Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
थेरगाव सोशल फाउंडेशन तर्फे २५ दिवस अन्न दान; ३ मे पर्यंत जेवण वाटप करण्याचा निर्धार.

व्हिएस न्युज - भारतातसह जगात कोरोना या साथीच्या आजारांने थैमान घातले आहे .करोनाचा फैलाव रोखण्याचा प्रयत्न सुरु असताना परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसल्याचं चित्र आहे. सोशल डीसटन्सी शिवाय कोणताही पर्याय नसलयामुळे मुळे देशात टाळेबंदी लागु करण्यात आले आहे . स्वच्छता- सुंदरता-जागरुकता ही उद्दिष्टे बाळगणारी थेरगाव सोशल फाऊंडेशन या संस्थेच्या सभासदांनी माझा समाज माझी जबाबदार हि संकल्पना राबवली आहे.

कोरोनामुळे थेरगाव व आजुबाजुच्या परिसरात अडकुन पडलेल्या विद्यार्थी आणि कामगार वर्गाला थेरगाव सोशल फाऊंडेशन तर्फे आज २५ दिवस अविरत अन्नदान सुरु आहे . सामाजिक अंतर पाळण्यासाठी पांढरे वर्तुळ आखण्यात आलेले आहेत सर्व सभासद स्वतःहुन काळजी घेतात. अन्नछत्रा वर वाढती गर्दी पाहता कोणाला ही विषाणु ची लागण होऊ नये म्हणुन सॅनिटायझर कक्ष ची उभारणी केलेली आहे.

सामाजिक बांधिलकी जोपासत अपंग व वयोवृद्ध नागरिकांपर्यंत घरपोच अन्न पोहचविण्याचे काम संस्था करत आहे. ३ मे पर्यत थेरगाव मध्ये कोणीही उपाशी झोपनार नाही असा निर्धार थेरगाव सोशल फाऊंडेशने केला आहे.

पिंपरी चिंचवड महानगपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी स्वतः अन्नछत्रांची पाहणी केली असता उत्तम नियोजन आहे असे म्हणत कौतुक केले.

थेरगाव सोशल फाऊंडेशन चे अनिकेत प्रभु, राहुल सरवदे,निलेश पिंगळे, अनिल घोडेकर, किरण बोडके, संकेत हलगेकर, सचिन क्षिरसागर, महेश येळवंडे, दशरथ रणपिसे, राहुल जाधव, रोहित ढोबळे, यश कूदळे, शंतनु तेलंग, स्वप्निल मंडल, संदेश डिगे, शेखर गांगर्डे,, संदीप येळवंडे, अंकुश कूदळे, अनिल शिंदे, प्रकाश शिंदे, शुभम कुलकर्णी, अभिषेक करपे, विष्णु तरंगे हे माझा समाज माझी जबाबदार हा उपक्रमासाठी सक्रिय आहेत.

...Read More

V. S. News
पिंपरी ; हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कंपनीला औषध निर्मितीसाठी परवानगी द्यावी - नगरसेविका गीता मंचरकर

व्हिएस न्युज - भारतातसह जगात कोरोना या साथीच्या आजारांने थैमान घातले आहे .करोनाचा फैलाव रोखण्याचा प्रयत्न सुरु असताना परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसल्याचं चित्र आहे. सोशल डीसटन्सी शिवाय कोणताही पर्याय नसलयामुळे मुळे देशात लॉकडाऊन लागु करण्यात आले आहे . या जीवघेण्या आजारापासुन बचावासाठी जगभरातून हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे पिंपरी येथील हिंदुस्थान अॅन्टीबायोटिक्स या कंपनीला औषध निर्मितीसाठी परवानगी द्यावी , अशी मागणी नगरसेविका गीता मंचरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे .

जगभरातून भारताकडे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाची मागणी करण्यात येत आहे. पिंपरी येथील ‘ एचए ‘ कंपनीत या औषधाची निर्मिती होऊ शकते . येथे सर्व यंत्रणा सज्ज असल्यामुळे त्वरित उत्पादनाला सुरुवात केली जाऊ शकते , असे मंचरकर यांनी या पत्रात म्हटले आहे . जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफ यांच्या सहकार्याने 1954 साली सुरू झालेल्या या कंपनीत सुरवातीला ‘ पेनिसिलीन ‘ ची निर्मिती होत असल्याने ‘ एचसीक्यु ‘ चे उत्पादन सहज शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहे .

एच.ए. कंपनीपासून रस्ता व रेल्वे मार्ग जवळ असल्याने वाहतूकीसाठी अडचण निर्माण होणार नाही . कंपनीची औषध उत्पादनाची क्षमता मोठी असल्यामुळे देशातील मागणीचा योग्य पुरवठा केला जाऊ शकतो . पण काही अपरिहार्य कारणांमुळे हा प्लांट उत्पादन थांबवून बंद करण्यात आला . गरिबांना स्वस्तात औषध उपलब्ध व्हावी , या महात्मा गांधी यांच्या विचारातून स्थापन झालेल्या या कंपनीचा या आणिबाणीच्या परिस्थितीत यथायोग्य उपयोग होऊ शकतो . त्यामुळे सरकारने पिंपरी येथील ‘ एच.ए. ‘ कंपनीला औषध निर्मितीसाठी परवानगी द्यावी , अशी मागणी मंचरकर यांनी केली आहे .

...Read More

V. S. News
अंडी विक्रेता निघाला करोना बाधित ; १८० जणांचं विलगीकरण.

व्हीएस न्युज - भोसरीत राहणाऱ्या व इतर ठिकाणी अंड्यांचा पुरवठा करणाऱ्या एका अंडी विक्रेत्याला करोना झाल्याचं निष्पन्न झाले आहे. यामुळे त्याच्या परिसरातील १८० जणांना होम क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. भोसरी येथील राहणारा हा विक्रेता महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार घेत आहे. तो किरकोळ विक्रेत्यांना अंड्यांचा पुरवठा करायचा.

पिंपरी-चिंचवड परिसरात सध्या करोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे दररोज नवे रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, भोसरी परिसरातील एका अंडी विक्रेत्याला करोना झाल्याचं निष्पन्न झाले असून तो इतर ठिकाणी अंड्यांचा पुरवठा करत होता. यामुळे वेगवेगळ्या भागातील ऐकून १८० जणांना होम क्वारंटाइन करण्यात आलं असल्याची माहिती डॉ. कनकवले यांनी दिली आहे. यात किरकोळ विक्रेते आणि नागरिकांचा समावेश आहे.

परिसरातील नानेकरवाडी, खराबवाडी आणि मेंदनकरवाडी येथील व्यक्तींना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. दरम्यान, परिसरात सर्वे सुरू केला असून आत्ता पर्यंत कोणी करोना पॉजिटिव्ह आढळला नाही अशी माहिती देखील डॉ. कनकवले यांनी दिली आहे.

...Read More

V. S. News
अत्यावश्यक सेवा स्टिकरचा गैरवापर ;दुधाच्या टेम्पोतून बिअरच्या बाटल्यांची तस्करी .

व्हिएस न्युज - लॉकडाउन तसेच कठोर निर्बंध लागू झाल्यानंतर दारूसेवान करणारे तसेच अन्य व्यसने करणाऱ्यांना दारू आणि अन्य गोष्टी मिळत नसल्याची परिस्थिती आहे. एरवी सहजतेने उपलब्ध होणारे दारू, तंबाखू तसेच गुटखा सेवन करणे आता परवडेनासे झाले आहे. चोरटय़ा मार्गाने दारू, तंबाखू तसेच गुटख्याची वाहतूक होत आहे. कात्रज घाटात वाहतूक पोलिसांनी रात्री दुधाच्या टेम्पोतून बिअरच्या बाटल्यांची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी बिअरची बारा खोकी जप्त केली.

सलीम बशिर शेख (वय २४) आणि सिद्धार्थ संजय मिसाळ (वय २५, दोघे रा.भिलारेवाडी,कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघांविरोधात मुंबई दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लॉकडाउन मध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहनांना प्रशासन तसेच पोलिसांकडून ओळखपत्र देण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, भाजीपाला, दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. रात्री कात्रज घाटात भारती विद्यापीठ वाहतूक शाखेने नाकाबंदी लावली होती. पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलीस हवालदार नरेंद्र पारखी, तोंडे, भिंगारे, झुंजार या भागातून जाणाऱ्या वाहनांची तपासणी करत होते.

त्या वेळी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी घाटात दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाला थांबण्याची सूचना केली. टेम्पोतील चालक शेख आणि मिसाळ यांची चौकशी सुरू केली तेव्हा ते गडबडले आणि पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली तेव्हा टेम्पोत दूध ठेवण्यासाठी येणाऱ्या प्लास्टिकच्या जाळीमागे (कॅरेट) बिअरची खोकी ठेवल्याचे आढळून आले.

त्यानंतर पोलिसांनी टेम्पोतील बिअरची खोकी जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या बिअरच्या बाटल्यांची किंमत २८ हजार ८०० रुपये आहे. वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी भारती विद्यापीठ वाहतूक शाखेतील पोलीस पथकाचे कौतुक केले.

अत्यावश्यक सेवा स्टिकरचा गैरवापर

या प्रकरणात अटक केलेल्या आरोपी शेख अणि मिसाळ यांनी दूध वाहतुकीच्या टेम्पोला अत्यावश्यक सेवेतील वाहन असे स्टिकर लावले होते. पोलिसांकडून कारवाई होऊ नये म्हणून त्यांनी हे स्टिकर लावले होते. आरोपींनी सातारा रस्त्यावरील शिरवळ येथून बिअरची खोकी आणली होती. दोनशे रुपयांची बाटली ते सहाशे रुपयांना विकणार होते, अशी कबुली शेख आणि मिसाळ यांनी पोलिसांना दिली.

...Read More

V. S. News
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी शिफारस हि भारतीय राज्यघटनेला काळिमा फासणारी गोष्ट आहे - दक्षिण भारतीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश भाजप चे अध्यक्ष राजेश पिल्ले.

व्हीएस न्युज -

दि ९ एप्रिल २०२० रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची ( कॅबिनेट) बैठक घेण्यात आली, सदर बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विधानपरिषदेवर नेमणूक करण्याबाबत शिफारस करणारा ठराव या बैठकीत पारित करण्यात आला, मंत्रिमंडळाचा ठराव व सल्ला म्हणून उद्धव ठाकरे यांना आमदार करण्याबाबत महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेकडे शिफारस करण्यात आली.

सदरची शिफारस हि केवळ बेकायदेशीरच नसून भारतीय लोकशाही आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या घटनेला काळिमा फासणारी आहे असे मत दक्षिण भारतीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश भाजप चे अध्यक्ष राजेश पिल्ले यांनी त्यांच्या १२/०४/२०२० रोजीच्या प्रसिद्धी पत्रात व्यक्त केले आहे

उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. संविधानाच्या कलम 164 (4) अंतर्गत उद्धव ठाकरे यांना सहा महिन्यात राज्याच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य बनणं अनिवार्य आहे. उद्धव ठाकरे सध्या विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत.

राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी शिफारस हि भारतीय राज्यघटनेला काळिमा फासणारी गोष्ट आहे याची करणे सुद्धा त्यांनी स्पस्ट केली आहेत ती खालील प्रमाणे ,

अ) सदरची मंत्रिमंडळ बैठक ( कॅबिनेट) अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. अजित पवार हे उपमुख्यमंत्री जरी असले तरी,“उपमुख्यमंत्री हे घटनात्मक पद नसून मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही “. असा अधिकार आपल्याला आहे असे भासवून घेण्यात
आलेली दि. ९ एपिल २०२० ची मंत्रिमंडळ बैठक ही पूर्णपणे बेकायदेशीर असून त्यात संमत केलेले ठराव ही बेकायदेशीरच आहेत.

आ) सदर मंत्रिमंडळ बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर विहित नमुन्यातील कागदपत्रांसह उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेचे आमदार करण्याबाबतचा विषय विषय पत्रिकेत नव्हता, महाराष्ट्र शासनाच्या कार्यनियमावली( Rules Of Buisness) कलम १७१ (३) (e) प्रमाणे राज्यपाल नियुक्त आमदार नियुक्त करण्याचा प्रस्ताव, सदर महाराष्ट्र शासनाच्या कार्यनियमावली चे कलम १५ पोटकलम (१०) प्रमाणे मुख्यमंत्र्यांकडे लेखी प्रस्ताव सादर करावा लागतो व त्यानंतरच असा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करता येतो, अशी कोणतीही कार्यपद्धती या वेळी वापरण्यात आलेली नाही आणि म्हणूनच, विहित कागदपत्रांव्यतिरिक्त सदरचा प्रस्ताव दि ९ एप्रिल २०२० रोजी मंत्र्यांसमोर आणण्यात आला.

इ) सदरची बैठक मुख्यमंत्रीच गैरहजर असल्याने बेकायदेशीर ठरते व विहित कायद्याच्या बाजूंची पूर्तता न केल्यानेही राज्यपालांना दिलेला सल्ला हा बेकायदेशीर ठरतो.

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १६६ (१) एक प्रमाणे मुख्यमंत्री प्रमुख असतील अशा मंडळाने दिलेल्या सल्ल्यानुसारच राज्यपालंनी कोणतीही कार्यवाही करणे अपेक्षित असते दिनांक 9 एप्रिल 2020 या बैठकीस उद्धव ठाकरे स्वतः गैरहजर होते त्यामुळे मुख्यमंत्री प्रमुख आहेत अशा परिस्थितीत उर्वरित मंडळाने दिलेला सल्ला राज्यपालांवर बंधनकारक नाही.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आजारी असतील किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे करण्यास समर्थ असतील अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या कार्यनियमावली( Rules of Buisness ) कलम ६(अ ) अन्वय माननीय मुख्यमंत्री एखाद्या मंत्रस त्यांची संपूर्ण अथवा विशिष्ट कामे करण्याबाबतचा अधिकार देऊ शकतात परंतु उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सोपवला नसताना 9 एप्रिल 2020 रोजी मुख्यमंत्र्याच्या अनुपस्थित अजितदादा पवार यांनी मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक घेणे व ती कायदेशीर आहे असे भासवून उद्धव ठाकरे यांना आमदार करण्याबाबतचा राज्यपाल यांना घटनात्मक सल्ला देणे ही घटनेची पायमल्ली नसून कायदेशीर गुन्हाच आहे.

सत्तेच्या लोभापायी घटनेने तयार केलेल्या नियमावलीला धाब्यावर बसून करणाच्या विळख्यात जनता अडकलेले असताना जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून उद्धव ठाकरे यांना सहा वर्षांकरिता कोणतीही निवडणूक न लढवतात आमदार करण्याचा घाट सत्तेच्या लोभापायी घातला जात आहे.

सरकारच्या तिजोरीच्या चाव्या घटनाबाह्य कृत्य करून उद्धव ठाकरे व त्यांच्या मंत्रिमंडळाच्या हातात देण्याचा हा डाव आहे सदरचे कृत्य घटनाबाह्य बेकायदेशीर व लांच्छनास्पद आहे.

या संधर्भात उच्च न्यायालयात दाद मागणार असून आवश्यक वाटल्यास फौजदारी तक्रारही करणार असल्याचे प्रसिद्धी पत्रात म्हंटले आहे.

...Read More

V. S. News
अजमेरा; धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे राजेश पिल्ले याच्या नेतृत्वाखाली स्विकृत नगरसेविका वैशाली प्रशांत खाडये यांच्या हस्ते वाटप.

व्हिएस न्युज - करोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन लागू झाल्याने नागरिक कुटुंबासहीत घरातच आहेत. प्रभाग क्रमांक ९ येथील अजमेरा कॉलनी आणि मासुळकर कॉलनी या परिसरात नागरिकांना जेवणाची व जीवनावश्यक वस्तूंची उणीव भासू नये या नेक उद्देश्याने राजेश पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली एकुण 100 गरजू कूटुंबाना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे स्विकृत नगरसेविका वैशाली प्रशांत खाडये यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना युवा मोर्चा चे प्रभागातील पदाधिकारी संतोष मसने,बापू झेंडे,संदीप पाल्हाडे,मंदार कुलकर्णी,आकाश पवार,आमीण बेग,विवेक भाट,मुकुंद वेदपाठक व इतर पदाधिकारी उपसथित होते.

कोव्हिड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ येथील काही परिसरामध्ये जनजागृती करण्यासाठी राजेश पिल्ले यांच्या कडून ऑटोरिक्षांमधून ध्वनिक्षेपकाद्वारे प्रचार करण्यात येत आहे. दिवसातून ८ तास या ऑटोरिक्षांमधून नागरिकांना वैयक्तिक स्वच्छता, लॉकडाऊनच्या कालावधीत घरी राहून करायच्या उपाययोजना, तसेच घराबाहेर पडल्यावर सामाजिक अंतर राखणे, सरकारच्या सूचना आणि मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे, अफवांचा फैलाव रोखणे, कोविड-19 रोगाबद्दलच्या संदेशांचा प्रचार केला जात आहे अनेक वेळा स्वतः राजेश पिल्ले या रिक्षा मधून नागरिकांना प्रबोधन करताना दिसतात.

...Read More

V. S. News
पिंपरी चिंचवड शहरात भाजीपाला व फळे विक्रीस पूर्णत:प्रतिबंध - आयुक्त श्रावण हर्डीकर

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना कोवीड १९ साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व भाजी मंडई ,आठवडी बाजार ,मोशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भाजीपाला व फळे विक्रीस पूर्णत:प्रतिबंध करण्याचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला असून त्याची अंमलबजावणी शनिवार दिनांक ११ एप्रिल पासून सायंकाळी ६ वाजता पासून मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२० पर्यंत करण्यात येणार आहे.कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व उपाययोजना करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र कोवीड १९ उपाययोजना नियम २०२० नुसैर एखाद्या भौगोलिक क्षेत्रात उद्रेक/प्रादुर्भाव आढळल्यास आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ मधील तरतूदीनुसार खालील ठिकाणी भाजीपाला व फळे विक्रीसाठी पूर्णता प्रतिबंध करण्यात आला आहे.

१) भोसरी भाजीमंडई २) चिखली भाजीमंडई ३)चिंचवड भाजीमंडई ४)आकुर्डी भाजीमंडई ५) पिंपरी भाजीमंडई ६) थेरगाव भाजीमंडई ७)वाकड भाजीमंडई ८)सर्व आठवडे बाजार ९)पिंपरी चिंचवड शहरातील हातगाड्या १०)कृषी उत्पन्न बाजार समिती मोशी ११) किरकोळ भाजीपाला व फळेविक्री .

११ एप्रिल २०२० रोजी सायंकाळ ६ वाजतापासून मंगळवार दि १४ एप्रिल २०२० रोजी रात्री बारा वाजेपर्यत हे आदेश लागू करण्यात आले आहेत.त्यानुसार या संबंधित परिसरातील पोलीस स्टेशन प्रमुख या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करतील व संपूर्ण शहरात कोणतीही भाजीमंडई किरकोळ भाज्या व फळे विक्री व आठवडे बाजार बंद राहतील याची खबरदारी घेतील असेही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले.

...Read More

V. S. News
हातभट्टी दारूची रिक्षामधून वाहतूक करणाऱ्यास अटक , पिंपरी वाहतूक विभागाची कामगिरी .

व्हीएस न्युज - पिंपरी येथील मोरवाडी चौकातून अवैध रित्या गावठी हातभट्टी दारूची रिक्षा मधून वाहतूक करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. विलास दौलत जाधव ( रा. आनंद नगर , झोपडपट्टी चिंचवड )असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या कडून ७१ हजार ५२०/- रु किमतीचा हातभट्टी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. पिंपरी वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई पुजारी( ब.क्र -१५५८) यांच्या फिर्यादीवरून पिंपरी पोलीस ठाण्यात 'मुंबई दारूबंदी अधिनियम कलाम ६५(अ)(ई)' प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .संपूर्ण शहरात संचारबंदी असतानाही दारू आणि गुटख्याची तस्करी सुरूच असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे . .

मिळालेल्या माहिती नुसार दिनांक १०-०४-२०२० रोजी पिंपरी वाहतूक विभाचे सह.पो.नि संतोष पाटील त्यांच्या टीम सोबत मोरवाडी चौक येथे लॉकडाऊन व संचारबंदी साठी नाकेबंदी करत असताना एक रिक्षा ( एम एच -१४ -जीसी- ९८८१) पोलिसांनी इशारा देऊन सुद्धा थांबली नाही व लगेचच पो.शि पुजारी व पो.शि लावटे यांनी शिताफीने पाठलाग करत रिक्षा अडवली असता त्यात हातभट्टी दारू असल्याचे समोर आले. पुढील तपस पिंपरी पोलीस करत आहे .

...Read More

V. S. News
पिंपरी मध्ये कोरोना रुग्णात आढळली ‘सारी’ आजाराची लक्षणं!

व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवडमध्येही कोरोनासह आता सारी आजाराचे संकट ओढावले आहे. एका महिलेमध्ये सिव्हीअरली अॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस अर्थात सारीची लक्षणं आढळून आली आहेत. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. सारी आणि कोरोनाची लक्षणं ही एकसारखीच आहेत. विशेष म्हणजे पुण्यातील महिलेला सारीसह कोरोनाचीही लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

राज्यात कोरोना विषाणूचे आव्हान असतानाच राज्यातील विविध शहरांमध्ये आता सारी आजार पसरल्याचे समोर आलं आहे. औरंगबाद, हिंगोली, पिंपरी चिंचवड येथे सारी आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. सारी आणि कोरोनाची लक्षणं एकसारखीच असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे सारीच्या एका रुग्णाला कोरोना झाल्याचेही समोर आलं आहे. त्यामुळे सारीच्या रुग्णांवरही बारीक लक्ष ठेवलं जात आहे.

औरंगाबादमध्ये दहा दिवसात 11 जणांचा सारी आजाराने मृत्यू

औरंगाबादमध्ये सारी आजाराचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कारण गेल्या दहा दिवसात तब्बल 11 जणांचा सारी आजाराने मृत्यू झाला आहे. 29 एप्रिल ते 7 मार्च या दहा दिवसात 11 जणांचा सारी आजाराने मृत्यू झाल्याने औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यामधील एक रुग्ण हा कोरोना पॉझिटिव्ह होता.

हिंगोलीत 19 वर्षीय मुलीचा सारी आजाराने मृत्यू

हिंगोली शहरातील एका 19 वर्षीय मुलीचा सारी आजाराने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर या युवतीच्या घरातील आठ जणांना हिंगोलीच्या रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले आहे.

सारी आजार म्हणजे काय?

सेवीअर अ‍ॅक्युट रिस्पायरेटरी इलनेस अर्थात सारी आजाराची लक्षणं ही कोरोना सारखीच आहेत. यामध्ये रुग्णाला सर्वसाधारणपणे 38 अंश सेल्सिअस ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे आणिश्वास घेण्यास त्रास होणे, अशी लक्षणं असतात. हे एक प्रकारचे इन्फेक्शन असते. ते विषाणूमुळे किंवा साथीमुळे अशा दोन्ही प्रकारे असू शकते. तर कोरोनाचे इन्फेक्शन हे केवळ साथीच्या स्वरुपाचे आहे.

दरम्यान, पिपरी चिंचवडमध्ये आता एकूण 22 कोरोना रुग्ण झाले आहेत. यातील 12 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. गेल्या बारा तासाच्या आतच 2 रुग्णांना कोरोनाची बाधा झालेली आहे.

...Read More

V. S. News
पिंपरी -चिंचवड ;मास्क न घालणाऱ्या ३० जणांवर गुन्हे दाखल

व्हिएस न्युज - मास्क न वापरणाऱ्या पिंपरी चिंचवड परिसरातील ३० नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलिसांकडून कलम १८८नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिंजवडी, चिखली, सांगवी आणि निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संबंधित पोलिसांनी अशा कारवाया केल्या आहेत. आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात करोनाबाधितांचा आकडा हा २६ वर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्यात. करोना हा संसर्गजन्य असल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय परिसरात मास्क न घालणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. शुक्रवारी सायंकाळी सहापर्यंत तब्बल ३० जणांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अनेक नागरिक हे सार्वजनिक ठिकाणं जसे बँका, भाजी बाजार, किराणा, मेडिकल दुकानांमध्ये जाताना मास्क वापरत नसल्याचे आढळून आले आहे. मात्र, आता पोलिसांनी कारवाई केल्याने किमान पोलिसांच्या कारवाईने तरी नागरिक मास्क वापरतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

...Read More

V. S. News
विज्ञान तंत्रज्ञान विभागाकडून आरोग्यसेवा स्टार्टअप तयार करण्यात पाठिंबा, कोविड-19 च्या निदानासाठी झटपट चाचणी

व्हिएस न्युज - आरोग्यसेवा क्षेत्रात काम करणारी पुण्यातील 'मोड्यूल इनोव्हेशन्स' नावाची स्टार्टअप कंपनी कोविड -19 च्या निदानासाठी 10 ते 15 मिनिटांची चाचणी तयार करत असून त्याला विज्ञान तंत्रज्ञान विभागाकडून अर्थसहाय्य मिळत आहे.

यूसेन्स (USense) नावाचे याच कंपनीचे प्रमुख उत्पादन असून त्यातील पूर्वसिद्ध संकल्पनेचा वापर करून आता ही कंपनी nCoVSENSEs (TM) तयार करत आहे. कोविड-19 चा सामना करताना मानवी शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीज म्हणजेच, प्रतिपिंडांचा झटपट शोध घेण्यासाठी याचा उपयोग होईल.

सध्या भारत ज्या टप्प्यावर आहे, त्याचा विचार करता बहुसंख्यांच्या चाचण्या करणे, आता आत्यंतिक महत्त्वाचे आहे. या झटपट चाचणी साधनामुळे, रुग्णांमधील संसर्गाची खात्रीशीर निश्चिती करता येईल. तसेच, एखादा संसर्गित रुग्ण बरा झाला का, किंवा कसे, त्याचप्रमाणे, संसर्गाची स्थितीही समजू शकेल.

सध्याची रिअल टाइम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पोलीमेरास चेन रिऍक्शन (RT-PCR) ही पद्धत सर्वोत्कृष्ट असली तरी ती महागडी व वेळखाऊ आहे, तसेच त्यासाठी विशिष्ट प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असते. तर या नवीन झटपट चाचणीमुळे या अडचणीवर कार्यक्षम पद्धतीने व कमी खर्चात तोडगा निघू शकतो.

“या चाचण्या म्हणजे, PCR वर आधारित खात्रीलायक तंत्राला पर्याय ठरू शकत नाहीत, हे खरे, मात्र प्रतिपिंडे शोधून काढण्यावर आधारित असणाऱ्या या चाचण्या बहुसंख्य लोकांच्या झटपट तपासण्या करण्यासाठी जगभर वापरात आहेत. संख्येने मर्यादित असणाऱ्या PCR यंत्रांवरील भार हलका होण्यास यामुळे मदत होते. तसेच, धोरणे ठरवणे, निर्णय घेणे अशा कामांनाही हे तंत्र सहाय्य्यभूत ठरते.”- असे मत, विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा.आशुतोष शर्मा यांनी व्यक्त केले आहे. मा

शरीरात विषाणूजन्य संसर्गाचा शिरकाव होताच तयार होणाऱ्या IgG आणि IgM या प्रतिपिंडांचा शोध घेण्याच्या उद्दिष्टाने तयार केलेली ही nCoVSENSe चाचणी, ‘स्पाईक’ प्रथिनांविरोधात काम करते. त्यामुळे ती खासकरून कोविड-19 च्या निदानासाठी उपयुक्त ठरते. ये

2 ते 3 महिन्यांत राष्ट्रीय पातळीवरील संस्थांकडून आवश्यक त्या परवानग्या मिळाल्यावर ही चाचणी प्रत्यक्षात उपयोगात आणण्याचा या कंपनीचा विचार आहे. या आजारातून लोक बरे झाले का, हे ठरवण्यासाठी भविष्यातही याचा उपयोग होऊ शकतो. विमानतळ, रेल्वेस्थानके, रुग्णालये, अशा अनेक ठिकाणी प्रवासी आणि रुग्णांच्या तपासणीसाठी हे वापरल्यास, भविष्यात पुन्हा संसर्ग उफाळण्याचा धोका आपण टाळू शकतो. सदर तंत्रज्ञानाची व्यवहार्यता सिद्ध झाली आहे, तथापि, त्या उत्पादनाची उपयोगिता आणि स्पष्टीकरण देणारा प्रोटोटाईप अद्यापि बाकी आहे.

...Read More

V. S. News
पिंपरी-चिंचवड शहरातील ४२ डॉक्टर्स आणि ५० कर्मचारी क्वारन्टाईन.

व्हिएस न्युज - एका अपघातग्रस्त रिक्षा चालकावर शस्रक्रिया केली. त्यानंतर केलेल्या तपासणीत तो रुग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करणारे ४२ डॉक्टर आणि ५० कर्मचारी यांना क्वारन्टाईन करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपर चिचंवड मधील एका खाजगी रुग्णालयात दि. ३१ मार्च रोजी एका अपघातग्रस्त रिक्षा चालकावर शस्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया करीत असताना या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यामुळे डॉक्टरांनी त्याचे सॅम्पल कोरोनाच्या तपासणी करता प्रयोगशाळेकडे पाठवले.

हा रुग्ण दिल्लीतील निजामुद्दीन इथे पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला हजर होता ही माहिती त्याने डॉक्टरांपासून लपवून ठेवली. या रुग्णाचा अपघात झाला होता. त्यामध्ये इंटरनल ब्लिडिंग झाल्यामुळे त्याची सर्जरी करावी लागली. त्यानंतर दोन दिवस त्याला ताप येत होता. डॉक्टरांनी रुग्णाच्या आईकडे या संदर्भात चौकशी केली त्यावेळी हा रुग्ण तबलिगी जमातच्या कार्यक्रमात हजर असल्याची माहिती समोर आली.

डॉक्टरांनी या रुग्णाच्या काही टेस्ट केल्यानंतर शनिवारी त्याचा रिपोर्ट आला. या रिपोर्टमध्ये तो कोरोना ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे समजल्यानंतर त्याच्यावर सर्जरी करणाऱ्यांसह इतर डॉक्टरांनाही ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. या ४० डॉक्टरांच्या थुंकीचे आणि काही ब्लड सँपल्स तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला डॉक्टरांनी या रुग्णाच्या कुटुंबीयांना आणि रुग्णाला ट्रॅव्हल हिस्ट्री विचारली असता त्यांनी नकार दिला होता. त्यावेळी कोणीही बोलायला तयार नव्हते. ताप आल्यानंतर त्याच्या आईने दिल्लीला जाऊन आल्याचा खुलासा केला. या ४० पैकी ३० जण हे रुग्णालयातील स्टाफ तर १० डॉक्टरांचा समावेश आहे. त्या सर्वांचे सॅपल्स पाठवण्यात आले आहेत.

दोनच दिवसांपूर्वी त्या रिक्षाचालकाचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये तो रिक्षाचालक कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे त्या रिक्षाचालकांवर शस्रक्रिया करणारे ४२ डॉक्टर आणि ५० कर्मचारी यांना क्वारंटाइन करण्यात आले. यामुळे पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!