व्हीएस न्युज - शहरातील वंजारगल्ली परिसरात दोन हजार रुपयांच्या बनावट चलनी नोटांची निर्मिती होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आज रात्री पोलीस उपाध्यक्ष संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून दोघांना अटक केली आहे.
दोन हजार रुपयांच्या बनावट चलनी नोटांची निर्मिती केली जात असल्याची माहिती उपाधीक्षक मिटके यांना मिळाली होती. त्यावरून त्यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने एका घरावर छापा टाकला. तेथे दोन हजार रुपयांच्या तब्बल चाळीस हजार मूल्यांच्या नोटा सापडल्या.
बनावट नोटांची निर्मिती करण्यासाठी वापरले जाणारे प्रिंटर, संगणक, कागद व इतर साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे. तेथून दोघांना ताब्यात घेतले असून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
अनेक दिवसांपासून वंजारगल्लीत दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002