Breaking News

जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम |
V. S. News
पिंपरी ; व्हॉटसअप वर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपमानास्पद शब्द वापरून बदनामीकारक स्टेटस ठेवणारा अटक,पिंपरी पोलिसांची कारवाई.

व्हिएस न्युज - महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमानास्पद शब्द वापरून मोबाईल व्हाट्सअप वर बदनामीकारक स्टेटस ठेवून दोन समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची गणेश राजू गायकवाड (34)( रा. नाणेकर चाळ, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पिंपरी पोलिसांनी दिनांक ०३/१२ रोजी आरोपीला तत्काळ अटक करून भा.द.वी कलम 500, 505(२) प्रमाणे गुन्हा(गुन्हा रजि क्र ११६८/१९)दाखल केला आहे.

महापरिनिर्वाण दिना चे गांभीर्य लक्षात घेता व स्टेटस् मध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वापरलेले अपमानास्पद शब्दांचे पडसाद अन्य ठिकाणी उमटून दोन समाजात द्वेष निर्माण होऊ नये म्हणून अतिशय गोपनीय पद्धतीने व तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे काम पिंपरी पोलिसांनी केले.

प्रकाश केनाराम चौधरी (26) (रा. गीता कॉम्प्लेक्स नेहरूनगर पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रकाश चौधरी पिंपरी येथील गोकुळ हॉटेल शेजारील एका मेडीकल मध्ये नोकरी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निमगिरे करत आहेत.

...Read More

V. S. News
पिंपरी चिंचवड कॉंग्रेसच्या वतीने पाणी कपातीच्या विरोधात महापालिकेवर मोर्चा

टँकरचे बील सोसायट्यांच्या माथी मारण्याऐवजी महापालिकेने भरावे : सचिन साठे

व्हिएस न्युज - राज्यामध्ये नुकत्याच स्थापन झालेल्या महाविकास आघाडीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नागरिकांचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न सोडवावा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आहे. टँकर लॉबीला पोसण्यासाठी आयुक्तांनी नागरिकांवर दिवसाआड पाणी कपात लादली आहे. ‘धरण घशाला, कोरड उशाला’ अशी शहरातील करदात्या नागरिकांची अवस्था झाली आहे. सत्ताधा-यांचे आयुक्तांवर नियंत्रण नाही आणि आयुक्तांचा प्रशासनावर अंकुश नाही. नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर अतिक्रमण करणा-या आणि निष्क़्रीय प्रशासनाला पाठीशी घालणा-या आयुक्त श्रावण हर्डीकर यांची ताबडतोब बदली करावी व या विषयाशी संबंधित जबाबदार अधिका-यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केली.

सोमवारी (दि. 2 डिसेंबर) पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने पाणी कपातीच्या विरोधात महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास साठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर हैद्राबाद येथे सामूहिक अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्या डॉक्टर तरुणीस व रविवारी रात्री दापोडी येथे ड्रेनेजचे काम करीत असताना मृत्यू झालेल्या अग्नीशामक दलाचे जवान विशाल जाधव आणि मजूर नादप्पा जमादार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून अहिल्याबाई होळकर चौकात महानगरपालिकेच्या प्रवेशव्दारासमोर आला. या ठिकाणी मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.

यावेळी साठे यांनी केलेल्या मागणीनुसार पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यास आले होते. यावेळी प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे, तुकाराम भोंडवे, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, बिंदू तिवारी, शहर महिला कॉंग्रेस अध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, परशुराम गुंजाळ, बाळासाहेब साळुंके, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रूपनर, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सज्जी वर्की, चंद्रशेखर जाधव, गौरव चौधरी, ॲड. क्षितीज गायकवाड, प्रियदर्शनी सेलच्या अध्यक्षा विनिता तिवारी, आशा शहाणे, विद्यार्थी कॉंग्रेस शहराध्यक्ष डॉ. वसीम इनामदार, विद्यार्थी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष विशाल कसबे, ज्येष्ठ नेते मेहताब इनामदार, हिरामण खवळे, चंद्रशेखर जाधव, बाबा बनसोडे, मुनसफ शेख, संदेश बोर्डे, मोहन अडसूळ, कुंदन कसबे, व्ही.एस.कबीर, विठ्ठल कळसे, भाऊसाहेब मुगूटमल, सुनिल राऊत, व्हि.जे. खंडाळे, कळसकर, कादीर खान, ॲड. मोहन आडसुळ, हिरामण खवळे, सचिन नेटके आदी उपस्थित होते.

सचिन साठे म्हणाले की, पाणीगळती व पाणीचोरी रोखण्यास मनपा प्रशासनाला पूर्णत: अपयश आले आहे. शहरातील नागरिक वेळोवेळी पाणीपट्टीसह सर्व कर महापालिकेच्या तिजोरीत करदात्या भरतात. मिळकत कर व पाणीपट्टी कर थकवणा-या नागरिकांवर जप्तीच्या नोटीसा बजावला जातात. सेवा न देता दडपशाही करणा-या अधिका-यांवर कारवाई झाली पाहिजे. नागरिकांना प्राथमिक सेवा, सुविधा देणे ही महापालिका प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे. नागरिकांना पाणी देण्याऐवजी टँकर लॉबी पोसण्याचा उद्योग प्रशासन करीत आहे. ज्या सोसायट्यांना खासगी टँकरव्दारे पाणी घ्यावे लागते. त्यांना महापालिकेने टँकरव्दारे पाणी पुरवठा करावा. या टँकरचे बील सोसायट्यांच्या माथी मारण्याऐवजी महापालिकेने भरावे.

नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर अतिक्रमण करणा-या आणि निष्क़्रीय प्रशासनाला पाठीशी घालणा-या आयुक्त श्रावण हर्डीकर यांची ताबडतोब बदली करावी व या विषयाशी संबंधित जबाबदार अधिका-यांवर कडक कारवाई करावी. धरणात मागील वर्षीपेक्षा जास्त जलसाठा आजही आहे. चालू वर्षी जास्त झालेल्या पावसामुळे धरणक्षमतेच्या चौपट पाणी नदीव्दारे विसर्ग करून सोडण्यात आले. पुढील वर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा असतानाही निव्वळ आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पाणीपुरवठा विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे नागरिकांना अपु-या पाणीपुरवठ्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे.

दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आयुक्तांचे नियोजन म्हणजे त्यांच्या अपयशाची व अकार्यक्षमतेची कबुलीच आहे. मागील सार्वत्रिक निवडणुकीत शहरभर चोवीस तास पुरेशा दाबाने आणि शहराला बंद जलवाहिनीव्दारे पाणीपुरवठा करू असे आश्वासन भाजपाने आपल्या जाहिरनाम्यात दिले होते. त्याचा विसर आता पदाधिका-यांना पडला आहे, अशीही टीका साठे यांनी यावेळी केली.

...Read More

V. S. News
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगाराला वाचवताना अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

व्हिएस न्युज - पिंपरी चिंचवडमध्ये सुरु असलेल्या अमृत योजनेच्या कामावेळी खड्ड्यात अडकलेल्या कामगाराला बाहेर काढताना अग्निशमन दलाच्या एका जवानाचा मृत्यू झालाय. तर दोन जवानांसह चौघे जखमी झालेत. तर एक कामगार अद्यापही अडकलेला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून दापोडीत अमृत योजनेअंतर्गत खोदकाम सुरू आहे. ही घटना रविवारी ( 1 डिसेंबर) सायंकाळी सव्वासहा वाजता घडली. याठिकाणी एनडीआरएफ दाखल झाले असून मतदकार्य सुरु आहे.

दापोडी येथे अमृत योजनेअंतर्गत नागेश जमादार हे कामगार त्या 15 फूट खड्ड्यात काम करत होते. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास अचानक त्यांच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळल्याने ते कंबरेपर्यंत गाडले गेले. त्यांना बाहेर काढण्यासाठी ईश्वर बडगे आणि सीताराम सुरवसे हे स्थानिक नागरिक खाली उतरले. नागेश यांना वाचवतानाच पुन्हा मातीचा ढिगारा खाली कोसळला. हे तिघे त्या ढिगाऱ्यात अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली.

जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सरोज पुंडे, निखिल गोगावले आणि विशाल जाधव हे तीन जवान बचावकार्यासाठी खड्ड्यात उतरले. शिडीच्या साह्याने ईश्वर आणि सीताराम यांना जखमी अवस्थेत बाहेर काढले. पुन्हा नागेशला सुखरूप बाहेर काढण्यात तिन्ही जवान व्यस्त झाले. पण तितक्यात आणखी एक ढिगारा चौघांच्या अंगावर पडला. तेव्हा विशाल यांचे तोंड खाली आणि पाय वर अशा परिस्थितीत ते ढिगाऱ्याखाली दबले गेले. त्यानंतर आणखी अग्निशमन आणि एनडीआरएफच्या जवानांची कुमक मागवण्यात आली. या बचावकार्यात सरोज आणि निखिल या कार्यक्षम जवानांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. मात्र, विशाल यांचा यात दुर्दैवी मृत्यू झालाय. तर सुरुवातीला फसलेले कामगार नागेश यांना बाहेर काढण्यासाठी अद्याप ही बचावकार्य सुरू आहे.

नागेश हे रंग कामगार आहेत. मात्र त्यांना काही पैश्यांची गरज असल्याने ते आज सुट्टी असताना ही या कामासाठी आले आणि त्यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली. पालिकेने एम बी पाटील या ठेकेदाराला अमृत योजनेचे काम दिलेलं आहे. भोसरी पोलिसांकडून या सर्व घटनेचा तपास केला जातोय.

दोषींवर कारवाई होणार...

घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले आहे. या घटनेचा तपास सुरु आहे, जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती डीसीपी स्मिता पाटील यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी ठेकेदाराच्या सुपरव्हायजरला भोसली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

...Read More

V. S. News
दिपकभाऊ निकाळजे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए = आंबेडकर) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

अमित मेश्राम यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए = आंबेडकर) च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड

व्हिएस न्युज - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए = आंबेडकर) च्या राष्ट्रीय कार्यकारिणी व केंद्रीय महासभा प्रतिनिधींची 10 नोव्हेंबर 2019 रोजी भोपाळ येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत 26 राज्यातील 200 हून जास्त प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सर्वांनुमते दिपकभाऊ निकाळजे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए = आंबेडकर) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आणि महासचिव पदी डॉ. मोहनलाल पाटील निवड करण्यात आली. अशी माहिती पार्टीचे महासचिव डॉ. मोहनलाल पाटील यांनी पिंपरी चिंचवड येथे दिली. शुक्रवारी (दि. 29 नोव्हेंबर) चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे, राष्ट्रीय संघटक सुनिल खांबे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमित मेश्राम, महाराष्ट्र कार्यालय प्रमुख बप्पा शिंदे, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सिना अमित छाजेड आदी उपस्थित होते.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए = आंबेडकर) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांनी सांगितले की, आमचा पक्ष देशातील 28 राज्य आणि 9 केंद्र शासित प्रदेशात कार्यरत आहे. पुढील दोन वर्षात देशातील चार ते पाच राज्यांमध्ये विधानसभा तसेच महाराष्ट्रात पुढील दोन वर्षांनंतर 25 हून जास्त महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या आणि स्थानिक निवडणूका आहेत. सर्व राज्यात लोकसभा, विधानसभा व स्थानिक निवडणूकांमध्ये उमेदवार उभे करण्यासाठी पक्ष संघटना बांधणी करण्यात येत आहे. यामध्ये युवक व महिलांना संधी देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात होणा-या सर्व निवडणूकांमध्ये पक्षाचे उमेदवार उभे करण्यात येतील. निवडणूकांना सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्राचे नेतृत्व युवकांनी करावे अशी मागणी होती. अमित मेश्राम यांचे संघटन कौशल्य पाहून त्यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय संघटक पदावर सुनिल खांबे यांची निवड करण्यात आली आहे. आगामी काळात आघाडी किंवा युती बरोबर जावे की नाही, याबाबत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करुन निर्णय घेऊ असे निकाळजे यांनी सांगितले. पा

महासचिव डॉ. मोहनलाल पाटील यांनी सांगितले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए = आंबेडकर) या राष्ट्रीय पक्षाची स्थापना 27/07/1990 रोजी भारत निवडणूक आयोगाकडे (क्र.56/6/90/1732/5303/35) करण्यात आली आहे. याबाबतची सर्व माहिती www.republicanpartyofindia.co.in या वेबसाईटवर आहे. पक्षाचे नोंदणीकृत केंद्रीय कार्यालय 1/16, संजय कॉम्प्लेक्स, टी टी नगर, मध्यप्रदेश भोपाळ 03 येथे आहे. 1990 पासून 2009 पर्यंत श्री एस.एस. भारती, श्री राजकुमार भारती, डॉ. मोहनलाल पाटील यांनी अध्यक्षपदावर आणि महासचिव पदावर श्री रामसिंग, श्री जंगेराम तँवर, श्री बी.के.गुप्ता यांनी काम पाहिले आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे 2009 ते 2018 या कालावधीत या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. तर डॉ. मोहनलाल पाटील महासचिव होते.

रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए = आंबेडकर) या राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे आणि रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) नावाचा नविन पक्ष स्थापन केला आहे. याबाबतचे नोंदणी पत्र भारत निवडणूक आयोग यांच्या वतीने मुंबई जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी 19 मार्च 2019 (F. No.56/350/LET/ECI/FUN/PP/PPS-I/2018/11) प्रसिध्द केले आहे.

...Read More

V. S. News
महात्मा फुले यांचे मानवी हक्कांसाठी अभूतपुर्व योगदान .....कविचंद भाट

व्हिएस न्युज - थोर समाज क्रांतीकारक महात्मा जोतीराव फुले हे मानवी हक्कांसाठी अहोरात्र झगडले, जोतीरावांनी स्वातंत्र्य, समता, बंधूता (भाऊपणा व बहीणपणा), शिक्षण, जातीनिर्मुलन, स्त्री-पुरुषसमता, शेती व शेतकरी यांचा सर्वांगीण विकास, महिला, अनुसूचित जाती, आदिवासी, भटके विमुक्त इतर मागासवर्गीय यांचे सामाजिक संघटन, मानवी हक्कांसाठी जागृती आणि संघर्ष यासाठी अभूतपुर्व योगदान दिले, असे पिंपरी चिंचवडचे माजी महापौर कविचंद भाट यांनी सांगितले.

थोर समाज क्रांतीकारक महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी (दि. 28 नोव्हेंबर) पिंपरीतील महात्मा फुले यांच्या पुर्णाकुती पुतळ्यास पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस पक्षाच्या वतीने माजी महापौर कविचंद भाट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर महिला कॉंग्रेस अध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, विद्यार्थी कॉंग्रेस शहराध्यक्ष डॉ. वसीम इनामदार ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रूपनर, भाऊसाहेब मुगूटमल, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, विद्यार्थी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष विशाल कसबे, चंद्रशेखर जाधव, बाबा बनसोडे, सुनिल राऊत, व्हि.जे. खंडाळे, मुनसफ शेख, संदेश बोर्डे, गौरव चौधरी, कादीर खान, ॲड. मोहन आडसुळे, हिरामण खवळे, सचिन नेटके आदी उपस्थित होते.

भाट म्हणाले की, महात्मा फुलेंना शिक्षणविषयक कामाला प्रतिगामी विचारांच्या मंडळीनी खूप विरोध केला. तरीही जोतीराव व त्यांचे सहकारी डगमगले नाहीत. वडिलांनी सामाजिक विरोधामुळे जोतीरावांना घराबाहेर काढले. त्यांचे मित्र उस्मान शेख यांच्या घरी राहून जोतीराव व सावित्रीबाईंनी आपले शिक्षणाचे ‘मिशन’ चालू ठेवले. त्यांचा ध्येयवाद आणि त्यांची तळमळ अजोड होती. सावित्रीबाईंना फातिमा शेख, गणू शिवाजी मांग व धूराजी आप्पाजी चांभार या शिक्षकांनी सहकार्य केले. या शैक्षणिक चळवळीत लहूजी वस्ताद साळवे आणि राणबा महार, तात्यासाहेब भिडे, अण्णासाहेब चिपळूणकर, सदाशिव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, भवाळकर, परांजपे आणि सहकारी सहभागी होते.

1855 साली त्यांनी पुण्यात गंज पेठेत (महात्मा फुले पेठ) राहत्या घरी देशातील पहिले प्रौढ साक्षरता वर्ग सुरु केले. ही साक्षरता अभियानाची सुरुवात होती. मुलामुलींच्या शैक्षणिक गळतीच्या मुळाशी दारिद्रय, पालकांची निरक्षरता, अंधश्रध्दा, शिक्षणापासून काय लाभ व सुखे असतात याचा परिचय नसणे आदी कारणे असल्याचे सांगून ती दूर करण्यासाठी त्यानी उपाय योजले. ते गरीब मुलामुलींना विद्यावेतन देत असत. शिक्षणातून जीवनातील खरे-खोटे निवडण्याची क्षमता आली पाहिजे. हा त्यांचा आग्रह होता. ‘दि पूना ऑब्झर्व्हर ॲण्ड डेक्कन वीकली’ या वृत्तपत्राने त्यांचे काम म्हणजे ‘भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील एका नव्या युगाचा आरंभ होय’ असे वर्णन केले होते. त्यावेळी मुलींच्या शाळांच्या परीक्षा बघायला पूना कॉलेजच्या प्रांगणात 3,000 हून अधिक लोक जमले होते आणि त्याहून अधिक गर्दी बाहेर होती असे वर्णन शिक्षणखात्याच्या अहवालात मिळते.

जोतीरावांनी शिक्षणाच्या झिरपत्या सिध्दान्ताला विरोध केला आणि समाजातल्या तळागाळापासून शिक्षणाची सुरुवात केली पाहिजे याचा आग्रह धरला. विधवांना त्या काळात पुनर्विवाहाची बंदी होती. केशवपन करावे लागत होते. त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन विधवाविवाह घडवून आणले आणि केशवपन करु नये यासाठी नाभिक बांधवांचे प्रबोधन करुन त्यांचा केशवपनविरोधी संप घडवून आणला. विधवांच्या बाळंतपणासाठी आणि त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी 1863 साली त्यांनी स्वत:च्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह काढले.

स्वत:च्या घरातील पाण्याची विहीर त्यांनी पूर्वास्पृश्य बांधवांसाठी खुली केली. सत्यशोधक विवाह पध्दतीची सुरुवात करुन हुंडा, लग्नातील डामडौल व अमाप खर्च यांना प्रतिबंध केला. कमी खर्चातील सत्यशोधक विवाह घडवून आणले. या लग्नातील मंगलाष्टकांमध्ये स्त्रियांच्या ‘मानवी अधिकारासाठी’ झटण्याची शपथ नवरा मुलगा घेत असल्याचे मनूद केले. 140 वर्षापूर्वी आपला ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ त्यांनी अमेरिकेतील निग्रोंच्या मुक्ती चळवळीला अर्पण केला होता.

जोतीरावांनी ‘शेतक-याच्या आसुड’ या ग्रंथात 1883 साली शेती आणि शेतकरी यांच्या समग्र विकासाचे संकल्पचित्र प्रकाशित केले. शेतीचे शिक्षण, संकरित बियाणे, अवजारे, पीकपध्दती, शेतीला जोडधंदे, ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या मोहिमेव्दारे पाणीपुरवठ्याचे नियोजन आधुनिक पध्दतीने करण्यावर त्यांनी भर दिला. शेतीमालाला ‘उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव’ मिळाले पाहिजेत याचा त्यांनी आग्रह धरला, अशा नोंदी महात्मा फुले समग्र वाड्‌.मयात आहेत.

महात्मा फुले यांच्या शिक्षण, शेती, सामाजिक समता, सत्यशोधक समाज या कार्याविषयी आजच्या युवा पिढीने माहिती घेणे आवश्यक आहे. त्यासाठी महात्मा फुले यांनी लिहिलेले साहित्य अभ्यासावे अशी अपेक्षा कविचंद भाट यांनी यावेळी व्यक्त केली.

...Read More

V. S. News
पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अनिल वडघुले, सरचिटणीसपदी मारुती बाणेवार उपाध्यक्षपदी तुळशीदास शिंदे, प्रवीण शिर्के

व्हिएस न्युज -मराठी पत्रकार परिषद संलग्न व पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली. ही कार्यकारिणी पुढील दोन वर्ष कार्यान्वित राहणार आहे.

नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल वडघुले, उपाध्यक्ष तुळशीदास शिंदे, प्रवीण शिर्के, सरचिटणीस मारुती बाणेवार, सहचिटणीस संजय बोरा, खजिनदार विनय लोंढे, समन्वयक विनायक गायकवाड, कार्यकारणी सदस्य सुनील कांबळे, माधुरी कोराड, दिनेश दुधाळे तसेच पत्रकार हल्ला कृती समिती पुणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून अनिल भालेराव आणि पुणे जिल्हा प्रतिनिधीपदी दादाराव आढाव यांची निवड करण्यात आली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कै. भा. वि. कांबळे पत्रकार कक्षात गुरुवारी (दि. 21) आयोजित केलेल्या बैठकीस पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ, गणेश हुंबे, माजी अध्यक्षा सायली कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार अरुण उर्फ नाना कांबळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते.

...Read More

V. S. News
पुणे;पतीला पोटची मुलगी दाखवायची म्हणून आईने दुसऱ्यांची मुलीगी पळवली.

व्हिएस न्युज - पतीपासून ती तब्बल चार वर्ष दूर होती. या कालावधीत तिच्या पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यु झाला. मात्र, काही दिवसांपुर्वीच पतीने तिला सासरी बोलावले. आता पतीला पोटची मुलगी दाखवायची कशी ? यावर उपाय म्हणून तिने एका महिलेच्या साथीने रविवारी चक्क एका सोसायटीतील पाच वर्षांची मुलगी पळवून नेली. या धक्कादायक प्रकाराबाबत खबर मिळताच विमानतळ पोलिसांनी तपासाची सुत्रे हलवून अवघ्या आठ तासातच दोन्ही महिलांना बेड्या ठोकून मुलीची सुखरूप सुटका केली.

रविवारी दुपारी तीन ते साडे तीन वाजण्याच्या सुमारास लोहगावच्या निंबाळकर नगरमधील प्राईड आशियाना सोसायटीतील शिवाजी चांदमाने यांची पाच वर्षांची मुलगी घराच्या मागील बाजुस खेळत होती. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने मुलीस कशाचे तरी आमिष दाखवून मुलीला पळवून नेले. याबाबत विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या

प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) बळवंत मांडगे यांच्या मागर्दशनाखालील पथकाने तपासाला सुरूवात केली. गुन्ह्याच्या अनुषंगाने सर्व बाजुंनी आरोपींची माहिती काढली. त्यामध्ये जयश्री शिवाजी कोळी (वय 26), हिराबाई उर्फ बायडाबाई भानुदास खंडाळे (वय 55, रा. माईचा वाडा, कात्रज) यांची नावे उघड झाली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांचा आधार घेऊन सोलापुर गाठले. तेथील हैद्राबाद रोडवरील भवानी पेठेमध्ये खड्डा रघुजी ट्रान्सपोर्ट येथून दोघींना अटक केली.

पोलिस उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे, पोलिस कर्मचारी अविनाश शेवाळे, विशाल गाडे, विश्‍वनाथ गोणे, संजय आढारी, राहूल मोरे, विनोद महाजन, प्रशांत कापुरे, नाना कर्चे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

..म्हणून केले मुलीचे अपहरण !

जयश्री काळे हिला दोन मुले व एक मुलगी होती. चार वर्षांपासून ती पतीपासून वेगळी राहात होती. जुलै 2019 मध्ये काळे ही नातेवाईकांसमवेत कात्रज येथे राहू लागली.दरम्यान, तिच्या पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यु झाला. त्यानंतर काही दिवसांनी तिच्या पतीने तिला सोलापुरला पुन्हा माघारी बोलाविले. आता पतीला मुलगी कशी दाखविणार ? म्हणून तिने हिराबाई खंडाळे हिच्या मदतीने लोहगाव येथून पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्याचे चौकशीत सांगितले

...Read More

V. S. News
पोलिसाने केला महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार 

व्हिएस न्युज - वडील व बहिणीला जिवे मारण्याची धमकी देत महिला पोलिस कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याला दिघी पोलिसांनी अटक केली आहे.

शुभम गजानन मोहिते असे अटक झालेल्या पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपी शुभम हा पुण्यातील मोटार वाहन परिवहन विभागात कार्यरत आहेत. शुभम याने फिर्यादी महिलेला लग्नाची मागणी घातली. त्यास महिलेने नकार दिला असता त्याने महिलेच्या वडीलांना व बहिणीला जिवे मारण्याची धमकी देत महिलेशी जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. यानंतर महिलेने आरोपीकडे लग्नाची मागणी केली असता आरोपीने त्यास नकार दिला. तसेच याबाबत तक्रार केल्यास महिलेचे वडील व बहिणीची सरकारी नोकरी घालविण्याचीही धमकी दिली. द

याबाबत महिलेने आरोपीची आई व बहिणीस सांगितले असता त्यांनी महिलेस वाईट वागणूक दिली. यासह आरोपीने फिर्यादी महिलेशी जातीवाचक संभाषण केल्याने आरोपीवर अॅट्रोसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...Read More

V. S. News
नीमच्‍या जाचक कायद्या विरोधात लढणा-या कामगारांना माझा पाठिंबा... खा. अमर साबळे

व्हिएस न्युज - औद्योगिक क्षेत्रात लागू झालेल्‍या नीम (नॅशनल एम्‍प्‍लॉएबिलिटी एन्‍हेन्‍समेंट मिशन) या योजनेत कामगारांच्‍या मुलभूत हक्‍कांवर गदा येत असून त्‍यांचे शोषण होत आहे. या योजनेविरोधात देशातील कामगार संघटनांनी विरोध केला असून श्रमिक एकता महासंघाने मुंबई उच्‍च न्‍यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. संघटनेच्‍या या लढयास माझा पाठिंबा आहे. कामगारांना त्‍यांचे मुलभूत हक्‍क मिळाले पाहिजेत यासाठी आपण प्रयत्‍न करणार असल्‍याचे प्रतिपादन भाजपाचे राज्‍यसभा खासदार अमर साबळे यांनी मंगळवारी (दि. 12) पिंपरी येथे पत्रकार परिषदेत केले. औ

क्षेत्रात काम करणा-या कामगारांना भविष्य निर्वाह निधी आणि अन्‍य सुविधा मिळाव्‍यात यासाठी खा. साबळे यांच्‍याकडे पाठपुरावा केला होता. त्‍यांच्‍या या प्रयत्‍नांना यश आले आणि कामगारांना भविष्य निर्वाह निधी लागू करावा याचे आदेश दिले. त्‍याबद्दलची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष दिलीप पवार, कार्याध्यक्ष संतोष कणसे, सचिव मनोज पाटील, मार्गदर्शक मारूती जगदाळे, नगरसेवक केशव घोळवे, माऊली थोरात, अरविंद श्रौती, ॲड. नितीन कुलकर्णी आदी उपस्थित होते. खा

साबळे म्‍हणाले, श्रमिक एकता महासंघाने नीम योजनेमुळे कामगारांचे हाल, शोषण याची व्‍यथा आपल्‍या पुढे मांडली. तसेच मी स्‍वतः कामगार मंत्रालयाच्‍या समितीवर असल्‍यामुळे देशातील अनेक कामगार संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते यांची प्रत्‍यक्ष भेट घेतली. नीम योजनेमुळे कामगारांचे शोषण होत आहे. त्‍यांना सामाजिक सुरक्षा, मुलभूत हक्‍क मिळत नसल्‍याचे निदर्शनास आले. त्‍यामुळे केंद्रीय कामगार मंत्री संतोषकुमार गंगवाल तसेच संबंधित अधिका-यांची भेट घेऊन वस्‍तुस्‍थिती निदर्शनास आणून दिली. त्‍यामुळे भविष्य निर्वाहनिधी विभाग आणिा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) यांना या प्रश्नी कारवाई करणे भाग पडले. तर दि. 12/2/2019 ला भविष्य निर्वाह निधीचे अतिरिक्‍त आयुक्‍त जगमोहन यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना नीम अंतर्गत नेमणूक केलेल्‍या प्रशिक्षणार्थींना कर्मचारी म्‍हणून संबोधण्यात यावे, त्‍यांना पीफ कायद्यानुसार सर्व फायदे देण्यात यावे असे आदेश दिले. आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास संबंधितांवर कारवाई केली जाईल असे ही बजावण्यात आले, असल्‍याचे अध्यक्ष दिलीप पवार यांनी सांगितले.

अरविंद श्रौती म्‍हणाले, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्‍या वतीने कौशल्‍य विकास विभागाचे निर्देशक कैलाश बन्‍सल यांनी सर्व नीम ठेकेदारांना पत्र पाठविण्यात आले असून नीम योजना केवळ प्रशिक्षण देण्यासाठी असल्‍याचे नमुद केले आहे. तसेच याव्दारे कामगारांचे शोषण होत अल्‍यास ठेकेदारांची नोंदणी रद्द केली जाईल असे निर्देश दिले आहेत, असे श्रौती यांनी सांगितले. श्रमिक एकता महासंघाने केलेल्‍या सर्वेक्षणात एकट्या पुणे जिल्‍हयात नीम योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थी कामगारांची संख्या सुमारे 2 लाख आहे. देशाचा विचार केल्‍यास हीच संख्या कोटींच्या घरात आहे. कामगारांच्या अन्‍य प्रश्नांवर खा. साबळे यांच्‍या सहकार्याने योग्‍य तो तोडगा निघेल, असा विश्वास महासंघाचे सल्‍लागार नगरसेवक केशव घोळवे यांनी व्‍यक्‍त केला.

...Read More

V. S. News
विधवांना समान हक्क मिळण्यासाठी पं. नेहरु यांचे काम.....सचिन साठे

व्हिएस न्युज - विधवांना संपत्तीमध्ये पुरुषांप्रमाणेच समान हक्क मिळावा यासाठी पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी काम केले. स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाल्यामुळे ब्रिटीशांनी त्यांना अहमदनगर येथील तुरुंगात ठेवले. तेथे त्यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात नेहरूंनी सिंधु सभ्यतेपासुन, भारताचे स्वातंत्र्य, भारतीय संस्कृती, धर्म आणि संघर्षाचे वर्णन केले आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी दिली.

देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि. 14 नोव्हेंबर) आकुर्डी प्राधिकरणात आयोजित केलेल्या कार्यक्रमात साठे यांच्या हस्ते पंडीत नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी महापौर कविचंद भाट, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, ज्येष्ठ नेत्या बिंदू तिवारी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, युवक कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, ज्येष्ठ नेते हरिदास नायर, सुदाम ढोरे, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, ज्येष्ठ नागरीक सेलचे उपाध्यक्ष लक्ष्मण रुपनर, दिलीप पांढरकर, हुरबानो शेख, मिना गायकवाड, संदेश बोर्डे, दिपक जाधव, निर्मल तिवारी, हिरामण खवळे, सचिन नेटके, सुनिल राऊत, गौरव चौधरी, भाऊसाहेब मुगूटमल, भास्कर नारकडे आदी उपस्थित होते.

साठे म्हणाले की, भारत देशाला ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त करण्यासाठी पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी ‘भारतीय स्वातंत्र्य लीग’ ची स्थापना केली. परदेशात शिक्षण घेत असताना आर्यलंड मध्ये झालेले सिन फेन आंदोलन त्यांनी जवळून पाहिले होते. त्यातूनच त्यांनी प्रेरणा घेऊन ब्रिटिश साम्राज्यापासून भारत मुक्त करण्याचे ध्येय घेऊन स्वातंत्र्य संग्रामात स्वत:ला झोकून दिले. 1920 साली शेतक-यांसाठी त्यांनी प्रथम उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात किसान मोर्चाचे आयोजन केले, त्यानंतर असहकार चळवळ आणि मिठाचा सत्याग्रह आंदोलनात त्यांना दोन वेळा तुरुंगात जावे लागले. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचा प्रतिनिधी म्हणून परदेशात अनेक आंतरराष्ट्रीय संमेलनात उपस्थित राहण्याची संधी मिळाली. सायमन कमिशनच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी केले. 29 ऑगस्ट 1928 रोजी त्यांनी सर्वपक्षीय परिषदेत भाग घेतला आणि त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या भारतीय घटनात्मक सुधारणेवरील नेहरू अहवालावर स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी ते एक होते. असे साठे यांनी सांगितले.

स्वागत मयूर जयस्वाल, सुत्रसंचालन गौरव चौधरी आणि आभार मकरध्वज यादव यांनी मानले.

...Read More

V. S. News
"खऱ्या अर्थाने तूम्ही या आयुष्यात माझी उंची वाढविली" - आमदार संजय जगताप ....

व्हिएस न्युज - पुणे-पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघातून नवनिर्वाचित आघाडीचे आमदार संजय जगताप यांची सांगता सभा श्री काळभैरवनाथ मंदीर प्रांगणात झाली.मतदारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी देशाचे लोकनेते शरदचंद्र पवार , माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार ,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात ,बारामतीच्या लोकसभेच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचे विशेष म्हणजे आभार मानले. तसेच मतदरसंघातील कार्यकर्ते ,सहकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, व उपपस्थितांचे आभार मानले.

या दरम्यान ते म्हणाले की "हवेली- पुरंदर भागातून मला खूप उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. माझेकडे बोलायला शब्द नाहीत. यवेळी बोलताना ते भावुक झाले ते म्हणाले,ज्यावेळेस माझ्या आई मतदान केंद्रात आल्या, तेव्हा काकांची कमतरता मला जाणवली असे सांगताना ते भावूक झाले. आणि उपस्थितांचे डोळे पाणावले. परंतु मोठ्या प्रेमाणे आपण सर्वांनीच आदरणीय काकांची जागा,तेथे माझ्या पाठीवर थाप देऊन भरून काढलीत . मी सर्वाना शब्द देऊन सांगतो की , हे क्षण मी आयुष्यभर विसरणार नाही. मी जरी आमदार झालो तरी तुम्ही आमदार झाले आहात. तन ,मन ,व धनाने मी तुमचे सोबत असेन प्रत्येक घरातील मी कुटुंब सदस्य राहील. अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिलीे."

नुकतेच निधन पावलेले कै.विलासभाऊ कामथे यांनी १००० मतांची आघाडी मिळवून दिली असेही त्यांनी आवर्जून सांगितले. मी आज तुमचेेसाठी केवळ सरच आहे व तुम्ही माझेसाठी सर्व आमदार आहात. पुरंदर हवेली, सासवड,जेजुरी सर्वाना एकी दाखवली. याबद्दल त्यांनी सर्वांचेच आभार मानले व सभेची सांगता झाली. प्रचंड जनसमुदाय , महिला, युवक सगळीकडे आनंद अगदी ओसंडून वाहत होता.

एकाच ठेक्यावर ताल धरून विशेष म्हणजे महिला, अबाल वृध्द, युवक जोश पूर्ण ताल धरत बेभान नाचत असलेचे चित्र दिसत होते. सर्व वातावरण संजयमय झाले होते. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमुळे हे शक्य झाल्याची चर्चा व नवनिर्वाचित आमदार संजय सर यांचे उल्लेखनीय कार्य तसेच शेकाप,जनतादल ,मनसे आदी सर्वांनीच एकदिलाने काम केलेमुळे सरांना यश प्राप्त झाले, असे विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे, डॉ . दिगंबर दुर्गाडे , अँँड.कलाताई फडतरे, संजय चव्हाण, नंदकुमार सागर, संजय हरपळे, सुदाम आणा इंगळे, शेकापचे दिलीप गिरमे, सुहास लांडगे, अॅड. सुरेश फडतरे , दत्ताशेठ झुरंगे, आदी मान्यवर उपस्थीत होते.

...Read More

V. S. News
पिंपरी; निवडणुकी दरम्यान २१ जणांना अटक.

व्हिएस न्युज - पिंपरी गाव येथील नव महाराष्ट्र शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सोमवारी (दि. 21) सव्वाबाराच्या सुमारास विधानसभा निवडणुकीचे मतदान होत असताना पिंपरीतील मतदान केंद्राबाहेर बेकायदेशीर जमाव जमवून थांबल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी 21 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राकेशकुमार मुन्नीलाल चौरसिया (वय 28), जितेंद्र कुमार रामकेस चौरसिया (वय 30), अजित सारदा शर्मा (वय 28), दीनानाथ रामकेस निसाद (वय 19), राहूल जितेंद्र यादव (वय 20), रोहीत रामबच्चन यादव (वय 20), सुमन मोहनराम कुमार (वय 19), विनोद सीताराम पाल (वय 21), वीरेंद्र रामविलास पाल (वय 24), यशवंत गुलजारी पासवान (वय 35), कुलदीप चंद्रभोकनसिंग कुमार (वय 19), अखिलेश कुमार सुरजबाबू (वय 24), अनिल कुमार शंकर यादव (वय 23), पवनकुमार लालबाबू गौतम (वय 23), दिलीप गंगाधर भोर (वय 20), अनिल धन्नू जाधव (वय 25, सर्व रा. कस्पटे वस्ती, वाकड). अरबाज जुबेर सय्यद (वय 20), संतोष राम जाधव (वय 22), वैभव श्रीमंत नरवडे (वय 20), गजानन सुभाष जाधव (वय 20), गणेश अनिल अवसरे (वय 20, रा. काळेवाडी फाटा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणूक काळात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशाचा भंग करून आरोपींनी पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर गर्दी केली होती. याठिकाणी मतदान केंद्र होते. पोलिसांनी त्यांना त्याठिकाणावरून जाण्याची विनंती केली होती. तरीही, त्यांनी त्याठिकाणी गर्दी जमवली. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर भारतीय दंड संहित कलम 188 आणि मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!