Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
२५ हजाराची लाच स्विकारताना सहायक पोलीस निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

व्हीएस न्युज - २५ हजार रुपयांरु लाच स्वीकारताना सहायक पोलीस निरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी पोलीस निरीक्षकांनी केली होती. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.

असिफ वहाब बेग (वय-३८) असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी ३६ वर्षीय युवकाने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. असिफ बेग पालघर जिल्ह्यातील माणिकपूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तक्रारदार यांनी एका महिलेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा माणिकपूर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेने देखील तक्रारदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल न करण्यासाठी बेग याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीमध्ये २५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंघक विभागाकडे याची तक्रार केली. पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता बेग याने ५० हजार रुपयाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पथकाने मंगळवारी पोलीस ठाण्यात सापळा रचून बेग याला २५ हजार रुपयाची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अंकुश बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सचिन मोरे, तानाजी गायकवाड, संदेश शिंदे, महिला पोलीस शिपाई रजपूत, चालक पोलीस शिपाई त्रिभुवन यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

...Read More

V. S. News
प्रकाश आंबेडकर सहा कोटी ७३ लाखांचे धनी !

व्हीएस न्युज - बहुजन वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. या मतदारसंघात त्यांची लढत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांच्याशी होणार आहे. आंबेडकर यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात ६ कोटी ७३ लाख रूपयांची संपत्ती दाखवली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात कुटुंबाच्या नावे ६ कोटी ७३ लाख रुपयांची संपत्ती दाखवली आहे. यातील ३ कोटी १५ लाखांची मालमत्ता वारसाहक्काने मिळाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यांच्या कुटुंबाकडे १ लाख २० हजार रूपयांची रोख रक्कम आहे. त्यांच्या नावे गडचिरोली जिल्ह्यातील मुडसा येथे जमीन आहे. मुलगा सुजातच्या नावे रत्नागिरी जिल्ह्यातील अंबावडे येथे आणि पत्नीच्या नावे वेल्हा तालुक्यातील ओसडे येथे जमीन आहे.

आंबेडकरांच्या नावे ४१ लाख ८१ हजार १८९, पत्नीच्या नावे ७३ लाख ८६ हजार २७३ तर मुलगा सुजातच्या नावे ९ लाख ५५ हजार ४५४ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. स्वत:च्या नावे ३२ लाख, पत्नी अंजली यांच्या नावे १ कोटी १५ लाख तर सुजातचया नावे ३ कोटी १५ लाख रुपयांकपैकी पाचवा हिस्सा स्थावर मालमत्ता आहे. स्वत:च्या नावे अकोला, पत्नीच्या नावे पुणे आणि मुलाच्या नावे मुंबईतील खार येथे घर आहे. याची किंमत २ कोटी इतकी आहे. आंबेडकर यांचे २०१७-१८ मधील उत्पन्न ८ लाख ६० हजार १९० तर पत्नीचे २१ लाख ०९ हजार १४० रुपये असल्याचे म्हटले आहे.

...Read More

V. S. News
पाकिस्तानात माझा प्रचंड मानसिक छळ झाला – अभिनंदन

व्हीएस न्युज - भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना आपण खूप चांगली वागणूक दिली असा पाकिस्तानकडून जोरदार प्रचार सुरु आहे. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी नाही. पाकिस्तानच्या ताब्यात असताना अभिनंदन वर्थमान यांचा प्रचंड मानसिक छळ करण्यात आला. भारतात परतल्यानंतर अभिनंदन वर्थमान यांनी ही माहिती दिली. पाकिस्तानात आपला शारीरिक नव्हे तर प्रचंड मानसिक छळ करण्यात आला असे अभिनंदन यांनी सांगितले. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

बुधवारी भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी विमानांना पिटाळून लावताना झालेल्या हवाई संघर्षात विग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे मिग-२१ विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले व ते पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. अभिनंदन यांना शुक्रवारी रात्री ९.२० च्या सुमारास पाकिस्तानने भारताकडे सोपवले. अभिनंदन यांच्या सुटकेला जवळपास तीन तास उशीर झाला. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अभिनंदन यांना सीमारेषा पार करण्यासाआधी जबरदस्तीने व्हिडीओ रेकॉर्ड करायला लावला. त्यामुळे त्यांना तीन तास उशीर झाला.

त्यातूनच पाकिस्तानी सैन्याची वाईट बाजू दिसते. अभिनंदन सध्या दिल्लीमध्ये असून कुलिंग डाऊन प्रोसेस अंतर्गत एअर फोर्सच्या सेंट्रल मेडिकल केंद्रात त्यांच्यावर सध्या वेगवेगळया वैद्यकीय चाचण्या सुरु आहेत. शनिवारी सकाळी अभिनंदन त्यांच्या कुटुंबियांना भेटले. एअर फोर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्यांची भेट घेतली.

...Read More

V. S. News
भारताचा पाकिस्तानवर ‘वॉटरबॉम्ब’; तीन नद्यांचे पाणी रोखणार  

व्हीएस न्युज - पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपली मुजोरी कायम ठेवत भारताकडे या हल्ल्याबाबत पुरावे मागितले आहेत. त्यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार दणका दिला आहे. पाकिस्तानाला जाणारे पाणी रोखून त्यांची कोंडी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टि्वट करुन आज (गुरूवार) दिली आहे.

गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सिंधू जल करारातून भारताने माघार घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानला जाणारे पाणी आता भारत स्वत:साठी वापरणार आहे. पूर्वेकडच्या नद्यांचे पाणी आता जम्मू-काश्मीर आणि पंजाबसाठी वापरण्यात येणार आहे, असे गडकरी यांनी म्हटले आहे. व्यास, रावी आणि सतलज या तीन नद्यांचे पाणी भारतातून पाकिस्तानला जाते. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानची पाण्यासाठी भटकंती होईल. तीन नद्यातील पाणी प्रकल्पाद्वारे पाकिस्तान ऐवजी यमुना नदीत सोडण्यात येईल. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवर दबाव वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. याचा भाग म्हणून भारताने हा निर्णय घेतल्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानावर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत असताना केंद्र सरकारने हा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा भारत सरकारने आधीच काढून घेऊन पाकिस्तानला संभाव्य धोक्याची सुचना करून दिली होती.

...Read More

V. S. News
मुंबई बॉम्ब स्फोटप्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू

व्हीएस न्युज - मुंबईत २००३ मध्ये झालेल्या भीषण बॉम्ब स्फोटप्रकरणातील फाशीची शिक्षा सुनावलेल्या आरोपीचा शनिवारी रात्रीच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोहम्मद हानिफ सईद असे या आरोपीचे नाव आहे. तो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. हानिफ त्याची पत्नी फेहमिदा आणि अशरत अन्सारी या तिघांनी मिळून दोन टॅक्सीमध्ये शक्तीशाली बॉम्ब स्फोट घडवून आणण्याचा कट रचला होता.

त्यानुसार, २५ ऑगस्ट २००३मध्ये ऐतिहासिक ‘गेट वे ऑफ इंडिया’ आणि ‘झवेरी बझार’ येथे हे स्फोट झाले होते. यामध्ये ५२ जणांचा मृत्यू झाला होता तर २४४ जण जखमी झाले होते. सईदच्या मृत्यूबाबत माहिती देताना कारागृहाचे अधीक्षक राणी भोसले यांनी सांगितले की, शनिवारी अचानक त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला नागपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात तातडीने त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले मात्र, दीड तासांच्या अवधीतच त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच ते समोर येईल.

सोमवारी सईदच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. दरम्यान, ऑटोस्पाय झाल्यानंतर हानिफचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात सोपवण्यात येणार आहे.

...Read More

V. S. News
पोलीस कॉन्स्टेबलचा खून करणाऱ्यांकडून पोलीस उपनिरीक्षकाला जीवे मारण्याची धमकी.

व्हीएस न्युज - शेवगावच्या पोलिसाचा खून केल्याप्रकरणी नाशिक रोड जेलमध्ये असलेला आरोपी पिन्या कापसे याला न्यायालयीन कामासाठी घेऊन जात असताना त्याने पोलिस उपनिरीक्षकाला जीवे मारण्याची धमकी दिली याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, कैदी सुरेश उर्फ पिन्या भरत कापसे (रा.अंतरवली, ता.शेवगाव, जि.अहमदनगर) हा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. औरंगाबाद न्यायालयाच्या आदेशानुसार कापसेला ताब्यात घेण्यासाठी बीडचे पोलीस गेले होते. कापसे याला पोलीस वाहनात बसवत असताना त्याने पोलीस उपनिरीक्षक जोगदंड यांना त्याच्या वकिलाला फोन करण्यास सांगितले. मात्र जोगदंड यांनी त्यास नकार देताच त्याने त्यांना धक्काबुक्की केली. यावेळी मध्यस्थीसाठी धावून गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच जोगदंड यांना तुमचे घर पाहिले आहे, मी पाच पन्नास लाख रुपये खर्च करून तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. तसेच आरडाओरड करत आपल्याला न्यायालयात यायचे नाही तर जेलमध्येच राहायचे आहे, असे सांगत गोंधळ घातला.याप्रकरणी जोगदंड यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पिन्या कापसे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काय गुन्हा केला होता

तीन वर्षांपूर्वी शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल दीपक कोलते व इतर पोलीस कर्मचारी मुंगी येथे गेले होते. त्यावेळी पिन्या कापसे व त्याचा साथीदार या गावातून जात होते. त्यावेळी कोलते व कापसे यांच्यात झटापट झाला. त्यातून कापसे याने तीक्ष्ण हत्याराने कलते यांचा खून केला होता. त्यामुळे नगर जिल्हा पोलीस हादरले होते.

...Read More

V. S. News
नगर मध्ये दोन हजार रुपयांच्या बनावट चलनी नोटांची निर्मिती.

व्हीएस न्युज - शहरातील वंजारगल्‍ली परिसरात दोन हजार रुपयांच्या बनावट चलनी नोटांची निर्मिती होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आज रात्री पोलीस उपाध्यक्ष संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून दोघांना अटक केली आहे.

दोन हजार रुपयांच्या बनावट चलनी नोटांची निर्मिती केली जात असल्याची माहिती उपाधीक्षक मिटके यांना मिळाली होती. त्यावरून त्यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने एका घरावर छापा टाकला. तेथे दोन हजार रुपयांच्या तब्बल चाळीस हजार मूल्यांच्या नोटा सापडल्या.

बनावट नोटांची निर्मिती करण्यासाठी वापरले जाणारे प्रिंटर, संगणक, कागद व इतर साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे. तेथून दोघांना ताब्यात घेतले असून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

अनेक दिवसांपासून वंजारगल्लीत दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

...Read More

V. S. News
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला सरकारकडून अडीच लाख

व्हीएस न्युज - जातीपातीचे बंध झुगारुन आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला अडीच लाख रुपये देण्याची घोषणा सरकारने केली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी यासंदर्भात घोषणा केली.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातून जातीव्यवस्थेचा समूळ नायनाट करण्यासाठी आंतरजातीय विवाह हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचे सांगितले होते. मात्र त्या प्रमाणात आंतरजातीय विवाह होताना दिसत नाही. समाजातील अंधश्रद्धा, जातीय वाद, सरंजामी रुढी-परंपरा, जातपंचायतीच्या नावाची बंधने समाजातून नष्ट करण्यासाठी केवळ आंतरजातीय विवाह हाच पर्याय आहे. त्यामुळे आम्ही आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी अडीच लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे’ असे बडोले म्हणाले. आतापर्यंत, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जात होते. पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये एपीजे अब्दुल कलाम आझाद स्मारकात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राजकुमार बडोलेंनी ही घोषणा केली.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ‘सावित्रीच्या लेकीं’चा सामाजिक न्याय मंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. आंतरजातीय विवाहातून होणाऱ्या हत्यांच्या घटना सुरु आहेत. या कुप्रथांच्या विरोधात संघर्ष तीव्र करण्याची गरजही बडोलेंनी व्यक्त केली. पहिला सामुदायिक आंतरजातीय विवाह सोहळा फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणावर घेण्यात येईल. या सोहळ्यात येऊन संबंधित जोडप्याने विवाह करावा, असे आवाहन राजकुमार बडोलेंनी केले.

आंतरजातीय विवाह कायद्यात बदल करण्याचा विचारही यावेळी बडोलेंनी बोलून दाखवला. आंतरजातीय विवाह केल्यानंतरच्या घटनांचा मागोवा घेतला तर हत्येसारख्या घटनांपासून त्यांच्या अपत्यांना कायदेशीर संरक्षण, पोलिस मदत अशा बाबींचा समावेश या कायद्यात करणार आहोत. भावी काळात आंतरजातीय विवाहांना विशेष प्रोत्साहनाच्या योजना, शासकीय लाभ, अपत्यांना काही सवलती अशा बाबींचा समावेश करण्याचा मानस आहे. यासंबंधीच्या कायद्याचा मसूदाही तयार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

...Read More

V. S. News
लाचखोरीत महसूल विभाग पाहिल्या तर पोलिस खातं दुसर्‍या क्रमांकावर.

व्हीएस न्युज - सालाबादप्रमाणे २०१८मध्येही लाचखोरीत महसूल विभागाने पहिला क्रमांक पटकावला. विशेष बाब ही की या विभागातील अधिकारी तीन कोटी सहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले. ही रक्कम शासनाच्या उर्वरित विभागांमधील लाचखोर अधिकाऱ्यांनी स्वीकारलेल्या लाचेच्या ६९ टक्के आणि २०१७च्या तुलनेत सहा पटीने जास्त आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) २०१८मध्ये राज्यभर ८८४ सापळे रचले. त्यात शासनाच्या विविध विभागातल्या अधिकाऱ्यांसह ११७० आरोपींना चार कोटी ४३ लाख ८६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. यापैकी २५ टक्के म्हणजे २१७ सापळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांसाठी लागले. त्यात या विभागाच्या अधिकाऱ्यांसह २७३ आरोपी तीन कोटी सहा लाख १४ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ सापडले.

शासनाच्या अन्य कोणत्याही विभागापेक्षा महसूल आणि पोलीस खात्याशी नागरिकांचा रोजच्या जीवनात सर्वाधिक संबंध येतो. त्यामुळे एसीबीकडून रचलेल्या सापळ्यांमध्ये हे दोन विभाग सातत्याने पहिल्या, दुसऱ्या क्रमांकांवर असतात. "खाओ और खाने दो वाली" भूमिका पोलिस खात्याने पत्करल्याने लाचखोरीत दुसरा क्रमांक पटकाविण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये मात्र महसूल विभाग लाचखोरीत पहिल्या क्रमांकावर आहे.

२०१५मध्ये महसूल विभागाचे ३२१ अधिकारी ३५.१५ लाख, २०१६मध्ये २३७ अधिकारी ७३.७७ लाख तर २०१७मध्ये २२८ अधिकारी ५२.२९ लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. २०१८मध्ये महसूल विभागातील २२७ अधिकारी अन्य ४६ सहकाऱ्यांसह लाच स्वीकारताना गजांआड झाले. ही आकडेवारी पाहता गेल्या काही वर्षांच्या तुलनेत लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या कमी असली तरी त्यांनी मागितलेली लाचेची रक्कम मात्र सहा पटीने वाढल्याचे दिसते. महसूल विभातील अधिकाऱ्यांनी आवाज वाढवल्याने शासनाच्या एकूण लाचखोर अधिकाऱ्यांनी मागितलेली लाचेची रक्कम २०१७च्या तुलनेत दुप्पटीवर गेल्याचे चित्र आहे.

२०१८मध्ये लाचखोर पोलिसांसाठी एसीबीने १९५(२२ टक्के) सापळे रचले. त्यात पोलिसांसह २५८ आरोपी २४ लाख ६६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक झाले. ही रक्कम एकूण रकमेच्या सहा टक्के आहे. असे असले तरी कारवायांचे प्रमाण जास्त असल्याने महसूल विभागानंतर लाचखोरीत पोलिसांचा दुसरा क्रमांक आहे.

...Read More

V. S. News
भाजपा नगरसेवकाच्या फार्म हाऊसवरील ‘मुजरा पार्टी’वर पोलिसांचा छापा

व्हीएस न्युज - नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जळगावमधील भाजपाशी संबंधित एका नगरसेवकाच्या फार्म हाऊसवर रंगलेली पार्टी चर्चेचा विषय ठरली आहे. या पार्टीवर छापा टाकून पोलिसांनी 18 पुरुष आणि सहा महिलांना ताब्यात घेतले असले तरी या कारवाईवरुन पोलिसांवर राजकीय दबाव आल्याचीही चर्चा आहे. तब्बल 18 तासांनी पोलिसांनी सर्वांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सर्वांची जातमुचलक्यावर सुटका केली आहे.

भाजपाशी संबंधित नगरसेवकाचे ममुराबाद रस्त्यावरच्या शेतात घर आहे. या ठिकाणी ‘थर्टी फर्स्ट’ निमित्त साग्रसंगीत पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत मुजरा करण्यासाठी बऱ्हाणपूर येथून सहा तरुणींना बोलावण्यात आले होते. जळगाव, पाळधी, बऱ्हाणपूर येथील उच्चभ्रू वर्गातील 18 जण या पार्टीत सहभागी झाले होते. या पार्टीवर पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी पथकासह छापा टाकला.

पोलिसांनी सहा महिला व 18 पुरुषांना ताब्यातही घेतले. सर्वांना घेऊन पोलिसांचे पथक मंगळवारी सकाळी ६ वाजता तालुका ठाण्यात पोहोचले. मात्र, तोवर या प्रकरणात पोलिसांवर दबाव वाढला. 18 जण उच्चभ्रू वर्गातील असल्याने राजकीय दबाव येत होता. यानंतर दिवसभर पोलीस आणि राजकीय पुढाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरु होते, असे सूत्रांनी सांगितले. अखेर मंगळवारी रात्री नऊ वाजता न्यायालयाने वैयक्तिक जात मुचलक्यावर सर्वांची सुटका केली.

दिलिप पाटील (वय ५४), तरूण रंगलानी (वय ४३), भारत तलरेजा (वय ३२), मुन्ना बारेला, लाला बारेला, नाना बारेला, नितीन वाणी (वय ३२), सर्फराज शेख (वय २३), विशाल वर्मा (वय ३८), प्रवीण जैन (वय ३७ ), राजेश माहेश्वरी (वय ३७), कमलाकर बनसोडे (वय ४०), चंद्रकांत खडके (वय ५२), प्रशांत अग्रवाल (वय ३७), दिलीप रंगलानी (वय ३१), करीम खान अयुब खान (वय २८), गिरीश लाहोटी (वय ३४), सय्यद जावेद सय्यद मतिन (वय २३) यांच्यासह सहा तरुणांनीही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

...Read More

V. S. News
फडणवीस सरकारने माफ केले दोन नेत्यांचे 59 लाख रुपये

व्हीएस न्युज - राज्याच्या तिजोरीत निधीची कमतरता आहे अशी चर्चा असताना फडणवीस सरकारने भाजपाच्या दोन नेत्यांचे 59 लाख रुपये माफ केल्याची माहिती समोर आली आहे. माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आली आहे असे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी म्हटले आहे. न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

डॉ. विजयकुमार गावित यांचे 43 लाख 84 हजार रुपये आणि एकनाथ खडसे यांचे 15 लाख 49 हजार रुपये माफ करण्यात आल्याचे गलगली यांनी स्पष्ट केले. तशा सूचनाही सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात आल्या आहेत. एकनाथ खडसे मंत्री असताना रामटेक या बंगल्यावर राहात होते. तर विजय कुमार गावित हे आघाडी सरकारच्या काळात सुरुची या सदनिकेत राहात होते.

एकनाथ खडसेंनी मंत्रीपद सोडल्यावरही काही दिवस बंगला रिक्त केला नाही. त्या संपूर्ण कालावधीचे भाडे 15 लाख 49 हजार 974 रुपये होते. तर विजय कुमार गावित यांच्या सदनिकेचे 43 लाख 84 हजार 500 रुपये भाडे थकीत होते. या दोन्ही नेत्यांनी हे भाडे माफ करण्याची विनंती केली. विशेष बाब म्हणून या दोन्ही नेत्यांचे थकीत भाडे माफ करण्यात आले.

...Read More

V. S. News
दाऊदच्या गँगस्टरला 20 वर्षांनंतर मुंब्रा येथून अटक

व्हिएस न्युज - कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतील एका गँगस्टरला तब्बल 21 वर्षांनी अटक करण्यात आली आहे. मोहम्मद अहमदखान महाडिक (57) असे या गँगस्टरचे नाव असून खून, खंडणीसारखे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. ठाण्यातील मुंब्रा येथून त्याला अटक करण्यात आली आहे.

महाडिक याने 1991मध्ये हैदर नावाच्या व्यक्तीचा खून केला होता. त्याला अटकही झाली होती. मात्र 1998मध्ये जामिनावर सुटल्यानंतर तो कर्नाटकात फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते पण तो पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यानंतर 2001 मध्ये नाव बदलून पठाण युसुफखान उस्मान या नावाने बनावट पासपोर्ट तयार करून तो देश सोडून गेला आणि 17 वर्ष मस्कतमध्ये राहिला. आठ महिन्यापूर्वीच तो मुंब्रा कौसा येथील अमरेशपार्क इमारतीत पत्नीसह राहण्यास आला होता.

‘आम्हाला महाडिक मुंबईत परतल्याची कुणकुण लागली होती, तो मुंब्र्यात पत्नीसह राहत असल्याची माहिती मिळताच त्याला अटक करण्यात आली’ अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली. नितीन ठाकरे यांच्या पथकाने सोमवारी महाडिक याला बनावट पासपोर्टसह मुंब्र्यातून अटक केली.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!