व्हिएसन्यूज - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरात स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमात बॅंक व एटीएम मधील सुरक्षा रक्षकांनी सहभाग घेतला आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते अरूण बकाल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिंचवड, पिंपरी, पिंपळे-सौदागर, काळेवाडी, रहाटणी या परिसरात ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने स्वच्छ भारत अभियान जोरदार राबविण्यात येत असल्याचे अरूण बकाल यांनी सांगितले.