व्हीएस न्यूज - सामाजिक व क्रिडा सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल अमित राजेंद्र बच्छाव यांना राज्यस्तरीय विश्वरत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व भारती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एफ. पाटील व विश्वशक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. दत्ता कोहिनकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय हवामान व कृषी तज्ञ शास्रज्ञ डॉ.रामचंद्र साबळे, प्रमुख पाहुणे नंदकुमार वाळंज, सुरेश कोते, शिवाजीराव कोते, शिवाजी घाडगे व इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन “राज्यस्तरीय विश्वरत्न गौरव २०१७” पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर येथील सभागृहात करण्यात आले होते.
काळ, विषय बदलले तसे सामाजिक जीवनातील समस्यांमध्ये देखील बदल झाले आहेत. बदलत्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतील, परंतु आपण एकत्र येऊन काम करून देश विकसित करुया. भविष्यकाळात समृद्ध जीवनाबरोबर खिलाडूवृत्तीने समाजासाठी कार्य करणा-यांची गरज आहे असे मत अमित बच्छाव यांनी सत्कारानंतर व्यक्त केले. यावेळी विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींचा विविध पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002