व्हीएस न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार अजित दामोदर गव्हाणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे, आमदार म्हणुन त्यांना विधानभवनात पाठवु आसा विश्वास छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.महायुती सरकार मराठा आरक्षण,धणगर आरक्षणाचा विषय सोडवला नाही आणि शेतकऱ्यांची कर्ज माफ केली नाहीत ,तसेच महाराष्ट्रातील अनेक मोठे प्रकल्प गुजरातला गेले, त्यांनाही महायुतीचे सरकार रोखू शकले नाहीत, त्याचप्रमाणे छावा संघटनेचे विध्यार्थी आघाडी चे प्रदेशाध्यक्ष व शेतकऱ्यांचे नेते विजय कुमार घाडगे पाटील हे तब्बल पंधरा दिवस सोयाबीनला आठ हजार भाव मिळावा यासाठी उपोषणाला बसले होते,याची दखल सरकारने घेतली नाही हे सरकार शेतकरी, कामगार, मराठा व धनगर समाजाला न्याय देऊ शकले नाही म्हणून परिवर्तन होण्याची आणि सरकार बदलायची वेळ आली आहे. यासाठी आखिल भारतीय छावा संघटनेने एक संस्कृत व सुशिक्षित उमेदवार अजित गव्हाणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
यावेळी आखिल भारतीय छावा संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन लिमकर, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष राम सुर्यवंशी पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षय बोडके, पुणे जिल्हा अध्यक्ष शिक्षक आघाडी प्रशांत फड,पुणे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश जाधव,पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संजय कांबळे, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष राजेंद्र राऊत, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सोसल मिडिया शुभम बिरादार, कुणाल शिंदे,व आदि कार्येकर्ते उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या सभेत खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. चुकीला एक वेळ माफी असू शकते परंतु गद्दारीला माफी नाही ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर गद्दारी केली त्यांना माफ केले जाणार नाही असे उद्गार शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी काढले.
यावेळी अमोल कोल्हे म्हणाले की सुलक्षणा शीलवंत या वाघीण आहेत. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत होता त्यावेळी भले भले मागे हटत होते परंतु ही वाघीण मैदानात उतरली. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका कवितेचा दाखला देत अमोल कोल्हे म्हणाले की सूर्य अस्ताला जात असताना प्रकाशाचे काय असा प्रश्न सूर्याला पडला होता त्यावेळी एक पंती पुढे आली व तिने अंधार दूर करता येतो हा विश्वास जगाला दिला त्याचप्रमाणे सुलक्षणा शीलवंत या विश्वास देणाऱ्या उमेदवार असल्याने आपले सर्वस्व पणाला लावून आपण त्यांना विजयी करावयाचे आहे.
यावेळी बोलताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे म्हणाले की शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या एक उच्चशिक्षित उमेदवार आपल्याला मिळाले आहेत हे आपले भाग्य आहे. बदलापूर येथे घडलेल्या घटनेनंतर निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व सुलक्षणा शीलवंत यांनी केले तसेच मणिपूर मधील महिला अत्याचाराच्या विरोधात निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व देखील सुलक्षणाशीलवंत यांनी केले त्याचवेळी महिलांच्या हक्कांसाठी व अधिकारासाठी सातत्यपूर्ण लढण्याची तयारी असलेले हे नेतृत्व आहे हे लक्षात आले होते. पिंपरी चिंचवड शहरातील प्रश्नांची जाण असलेल्या उमेदवार सुलक्षणाशीलवंत असल्याने त्यांना निवडून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
आज कार्यकर्त्यांचा प्रचंड जल्लोष मतदारांचा उत्साह आणि प्रेमाच्या वर्षावात पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सुलक्षणा शीलवंत यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ची रॅली विजय निर्धाराची रॅली ठरली होती. यावेळी कार्यकर्ते दुचाकी व चार चाकी गाड्यांमधून महेश नगर, संत तुकाराम नगर येथून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापर्यंत आले होते. सुलक्षणा शीलवंत यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून कार्यकर्त्यांच्यात व मतदारांच्यात उत्साह व चैतन्य निर्माण झाले आहे हा उत्साह आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेल्या रॅलीतही दिसून आला. सुरुवातीला पिंपरी चौकात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून प्रचंड घोषणा देत कार्यकर्ते निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयापर्यंत आले होते.
रॅलीतील कार्यकर्त्यांच्या हातात शरद पवार साहेब, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे, आपचे प्रमुख व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच उमेदवार सुलक्षणा शीलवंत यांच्या प्रतिमा हातात घेऊन दिमाखात सहभागी झाले होते.
सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज भरताना शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे,माजी नगरसेवक शंकर पांढरकर,आप पक्षाच्या शहराध्यक्ष मीनाताई जावळे, चंद्रमनी जावळे,सुनील मोरे,सूरज मोरे,शरद जाधव,युवक अध्यक्ष इम्रान शेख,वरिष्ठ उपाध्यक्ष धम्मराज साळवे ,चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे,नेते इखलास सय्यद,कार्याध्यक्ष विशाल काळभोर कार्याध्यक्ष संतोष कवडे ,ज्ञानेश आल्हाट,श्रीमंत जगताप ,दिलीप पानसरे ,जिब्राईल शेख ,संदीप चव्हाण,अनिल भोसले,योगेश सोनवणे,महेश पानस्कर,गिरीश कुटे, अतुल शितोळे,गोविंद अप्पा काळभोर,आपुलकी जेष्ठ नागरिक संघ,वसंत सोनार,फैज शेख,तृप्ती निंबळे,सागर लष्करे,अमोल गाडेकर,चेतन शेटे सूर्यवंशी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे adv अमीन शेख,अण्णा कुऱ्हाडे, राहुल आहेर,संदीप गायकवाड ,कैलास बनसोडे, संदेश जगताप,राजेंद्र जगताप,हेमंत बलकवडे, श्रीकांत पवार उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. त्यामुळे विकासात्मक मुद्दे घेऊन विधानसभा निवडणुकीला महायुती एकजुटीने सामोरे जात आहे. जनता महायुतीच्या मागे आहे. पिंपरी चिंचवड शहरासाठी मेट्रो, पाणी, रस्ते असे अनेक प्रश्न महायुतीने मिटवले आहेत. आम्ही सर्वजण एकत्र असून एकदिलाने निवडणुका लढून जिंकणार असल्याचा निर्धार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
महायुती व इतर घटक पक्ष यांच्या वतीने रविवारी चिंचवड विधानसभेचे उमेदवार व भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, पिंपरी विधानसभेचे उमेदवार, आमदार अण्णा बनसोडे आणि भोसरी विधानसभेचे उमेदवार आमदार महेशदादा लांडगे यांचे प्रतिनिधी कार्तिक लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष योगेश बहल, आमदार अश्विनीताई जगताप, उमाताई खापरे, माजी खासदार अमर साबळे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे आदींसह महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
योगेश बहल यांनी सांगितले की, पिंपरी विधानसभेतून आमदार अण्णा बनसोडे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. या ठिकाणी इच्छुक असणाऱ्या इतर व्यक्तींची नाराजी दूर करून अण्णा बनसोडे यांच्यासह महायुतीतील चिंचवड विधानसभेचे उमेदवार शंकर जगताप, भोसरी उमेदवार आमदार महेशदादा लांडगे या तीनही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे. चिंचवड विधानसभेचे उमेदवार व भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त उमेदवार राज्यातून आणि शहरातील तीनही उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप सह सर्व घटक पक्ष एकत्रित काम करीत आहेत. त्याला त्या सरकारच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली विकासाची गंगा आणि वेग आणखी वाढवण्याचे व्हिजन आहे.
पिंपरी चिंचवड शहराचे नाव देशातच नव्हे तर जगात उंचावण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत, यासाठी जनता आमच्या पाठीशी आहे असा विश्वास शंकर जगताप यांनी व्यक्त केला. सदाशिव खाडे यांनी सांगितले की, चिंचवड विधानसभेचे उमेदवार व भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप आणि पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे सोमवारी तर भोसरी विधानसभेचे आमदार व उमेदवार महेशदादा लांडगे मंगळवारी अर्ज भरणार आहेत अशी माहिती खाडे यांनी यावेळी दिली.
व्हीएस न्युज - थेरगाव परिसरात राहणारे राहुल सरवदे ह गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी केसदान हा उपक्रम राबवित आहेत. राहुल सरवदे हे थेरगाव येथील पदमजी पेपर प्रॉडक्ट्स या कंपनीत कार्यरत आहेत. तसेच ते परिवर्तन सोशल फाऊंडेशन आणि थेरगाव सोशल फाऊंडेशन या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजकार्यात सक्रीय असतात. त्यांनी पहिल्यांदा २७ जुलै २०१९ रोजी केसदान केले. त्यानंतर ११ फेब्रुवारी २०२२ आणि आता पुन्हा एकदा केसदान केले आहे.
मुंबई येथील टाटा हॉस्पिटल संलग्न मदत ट्रस्ट या संस्थेकडून दान मिळालेल्या केसांचे विग बनवले जातात. हे विग कर्करोगामुळे केस गेलेल्या रुग्णांना दिले जातात. कर्करोगाशी उपचार पद्धती असलेल्या केमोथेरपीमध्ये रुग्णाच्या डोक्यावरील सर्व केस गळून जातात. त्यामुळे अनेक रुग्णांचे मानसिक खच्चीकरण होते. त्यांना मानसिक बळ मिळण्यासाठी मदत ट्रस्टने केलेले विग त्या आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना दिले जातात.
केसदान या उपक्रमाबाबत व्यक्त होताना राहुल सरवदे म्हणतात, “केसदान आणि इतर सामाजिक कार्य करत असताना मला माझे कुटुंबीय व सहकारी मित्र परिवार यांचा खूप मोठा पाठिंबा मिळाला. आजवर मी ४५ पेक्षा जास्त वेळा रक्तदान केले असून तीन वेळा केसदान केले आहे.तसेच यापूढे देखील आपल्या समाजसाठी काहीतरी चांगले करण्यासाठी मी नेहमीच अविरतपणे प्रयत्नशिल राहील.”
व्हीएस न्युज - वाकड येथील एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेत प्रजासत्ताक दिना निम्मित भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्कृष्टपणे सदर केले.विद्यार्थ्यांनी भाषणे करून क्रांतिकारकांना आदरांजली व्यक्त केली.
यावेळी ॲड. दीप्ती देशपांडे यांनी ध्वजारोहण करण्याची आणि प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी दिली म्हणून शाळेचे आभार व्यक्त केले. या वेळी विद्यार्थांना संबोधित करीत त्या म्हणाल्या की "दर वर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जतो. भारत देश १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा ‘प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो.आपला भारत हा एक लोकशाही राष्ट्र आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राष्ट्र आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्यादिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली." पुढे त्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटना आणि त्यातील नागरिकांचे मूलभूत हक्क या वर मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्याबद्दल माहिती दिली आणि शिक्षणामुळेच आपण आवश्यक कौशल्ये, ज्ञान, मुल्ये आणि जीवनविषयक दृष्टीकोन आत्मसात करून सक्षम होतो’, असे प्रतिपादन करत शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले.
शाळेचे संस्थापक श्री अंकुश बोडके आणि मुख्याध्यापिका आरतारे मॅडम यांनी शिक्षणाच्या नव्या दृष्टीनुसार अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला साह्य करणाऱ्या समग्र अनुभवसंहतीचा समावेश केला आहे. त्यामुळे अभ्यासेतर समजल्या जाणाऱ्या क्रीडा, वक्तृत्व, नाट्य आदी कार्यक्रमांचा अभ्यासक्रमात समावेश होत आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच विविध कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांना त्यात निपुण केले आहे.यामुळे ॲड. दीप्ती देशपांडे यांनी शाळेच्या संस्थापक , मुख्याध्यापिका आणि शिक्षकांचे कौतुक केले.
यावेळी शाळेतील सर्व शिक्षक आणि शाळेतील इतर स्टाफ उपस्थित होता.
व्हीएस न्युज - भारताच्या ७५ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खराळवाडी येथील मध्यवर्ती कार्यालयासमोर शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अजित गव्हाणे म्हणाले की, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे आम्ही सर्व नागरीक असल्याचे आम्हां सर्वांना सार्थ अभिमान असून संविधानाच्या आधारावर सर्वसामान्य नागगरीकांचे मूलभूत हक्क, अधिकार, कर्तव्याचे रक्षण करणे हे आपल्या सर्वाची जबाबदारी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, कार्याध्यक्ष फजल शेख, मा.उपमहापौर मोहंम्म्द पानसरे, माजी नगरसेविका वैशालीताई काळभोर, ओबीसी अध्यक्ष विजय लोखंडे, युवक अध्यक्ष शेखर काटे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, सेवादल अध्यक्ष महेश झपके, प्रदेश सरचिटणीस ॲड.गोरक्ष लोखंडे, ओबीसी निरिक्षक ॲड.सचिन औटे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोर, मुख्य सरचिटीणीस विनायक रणसुभे, खजिनदार दिपक साकोरे, सहकार सेल अध्यक्ष श्रीधर वाल्हेकर, ख्रिश्चन सेल अध्यक्ष डॅनियल दळवी, ज्ञानेश्वर कांबळे, झोपडपट्टी सेल अध्यक्ष संतोष निसर्गंध, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसरमल, पिंपरी विधानसभा अध्यक्ष कविता खराडे, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला, शोभा पगारिया, अर्बन सेल अध्यक्ष मनिषा गटकळ, बचत गट महासंघ अध्यक्षा ज्योती गोफणे, साफसफाई कामगार अध्यक्षा सुर्वणा निकम, महिला संघटीका पुष्पा शेळके, पौर्णिमा पालेकर, आशा शिंदे, युवराज पवार, बाळासाहेब पिल्लेवार, तुकाराम बजबळकर, युवक कार्याध्यक्ष प्रसाद कोलते, सचिन वाल्हेकर, अंकुश दिघे, दिलीपराव तापकिर, संपत पांचुदकर, काळूराम खेडकर, अभिजीत आल्हाट, नवनाथ डफळ, बाबासाहेब चौधरी, माऊली मोरे, प्रविण गव्हाणे, सतीश चोरमले, विजय दळवी, राजन नायर, दत्तात्रय बनसोडे, वर्षा शेडगे, वंदना कांबळे, देवी थोरात, रामप्रभू नखाते, महेश माने, अर्चणा लोहार, मिरा कांबळे, रजनी गोसावी, सचिन मोकाशी, राजू चांदणे, योगेश सागरे, निखिल सिंग, इम्रान शेख, सुनिल अडागळे, धनाजी तांबे इत्यादीसह पदाधिकारींसह अनेक कार्यकर्ते उपस्थिती होते.
या कार्यक्रमाचे संयोजन सेवादल अध्यक्ष महेश झपके यांनी केले.
व्हीएस न्युज - कात्रज-कोंढवा रस्त्यावर सातत्याने लहान-मोठे अपघात होत असल्याने आणि निधी अभावी भूसंपादनाची प्रक्रिया तसेच अन्य कामे रखडल्याने महापालिका प्रशासनाने सातव्या वेतन आयोगाच्या निधीतून रस्त्याच्या कामासाठी ३० कोटींचा निधी मंजूर केला आहे. सातव्या वेतन आयोगाच्या निधीतून निधी देण्याचा वर्गीकरणाचा प्रस्तावाला स्थायी समितीनेही मंजुरी दिली आहे.
रस्त्याच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाकडून २०० कोटी रुपये देण्याची घोषणा झाली असली तरी हा निधी महापालिकेला अद्याप मिळालेला नाही. कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी सध्या भूसंपादनासाठी ७०० कोटींची आवश्यकता आहे. निधी अभावी रस्त्याचे काम रखडले आहे. या रस्त्यांच्या रुंदीकरणाला मंजुरी देताना रस्त्याची रुंदी ८४ मीटर एवढी प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, रस्त्याची रुंदी ५० मीटर एवढी करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यासाठी भूसंपादनही कमी करावे लागणार असून, त्यासाठी २७७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी दोनशे कोटींचा निधी राज्य शासनाने महापालिकेला द्यावा, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून राज्य शासनाला पाठिवण्यात आला होता.
उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा निधी दिला जाईल, अशी घोषणाही केली होती. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यात हा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र तो अद्यापही महापालिकेला प्राप्त झालेला नाही. या रस्त्यावर सातत्याने लहान-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केली होती. त्यावेळी ऑक्टोबर अखेरपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून मार्च अखेरपर्यंत रस्ता रुंदीकरणाची कामे पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते.
महापालिकेला प्रकल्पाच्या व्यवस्थापन सल्लागाराचे शुल्कापोटी ११ लाख ९४ हजार ३०४ रुपये, जागेचा मोबदला १५ कोटी ३७ लाख ४५ हजार ९०० रुपये, केबल स्थलांतरित करणे यासाठी १ कोटी १ लख २० हजार १०८ रुपये असे एकूण १६ कोटी ५० लाख ६० हजार ३१२ रुपयांची महापालिकेला तातडीची आवश्यकता आहे. त्यामुळे सातव्या वेतन आयोगाच्या निधीतून ही रक्कम घेण्यात आली आहे. सातव्या वेतन आयोगासाठी १३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी ३० कोटींचा निधी या कामांसाठी घेण्यात येणार आहे.
व्हिएस न्युज -वाकड येथील अटलांटा सोसायटी जवळ प्रेयसीने प्रियकरावर धारदार कोयत्याने सपासप वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (दि.१३) दुपारी तीनच्या सुमारास घडली.हॉटेलमधून प्रियकराला जाण्यास सांगितले असताना देखील तो गेला नाही याचा राग मनात धरून प्रेयसीने प्रियकरवेर जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला.याप्रकरणी महिलेवर हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय नारायण जाधव (वय-४५ रा. श्रीधरनगर, चिंचवड) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी एका महिलेवर भादवी कलम ३०७ आणि आर्म ॲक्ट महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय जाधव हा रिक्षा चालक आहे तर महिला हॉटेल चालवते. फिर्यादीचे आरोपी महिलेसोबत प्रेमसंबंध असून दोघेही वाकड येथे राहतात. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास फिर्य़ादी हॉटेलमध्ये आले. त्यावेळी महिलेने त्याला हॉटेलमधून राहते घरी जाण्यास सांगितले.मात्र, संजय जाधव हे गेले नाहीत. यावरून दोघांमध्ये वाद झाले.संतापलेल्या महिलेने धारदार कोयत्याने संजय जाधव यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात,हातावर, छातीवर कोयत्याने सपासप वार करुन गंभीर जखमी केले.पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.
व्हीएस न्युज -भोसरी येथील क्लासिक कम्युनिकेशन मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून ११ लाख ६८ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही घटना २९ सप्टेंबर रोजी घडली होती.
मोबाईल शॉपीच्या टेरेसवरील स्लॅबच्या बाजूला बसवलेले बार कट करुन दुकानातील १५ लाख १८ हजार ९६२ रुपये किंमतीचे ॲपल व सॅमसंग तसेच इतर कंपनीचे २७ महागडे मोबाईल फोन आरोपींनी चोरुन नेले होते. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात कलीम हुसेन अन्सारी (वय-३३ रा. शास्त्रीनगर, बांद्रा बस डेपो, मुंबई), फिरोज नईम खान (वय-३३ रा. आळंदी रोड, चाकण) यांना अटक करून त्यांचा विरोधात भादवी कलम ४५४, ४५७,३८०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरोडा विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस शिपाई सुमित देवकर यांना आरोपीची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुशंगाने पथकाने तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी कुर्ला मुंबई परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने दोन दिवस कुर्ला, मुंबई, अंबरनाथ व ठाणे या परिसरात आरोपींचा शोध घेऊन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडे केलेल्या चौकशीत फिरोज खान याने कालीम अन्सारी याच्या सांगण्यावरून मोबाईल शॉपीमध्ये चोरी केल्याचे सांगितले. तसेच चोरलेले फोन विक्रीसाठी स्वत:कडे ठेवल्याचे सांगितले. आरोपी कामील अन्सारी याचे कुर्ला मुंबई परिसरात मोबाईल विक्री व रिपेअरींगचे दुकान आहे. आरोपींकडून चोरलेल्या एकूण मोबाईल फोन पैकी ११ लाख ६८ हजार २७० रुपयांचे मोबाईल फोन जप्त केले आहेत.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,सह पोलीस आयुक्त संजय शिंदे ,अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी,पोलीस उपायुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर,यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील ,सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख , पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी,पोलीस अंमलदार महेश खांडे, नितीन लोखंडे, सुमित देवकर, गणेश हिंगे, प्रविण कांबळे, आशिष बनकर, गणेश कोकणे,गणेश सावंत, विनोद वीर, विक्रांत गायकवाड, सागर शेडगे, माळी व हुलगे यांच्या पथकाने केली.
व्हीएस न्युज -महाराष्ट्र बॅाक्सिंग असोसिएशन आणि ॲमॅच्युअर बॅाक्सिंग असोसिएशन (नागपुर जिल्हा) यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या '९ व्या सब ज्युनिअर बॅाईज महाराष्ट्र स्टेट बॅाक्सिंग चॅम्पियनशिप २०२३-२४' मध्ये खराळवाडी स्पोर्ट्स क्लबच्या निश्चय सुभाष जिनवाल ने चुरशीच्या लढतीत विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे. निश्चय हा पिंपरी येथील खराळवाडी परिसरातील रहिवासी आहे.
पिंपरी चिंचवड संघाचे प्रतिनिधित्व करत निश्चय जिनवाल (वय -१४) याने सब ज्युनिअर ६४ ते ६७ वजनी गटात महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक पटकाविले आहे.याने जिद्द, चिकाटी,एकाग्रता आणि मेहनतीच्या जोरावर सुवर्णपदक पटकावले आहे. त्याचे वडील सुभाष जिनवाल हेच त्याचे प्रशिक्षक आहेत. तो खराळवाडी येथील पोतदार इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षण घेत आहे.
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या मार्गदर्शनात नागपूर जिल्हा अॅमेच्युअर बॉक्सिंग असोसिएशन ऑफ नागपूर यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेचे आयोजन रवी नगरातील विद्यापीठ मैदानाजवळील सुभेदार सभागृहात २२ ते २६ जुलै दरम्यान करण्यात आले होते. नागपूर ,गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, अकोला, अमरावती, ठाणे, मुंबई, पुणे अशा एकूनच ३३ मुलांचा व ३३ मुलींचा जिल्हा व शहर संघ सहभाग घेतला. संपूर्ण महाराष्ट्रातून ४५६ खेळाडू सहभागी झाले होते.
त्याने अत्यंत अटीतटीच्या सामन्यात कडवी झुंज देत अंतिम फेरी गाठून सुवर्ण पदक पटकाविले. निश्चयने पिंपरी चिंचवड शहराचे नाव लौकीक केले आहे.यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
व्हिएस न्युज - माथाडीच्या नावाखाली व्यावसायिक आणि कामगारांमध्ये दहशत माजवून लुटमार करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. रमाकांत राजेंद्र जोगदंड (वय 30, रा. वाकड, पुणे), समीर नझीर शेख (33, रा. काळेवाडी, पुणे), मयुर बाळासाहेब सरोदे (23, रा. पुनावळे, पुणे) व करण सदाफळ चव्हाण (24, रा. पुनावळे, पुणे) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरातील माऊली चौकात 5 जुलै रोजी तक्रारदार अनिकेत रवींद्र वाडीया (वय 24, रा. शिवाजीनगर, पुणे) यांच्या रेजीम व्हिस्टा फॅसिलीटीस सर्व्हिसेस प्रा.लि.चे असिस्टंट मार्केटिंग एक्झीक्युटीव्ह सुर्यकांत वाघमारे व रोहन कांबळे हे प्रमोशनल ऍक्टीव्हीटी करत होते. त्यावेळी त्याठिकाणी पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर गाडीतून आरोपी जोगदंड व त्याच्यासोबत आणखी दोन ते तीनजण आले. त्यांनी तक्रारदार व त्यांच्या सहकाऱ्यांना मी माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे. माझ्या परवानगी शिवाय येथे कामगार कसे ठेवले? काम कसे काय करत आहात? अशी विचारणा करत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यावेळी आरोपींनी तक्रारदार यांच्या हातातील टायटनचे घडयाळ व सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून नेली. यावेळी झालेल्या मारहाणीत त्यांच्या डोक्याला, पोटाला, कंबरेला आणि पायाला मार लागला. त्यामुळे त्यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास पथकातील सह.पोलिस निरीक्षक संतोष पाटील आणि पोलिस उप निरीक्षक सचिन चव्हाण यांना सदर गुन्ह्यातील आरोपी बबलू जोगदंड आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेऊन ताब्यात घेण्याचे आदेश दिले. सदर आरोपींचा शोध घेत असताना सह.पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांना त्यांच्या विश्वासू बातमीदारामार्फत बातमी मिळाली की बबलू जोगदंड त्याच्या इतर साथीदारांसोबत वाशी, नवी मुंबई येथे लपून बसला आहे. सपोनी.संतोष पाटील यांनी स्टाफच्या मदतीने सापळा रचून वाशी, नवी मुंबई येथून बबलू जोगदंड आणि समीर शेख यांना अटक केली. त्यानुसार जोगदंड याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने गुन्हयाची कबुली दिली आणि इतर साथीदारांची माहिती दिली वर त्यांनाही ताब्यात घेण्यात आले . रमाकांत जोगदंड (30) हा सराईत गुन्हेगार अजून तो माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षारक्षक, जनरल कामगार युनियनचा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आहे.
व्हिएस न्युज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत विविध विभागात मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार काम करीत आहे. संबंधित ठेकेदार त्यांना पगार स्लिप देत नसल्याने त्यांना विविध प्रकारची अल्प मुदतीची अथवा दीर्घ मुदतीची कर्ज काढणे व इतर कामे करणे शक्य होत नाही. त्यामुळे पालिकेच्या सर्व कंत्राटी कामगारांना पगार स्लिपा देण्याचे आदेश पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी द्यावेत, अशी मागणी भाजपा कामगार सेलचे सरचिटणीस हनुमंत लांडगे यांनी केली आहे.
याबाबत लांडगे यांनी आयुक्त सिंह यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधून दर महिन्याला 30 ते 35 अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे महापालिकेत विविध विभागात ठेकेदारांमार्फत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, संबंधित ठेकेदार त्यांना पगार स्लिप देत नसल्याने त्यांना विविध प्रकारची अल्प मुदतीची अथवा दीर्घ मुदतीची कर्ज काढणे व इतर कामे करणे शक्य होत नाही. त्यामुळे सर्व कंत्राटी कामगारांना पगार स्लिपा देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सरचिटणीस लांडगे यांनी केली आहे.
"पगार स्लीप न देणे म्हणजे कामगाराला त्याच्या हक्क पासून वंचित ठेवणे . प्रत्येक सरकारी नोकरी किंवा खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी पगार स्लिप आणि नियुक्ती पत्र महत्वाची असते. पगार स्लिपला महत्वाचे कागदपत्र देखील मानले जाते. जर तुम्ही इन्कमटॅक्स फाइल करीत आहात, किंवा बॅंकेतून कर्ज घेऊ इच्छिता त्यावेळी ही स्लिप महत्वाची असते. तसेच एक नोकरी सोडून दुसरी नोकरी स्विकारण्याआधीसुद्धा आधीच्या नोकरीची सॅलरी स्लिप महत्वाची ठरते. कंत्राटी कामगारांना पगार स्लीप नसल्याने अल्प मुदतीची अथवा दीर्घ मुदतीची कर्ज काढणे अशक्य झाल्याने ते सावकारी कर्जाकडे वळत आहेत. पगार स्लीप उपलब्ध झाल्यास अडचणीच्या वेळेस कंत्राटी कामगारांना बँकेतून सहज कर्ज घेता येईल आणि देशाचे नुकसान सुद्धा होणार नाही" असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना लांडगे म्हणाले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002