व्हीएस न्यूज – स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने व मॉडर्न महाविद्यालय, यमुनानगर, निगडी यांच्या सहकार्याने नागरीकांमध्ये स्वच्छते विषयक जनजागृती व्हावी यासाठी गुरुवार दि. २५ जानेवारी २०१८ रोजी “स्वच्छ भारत सुदृढ भारत” या विषयावर शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, निबंध व कोलाज स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
यमुनानगर निगडी येथील मॉडर्न महाविद्यायात होणा-या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सोमवार दि.२२ जानेवारी ते बुधवार दि.२४ जानेवारी २०१८ पर्यंत उत्सर्फूतपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेण्यासाठीचे नियम व अटी पुढील प्रमाणे असणार आहेत. प्रत्येक महाविद्यालयातील एक किंवा दोन विद्यार्थ्यांचा सहभाग असावा. अभिव्यक्तीचे माध्यम मराठी, हिंदी व इंग्रजी असे असेल. प्रत्येक विद्यार्थ्याला जास्तीत जास्त पाच ते सात मिनिटे बोलण्याची परवानगी दिली जाईल. वक्तृत्व स्पर्धेचा विषय “स्वच्छ भारत, सुदृढ भारत” असा असेल. सादरीकरण, शब्दफेक, संदेश व जनजागृती या गोष्टी परिक्षणासाठी प्रामुख्याने पाहिल्या जातील. संयोजकांना स्पर्धेच्या नियमात बदल करण्याचा हक्क राहिल व संयोजकांचा निर्णय अंतिम राहिल. वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख बुधवार दि. २४ जानेवारी, २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजे पर्यंत राहिल. कोलाज स्पर्धेत सहभाग घेण्यासाठीचे नियम व अटी पुढील प्रमाणे असणार आहेत. प्रत्येक महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व एक किंवा दोन विद्यार्थी करु शकतील. कोलाज बनविण्यासाठी विषय दिल्यानंतर त्यासाठीचे लागणारा कागद जागीच पुरवला जाईल. स्पर्धेचा कालावधी २ तास ३० मिनिटे असेल. स्पर्धेत सहभाग घेणा-या विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी लागणारे साहित्य स्वत: आणणे आवश्यक आहे. महाविद्यालयांनी वृत्तपत्र व मासिकांसह तयार राहणे आवश्यक आहे. संयोजकांना स्पर्धेच्या नियमात बदल करण्याचा हक्क राहिल व संयोजकांचा निर्णय अंतिम राहिल. कोलाज स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख बुधवार दि. २४ जानेवारी, २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजे पर्यंत असणार आहे. निबंध स्पर्धेत सहभाग घेण्यासाठीचे नियम व अटी पुढील प्रमाणे असणार आहेत. स्पर्धेचा कालावधी ६० मिनिटे असेल. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी लागणारे साहित्य स्वत: आणावे. संयोजकांना स्पर्धेच्या नियमात बदल करण्याचा हक्क राहिल व संयोजकांचा निर्णय अंतिम राहिल. निबंध स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख बुधवार दि. २४ जानेवारी, २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे. या स्पर्धेच्या प्रवेशासाठी तथा अनुषंगीक माहितीसाठी आकाश चव्हाण (मो.क्र. 9881234771) यांच्याशी संपर्क साधावा. शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी “स्वच्छ भारत, सुदृढ भारत” या विषयावर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या या वक्तृत्व,कोलाज व निबंध स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सहआयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002