Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
थेरगावात बॅक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडले

व्हिएस न्यूज - बॅक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम फोडून 9 लाख 76 हजारांची रोकड, एटीएममधील सीपीयु असा दहा लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार शुक्रवारी थेरगाव येथे उघडकीस आला.
सचिन काळगे (वय-30, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळगे हे इलेक्ट्रानिक्स पेमेन्ट आणि सर्व्हिसेस या कंपनीत तळेगाव, देहूगाव, वाकड, चाकण या विभागाचे मॅनेजर आहेत. दि. 7 ऑक्टोबर ते 22 डिसेंबर या कालावधीत थेरगाव येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम चोरट्यांनी फोडले. एटीएममधील 9 लाख 76 हजार 400 रूपयांची रोकड, 30 हजार रूपये किंमतीचा सीपीयु असा 10 लाख 6 हजार 400 रूपयांचा ऐवज चोरून नेला.
सहायक पोलीस निरीक्षक टी. एस. भोगम अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
भोसरी गोळीबार प्रकरणी चार जण गजाआड

व्हिएस न्यूज - तरूणावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भोसरी पोलीसांनी शुक्रवारी रात्री उशिरा चार जणांना गजाआड केले. गोळीबार करणारा फरार झाला आहे. अटक केलेल्या चार जणांना पिंपरी न्यायालयात हजर केले असता 27 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.
प्रितेश उर्फ पप्पू फुगे (वय 29) अनिल सुभाष लांडे (वय 32) अजय युवराज बोत्रे (वय 19) सौरभ नितीन टकले (वय20 , सर्व रा. विठ्ठल-रूक्मिणी मंदीरामागे, भोसरी गावठाण) अशी अटक केलेल्या चार जणांची नावे आहेत. गोळीबार करणारा मुख्य आरोपी बंटी टकले हा पसार असून गोळीबारात जखमी झालेल्या पंकज कांताराम फुगे (वय26) याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या डाव्या खांद्यात गोळी घुसली आहे. पंकज याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरज फुगे (वय 28, रा. भोसरी गावठाण) याने फिर्याद दिली आहे. जखमी पंकज आणि अजिंक्य माने यांची पूर्वी भांडण झाले होते. त्याचा राग पंकजला आहे.
फिर्यादी सुरज आणि अजिंक्य हे मित्रांसमवेत शुक्रवारी दुपारी फुगे-माने आळीत बसले होते. यावेळी बंटी टकले, पंकज आणि इतर आरोपी दोन दुचाकींवर तेथे आले. पंकज अजिंक्यला मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून गेला. त्यामुळे अजिंक्य तेथून पळाला असता पंकजने त्याचा पाठलाग सुरू केला. यावेळी बंटी याने त्याच्याकडील पिस्तुलातून अजिंक्यच्या दिशेने गोळी झाडली. मात्र, त्याचा नेम हुकला. त्यानंतर त्याने पुन्हा गोळी झाडली असता गोळीचा पुन्हा निशाणा चुकला आणि गोळी अजिंक्यऐवजी पंकजच्या डाव्या खांद्यात घुसली. सुरूवातीला अजिंक्यनेच पंकजवर गोळी झाडल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, अजिंक्यने तात्काळ भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत भोसले तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
स्टिल उदयोगात विकासाच्या व रोजगारांच्या अनेक संधी - मनोज भुतानी

व्हीएस न्यूज - भारतातील स्टिल उद्योगाला उज्ज्वल भविष्य आहे. भारतात दर मानसी स्टिलचा वापर दोन टक्के आहे. तर अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रात तीस टक्के दर मानसी स्टिल वापरले जाते. भारतात स्टिल उद्योगाची वार्षिक वाढ आठ टक्के आहे. स्टेनलेस स्टिलचा शंभर टक्के पुर्नवापर करता येतो. या उदयोगाला भारतात विकासाच्या व रोजगारांच्या अनेक संधी असल्याचे मत जिंदाल स्टिलचे महाराष्ट्र व्यवस्थापक मनोज भुतानी यांनी व्यक्त केले.

वसंत ग्रुप आणि जिंदाल स्टिल यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड शहरातील स्टिल व्यापा-यांच्या परिसंवादाचे आयोजन चिंचवड येथे करण्यात आले होते. यावेळी वसंत ग्रुपचे संचालक प्रेमचंदजी मित्तल, अनिल मित्तल, रविंद्र लांबा, राजेंद्र मोकाशी, रविंद्र येवले आदींसह शहरातील स्टिल उद्योग व्यवसायाशी संबंधीत उद्योजक व्यापारी उपस्थित होते.

मनोज भुतानी म्हणाले की, भारताच्या विस्तिर्ण समुद्र किनारी भूप्रदेशात स्टिल मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. या उद्योगात गुंतवणूक वाढल्यास लाखो उद्योगांना वाढीसाठी मदत होईल. यातून कोट्यावधी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. तसेच सरकारला हजारों कोटींचा महसूल मिळेल. यासाठी गुंतवणूकदारांनी व उद्योजकांनी स्टिल उद्योगात यावे. जिंदाल स्टिल चलणी नाणे निर्मितीसाठी रिझर्व बँकेला स्टिल पुरवठा करते. केंद्र व राज्य सरकारने नियम अनुकूल करुन पोषक वातावरण निर्मिती केल्यास मेक इन इंडियाचे स्वप्न साध्य होण्यास मदत होईल. असेही भुतानी म्हणाले.

स्वागत, प्रास्ताविक करताना अनिल मित्तल यांनी सांगितले की, वसंत ग्रुपची स्थापना 1981 साली प्रेमचंदजी मित्तल यांनी केली. पुण्यात सात आणि धारवाड येथे एक असे आठ प्रकल्प वसंत ग्रुपचे आहेत. नुकताच सोलर उद्योगात वसंत ग्रुपने प्रवेश केला आहे. आयएसओ 9000 प्रमाणीत हा ग्रुप असून यातून हजारों लोकांना रोजगार दिला आहे.
...Read More

V. S. News
सलमान खान व शिल्पा शेट्टी यांचा पिंपरीत निषेध - जोडे मारो आंदोलन

व्हिएस न्यूज - अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी एका चित्रपटाच्या प्रमोशनवेळी वाल्मिकी समाजाबाबत अपशब्द वापरले यामुळे वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. याबाबत त्यांनी समाजाची जाहिर माफी मागावी आणि त्यांच्यावर ॲल्ट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी अखिल वाल्मिकी समाज, पिंपरी चिंचवड शाखेच्यावतीने माजी नगरसेवक अरुण टाक यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.
शुक्रवारी (दि. 22 डिसेंबर 2017) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सलमान खान आणि शिल्पा शेट्टी यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करण्यात आले माजी नगरसेवक अरुण टाक, मारूती भापकर, नगरसेवक संतोष लोंढे, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, प्रताप गुरव, देवेंद्र तायडे यांनी सलमान खान व शिल्पा शेट्टी यांचा तीव्र शब्दात निषेध केला.

यावेळी वाल्मिकी समाज शहराध्यक्ष राजू परदेशी, सोनाथ बेद, मोहन बिडलान, सचिन माने, धर्मवीर चंडालीया, धम्मराज साळवे, राजू डुलगूज, अनिल पारचा, सुभाष कुडीया, विनोद करोतीया, विजय चावरीया, सचिन सौदाई, राजकुमार परदेशी, शाम मेवाती, सुखवीर मोतीया, मेघराज सौदे, राकेश राजोरीया, ओमपाल बेनवाल, करण ढकोलीया, कृष्णा चटोलीया, कुणाल बेद, अर्जुन ओव्हाळ आदी उपस्थित होते.
...Read More

V. S. News
भोसरीत हल्लेखोरावरच झाला गोळीबार

व्हिएस न्यूज -भोसरीत झालेल्या गोळीबार प्रकरणाने वेगळीच कलाटणी घेतली आहे. पूर्ववैमनस्यातून अजिंक्य माने या तरूणावर गोळीबार करण्यासाठी आलेल्या टोळक्यातील पंकज फुगे हाच त्याचा साथीदार बंटी टकले याच्याकडून झालेल्या गोळीबारात जखमी झाला. परंतू अजिंक्य माने याने गोळीबार केल्याचा बनाव पंकज याने सुरूवातीला केला होता. तपासात अजिंक्य नव्हे तर पंकजच गोळीबार करण्यासाठी आल्याचे उघड झाले. या प्रकरणी २ जणांना अटक करण्यात आली आहे.
भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहामागे गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळाबारात पंकज फुगे हा जखमी झाला होता. त्यानंतर जखमी पंकजने त्याच्यावर अजिंक्य माने यानेच गोळीबार केल्याचे पोलीसांना सांगितले. त्यानुसार पोलीसांनी अजिंक्य माने याला ताब्यात घेतले. पोलीसांनी त्यानंतर तपास सुरू केल्यावर उलटाच प्रकार समोर आला.

पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार अजिंक्य आणि पंकज यांच्यात वाद झाला होता. तो वाद मिटवण्यासाठी पंकज फुगे पाच जणांसह अजिंक्य माने याला भेटायला आला होता. मात्र त्यावेळी त्याच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी पंकज सोबत आलेल्या बंटी टकले याने पिस्तुल बाहेर काढले. ते पाहून अजिंक्य तेथून पळाला, त्याच्या मागे पंकज पळाला. दरम्यान बंटी टकले याने अजिंक्यच्या दिशेने गोळीबार केला. मात्र ती गोळी पंकजच्याच पाठीला लागली. त्यानंतर पंकजसह आलेले सर्व साथीदार घटनास्थळावरून फरार झाले. तर पंकज याला काहींनी उपचारासाठी भोसरीतील एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. त अजिंक्य यानेच आपल्यावर गोळीबार केल्याचा पंकज याने बनाव केला. सुरूवातीला अजिंक्य याने गोळीबार केल्याचे जखमी पंकज याने सांगितले होते. त्यामुळे अजिंक्य यालाच ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर खरा प्रकार उघड झाला.

दरम्यान अप्पर पोलिस आयुक्त रविंद्र सेनगावकर यांनी घटनास्थळी पाहणी करून, तपासाच्या सूचना दिल्या. सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश पाटील, संजय निकम (गुन्हेशाखा), वरिष्ठ निरीक्षक संपराव भोसले, आर. एम. तोडकर, ब्रम्हानंद नायकवडी आदींनी दोघांना अटक करून, पथक रवाना केली.
...Read More

V. S. News
विश्वास नांगरे-पाटील साधणार माजी विद्यार्थ्यांशी संवाद

प्रा.मोरे महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

व्हिएस न्यूज - आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज़्य व विज्ञान महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 26 डिसेंबर 2017 रोजी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. मोरे महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सव सांगता समारंभाच्या निमित्ताने आणि माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाशी संपर्क वाढावा, जुन्या आठवणींना उजाळा देता यावा, आजी विद्यार्थांसमोर एक आदर्श निर्माण व्हावा, होतकरू विद्यार्थ्यांस मदत व्हावी या उद्देशाने हा मेळावा घेण्यात येत असून मेळाव्यास सुमारे 3 ते 4 हजार विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे तरूणांचे आदर्श प्रमुख पाहुणे स्पेशल आय.जी. कोल्हापूर विभाग विश्वास नांगरे पाटील हे यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर, माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपध्याक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव संदिप कदम, खजिनदार मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए.एम. जाधव, प्रा रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम जी चासकर आदि उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. जी. चासकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, सुसज्ज अशा स्पर्धा परिक्षा केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ज्यामध्ये उपयुक्त भरपूर पुस्तके, इंटरनेट, ए.सी आदि सुविधा असणार आहेत. विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या माजी विद्यार्थ्यांचे अनुभव यशोगाथा या पुस्तकाच्या रूपाने प्रसिध्द करण्यात येईल. तसेच विशेष उल्लेखनीय कार्य करणार्या विद्यार्थ्यांचा उपस्थित पाहुण्यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात येणार आहे. 1992 साली स्थापन झालेल्या प्रा रामकृष्ण मोरे महाविद्यालयाला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या 25 वर्षामध्ये महाविद्यालयाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उत्तम सोय उपलब्ध करून दिलेली आहे. महाविद्यालय अत्याधुनिक सुविधांनी युक्त असून महाविद्यालयाला व प्राध्यापकांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. महाविद्यालयातील 14 विद्यार्थी सुवर्णपदक प्राप्त असून विद्यार्थी व प्राध्यापक राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय परिषदामध्ये सहभागी होत असतात. यावेळी माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष शांताराम वायकर, नगरसेवक अमित गावडे, नगरसेवक अँड. मोरेश्वर शेडगे, नाना शिवले, ज्ञानेश्वर कुटे, दत्तात्रय भालेकर, विजय लांडगे, प्रा रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे उपसचिव एल. एम. पवार, उपप्राचार्य डॉ. निलेश दांगट, डॉ. अभय खंडागळे, डॉ. तुषार शितोळे, डॉ. सुजाता टापरे आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. निलेश दांगट, डॉ. अभय खंडागळे, डॉ. तुषार शितोळे, रजिस्ट्रर अनिल शिंदे तसेच माजी विद्यार्थी संघाच्या समन्वयक डॉ. सुजाता टापरे करणार आहेत.
नाव नोंदणीसाठी मोबाईल अँप तयार करण्यात आले असून विद्यार्थांनी त्यावरून आपली नोंदणी करावी, तसेच अधिक माहितीसाठी डॉ. सुजाता टापरे (9970925914) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
...Read More

V. S. News
डी. एस. कुलकर्णींना न्यायालयाकडून एक महिन्याचा दिलासा

व्हिएस न्यूज – ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ठेवीदारांचे ५० कोटी रुपये भरण्यासाठी उच्च न्यायालयात दिलेली पहिली तारखी उलटून गेल्यानंतर अटकेची टांगती तलवार असणारे कुलकर्णी यांच्या माध्यमातून एक निवेदन प्रसिद्ध कऱण्यात आले आहे.

या निवेदनामध्ये आम्हाला १९ जानेवारीपर्यंत ५० कोटी भरण्याची मुदत सर्वोच्च न्यायालयाने वाढवून दिल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर सर्व रक्कम सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या मुदतीमध्ये जमा करण्यात येईल. कोणत्याही गुंतवणुकदारांचा एक रुपयाही आम्ही ठेवणार नसून कोणाचीही फसवणूक केली जाणार नाही असे आश्वासनही कुलकर्णी यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे कुलकर्णी यांनी सर्वोच्च न्यायालयाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. आमचे म्हणणे सर्वोच्च न्यायलयाने ऐकून घेत आमच्यावर विश्वास दाखवल्यामुळेच आता सर्व गोष्टी व्यवस्थित होतील आणि व्यवसाय नक्कीच पूर्वपदावर येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे
...Read More

V. S. News
राष्ट्र संत गाडगे महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त एच.ए.स्कूल ची स्वच्छता मोहीम

व्हीएस न्यूज - पिंपरी येथील एच.ए.स्कूल आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय 'ह' चे आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त सौ.अशा राऊत आणि आरोग्य निरीक्षक सतीश इंगेवाड यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ भारत मिशन (नागरी) स्वछ महाराष्ट्र मिशन (नागरी) अंतर्गत राष्ट्र संत गाडगे महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ह्या मोहिमेत एच.ए.स्कूलच्या १४०० विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सहभाग घेतला. या दरम्यान एच.ए.स्कूल आणि एच.ए.कॉलनी च्या परिसराची साफसफाई केली आणि विध्यार्थ्यांना काचऱ्या विषयी प्रबोधन करण्यात आले.
...Read More

V. S. News
दहा हजाराचे बंदे देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठाची फसवणूक

व्हिएस न्यूज - तूप विकायला आलेल्या चोरट्याने एका ज्येष्ठ नागरिकाला दहा हजार रूपयांचे बंदे देतो, असे सांगून दहा हजार रूपये घेवून पोबारा केला. हा प्रकार ताथवडे येथील जीवननगर नरहरी सोसायटी येथ बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता घडला.
रमाकांत रेपाळ (वय़-70, रा. जीवननगर नरहरी सोसायटी, ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेपाळ यांच्या घऱी बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता एक जण तुप विकण्याच्या बहाण्याने आला. रेपाळ यांना 10 हजार रूपयांचे बंदे करून देतो, असे सांगून त्यांच्याकडून दहा हजार रूपये घेवून पोबारा केला.
फौजदार मोहन जाधव अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
वायसीएम रुग्णालयात दोन डॉक्टरांमध्ये हाणामारी

व्हिएस न्यूज - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात शुक्रवारी ड्युटीवर असणाऱ्या दोन डॉक्टरांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला आहे. हजेरी पुस्तकावर सही करण्यासाठी गेलेल्या एका डॉक्टरला दुसऱ्या डॉक्टरने शिवीगाळ करत हाणामारी केली. यामध्ये दोघांचे शर्ट फाटले. हा प्रकार वायसीएम रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयासमोर घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी नऊ वाजता संबंधित डॉक्टर हजेरी पुस्तकावर सही करण्यासाठी आले होते. त्यावेळी दुसऱ्या डॉक्टरने त्यांना शिवीगाळ केली. यामुळे दोघांत शाब्दीक बाचाबाची झाली. याचे रुपांतर भांडणात झाले. यामध्ये दोन्ही डॉक्टरांनी एकमेकांचे कपडे फाडण्यापर्यंत प्रकरण वाढले होते. याप्रकरणी अद्याप पोलिसांकडे अथवा रुग्णालय प्रशासनाकडे कोणाचीही तक्रार आली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
...Read More

V. S. News
लेखा विभागाच्या लिपिकाला चार हजाराची लाच घेताना अटक

व्हिएस न्यूज - बायोमॅट्रीक मशीन दुरुस्तीचे एक लाख 64 हजार रुपयांचे बिल काढून देण्यासाठी लेखा विभागाच्या कनिष्ठ लिपिकाला चार हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई पिंपरी पालिकेतील लेखा विभागात दुपारी एकच्या सुमारास करण्यात आली.
प्रकाश जयसिंग रोहकले (वय-39, रा. पिंपळे गुरव) असे अटक करण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय कंत्राटदाराने लाच लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत बायोमॅट्रीक मशीन दुरुस्तीचे कंत्राट होते. याच कंत्राटाचे एक लाख 64 हजार रुपयांच्या बिलाच्या फाईलवर वरिष्ठांची सही घेऊन धनादेश देतो असे सांगून तक्रारदाराकडे चार हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे केली होती. लाचलुचपत विभागाने महापालिकेतील लेखा विभागात सापळा लावून रोहकले याला लाच घेताना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अरुण घोडके, सुरेखा घार्गे यांनी केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेत एका वर्षात लाचलुचपत विभागाची ही पाचवी कारवाई आहे.
...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!