेवानिवृत्त शिक्षकांसह अंदाजे ९ हजारापेक्षा जास्त कर्मचा-यांना मिळणार आहे.

कर्मचा-यांवर ज्यांनी ही निवडणूक लादली आहे ते कर्मचारी महासंघाचे माजी खजिनदार महासंघाविरोधात सोशल मिडीया, प्रिंट किंवा इलेक्ट्रानिक मिडियाद्वारे कामगारांना चुकीची माहिती देऊन दिशाभुल करत आहे. हिच बाब चुकीची व कर्मचारी महासंघाच्या प्रतिमेस काळीमा फासणारी आहे. त्यांच्या विरोधात आम्ही सर्वजण स्व.शंकर आण्णा गावडे कर्मचारी महासंघ पॅनेलच्या माध्यमातुन ही निवडणूक लढवत आहोत. आमचे पुर्ण पॅनेल बहुमताने निवडून येईल याचा आम्हाला विश्वास आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ निवडणूक स्व. शंकर (आण्णा) गावडे कर्मचारी महासंघ पॅनल अधिकृत उमेदवार निवडणूक चिन्ह बॅट अध्यक्ष श्री. झिंजूर्डे शशिकांत उर्फ बबनराव खंडू, उपाध्यक्ष श्री. वाघेरे महाद्रंग नामदेव, सरचिटणीस श्रीमती जोशी चारूशिला किशोर, चिटणीस श्री. येळवंडे शिवाजी बाबूराव, सहसचिव श्री. लांडगे संजय ज्ञानोबा, खजिनदार श्री. संमगिर नितीन संपत, प्रमुख संघटक श्री. माछरे मनोज प्रितमसिंग, संघटक श्रीमती सुकाळे सीमा अनिल, कार्यकारिणी सभासद - श्री. भूजबळ विशाल बाळासाहेब, श्री. चिंचवडे दिगंबर हरीभाऊ, श्री. गावडे चंद्रशेखर शंकर (आण्णा), श्री. राक्षे संजीव प्रल्हाद, श्री. कापसे संजय किसन, श्री. वाखारे मुकुंद विश्वनाथ, श्री. गुंजाळ दिलीप शिवराम, श्री. गंगावणे उत्तम सहादू, श्री. बेळगावकर सुनील सिद्धाप्पा, श्री. बांदल उमेश बाळासाहेब, श्री. मातेरे नथा नारायण, श्री. बोत्रे महादेव तुकाराम, श्री. कलापुरे मंगेश पोपट. कर्मचारी हिताकरीता महासंघाच्या एकविचाराच्या संपूर्ण पॅनलला बहुमताने निवडून देण्याचे आवाहन पॅनल प्रमुख शशिकांत उर्फ बबन झिंजूर्डे यांनी केले.

मतदान शनिवार, दि, 11 जानेवारी 2020 सकाळी 7 ते दुपारी 4 वा. पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत पिंपरी येथे होणार आहे.

...Read More

V. S. News
निगडीत नक्षञांची काव्यमैफल बहारदार कवितांनी रंगली-

व्हिएस न्युज - नक्षञाचं देणं काव्यमंच,निगडी विभागा व साहित्य सारखी कलामंच यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी निमित्त"राज्यस्तरीय काव्यमैफल"चे आयोजन करण्यात आले होते.निगडी येथील साविञीबाई फुले सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी संपुर्ण महाराष्ट्रातील कवी कवयिञींनी उपस्थित राहुन कविता सादर केल्या.

कार्यक्रमाचे उदघाटक प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे( राष्टीय अध्यक्ष नक्षञाचं देणं काव्यमंच),कार्यक्रम अध्यक्ष ज्येष्ठ कायदेतज्ञ व कविवर्य अॅड.बाळासाहेब तोरस्कर (ठाणे),प्रेम कवी सुरेश धोञे(अध्यक्ष साहित्य सारखी कलामंच),कविवर्या सौ योगिता कोठेकर,(निगडी विभागप्रमुख)समाजसेवक प्रभाकर ढोमसे(अध्यक्ष जुन्नर तालुका मिञ मंडळ,पुणे), कवी बी.एस.बनसोडे,कवी अरुण कटारे,पञकार दत्ताञय परळकर,कवी अशोक कोठारी,कवयिञी माधुरी चौधरी इ.मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम अध्यक्ष अॅड बाळासाहेब तोरस्कर म्हणाले,"काव्यमंचचे कार्य कौतुकास पाञ आहे.कवींना समाजाने जपले पाहिजे.कवी हा समाजाचा आरसा आहे.कविता म्हणजे विषय,आशय,आणि अभिव्यक्ती यांचा ञिवेणी संगम असतो.कविता अंर्तमनातुन निर्माण झाली पाहीजे."

विजय कांबळे,आत्माराम घारे,संतोष फंड,अरुण कांबळे,योगेश नरवडे,संगमेश्वर बल्लापुरे,अमर तिकोणे,नंदकुमार गोपाळे,मनोज धूरंदर,समीर बने,गीतांजली सटाणेकर,रमेश जाधव,आनंद गायकवाड,विवेकानंद बनसोडे,प्रमोद सुर्यवंशी,कौतिक पाटील,शामराव सुतार,राजश्री बोहरा,समाधान गायकवाड,हरीश्चंद्र धिवार,अलका जोशी,संतोष गाढवे,वर्षा जगताप,आर्या घरवडेकर,महेश कुलकर्णी,सुरेश पाटोळे,अमर भिसे इ. रचना सादर केल्या.प्रत्येक सहभागींना सन्मानपञ देण्यात आले.सर्वांना विनामूल्य सहभाग देण्यात आला.

कार्यक्रमाचे सुञसंचालन जगदीप वनशिव, रुपाली अवचरे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी वादळकार यांनी केले.संयोजन कविवर्या योगिता कोठेकर ,प्रेमकवी सुरेश धोञे यांनी केले. विवेकानंद बनसोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले .विश्वगीत पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

...Read More

V. S. News
अण्णासाहेब मगर स्टेडियमचा पीपीपी तत्वावर पुनर्विकास बेकायदेशीर : भारती चव्हाण

व्हिएस न्युज - अण्णासाहेब मगर स्टेडियमची जागा कामगार कल्याण मंडळाच्या मालकी हक्काची आहे. ही जागा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला मिळावी, यासाठी गेल्या 27 वर्षापासून कामगार कल्याण मंडळ प्रयत्न करीत आहे. दरम्यानच्या काळात या जागेच्या मोबदल्यात पर्यायी जागा देण्याबाबत चर्चा व बैठकांचा देखावा मनपा प्रशासन करीत आहे. मनपाच्या वतीने कामगार कल्याण मंडळाशी जागा ताब्यात देण्याबाबत व पर्यायी जागा व पैशांबाबत बैठका सुरु असताना कामगार कल्याण मंडळाला विश्वासात न घेता त्यांचा हक्क डावलून मनपा प्रशासनाने बेकायदेशीररित्या अण्णासाहेब मगर स्टेडियम पाडण्याबाबत निविदा प्रक्रिया सुरु केली आहे.

मनपा प्रशासनाची ही भूमिका पूर्णत: बेकायदेशीर आहे. ही निविदा प्रक्रिया ताबडतोब थांबवावी अन्यथा आगामी 15 दिवसात तीव्र आंदोलन करू व याबाबत न्यायालयात दावा दाखल करू असे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ व केंद्रीय कामगार मंडळाच्या माजी सदस्या भारती चव्हाण यांनी सोमवारी पिंपरी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

या जागेवर उभारण्यात आलेला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प पुर्णत: बेकायदेशीर आहे. तसेच अण्णासाहेब मगर स्टेडियमचे पीपीपी तत्वावर पुर्नविकास करणे हे देखील बेकायदेशीर आहे याबाबत न्यायालयीन लढा सुरु करण्यात येत आहे. कष्टकरी कामगारांच्या श्रमातून उभी राहिलेल्या या नगरीत कामगारांचेच हक्क प्रशासन डावलत आहे. मनपा प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणाविरोधात तीव्र धरणे आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात शहरातील सर्व कामगार, कामगार नेते आणि कामगार संघटनांनी सहभागी व्हावे असेही आवाहन भारती चव्हाण यांनी केले.

यावेळी कामगार प्रतिनिधी स्वानंद राजपाठक, तानाजी एकोंडे, भरत शिंदे, गोरखनाथ वाघमारे, अण्णा जोगदंड, राजेश हजारे आदी उपस्थित होते. मनपा प्रशासनाने कामगार कल्याण मंडळाबरोबर केलेल्या कराराची पूर्तता होईपर्यंत स्टेडियमबाबत कोणताही निर्णय मनपा प्रशासनाने घेऊ नये. त्यास कामगार कल्याण मंडळाचा व सर्व कामगारांचा विरोध आहे. तसेच पीपीपी तत्वावर स्टेडियमचा पुनर्विकास करण्यासही विरोध आहे याची मनपाने दखल घ्यावी.

वास्तविक 1992 पासून स्टेडियमचा ताबा घेवून मनपाने यावर एक रुपयाही खर्च न करता देखभाल केली नाही, त्यामुळे स्टेडियमची दुरावस्था झाली आहे. आज स्टेडियमचा वापर राडारोडा व भंगार टाकण्यासाठी केला जात आहे. गेली 27 वर्षे या वास्तुमधून फक्त भाड्याचे उत्पन्न घेण्याचे काम मनपाने केले आहे. पर्यायाने कामगारांच्या घामाच्या पैशातून कामगार कल्याण निधी मधूनउभ्या राहिलेल्या वास्तुचा दुरुपयोग आणि दुरावस्था मनपाने केली आहे. पिंपरी चिंचवडमधून सर्वात जास्त कामगार निधी मंडळाकडे जमा होतो. या निधीमधूनच मुंबई, पुणे, नागपूर, अकोला, अमरावती, नाशिक, औरंगाबाद येथे भव्य कामगार प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी कामगार आणि कामगार कुटुंबियांसाठी प्रशिक्षण केंद्र, सभागृह, वसतिगृह, अभ्यासिका, जलतरण तलाव, ग्रंथालय, मनोरंजन केंद्र, नाटयगृह अशा प्रकारच्या अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात.

पिंपरी चिंचवड मनपाच्या आडमुठया धोरणामुळे पिंपरी चिंचवड सारख्या कामगारनगरीतच कामगार आणि कामगार कुटुंबीय यांच्यावर अन्याय केला जात आहे. त्यांना मुलभूत हक्क आणि अधिकारांपासूनपासून वंचित रहावे लागत आहे. कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम हस्तांतरणाबाबत पिंपरी चिंचवड मनपा आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांचे दरम्यान 1992 मध्ये हस्तांतरण करार करण्यात आला. का

कल्याण मंडळाने पिंपरी नेहरूनगनर येथे 28 एकर जागेमध्ये उभारण्यात आलेली कामगार स्टेडियमची भव्य वास्तु मनपाला हस्तांतरित केली. पिंपरी चिंचवडशहरात कामगारनगरीमध्ये कामगार आणि कामगार कुटुंबियांच्या सर्वांगीण विकासासाठी या भव्य वास्तुची निर्मिती करण्यात आली आहे. काही कारणास्तव हे स्टेडियम पिंपरी चिंचवड मनपास हस्तांतरीत करावे आणि त्या बदल्यात एक कोटी रुपये आणि शहरात पाच ठिकाणी सुमारे 6 एकर जागा देण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळासमोर ठेवला. त्या प्रस्तावानुसारच 1992मध्ये स्टेडियम मनपाकडे हस्तांतरीत करण्यात आले.

या करारामध्ये नमुद केल्यानुसार एक कोटी रुपये आणि दळवीनगर चिंचवड येथील 20000 चौ. फुट जागा मंडळाला देण्यात आली. उर्वरित मोशी सेक्टर नं. 5 मध्ये 2 एकर, प्राधिकरण सेक्टर 25 मध्ये 25000 चौ. फुट, सेक्टर 26 मध्ये एक एकर आणि थेरगांव सर्व्हे न. 9 मध्ये दिड एकर जागा देण्याचे ठरले होते. परंतु या जागा मनपाच्या मालकीच्या नाहीत. त्यामुळे हस्तांतर होवू शकत नाही. कामगार कल्याण मंडळाच्या मागणीनुसार मंडळाला प्रकल्प उभारणीसाठी मनपाच्या ताब्यातील आणि विकसनाकरिता बांधकाम चटई क्षेत्र उपलब्ध असणाऱ्या जागा मिळणे गरजेचे आहे. त्याबाबत वेळोवेळी मनपाला कळविण्यात आले आहे.

1993 पासून मा. कामगार मंत्री एकनाथराव गायकवाड, मा. कल्याण आयुक्‍त, मा. मंडळ अध्यक्ष, मंडळ सदस्या भारती चव्हाण यांनी सातत्याने मनपाबरोबर पत्रव्यवहार, बैठका आणि चर्चा करुनही संबंधीत जागा किंवा त्या जागांच्या ऐवजी दुसऱ्या जागा मनपाकडून उपलब्ध करुन देण्यात आल्या नाहीत.

2002 च्या कालावधीमध्ये मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष कामगार मंत्री मा. डॉ. हेमंतराव देशमुख, मा. कल्याण आयुक्‍त आणि मा. कल्याण सदस्या भारती चव्हाण यांच्यासोबत बैठका होवून काही जागा दाखविण्यात आल्या होत्या. मंडळाने संमती देऊनही संबंधीत जागांपैकी कोणत्याही जागेचे हस्तांतरण करण्यासंदर्भात अद्यापपर्यंत काहीही कारवाई झालेली नाही. मनपाकडून जागा देण्यासंदर्भात नेहमीच टाळाटाळ आणि फसवणूकच करण्यात आली असा आमचा स्पष्ट आरोप आहे.

2005 मध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार साहेब यांनी याबाबत लक्ष घालावे. यासाठी भारती चव्हाण, अरुण बोऱ्हाडे, शंकरराव गावडे, पी.बी. प्रभु, के.एस. काळभोर, व्ही. बी. पावसकर, बी. बी. इंगवले, आर. के. सोंडकर, किशोर ढोकळे, शिवाजी शेडगे, यशवंत भोसले, शेखर सावंत, सुभाष सरिन, विनायक घोरपडे, अरुण गराडे, बाळासाहेब तेलंगी, नामदेवराव गोलांडे, अरविंद प्रभुणे, दिनेश परपुळकर, बहिरट, एन. एन. जगदाळे, पी. एन. बारहाते, ए. आर. पाटील, हरिभाऊ चिंचवडे, आनंद ठकार आदी प्रमुख कामगार नेत्यांनी पवार साहेबांना विनंती केली होती.

2008 मध्ये ठराव क्र. 5693/ 2005 नुसार मंडळास 6 एकर जमिन देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

2006 मध्ये काही जागा देण्याबाबतची चर्चा व बैठक मंडळ सदस्या भारती चव्हाण आणि भूमी जिंदगी विभाग यांचेबरोबर होवून काही जागा प्रस्तावित केल्या गेल्या. या जागा ताब्यात देण्याबाबत त्वरित कार्यवाही व्हावी याबाबतचे पत्र मा. कल्याण आयुक्‍त यांनी मनपा आयुक्‍त यांना पाठविले होते.

2018 मध्ये मनपाकडून जागा देण्याबाबत काही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील सर्व गुणवंत कामगारांनी एकत्र येवून भारती चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद घेवून कामगार स्टेडियम मंडळाच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यानंतर पुन्हा पाठपुरावा करुनही उर्वरित चार जागा देण्यास मनपा जाणून बुजून टाळाटाळ करत आहे. स्टेडीयमच्या जागेसंदर्भातील शेवटची बेठक सप्टेंबर 2019 मध्ये सहाय्यक आयुक्‍त पवार, अतिरिक्‍त आयुक्‍त चितळे आणि भारती चव्हाण व कल्याण उपआयुक्त समाधान भोसले यांचे दरम्यान झाली. त्यानंतर ही जागा मिळणे संदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

एकीकडे चर्चा व बैठकांचे गु-हाळ चालू ठेवायचे आणि कामगार कल्याण मंडळ व कामगारांना विश्वासात न घेता स्टेडियमच्या पुनर्विकासाबाबत निविदा प्रक्रिया राबवून कामगारांना अंधारात ठेवायचे. ही मनपा प्रशासनाची भूमिका पूर्णत: बेकायदेशीर व संशयास्पद आहे. मनपाने पीपीपी तत्वावर स्टेडियमचा पुनर्विकास करण्याचे जाहीर केले. वास्तुविशारदाची नेमणुक करुन आराखडा तयार करण्याचे काम देण्यात आले आणि स्टेडियम भूईसपाट करण्याची निविदा मागविण्यात आली. मनपा आणि कामगार कल्याण मंडळ यांच्यामधील करारातील अटींची पूर्तता न झाल्यामुळे कराराचा भंग झाला आहे.

जो पर्यंत कराराची पूर्तता होत नाही, मंडळास जागांचे हस्तांतरण होत नाही तोपर्यंत मनपा स्टेडियमच्या जागेवर मालकी हक्क प्रस्थापित करु शकत नाही. म्हणजेच स्टेडियमबाबत कोणताही पुनर्विकासाचा निर्णय मनपा प्रशासन घेऊ शकत नाही किवा निविदादेखील मंजूर करु शकत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे स्टेडियमच्या जागेची मनपाची मालकी वादातीत असताना विठ्ठलनगर झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्प स्टेडियमच्या जागेत उभारण्यात आला आहे ही बाब बेकायदेशीर आहे. त्याबाबत तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल व तशी नोटीस लवकरच मनपा प्रशासनावर बजावण्यात येईल. आजपर्यंत पिंपरी चिंचवड मनपाने जागांचे हस्तांतरण केले नाही. त्यामुळे कामगार उपयोगी प्रकल्प मंडळाला विकसित करता आले नाहीत.

मंडळाच्या वतीने उभारण्यात येणारे प्रकल्प कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी सेवा, सुविधा उपलब्ध करून देणारे आहेत. त्याचा कोणताही आर्थिक भार मनपाच्या तिजोरीवर पडणार नाही. असे असतानाही मनपा प्रशासन आकसबुद्धीने जागा ताब्यात देण्याबाबत आडमुठे धोरण राबवित आहे. याबाबत आता ताबडतोब कार्यवाही व्हावी यासाठी हा शेवटचा इशारा देण्यात येत आहे, असे भारती चव्हाण यांनी नमूद केले. प्रामुख्याने आण्णासाहेब मगर स्टेडियमची झालेली दुरावस्था पाहता स्टेडियमची मालकी कामगार कल्याण मंडळास देण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे.

तसेच झालेल्या बेकायदेशीर झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्पावर आणि स्टेडीयमच्या पीपीपी तत्वावर पुर्नविकास करण्याच्या प्रक्रियेविरोधात न्यायालयीन लढा सुरु करण्यात येत आहे.

...Read More

V. S. News
प्रियंका रेड्डी प्रकरण: आरोपींना ताब्यात घेण्याआधीच पोलिसांनी केला एन्काऊंटरचा प्लान

व्हिएस न्युज - तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये सामूहिक बलात्कारानंतर महिला पशुवैद्यकीय डॉक्टरची हत्या आणि त्यानंतर मृतदेह जाळल्याच्या घटनेनंतर लोक संतप्त झाले होते. लोक पोलिसांच्या सुरुवातीच्या कारवाईवर प्रचंड नाराज होते. याशिवाय पोलिसांनी एफआयआर नोंदविण्यात उशीर केल्याचा आरोपही पीडितेच्या कुटुंबीयांनी केला होता. त्यामुळे पोलिसांवर प्रचंड दबाव होता. अशात लोकांचा रोष शांत करण्यासाठी पोलिसांनी चकमक घडवून आणली आणि आरोपींना ठार केलं असल्याचं सांगण्यात येत आहे.

एन्काऊंटरचा प्लान!

इंग्रजी वृत्तपत्र डेक्कन क्रॉनिकल यांनी एका अहवालात दावा केला आहे की, घटनेच्या 24 तासांनंतर पोलिसांनी इतर पर्यायांचा विचार करण्यास सुरवात केली. 30 नोव्हेंबरला वर्तमानपत्राने हा अहवाल प्रसिद्ध केला. या प्रकरणात पोलिसांव्यतिरिक्त मुख्यमंत्री केसीआर यांच्यावरही राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. वर्तमानपत्रानुसार, आरोपींना अटक होण्यापूर्वी पोलिस आयुक्त सी.पी. सज्जनार यांनी आरोपीला धडा शिकवण्यासाठी चर्चा केली होती.

...Read More

V. S. News
दापोडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ दहा लाखांची मदत करा : आमदार बनसोडे

व्हिएस न्युज - दापोडी येथील दुर्घटनेत मृत्यू झालेले मजूर आणि जवानाच्या कुटुंबियांना तत्काळ दहा लाखांची आर्थिक मदत करण्यात यावी. तसेच या कामात बेपर्वाई करणा-या ठेकेदाराला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात मलनिस्सारणवाहिनी टाकण्याची कामे सुरु केली आहेत. त्यानुसार दापोडी येथे पाईपलाइन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्डयात मजूर नादप्पा जमादार पडले. त्यांना वाचविण्यासाठी खड्डयात उतरलेले महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान विशाल जाधव यांनी प्रयत्न केला. या घटनेत मजूर जमादार व कर्तव्य बजावत असताना विशाल जाधव यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही दुर्घटना संबंधित ठेकेदाराने व मनपा अधिका-याने सुरक्षिततेच्या उपायांकडे दुर्लक्ष केल्यामुळे झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते.

या ठेकेदारास कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे व मजूर जमादार आणि जवान विशाल जाधव यांच्या कुटुंबियांना महानगरपालिकेने तातडीची मदत म्हणून दहा लाख रूपये द्यावेत. तसेच त्यांच्या वारसांना महानगरपालिकेच्या सेवेत नोकरीस घ्यावे. घडलेल्या दुर्घटनेत महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग कुचकामी ठरला आहे. अशा दुर्घटना भविष्यात घडू नयेत यासाठी शहरात सुरु असणा-या विकास प्रकल्पांच्या ठिकाणी केंद्र व राज्य सरकारने आखून दिलेल्या सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जावे. यासाठी आयुक्तांनी गरज भासल्यास स्वतंत्र अधिका-यांची नेमणूक करावी.

सुरक्षाविषयक नियमांकडे दुर्लक्ष करणा-या ठेकेदार व अधिका-यांवर कारवाई करावी तसेच महिन्यातून किमान एक वेळ तरी आयुक्तांनी काम सुरु असणा-या प्रकल्पांचा सुरक्षाविषयक आढावा घ्यावा. आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा प्रशासनावर अंकुश नसल्यामुळे अनेक अधिकारी बेजबाबदारपणे वागतात.

या दुर्घटनेबाबत आपण आगामी हिवाळी अधिवेशनात विधीमंडळात प्रश्न उपस्थित करू असेही आमदार अण्णा बनसोडे यांनी म्हटले आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!