Breaking News

मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी |
V. S. News
काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत.

व्हिएस न्यूज – काळेवाडी पोलीस ठाणे येथील तपास पथकाने वाहन चोरीचे एकूण १० गुन्ह्यांचा छडा लावला त्यातून ८,४०,०००/- रु एकूण २० दुचाकी वाहने हस्तगत करून दोन आरोपी अटक करण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी काळेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते त्यानंतर सोनारानेच कान टोचले असावेत म्हणून कार्यक्षमता दाखवून "लेट पण थेट" अशी दमदार कामगिरी काळेवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केली असल्याची सर्वत्र चर्चा आहे.

शुभम चंद्रकांत शिंदे (वय-२६ वर्षे रा. पाचपीर चौक, नढे नगर काळेवाडी पुणे मुळ रा.फौजी आंबवडे, ता. महाड, जि. रायगड). सोमनाथ शांताराम कासरुंग (वय-३२ वर्षे, रा.नेऱ्हे, दत्तवाडी, मारुंजी रोड घाणेकरवस्ती, ता.मुळशी, जि.पुणे मुळ रा. करंजमाळ, ता. महाड, जि. रायगड) अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत.

काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक वैभव गुरव, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ सुर्यवंशी, उपनि. राजेंद्र काळे, पोहवा स्वप्निल खेतले. पोहवा प्रमोद कदम, पोहवा अतिक शेख, पोशि अजय अरुण फल्ले, पोशि रमेश खेडकर, पोशि गणेश जाधव असे काळेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करत असताना पोहवा प्रमोद कदम यांना पाचपीर चौक काळेवाडी येथे राहणारा एक इसम हा एक पल्सर मोटार सायकल वापरत असुन तो संशयीत वाटत आहे अशी माहिती पोहवा प्रमोद कदम प्राप्त झाली. पोलिसांनी पाचपीर चौक येथे सापळा रचून शिताफीने आरोपीला पकडले.

संशयित आरोपीकडे असलेल्या गाडीचा नंबर पाहिला असता तो यु.पी.७०/डी.एन./८१६३ असा होता त्याला पोलिसांनी त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव-शुभम चंद्रकांत शिंदे असे सांगितले, तो वापरत असलेली पल्सर मोटार सायकल व मोटार सायकलबाबत त्याचेकडे विचारणा केली असता त्याने ती मोटरसायकल त्याच्या मित्राकडून विकत घेतल्याचे सांगितले. सदर आरोपीला गाडीसह पोलीस स्टेशन येथे आणले व त्याचेकडे सखोल तपास केला असता त्याने ही मोटरसायकल त्याचा सोमनाथ शांताराम कासरुंग याचेकडुन विकत घेतल्याचे सांगितले.

आरोपी याचे बोलण्यामध्ये व त्याचेकडे तपासामध्ये तो खोटे बोलत असल्याबाबत संशय आल्याने जप्त पल्सर मोटार सायकलचे चेसी नंबर, इंजिन नंबर वरुन मोटार सायकल मालकाची माहिती प्राप्त केली व काळेवाडी पोलीस स्टेशन कडील मोटार सायकल चोरीचे दाखल गुन्हयाचे माहिती घेतली त्यानुसार सदर गाडी गाडी ही काळेवाडी पोलीस स्टेशन गु.रजि.नं.२८२/२०२५ बी.एन.एस.३०३(२) मधील चोरीस गेलेली असल्याचे निष्पण्ण झाले. पोलिसांनी आरोपी यांचेकडे अधिक तपास केला असता आरोपी यांचेकडुन पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेल्या ८,४०,०००/- रु च्या एकुण २० मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. इतर १० गाड्यांचा तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, परिमंडळ २ चे पोलीस उपयुक्त विशाल गायकवाड, वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांचे मार्गदर्शनाखाली काळेवाडी पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेंद्र धुमाळ, सह पोलीस निरीक्षक वैभव गुरव, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ सूर्यवंशी, राजेंद्र काळे ,पोलीस अंमलदार पोहवा स्वप्निल खेतले, पोहवा प्रमोद कदम, पोहवा अशोक जायभाये, पोहवा अतिक शेख, पोहवा भारत पारधी, पोशि अजय अरुण फल्ले, पोशि भास्कर भारती, पोशि रमेश खेडकर, पोशि गणेश जाधव यांनी केली.

...Read More

V. S. News
स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते

जिद्द असेल तर असाध्य हे साध्य करता येते – तहसीलदार अजित गायकवाड

व्हिएस न्युज | प्रतिनिधी | दिनांक २८ जुलै २०२५ –'आम्ही मुळशीकर' प्रतिष्ठानच्यावतीने १९ वा "शाब्बास" गुणगौरव सोहळ्याचे आयोजन कोथरूड येथील उत्सव मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी २५० हून अधिक १० वी, १२ वीतील यशवंत विद्यार्थांना शालेय उपयोगी वस्तू तसेच सन्मानचिन्ह देवून त्यांना गौरविण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार अजित गायकवाड, उल्हे कोचिंग क्लासचे संचालक मनोज उल्हे, महेश महाले, कार्यक्रमाचे संयोजक ॲड. गणेश सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.

गायकवाड म्हणाले, की अशा कार्यक्रमातून प्रोत्साहन मिळते आणि यातूनच पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. जिद्द असेल तर असाध्य हे साध्य करता येते. ग्रामीण भागातून येवून स्पर्धा परीक्षांमध्ये अभ्यास करून पुढे येणे खूप कठीण आहे. मात्र जिद्दीने पुढे आले पाहिजे. १० वी १२ नंतर जीवनातील सर्वात महत्त्वाचे वळण आहे. येथून आपण विविध शाखेत प्रवेश घेऊ स्वतःचे भवितव्य घडवू शकता. ते पुढे म्हणाले की अशा वेळी पालकांनी मुलांचा कल कुठे आहे हे ओळखून मुलांच्या पाठीशी खंबीर उभे रहावे.

सातपुते म्हणाले, की "गेल्या १९ वर्षांपासून "आम्ही मूळशीकर प्रतिष्ठान"च्या माध्यमातून सातत्याने काम करत आहेत. यामध्ये उद्योजकांचा सन्मान, नोकरी महोत्सव, वधुवर मेळावा, गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार, आम्ही मूळशीकर भूषण पुरस्कार असे अनेक उपक्रम गेल्या दोन दशकांपासून आम्ही राबवत आहेत. मुळशी तालुक्यातील नाणेगावचे सुपुत्र गायकवाड हे सध्या तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. तेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी उपस्थिती लावली. मुळशी तालुक्यासाठी नेहमी चांगले कार्य करण्याची माझी तळमळ आहे. स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही. नेहमी विद्यार्थ्यांनी संघर्षाची तयारी ठेवावी. उल्हे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास डोक यांनी केले. तर सूत्रसंचालन बंडू दातीर यांनी केले आणि आभार राजेंद्र उभे यांनी मानले. तर निवृत्ती येवळे, अनंतराव दहीभाते, सीताराम तोंडे पाटील, माऊली डफळ, सुरेश साळुंखे, लक्ष्मण कंधारे, विकास डोख, सदाशिव तापकीर, रमेश उभे, सुरेश शिंदे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

विशेष सन्मानाने यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक

यावेळी विशेष सन्मान करून यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. त्यामध्ये डॉ. देविका माझीरे, सी.ए. प्रज्वल वाईकर, उम्री नांगरे, संस्कृती तापकीर, प्रथमेश टमगिरे अर्जुन मारणे, आयुष्य दहीभाते, अर्जुन खैरे आदींचा सन्मान करण्यात आला.

...Read More

V. S. News
संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन

व्हिएस न्युज | प्रतिनिधी | दिनांक ०४ जुलै २०२५ : भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा व राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या संयोजनाखाली व भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

रविवार दिनांक ०६ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशीचा पवित्र दीन हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या नावाने पावन झालेल्या संत तुकाराम नगर मध्ये विविध कार्यक्रमाने यंदा आपल्या सर्वांच्या सहभागाने जल्लोषात साजरा होत आहे, शुभकार्यात परिवारासह सहभागी व्हावे अशी विनंती संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी केली.

या शुभ मुहूर्तावर दोन कार्यक्रम आयोजित केले असून ते खालील प्रमाणे आहेत .

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे सरकारने यशस्वी अकरा वर्षे पूर्ण केले त्याबद्दल आचार्य अत्रे रंगमंदिर संत तुकाराम नगर येथे रविवार रोजी दुपारी ३.०० वाजता संकल्प सिद्धी ११ वर्षे अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये अकरा वर्षात झालेल्या विविध विकासातील कार्यबद्दल माहिती देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात संत तुकाराम नगर सहकारी गृह रचना संस्थेच्या ९४१ सदनिकाधारक व २२ दुकानदार सभासदांना शेअर सर्टिफिकेट वाटण्यात येणार आहेत. सर्व संत तुकाराम नगर हे साक्षात पंढरपूर होणार असून विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या जिवंत प्रतिकृतीचे मिरवणूक तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पवित्र गाथा व ज्ञानेश्वर माऊली यांची ज्ञानेश्वरी या ग्रंथांसह भगवान विठ्ठलाच्या पादुकांची पालखी संत तुकाराम नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर,(एच.ए. मैदानातील पेट्रोल पंप समोरील, संत रोहिदास महाराज यांचे मंदिर शेजारी ) येथून शेकडे वारकऱ्यांसह,भजनी मंडळासह दुपारी १.०० वाजता दिंडी निघणार आहे, महेश नगर, संत तुकाराम नगर, वल्लभ नगर मधील दत्त मंदिर, दक्षिण मुखी हनुमान मंदिर, गणेश मंदिर, जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर, तुळजाभवानीमाता मंदिर, खंडोबा मंदिर, शनी मंदिर येथून आचार्य अत्रे रंगमंदिर येथे ही दिंडी पोहोचणार आहे, या भव्य दिंडीचे, पालखीचे तेथे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात येणार आहे, दिंडीमध्ये सहभागी झालेल्या सर्व भजनी मंडळांचे यतोचित स्वागत झालेंनंतर त्यांच्या गौरव करण्यात येणार आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी दिली.

आषाढी एकादशी दिवशी दुपारी ३.०० वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर मध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे तरी पिंपरी चिंचवड परिसरातील सर्वच भाविकांना निमंत्रण देण्यात येत आहे आपण आपल्या परिवारासह आषाढी कार्तिकी निमित्त होणाऱ्या प्रथम पवित्र सोहळ्यास सहभागी होऊन हरी भजनाचा लाभ घ्यावा व देशाप्रती देखील आपले प्रेम व्यक्त व्हावे याकरता या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावे,कार्यक्रम संपल्यानंतर आचार्य अत्रे रंगमंदिर बेसमेंट मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा प्रसाद सर्वांनी एकत्र गृहन करावयाचा आहे अशी विनंती संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले आणि केली.

यावेळी माधुरी मिसाळ नगर विकास राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच अण्णासाहेब बनसोडे उपाध्यक्ष विधानसभा महाराष्ट्र राज्य उपस्थित असतील.

आमदार महेश लांडगे,आमदार शंकर जगताप,आमदार अमित गोरखे,आमदार उमा खापरे यांचे मार्गदर्शन असेल. प्रमुख वक्ते अमरजी साबळे आदी मान्यवर उपस्थित असतील.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शत्रुघ्नजी काटे आहेत, त्यांच्या सोबत सदाशिव खाडे,सुजाता पलांडे,विजय उर्फ शीतल शिंदे, विलास मडगिरी ,ॲड मोरेश्वर शेडगे,संजय मांगोडेकर,माऊली थोरात,मंगेश धाडगे, महेंद्र बाविस्कर इत्यादी पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

...Read More

V. S. News
महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन

व्हिएस न्युज | प्रतिनिधी | दिनांक ०१ जुलै २०२५ : "ब" प्रभाग कार्यालयांतर्गत येणारी लायसन धारक टपरी उचलून अतिक्रमण विभागाने चुकीची कारवाई केली. बंद असलेल्या टपऱ्या उचलून तेही अधिकृत लायसन असलेल्यावर कारवाई करून गोर गरीब लोकाची रोजी रोटी हिसकावून घेण्याचे काम महापालिकेचा संबंधित विभाग करीत असून केवळ पैसे लुटण्याचे काम चालू आहे. सदर चुकीच्या कारवाई विरोधात भाजपा महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या आरपीआय आठवले गटाचे महाराष्ट्र राज्य व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन केले.

यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "अतिक्रमण विभागामुळे त्यांच्या भ्रष्ट कारवाईमुळे जाणून-बुजून द्वेषा पोटी केलेल्या कारवाईमुळे धनदांडग्यांना मदत करण्याच्या उद्दिष्टाने केलेल्या कारवाईमुळे माझी जगण्याची आशा संपली आहे, कारण माझी रोजी रोटी ज्या धंद्यावरती अवलंबून होती ती टपरी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून उचलून घेऊन गेले. या आंदोलनामधून चुकीच्या कारवाईतून ओढलेली परिस्थिती माझ्या परिवाराला महानगरपालिकेसारख्या शहरांमध्ये हलाखीचे दिवस आले आहेत. त्यामुळे खचलेला एक नागरिक त्याची झालेली अवस्था ही आंदोलनाद्वारे शहरांमध्ये महानगरपालिकेला दाखवत आहे. खरंच जनसामान्यांवर मरणाची वेळ आलेली आहे. पिंपरी चिंचवड मनपा अधिकारी यांना आपल्या कायद्याची जाण नाही. कोर्टाची जाण नाही, कारण दिनांक 28 मार्च 2025 रोजी पासून मी महानगरपालिकेमध्ये प्रत्यक्ष फोन द्वारे किंवा पत्रव्यवहाराद्वारे न्याय मागत आहे ,परंतु मला न्याय न भेटता उडवा उडवीचे उत्तरे दिली गेली. माझ्याकडे महापालिकेचे लायसन्स असून सुद्धा हातगाडी उचलून नेली असून मी माझ्या टपरी वरती दोन्ही प्रति लावल्या होत्या, तरीसुद्धा ब प्रभाग अतिक्रमण विभागाने माझ्या रोजी रोटीवर अतिक्रमण व बळाचा वापर करून माझ्यावर कारवाई केली. ही कारवाई चुकीची असल्यामुळे मी माझ्या आणि माझ्या कुटुंबावर मरणाची वेळ आली असल्यामुळे मी या अतिरिक्त उपायुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांची तिरडी उठाव आंदोलन करुन निषेध करतो व्यक्त करीत आहे" मला न्याय मिळावा जनसामान्यांना सुद्धा महानगरपालिकेमध्ये न्याय मिळावा , असे दत्तात्रय गायकवाड यांनी आपले मत व्यक्त केले.

...Read More

V. S. News
इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त

व्हिएस न्युज | प्रतिनिधी | दिनांक १५ जून २०२५ – पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार २ जणांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

शोक संदेशात मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे. ६ जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ३२ लोक जखमी झाले, त्यापैकी ६ गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

...Read More

V. S. News
पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

व्हिएस न्युज | प्रतिनिधी | दिनांक १० जून २०२५ - पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा गुरुवार (दि.१२ जून) रोजी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार आहे. दुस-या दिवशी शुक्रवार (दि.१३ जून) रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील से.क्र.२३ येथील स्थापत्य विषयक तसेच विद्युत विषयक कामे करण्यात येणार आहेत. पिंपरी चिंचवड शहराच्या पाणी पुरवठा व्यवस्थेमध्ये खंड पडू नये याकरिता वेळोवेळी पाणीपुरवठा यंत्रणेतील देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असते ,असे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता-१ प्रमोद ओंभासे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

तसेच क्षेत्रीय स्तरावरील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील स्थापत्य विषयक तसेच विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे आवश्यक आहे. त्यासाठी गुरुवार दि.१२/०६/२०२५ रोजी निगडी जलशुध्दीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन आहे. त्या अनुषंगाने गुरुवार दि.१२/०६/२०२५ रोजी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागातील संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद राहील. तसेच दुस-या दिवशी शुक्रवार दि.१३/०६/२०२५ रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल. तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाणी वापर करून सहकार्य करावे असे आवाहन प्रमोद ओंभासे यांनी केले आहे.

...Read More

V. S. News
शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर.

व्हिएस न्युज | प्रतिनिधी | दिनांक ८ जून २०२५ - शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे प्रदेश सचिव सुरज आण्णा कांबळे यांच्या सुचनेनुसार व प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे यांच्या अनुमोदनाने सागर गंगाराम साळुंके यांची अमरावती जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी मुंबई मध्यवर्ती कार्यालयातुन जाहीर केली.

नवनियुक्त अमरावती जिल्हा अध्यक्ष सागर साळुंके यांनी सर्वसामान्य नागरिक, व्यापारी वर्ग, माता भगिनी, दिव्यांग बांधव यांचे प्रश्न शासन दरबारी मांडुन ते सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे व उपनेत्या उषामाई कांबळे यांनी दिल्या.

...Read More

V. S. News
महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला

व्हिएस न्युज | प्रतिनिधी | दिनांक ६ जून २०२५ –भोसरी येथील महावितरण कार्यालय, स्पाईन सिटी उपविभाग-२ येथे कार्यरत सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे (वय ३४) आणि त्यांच्या ओळखीच्या खाजगी इसम श्यामलाल असोकन (वय ३४) यांना रुपये २५,००० लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी रंगेहाथ पकडले. तक्रारदार हे शासकीय मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदार असून, महावितरणकडील लायझनिंग व कनेक्शनच्या मंजुरीसाठी काम करतात. त्यांनी दि. ४ मार्च २०२५ रोजी एका ग्राहकाच्या घरगुती वीज कनेक्शनसाठी अर्ज दाखल केला होता. सदर अर्ज सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे यांच्याकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला होता.

काम करून देण्यासाठी नरवडे यांनी सुरुवातीला ३५,००० रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने दि. २ जून २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे तक्रार दाखल केली. ४ जून रोजी पंचासमक्ष पडताळणी दरम्यान नरवडे यांनी तडजोड करत २५,००० रुपये लाच स्वीकारण्यास सहमती दर्शवली. त्यानुसार ५ जून रोजी, सापळा रचण्यात आला. यामध्ये तक्रारदाराकडून नरवडे यांनी खाजगी इसम श्यामलाल असोकन याला लाच रक्कम स्वीकारण्यास सांगितले. श्यामलालने ती रक्कम पंचासमक्ष स्वीकारताच दोघांनाही रंगेहाथ पकडण्यात आले. दोघांविरोधात भोसरी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल झाला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांचा एजंट लाचेची मागणी करत असेल, तर त्वरित खालील माध्यमांतून संपर्क साधावा:

...Read More

V. S. News
कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले

व्हिएस न्युज | पिंपरी | प्रतिनिधी | – राज्यातील झपाट्याने होत असलेल्या औद्योगिकीकरणामध्ये अनेक वेळा श्रमिक वर्गाचा आणि पर्यावरणाचा विचार दुर्लक्षित केला जातो. अशाच अन्यायग्रस्त कामगारांच्या न्यायहक्कासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णासाहेब बनसोडे यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्यांच्या कार्यालयात झालेल्या विविध औद्योगिक कंपन्यांवरील बैठकींमध्ये अन्यायग्रस्त श्रमिकांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती आज हॉटेल कलासागर पिंपरी येथे दि.६ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भाऊ भोसले यांनी दिली.

यावेळी भोसले म्हणाले की,राज्यभरातील अनेक कंपन्यांमध्ये पर्मनंट नोकऱ्या रद्द करून कंत्राटी, हंगामी स्वरूपात कामगारांना नियुक्त केले जात आहे. त्यामुळे सुशिक्षित तरुणांचे आयुष्य विस्कळीत होत असून, न्यायासाठी वर्षानुवर्षे न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. या संदर्भात विधानसभेचे उपाध्यक्ष बनसोडे यांच्याकडे निवेदन सादर करून ही माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी तातडीने विविध औद्योगिक आस्थापनांसोबत समेटासाठी बैठका लावल्या.या बैठकीत कामगार आयुक्त, औद्योगिक आरोग्य सुरक्षा अधिकारी, पोलीस अधिकारी, संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी, तसेच संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने कोणत्याही कामगाराला कामावरून काढू नये आणि वेतन द्यावे, असे आदेश दिले होते. मात्र, अनेक खाजगी व सरकारी संस्थांनी आदेश धुडकावून शेकडो कामगारांना कामावरून काढले. त्यामध्ये मे. पोलिबॉण्ड, राठी कंपनी, प्लास्टिक ओमनियम, लोकमान्य हॉस्पिटल, तुळजापूर देवस्थान इत्यादी आस्थापनांचा समावेश आहे.

मुंबई उच्च न्यायालय आणि कामगार आयुक्तांच्या आदेशानुसार कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याचे आदेश देण्यात आले होते. तरीही गेल्या पाच वर्षांपासून कंपन्यांकडून आदेशांची अंमलबजावणी न करता वेळकाढूपणा सुरू आहे.टाटा मोटर्स फौंड्री, चिंचवड येथे फॅब्रिकेशन करत असताना पुष्पेंद्र कुमार (वय २६) या युवकाचा मोठ्या जॉबसखाली दबून मृत्यू झाला होता. याबाबत यशवंत भोसले व पत्रकार ब्रिजेश बडगुजर यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.

उपाध्यक्ष बनसोडे यांनी गंभीर दखल घेतली असून, कंपनीकडून फक्त सहा लाख रुपये दिल्याचा दावा फेटाळत, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुढील आर्थिक व शैक्षणिक मदतीबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती भोसले यांनी दिली. तुळजापूर देवस्थानच्या व्यवस्थापक व प्रांत अधिकाऱ्यांना कामावरून काढलेल्या कामगारांना आठ दिवसांत पुन्हा कामावर घेण्याचे आणि वेतन अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.कामगारांवर अन्याय करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध ही लढाई आहे. उपाध्यक्ष आण्णासाहेब बनसोडे यांच्या सक्रिय सहभागामुळे कामगारांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. लोकन्याय हॉस्पिटलच्या कामगारांना कामावर घेण्यासाठी लवकरच आदेश काढणार असल्याचे बनसोडे यांनी सांगितले आहे.

शासनस्तरावर पुढील बैठकीसाठी संबंधित कंपन्यांचे निर्णयक्षम अधिकारी व पोलीस, कामगार विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निर्णय न झाल्यास शासनाकडून थेट आदेश दिले जातील, असे सूतोवाच उपाध्यक्षांनी केले. सरकारने उचललेले पाऊल हे आशावादी असल्याचे मत भोसले यांनी व्यक्त केले.

...Read More

V. S. News
कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन

एससीडीएलची सिल्वर जुबली उत्साहात साजरी

व्हिएस न्यूज - "कौशल्य प्रशिक्षण हे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मोठया प्रमाणावर काम करते, या लोकांकडे नीट लक्ष देऊन त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले तर ते सुद्धा चांगले आयुष्य जगू शकतात, असे विचार मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता अवचट पुणतांबेकर यांनी व्यक्त केले. सिंबायोसिस ओपन एजुकेशन सोसायटीचा 18 वा स्थापना दिन, सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निगची सिल्वर जुबली आणि सिंबायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी किवळेच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त किवळे येथील सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या ऑडिटोरियम मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ शा. ब. मुजुमदार हे होते. तसेच सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या प्रिन्सिपल डायरेक्टर डॉ. स्वाती मुजुमदार या उपस्थीत होत्या.

यावेळी एससीडीएलच्या सिल्वर जुबली लोगोचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुक्ता अवचट पुणतांबेकर म्हणाल्या, सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निग हे कौशल्य प्रशिक्षण देऊन अनेक युवकांच्या आयुष्यात खूप मोलाचा बदल करत आहे. कौशल्य प्रशिक्षण घेऊन त्यांची आर्थिक परिथिती सुधारून सुंदर आयुष्य जगात आहेत."

डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या, “तळागाळातील लोकांना आम्ही कौशल्य प्रशिक्षण देत आहोत, हे प्रशिक्षण देताना व्यवसाय व बाजारातील मागणी चे भान ठेवले आहे आणि त्यानुसार प्रशिक्षण देत आहोत. दुर्गम भागात शिक्षण पोहचवण्या करतात ऑनलाईन लर्निग हे महत्वाचे ठरत आहे. सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निगला झालेली २५ वर्ष यात अतिशय मोलाची भूमिका बजावतात. पुढील पाच वर्षात नवीन दिशा घेण्याची गरज आहे. 'एजुकेशन ऑन डिमांड' - शिक्षणा बरोबर अधिक कौशल्य प्रशिक्षणाची गरज आहे. सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निग मध्ये आता आपण सर्टिफिकेट आणि डिप्लोमा देत आहोत पण पुढील दोन वर्षात याचे ओपन युनिव्हर्सिटी मध्ये परिवर्तन करून मुलांना डिप्लोमा न देता डिग्री दिली जाईल असा माझा भविष्यासाठीचा मानस आहे".

शा. ब. मुजुमदार म्हणाले," एससीडीएल सोबत खूप लोक जोडली गेली आहेत आणि त्यात आमचे कर्मचारी अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. २५ वर्ष हा काही सोपा प्रवास नाही. हि भाग्याची गोष्ट आहे. आमच्या सोबत येणाऱ्या बऱ्याच लोकांनी सुचवलेल्या गोष्टी करत गेलो आणि त्याला लोकांनी खूप मोठा प्रतिसाद दिला, पाहता पाहता विद्यार्थी संख्या २ लाख पर्यंत गेली. प्रत्येक शिक्षण संस्थेकडे सांगण्यासाठी स्वतःचा आपला प्रवास असतो. आमचा हा प्रवास स्पष्ट दूर दृष्टी पासून सुरु झाला, समाजातील या बदलांन प्रमाणे आपण बदलणे गरजेचे आहे." यावेळी त्यांनी अनिल अवचट यांच्या आठवणींना देखल उजाळा दिला.

कार्क्रमात निखिलेश कुलकर्णी, योगेश जोशी, हेमंत सेठिया, अतुल उपाध्याय या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गायत्री पिल्लई, दिलीप शर्मा, ऋतुपर्ण मुखर्जी, नमिता कडू, मधुरा जोशी, ज्योतीका कोळतकर, यश केंजाळे या उतुंग यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा हि या वेळी सत्कार करण्यात आला. २५ वर्ष व अधिक वर्षांपासून जोडलेल्या कर्मचाऱ्यांचा हि या वेळी सत्कार करण्यात आला, या मध्ये रजिस्टार कुंभार, नूतन गोरे, सुनील धुमाळ, रवींद्र शेलार, भास्कर निकम हे होते. १० वर्ष व अधिक कर्मचाऱ्यांनमध्ये सुहास भोसले, पदंप्रिया इरावती, यांचा सत्कार करण्यात आला. १५ वर्ष व अधिक कर्मचाऱ्यांनमध्ये आमला किरण जोशी यांचा सत्कार करण्यात आला. ३० वर्ष व अधिक कर्मचाऱ्यांनमध्ये प्रदीप डोळस, प्रमोद भोसले, शोभा अमोल यांचा सत्कार करण्यात आला. पुढील कार्यक्रमात एससीडीएल इमारतीच्या मिनिएचरचा केक कापण्यात आला.

या वेळी कर्मचाऱ्यांनी आयोजित केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थितानी भरभरून प्रतिसाद दिला. शालिनी नायर यांनी सूत्रसंचालन केले. निवृत्त मेजर सोनाली कदम यांनी यांनी आभार मानले.

...Read More

V. S. News
जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी

व्हिएस न्यूज - भोसरी भगत वस्ती येथे (दि.२९) शिवयोगी सभागृहात भगवान परशुराम जयंती उत्सव आयोजित करण्यात आला. या निमित्त उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.तसेच दिपप्रज्वलन करुन श्री भगवान परशुरामाच्या प्रतिमाचे पुजन केले वेदमूर्ती महेश कुलकर्णी, ऋषिकेश कुलकर्णी, नागेश वैद्य यांनी मंञघोष करुन व सर्व उपस्थितांनी केलेल्या भगवान परशुरामाच्या जयघोषात परिसर मंत्रमुग्ध झाला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम भगवान जय परशुराम सेवा समिती च्या सर्व सदस्य सभासदांनी घेतले तसेच उपस्थित मान्यवर भोसरी ग्रामउपाद्या माधव तिखे गुरुजी, शशिकांत कुलकर्णी गुरुजी,महेश जोशी गुरुजी ,आखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे सदस्य प्रविण कुरबेट,हनुमंत रामदासी, दिपक भास्कर, रोहित वैद्य, संदिप वैद्य, संदिप कुलकर्णी, तात्यासाहेब कुलकर्णी, शेंडे गुरुजी, चिन्मय पाठक, प्रकाश कुलकर्णी, शिवाजी डांगे, सिध्दांत चौधरी तसेच महिला भगिनी ज्योतिर्भास्कराचार्या मंजुषा जोशी कुलकर्णी, विजयालक्ष्मी डांगे, ज्योती कुलकर्णी, धनश्री कुलकर्णी, स्नेहल कुलकर्णी, सिमा कुलकर्णी अणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

आभार ज्योतिषाचार्य महेश जोशी यांनी मानले.

...Read More

V. S. News
पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड पिंपळे सौदागर येथे डिजिटल मीडिया पिंपरी चिंचवड शहर तर्फे नवीन सदस्य नोंदणी व संघटनेच्या बळकटी करणासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. इलेक्ट्रॉनिक माध्यम व प्रिंट मीडिया माध्यमातून असणाऱ्या पत्रकार संघप्रमाणे डिजिटल माध्यमानाही महत्व असून या माध्यमातून लोकशाहीचा एक महत्वाचा अंग म्हणून बघण्यात येते या अनुषंगाने डिजिटल मीडिया पिंपरी चिंचवड शहराचे नवनिर्वाचित अध्यक्ष विनय सोनवणे यांनी नवीन सदस्य नोंदणी व डिजिटल मीडिया माध्यमातून सदस्य व इतरांचे बळकटीकरण करण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन काम करण्यासाठी या सभेचे आयोजन केले होते.

यावेळी नवीन दहा विविध माध्यमाचे प्रतिनिधी यांचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली. नवीन सदस्यांचे यावेळी अध्यक्ष विनय सोनवणे, पत्रकार संघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अनिल वडघुले यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी डिजिटल माध्यमानी एकत्र येऊन कार्य करावे व सर्वानी संघांचे हित जोपासून काम करावे असे अध्यक्ष विनय सोनवणे यांनी अधोरेखित केले. यावेळी मोठया संख्येने डिजिटल मीडिया माध्यमाचे प्रतिनिधी उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गणेश मोकाशी यांच्या अध्यक्षतेखाली नवीन सदस्य नोंदणी संपन्न झाली यावेळी सचिव सागर सूर्यवंशी उपस्थित होते.

मराठी पत्रकार परिषद मुंबई चे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख साहेबांच्या संघटनात्मक धेय्य धोरणांना अनुसरून आणि विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर डिजिटल मिडिया परिषद राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून पत्रकारांना संघटनेचे सदस्य करून घतले अनंता इनगळे, संदीप दुसाने, सुनील गायकवाड, संभाजी बारबोले, राहुल जाधव, अमर चाकोतकर, योगेश वडमारे, भाऊसाहेब निकम, प्रियांका गायकवाड आणि सचिन पाटील हे पत्रकार पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व पिंपरी चिंचवड डिजिटल मिडिया परिषदे सदस्य झाले.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!