Breaking News

मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे |
V. S. News
सुनियोजित षडयंत्र आखून ॲड. नितीन लांडगे यांना जाळ्यात अडकविले – चंद्रकांत पाटील

व्हिएस न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांना सुनियोजित षडयंत्र आखून जाळ्यात अडकविल्याचे एकूण परिस्थितीवरून लक्षात येत आहे. मात्र, या प्रकरणाची तपशीलवार माहिती घेऊन या कटकारस्थानाचा मूळ शोधण्यासाठी भाजपाच्या पिंपरी-चिंचवडच्या प्रभारी आमदार माधुरी मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

माधुरी मिसाळ उद्या 20 ऑगस्ट रोजी पिंपरी-चिंचवडला येणार असून, त्या सर्वांची भेट घेऊन या तक्रारी मागचे सत्य जाणून घेतील आणि त्याचा अहवाल माझ्याकडे सुपूर्द करतील, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

सत्तेचा दुरुपयोग करून आमच्या लोकप्रतिनिधींवर आरोप केले जात आहेत. त्यांना अडकविण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र आमचा न्याय संस्थेवर विश्वास आहे व लवकरच सत्य बाहेर येईल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांची भूमिका भाजपचे मुख्य प्रवक्ते, संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी दिली.

...Read More

V. S. News
पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती, दोन लिपिक,एक संगणक चालक व शिपयावर लाच स्वीकारल्या प्रकरणी अटक.

व्हिएस न्युज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेेतिल स्थायी समितीचे सभापती ॲड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे आणि त्यांचे स्विय सहाय्यक व मुख्य लिपिक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे ,विजय शंभुलाल चावरिया ( पद - लिपिक) , राजेंद्र जयवंतराव शिंदे ( पद - संगणक चालक ) , अरविंद भीमराव कांबळे ( पद - शिपाई) यांना १ लाख अठरा हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दि. १८ रोजी ताब्यात घेतले आहे.

सदर विषयी पिंपरी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम - ७, ७अ, १२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार सदर प्रकरणतील तक्रारदार हे जाहिरातीचा व्यवसाय करत असून त्यांनी पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या कार्यक्षेत्रात होर्डिंग उभरण्याकरिता भरलेल्या २८ निविदा मंजूर झालेल्या आहेत. परंतु त्यांची वर्क ऑर्डर अद्याप न निघाल्याने तक्रारदार हे स्थायी समितीचे सभापती ॲड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे आणि त्यांचे स्विय सहाय्यक व मुख्य लिपिक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे यांना भेटले आसता वर्क ऑर्डर मिळवण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठी त्या २८ निविदांच्या बोली रक्कमेच्या (बीड अमाउंट) ३ टक्के रक्कम १० लाख रुपये लाचेची मागणी केली .

तडजोडीअंती २ टक्के प्रमाणे सहा लाख घेण्याचे मान्य केले व ६ लाख रुपयांची मागणी करून त्यापैकी तयार असलेल्या ६ करारनाम्यांच्या कागदपत्रांवर सही शिक्का देण्याकरिता १ लाख अठरा हजार लाच रक्कमेची मागणी करून ती महापालिकेतील लिपिक विजय चावरीया, संगणक चालक राजेंद्र शिंदे व शिपाई अरविंद कांबळे यांच्या मार्फत स्विकरणात आली असता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाच्या उपअधीक्षक सीमा मेहेंदळे करत आहेत.

विरोधी पक्षाकडून सत्ताधारी भाजपवर सडकून टीका....

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाडेमुळे महापालिकेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाडे बद्दल महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे पदाधिकार्यांनी बोलण्यास टाळा टाळ केली . मात्र विरोधी पक्षाकडून सत्ताधारी भाजपवर सडकून टीका करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधीपक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर मंगला कदम, वैशाली घोडेकर, माजी विरोधीपक्षनेते नाना काटे, माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हाणे उपस्थित होते.

संजोग वाघेरे म्हणाले, ‘‘भय आणि भ्रष्टाचार मुक्त पिंपरी-चिंचवड असे अभिवचन देऊन भाजप सत्तेत आली. किती पारदर्शक आणि भ्रष्ट कारभार आहे, हे या कारवाईवरून दिसून येते.

...Read More

V. S. News
सर्वसामान्य नागरिकांसाठी पुणे-लोणावळा लोकल सुरु, पण…

व्हिएस न्यूज - सर्वसामान्य पुणेकरांसाठी पुणे-लोणावळा लोकल सुरू करण्यात आली आहे. मात्र राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतर रेल्वेकडून तिकिट अथवा पास मिळेल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

राज्य शासनाकडून सर्वसामान्य नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्यास मुभा मिळाली आहे. मात्र कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन चौदा दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना स्थानिक प्रशासनाकडून ओळखपत्र द्यावे लागेल. हे ओळखपत्र पुण्यामध्ये कोणाकडून दिले जाणार याबाबत मात्र रेल्वेकडून सांगण्यात आलेले नाही.

यापूर्वी अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्यासाठी पुणे पोलिसांकडून क्यूआर कोड देण्यात येत होता. तो क्यूआर कोड रेल्वे स्टेशनवर दाखवल्यानंतर तिकिट अथवा पास दिला जात होता. मात्र आता सर्व नागरिकांसाठी लोकल सेवा सुरु झाली असल्याने नागरिकांना दोन्ही डोस नंतर 14 दिवस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र स्थानिक प्रशासनाकडे देऊन त्यांच्याकडून ओळखपत्र घ्यावे लागेल.ते ओळखपत्र रेल्वेकडे द्यावे लागणार आहे.

त्यानुसार रेल्वेकडून नागरिकांना तिकिट अथवा पास दिला जाणार आहे. लोकल सेवा नागरिकांसाठी सुरू झाल्याचा आनंद असला तरी दोन्ही डोस झाल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाल्याचे ओळखपत्र नेमके पोलीस की महापालिका यापैकी कोणाकडून घ्यायचे याबाबत मात्र साशंकता आहे.

राज्य शासनाकडून सर्वसामान्य नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्यास मुभा मिळावी यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी मागणी केली होती. मुंबई प्रमाणेच पुणे- लोणावळा लोकल सेवा पूर्ववत सुरू व्हावी, यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पाठपुरावा केला होता.

...Read More

V. S. News
भाजपा कामगार आघाडी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष पदी नरेश जिनवाल यांची नियुक्ती.

व्हिएस न्युज- पिंपरी आणि भोसरी परिसरातील युवा कामगार नेता आणि सामाजिक कार्यकर्ते नरेश जिनवाल यांची भारतीय जनता पार्टी, कामगार आघाडी, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. हनुमंत लांडगे ( भाजपा, महाराष्ट्र प्रदेश,कामगार आघाडी, सोशल मीडिया प्रमुख/ सरचिटणीस) आणि प्रकाश मुगडे ( भारतीय जनता पार्टी,कामगार आघाडी, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष )यांच्या हस्ते इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.

सामाजिक कार्यकर्ता व कामगारांच्या न्याय हक्कासाठी नेहमी कटिबध्द असणारे नरेश जिनवाल यांनी माथाडी संघटनेच्या माध्यमातून अनेक कामगारांना न्याय आणि रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अखिल भारतीय वाल्मिकी समाज पिंपरी चिंचवड शहर महासचिव पदी त्यांना निवडून दिले होते आणि त्या माध्यमातून अनेक सफाई कामगारांना मार्गदर्शन आणि त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम नरेश जिनवाल यांनी केले आहे.अशा विविध सामाजिक आणि कामगार क्षेत्रात कार्यरत असणा-या संस्था, संघटनांवर विविध पदांवर काम केले आहे.

नरेश जिनवाल यांनी सोशल मीडिया मार्फत आपला संपर्क क्रमांक ( 7219228866/9922877462) प्रसिद्ध करून पिंपरी चिंचवड परिसरातील कामगार वर्गाला कोणत्याही प्रकारच्या मदतीची गरज भासल्यास निसंकोच पणे संपर्क साधावा आणि त्यावर निस्वार्थीपणे सहकार्य केले जाईल असे आव्हान केले आहे.

"माझ्यावर जिवापाड प्रेम करणारा माझा कामगार वर्ग, मित्र परिवार आणि नागरिकांसह भाजपा पक्षश्रेष्ठी, आणि लोकप्रतिनिधींच्या अशिर्वादने माझी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष, भा.ज.पा. (कामगार आघाडी) पदी नुकतीच निवड झाली, तुमच्या सारख्याच्या कृपाशिर्वाद, शुभेच्छा, सदिच्छामुळेच हे घडलं", असे म्हणत आभार मानले.

...Read More

V. S. News
मातोश्री सामाजिक संस्थेची कोकण पूरग्रस्त बांधवांना मदत आणि दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना वाहिली श्रद्धांजली.

व्हिएस न्युज - मुसळधार पावसामुळे तसेच दरड कोसळून अतोनात नुकसान झालेल्या कोकणातील महाड, तळीये, पोलदपूर, खारसगांव या पुरग्रस्त भागात जावून मातोश्री सामाजिक संस्थेच्या वतीने धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे कीट मदत म्हणून देण्यात आले.

यावेळी तळीये गावात दरड कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून अनेक निष्पाप नागरीक मृत्यूमूखी पडले. त्या ठिकाणी दशक्रिय विधीच्या कार्यक्रमात मातोश्री सामाजिक संस्थेच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आले.

यावेळी भावना व्यक्त करताना अध्यक्ष गणेश आहेर म्हणाले की, "या गावावर निसर्गाचा फार मोठा प्रकोप झाला आहे. यातून सावरण्यासाठी संबंध महाराष्ट्र या ग्रामस्थांच्या पाठीशी उभा आहे. मात्र या दुर्घटनेत जी जीवितहानी झाली. त्याचं दुःख कधीही भरून येणार नाही. तरीही आम्ही या मदतीच्या माध्यमातून एक छोटीशी सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहोत".

पिंपरी चिंचवड मधील अनेक दानशूर व्यक्तींचा मदत पोहचवण्यात खारीचा वाटा आहे. या सेवेसाठी सहायक पोलिस निरीक्षक अन्सार शेख, गणेश आहेर, धनराजसिंग चौधरी, सुदर्शन देसले, विशाल वाली, सूशिल मल्ले, गणेश चाटणे, गोरख पाटील, गणेश पाडूळे, माऊली जाधव, बाळासाहेब गायकवाड, भरत इंगळे, प्रदिप दळवी, रविकिरण घटकार, डाॅ अभय कुलथे, विष्णू साळवे, दत्ता गिरी, अंकुश कोळेकर, महेश गुळगोंडा, मारूती म्हस्के, नरसिग माने, गणेश वाळुंज, अभय खामकर, सचिन साळवी, मंगल शिंगारे, नारायण खूशलानी, उमेश भायानी, लक्ष्मण, रामू चंयन्दास, सचिन छपरीबंद यांनी सहकार्य केले.

...Read More

V. S. News
पुणे-बंगळूर महामार्गावर ट्रकची सहा वाहनांना धडक, तिघांचा जागीच मृत्यू

व्हिएस न्यूज : पुणे बंगळूर महामार्गावर शिरवळ गावच्या हद्दीत भरधाव वेगातील ट्रकने सहा वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच गाडीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण जखमी असल्याची माहिती समोर येते. मंगळवारी रात्री हा अपघात झाला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की साताऱ्याहून पुण्याच्या दिशेला जात असताना भरधाव ट्रकने सहा गाड्यांना धडक दिली. यामध्ये दुधाचा ट्रक, मालट्रक, जीप, वॅगनार आणि आणखी दोन अशा सहा वाहनांना या भरधाव वेगातील ट्रकने धडक दिली. या अपघातात व्हॅगनार कारचा चक्काचूर झाला आहे तर इतर गडांची देखील प्रचंड नुकसान झाले आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान अपघाताची घटना घडल्यानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्यासाठी पुढाकार घेतला. त्यातील जखमी नागरिकांना बाहेर काढत असताना तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे लक्षात आलं. अपघाताचा या घटनेमुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

...Read More

V. S. News
भा.ज.पा चे हनुमंत लांडगे यांची एक महिन्याची पेन्शन पूरग्रस्तांना मदतीसाठी..!

व्हिएस न्युज - कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्र पावसामुळे अनेक ठिकाणी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. महापूर, भूस्खलनामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले. राज्याती स्वयंसेवी संस्थासह अनेक नागरिकांनी आपापल्या परीने आपत्तीग्रस्तांपर्यंत मदत पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

अशातच राज्यातील भारतीय जनता पार्टी ,कामगार आघाडी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश ताठे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त मदत कार्यास खारीचा वाटा म्हणून भारतीय जनता पार्टी ,कामगार आघाडीचे, महाराष्ट्र प्रदेश ,सोशल मीडिया प्रमुख आणि सरचिटणीस हनुमंत लांडगे यांनी स्वतःची एक महिन्याची पेन्शन मदत म्हणून जाहीर केली आहे. सदर पेन्शनची रक्कम १ ऑगस्ट रोजी रोखस्वारुपत स्वाधीन करण्यात येणार आहे.

सेवा व मदत करण्यात नेहमीच तत्पर..

एक विचारशील कामगार नेता असलेल्या, हनुमंत लांडगे यांचा साधेपणा आणि मुक्त विचारसरणी यांवर विश्वास आहे. पारदर्शकतेला प्राथमिक महत्त्व देत, त्यांचा स्वभाव कायम आपल्या मातीशी जोडून राहण्याचा बनला आहे. एक खरा कामगार नेता सर्वंसमोर योग्य उदाहरण ठेवून नेतृत्व करतो. लांडगे यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आहे आणि जनतेच्या हितासाठी त्यांनी आपले कार्य समर्पित केले आहे. सर्व परिणामांचा विचार करुन काम करण्याचे धोरण ते अंमलात आणतात.तंत्रज्ञानाच्या युगात लोक डिजिटल माध्यमांद्वारे जोडले गेले आहेत. लांडगे यांनीही हे तंत्रज्ञान आत्मसात करून मोठ्या प्रमाणात समाजापर्यंत पोचण्यासाठी त्याचा उपयोग केला आहे.

...Read More

V. S. News
रेकी करून ज्वेलर्स शॉप, बँका फोडणाऱ्या नेपाळी टोळीच्या पाच सदस्यांना अटक; 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

व्हिएस न्युज - रेकी करून ज्वेलर्स शॉप आणि बँका फोडणाऱ्या नेपाळी टोळीच्या पाच सदस्यांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली आहे. या आरोपींकडून 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ज्या दुकानात चोरी करायची आहे, त्याच्या बाजूचे दुकान भाड्याने घ्यायचे आणि वेळ गाठून भिंत फोडून चोरी करण्याची या टोळीची पद्धत होती. बावधन येथे 18 जून रोजी एका ज्वेलर्सच्या दुकानात अशा प्रकारची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

जगत बम शाही वय 28, रा. क्रिस्टल पैलेस, क्रिष्णा कॉलनी, मारुंजी पुणे. मुळ रा. गाव गटाडा, विनायक नगरपालिका, जि. अच्छम, नेपाळ), गणेश विष्णु शाही (वय 33, मूळ रा. गाव भुरुआ, लम्की टिकापुर रोड, जि. कैलासी, नेपाळ), खगेंद्र दोदी कामी (वय 27, मूळ रा. घाटगाऊ चौगुने गाव पालिका जि. सुरखेत नेपाळ), प्रेम रामसिंग टमाटा (वय 42, सध्या रा. पद्मालय पार्क, लंडन ब्रिज जवळ, पुनावळे, पुणे. मुळ रा. कालकांडा, विनायक नगरपालिका, जि. अच्छम, नेपाळ), रईस कादर खान वय 52, रा. तीन डोंगरी, प्रेम नगर, उन्नत नगर रोड क्र.2 साईबाबा मंदीर समोर, गोरेगाव (पश्चिम) मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

बावधन मध्ये ज्वेलर्स शॉप फोडले

जगदंबा ज्वेलर्स, शॉप नं. 2, गीतांजली अपार्टमेंट, हुतात्मा चौक, बावधन बु. या शॉपच्या बाजूचे दुकान आरोपींनी 15 जून रोजी चायनीज व्यवसायासाठी भाड्याने घेतले. 18 जून रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ज्वेलर्स दुकानदाराने दुकान उघडले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी शेजारील चायनिज दुकानातून पोटमाळ्यावरील भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश करून गॅस कटरने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु तिजोरी न फुटल्याने दुकानातील वर ठेवलेले चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल फोन व सीसीटीही डीव्हीआर असा एकूण तीन लाख 55 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग

सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच गुन्ह्याची पद्धत वेगळी असल्याने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी हा गुन्हा गुन्हे शाखा युनिट चारकडे वर्ग केला. पोलिसांनी घटनास्थळावरील, आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत तांत्रिक सुरू केले.

नेपाळी व्यक्तीवर संशयाची सुई आली अन तपास पुढे सरकला

या गुन्ह्यात आजूबाजूच्या परिसरात काम करणारे नेपाळी वॉचमन सामिल असण्याची दाट शक्यता पोलिसांना वाटली. पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणात मारुंजी परिसरात वॉचमन म्हणून काम करणारा एक इसम सदर गुन्ह्यात सामिल असल्याबाबत संशय आल्याने तसेच तो घटना झाल्यापासून काम सोडून गेल्याचे कळाल्याने त्याच्यावरील संशय बळावला. त्याच्याबाबत माहिती काढून पोलिसांनी जगत बम शाही याला अंबरनाथ येथून 12 जुलै रोजी अटक केली. त्याने त्याच्या तीन साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी गणेश, खगेंद्र, प्रेम या तिघांना ठाणे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केली. वरील आरोपींनी कार चालक अटक आरोपी रईस आणि फरार आरोपी शंकर चंद्र उर्फ कांचा लामा (रा. धनगढी नेपाळ), अर्जुन उर्फ ओम रावल रा. धनगढी, नेपाळ), बादल लामा (रा. धनगढी, नेपाळ), तसेच शंकर चंद्र उर्फ कांचा लामा याचे झारखंड येथून बोलावलेले तीन साथीदार यांनी केल्याचे पोलीस तपासात समोर आले.

अटक केलेल्या आरोपींकडून एक किलो 719 ग्रॅम चांदीचे दागिने, 11 ग्रॅम सोन्याचे दागिने, इनोव्हा कार, दुचाकी, मोबाईल फोन असा एकूण 12 लाख तीन हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चोरी करण्यापूर्वी आरोपी अशी करायचे रेकी

या प्रकरणात अटक आरोपी गणेश शाही व पाहिजे असलेला आरोपी शंकर चंद्र उर्फ कांचा लामा हे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी चोरी करण्यासाठी सोनारा दुकानाशेजारील दुकान भाड्याने घेता येईल अशा बऱ्याच ठिकाणांची पाहणी केली. त्यापैकी सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत एक आणि बावधन येथील एका सोनाराचे दुकान पाहून ठेवले होते. त्यानंतर आरोपींना 15 जून रोजी बावधन येथील ज्वेलर्सच्या दुकानाच्या बाजूचे दुकान भाड्याने मिळाले. लगेच आरोपींनी त्यांच्या साथीदारांना बोलावून घेतले आणि 17 जून रोजी रात्री भिंत फोडून चोरी केली.

हे प्रकरण शांत झाल्यावर ते काही दिवसांनी परत येवून सांगवी परिसरातील पाहून ठेवलेल्या दुकानात याच प्रकारे चोरी करण्याच्या विचारात होते. तसेच आरोपीकडे केलेल्या तपासात गणेश शाही व शंकरचंद्र लामा या दोघांनी त्यांच्या इतर साथीदारांसोबत 30 मे रोजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे स्थानिक वॉचमनच्या मदतीने एका बँकेचे शटर कापून चोरी केल्याचे उघड झाले आहे.

सराईत अन चलाख आरोपी

या आरोपिंची मोठी टोळी आहे. या टोळीने यापूर्वी अशाच पद्धतीने अनेक गुन्हे केलेले आहेत. गणेश शाही याच्यावर घरफोडीचे व दरोड्याच्या प्रयत्नाचे एकूण 12 गुन्हे, प्रेम टमाटा याच्या विरुद्ध चार गुन्हे दाखल आहेत. पाहिजे आरोपी शंकरचंद्र लामा ऊर्फ कांचा याच्यावर एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. तसेच सदर आरोपी हे अत्यंत चलाख असून ते आपसात बोलण्यासाठी नेहमी फेसबुक मॅसेंजरचा वापर करत होते. त्याद्वारे आरोपी एकमेकांना ऑडिओ व व्हिडिओ कॉल करत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, सिद्धनाथ बाबर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धर्मराज आवटे, दादा पवार, नारायण जाधव, पोलीस अंमलदार प्रविण दळे, संजय गवारे, अदिनाथ मिसाळ, राहिदास आडे, संतोष असवले, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मो. गौस नदाफ, वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, प्रशांत सैद, तुषार काळे, अजिनाथ ओबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोविंद चव्हाण, आणि तांत्रिक विश्लेषन विभाग (गुन्हे शाखा) चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, राजेंद्र शेटे, नागेश माळी, विकास आवटे, पोपट हुलगे यांनी केली आहे.

...Read More

V. S. News
स्पाईनरोड, मोशी प्राधिकरण, संतनगर सेक्टर ४,६,९,११,१२ मधील पथारी, हातगाडी, टपारी धारक व रिक्षा, टेम्पो धारकांसाठी तीन दिवसीय करोना लसीकरण शिबिर आयोजित करावे - हनुमंत लांडगे

व्हिएस न्युज - स्पाईन रोड, संतनगर, मोशी प्राधिकरण सेक्टर ४, ६,९, ११ व १३ मधील ३० हजार नागरिकांच्या जीवितास धोका असणा-या ५०० पथारी, हातगाडी, टपारी धारक व रिक्षा, टेम्पो चालकांचे तातडीने कोरोना लसीकरण करावे, यासाठी पिंपरी चिंचवड मानगरपालिकेचे आयुक्त, आमदार, नगरसेवक यांना भारतीय जनता पार्टी (का. आ.) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हनुमंत लांडगे यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.

सदर पत्राची गंभीरपणे दखल घेऊन परिसरातील पथारी, हातगाडी, टपारी धारक व रिक्षा, टेम्पो चालक हे कोरोना विषाणूचे सुपर स्प्रडर ठरू शकतात व तशी सुरुवात देखील झाली आहे ही गंभीर बाब लक्षात घेता तीन दिवसीय कारोना लसीकरण शिबिर आयोजित करून तातडीने लसीकरण करावे अशी विनंती निवेदनाद्वारे पिंपरी चिंचवड मानगरपालिकेचे आयुक्त, आमदार व नगरसेवक यांना हनुमंत लांडगे यांनी केली आहे.

...Read More

V. S. News
देहूरोड - अश्‍लील हावभाव करून वेश्‍यागमनासाठी उत्तेजित करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल

व्हिएस न्यूज – अश्‍लील हावभाव करून वेश्‍यागमनासाठी उत्तेजित करणाऱ्या सात महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विकासनगर, देहूरोड येथे सोमवारी (दि. 21) दुपारी करण्यात आली.

याप्रकरणी महिला पोलीस कर्मचारी वैशाली कपिल आशिवाल यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सात महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास देहूरोड- कात्रज बायपास मार्गावर विकासनगर, देहूरोड येथील द्वारका लॉजच्या समोर सात महिला उभ्या होत्या. त्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हातावरे करून थांबवत होत्या. तसेच अंगविक्षेप करून त्यांच्याशी लगट करून असभ्य वर्तन करीत होत्या. तसेच छेड काढून शब्दाने बोलून त्यांना वेश्‍यागमनासाठी उत्तेजित करीत होत्या. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...Read More

V. S. News
पिंपरी चिंचवड - नागरिकांच्या मनातली भीती कमी करण्यासाठी पोलिसांनी काढली आरोपीची धिंड

व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात 13 रिक्षांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली आहे. यातील मुख्य आरोपी सुरक्षा रक्षक किरण घाडगेला त्याच दिवशी वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कॉम्प्लेक्सच्या समोर रिक्षा उभी करत असल्याने तो हे कृत्य केल्याच समोर आलं होतं. याप्रकरणी एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

मुख्य आरोपी सुरक्षा रक्षक किरण घाडगे, सागर घाडगे, चंद्रकांत गायकवाड, मयूर अडागळे, अविनाश नलावडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हातोबा नगर वाकड येथे 13 रिक्षांची तोडफोड करणाऱ्या किरण घाडगेसह पाच जणांची वाकड पोलिसांनी त्याच परिसरात धिंड काढली आहे. संबंधित आरोपींना धडा शिकवण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी धिंड काढली असल्याचं वाकड पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

नेमकं घडलं काय?

वाकड परिसरातील म्हातोबा नगर येथे नवीन कॉम्प्लेक्स उभारण्यात आले असून त्याच्या समोर तेथील काही रिक्षा चालक रिक्षा उभी करत असत. तसेच, ते तिथे लघुशंका करायचे असं आरोपी सुरक्षा रक्षक घाडगे याचं म्हणणं असून त्यांना वारंवार सांगून ही ते तिथे रिक्षा पार्क करायचे. याचाच राग मनात धरून तीन दिवसांपूर्वी मध्यरात्री इतर मित्रांच्या मदतीने पार्क केलेल्या रिक्षा दगडाने फोडून नुकसान केले होते.

...Read More

V. S. News
मुलींना बारावी पर्यंत शिक्षण मोफत तरीही शाळा आणि महाविद्यालयांची मुलींकडून शुल्क वसुली चालूच .

व्हीएस न्यूज - ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा दिला जातो, पण मुलींना बारावीपर्यंत शिक्षण मोफत असतानाही प्रत्यक्षात अनेक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये शुल्क घेत असल्याची वस्तुस्थिती आहे. इमारत निधी, शाळा परिसर विकास निधी, वार्षिक संमेलन, स्नेहसंमेलन या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट होते. शहरात ६२० शाळा व कनिष्ठ महाविद्यालये आहेत. अनुदानित-विनाअनुदानित शाळांमध्येही मुलींकडून कुठलेही शुल्क आकारायचे नाही, असे स्पष्ट आदेशच आहेत. याबाबत माध्यमिक शिक्षण विभागाकडून दरवर्षी नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच माहिती नियमित दिली जाते. पण, या संस्थांकडून सर्रासपणे शुल्काची वसुली केली जाते.

अनुदानित शाळांना वेतन तसेच, वेतनेतर अनुदान सरकारकडून मिळते. त्यासाठी दर महिन्याची बिले सरकारकडे सादर करावी लागतात. १९८६ च्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांकडून घेतलेले शुल्क त्यांच्या संख्येसह बँकेत सादर करावे, असे स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षीच्या एकूण वसूल शुल्काच्या (१/१२) इतकी रक्कम शाळांनी सहकारी बँकेत भरायची. त्याचे प्रमाणपत्र दर महिन्याच्या पगार बिलासोबत जोडायचे आहे. मुलीने प्रवेश घेतल्यापासून एक महिन्याच्या आत प्रतिपूर्तीचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयाकडे सादर करणे गरजेचे आहे.

शुल्क आकारण्याचा संबंधच येत नाही

विनाअनुदानित संस्थेत मुलींकडून आकारलेल्या शुल्काबाबत सरकारने नियम ठरविले आहेत. अनुदानित शाळांकडून संबंधित इयत्तेत आकारलेल्या प्रमाणित शुल्काइतकेच शुल्क आकारायचे आहे. सरकारकडून प्रतिपूर्तीने मान्य केलेले शुल्क, उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा शुल्क सोडून इतर कोणतेही शुल्क आकारूच नये, असे स्पष्ट आदेश आहेत. पण, या शाळाही अनुदानित संस्थांप्रमाणेच मुलींकडून पैसे वसूल करतात. शिवाय सरकारकडूनही पैसे वसूल करताहेत.

मुलींना बारावीपर्यंत शिक्षण मोफत असतानाही शुल्क वसूल करणाऱ्या शाळा-महाविद्यालयांवर कारवाई करण्‍यात येईल. या संदर्भात पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी कराव्यात.

- विलास पाटील, तक्रार निवारण अधिकारी, शिक्षण विभाग

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!