व्हिएस न्यूज - रोहित्रमधील 25 हजार रूपये किंमतीची तांब्याची तार व पट्या चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना मुळशीतील रसिकवाडी येथे नुकतीच उघडकीस आली.
महावितरणचे राजाराम जाधव (वय-39, रा. गणेशनगर, नेरे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मुळशीतील रसिकवाडी येथे 100 के. व्हि. अॆ क्षमतेचे रोहित्र बसविण्याचे काम सुरू होते. चोरट्यांनी रोहित्रमधील 25 हजार रूपये किंमतीची तांब्याची तार व पट्या चोरून नेल्या. सहायक पोलीस निरीक्षक धुमाळ अधिक तपास करत आहेत.