व्हीएस न्युज - पिंपरी येथील मोरवाडी चौकातून अवैध रित्या गावठी हातभट्टी दारूची रिक्षा मधून वाहतूक करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. विलास दौलत जाधव ( रा. आनंद नगर , झोपडपट्टी चिंचवड )असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या कडून ७१ हजार ५२०/- रु किमतीचा हातभट्टी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. पिंपरी वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई पुजारी( ब.क्र -१५५८) यांच्या फिर्यादीवरून पिंपरी पोलीस ठाण्यात 'मुंबई दारूबंदी अधिनियम कलाम ६५(अ)(ई)' प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .संपूर्ण शहरात संचारबंदी असतानाही दारू आणि गुटख्याची तस्करी सुरूच असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे . .
मिळालेल्या माहिती नुसार दिनांक १०-०४-२०२० रोजी पिंपरी वाहतूक विभाचे सह.पो.नि संतोष पाटील त्यांच्या टीम सोबत मोरवाडी चौक येथे लॉकडाऊन व संचारबंदी साठी नाकेबंदी करत असताना एक रिक्षा ( एम एच -१४ -जीसी- ९८८१) पोलिसांनी इशारा देऊन सुद्धा थांबली नाही व लगेचच पो.शि पुजारी व पो.शि लावटे यांनी शिताफीने पाठलाग करत रिक्षा अडवली असता त्यात हातभट्टी दारू असल्याचे समोर आले. पुढील तपस पिंपरी पोलीस करत आहे .
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002