Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी सपत्नीक फरार

व्हिएस न्यूज – प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी सपत्नीक मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर फरार झाले आहेत. गुरुवारी पुण्यात डी. एस. कें.च्या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या कर्जरोखे धारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अर्थात डी. एस. के. आणि त्यांच्या पत्नी हेमंती या बैठकीला गैरहजर होते.

१ एप्रिल २०१८ पर्यंत मुदत कंपनीच्या इतर संचालकांनी पैसे परत करण्यासाठी वाढवून देण्याची मागणी गुंतवणुकदारांना केली आहे. पण आता डी. एस. कें.च्या शब्दावर विश्वास राहीला नसल्याने गुंतवणुकदारांनी ही मुदत देण्यास नकार देत तात्काळ पैसे देण्याची मागणी केली. ही बैठक डीएसकेंच्या कंपनीचे संचालक आणि कर्मचारी समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्यानेआटोपती घ्यावी लागली. पैसे परत मिळत नसल्याने अनेक गुंतवणुकदार अक्षरश रडकुंडीला आल्याच यावेळी दिसून आले.

मुदत ठेवीखाली कर्जरोखे धारकांनी सहाशे कोटी ठेवले आहेत. ज्या जागा विकल्या जातील त्यापैकी चाळीस कोटी रक्कम राहणार आहे. मुदत ठेवधारकांनी पोलिसांशी संवाद सुरु ठेवावा, जेणेकरुन ती रक्कम वेळेवर मिळेल, असे रिअल इस्टेटचे अभ्यासक रवी करंदीकर यांनी सांगितले.
...Read More

V. S. News
शिवसेनेचा जप्त संगणक परत मिळाला

व्हिएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेना कार्यालयातील जप्त करण्यात आलेला संगणक मनसेने परत मिळवून दिला आहे. मनसे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले यांनी हा संगणक परत करावा यासाठी महापौरांकडे मागणी केली होती.

पिंपरी महापालिकेतील शिवसेना कार्यालयातील संगणक प्रशासनाने जप्त केला होता. गटनेते राहुल कलाटे यांच्या अनुपस्थितीत येथे संगणकाचा गैरवापर केला जात असल्याचे कारण आयुक्तांनी दिले होते. वास्तविक पाहता सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर हे या संगणकावरून सत्ताधारी भाजप विरोधात पत्रकबाजी करत होते. विरोधात होत असलेली प्रसिध्दी सहन न झाल्यामुळेच सत्ताधारी पदाधिकार्यांनी हा संगणकच जप्त करण्यास आयुक्तांना सांगितले होते.

प्रशासनाने केल्या या कारवाईची सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त होत होती. दरम्यान सेना गटनेते राहुल कलाटे यांची प्रकृती ठिक नसल्याने ते विरोध करू शकले नाहीत. मात्र शिवसेनेचे इतर नगरसेवक मुग गिळून गप्प राहिले. त्यामुळे सेनेची आक्रमकता गेली कुठे असा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान मनसेचे एकमेव नगरसेवक सचिन चिखले सेनेवर झालेल्या अन्यायाविरूध्द धावून आले. चिखले यांनी सत्ताधार्यांनी केलेल्या या कारवाईचा निषेध करत महापौरांना सेनेचा संगणक परत करा अशी मागणी केली.

सचिन चिखले यांनी महापौरांकडे केलेल्या या मागणीनंतर शिवसेनेचा तो जप्त करण्यात आलेला संगणक कार्यालयात परत बसविण्यात आला. एवढंच नाही तर सचिन चिखले यांच्यासाठी ही प्रशासनाने स्वतंत्र संगणक उपलब्ध करून दिला आहे.
...Read More

V. S. News
लग्नाच्या अमिषाने 16 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार

व्हीएस न्यूज - एका 16 वर्षाच्या मुलीवर 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 12 डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून पीडित मुलीच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 डिसेंबर रोजी दुपारी घरामध्ये कोणी नसताना संबंधित मुलाने पीडित मुलीला लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केले. तसेच या घटनेची माहिती बाहेर देऊ नको असे धमकावले. पीडित मुलीने ही माहिती आईला सांगितल्यानंतर मंगळवारी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.
...Read More

V. S. News
सांगवीत पीडब्ल्युडीच्या मुकादमाला मारहाण

व्हीएस न्यूज - पीडब्ल्युडीच्या कॉलनीत निवासस्थान बळकावून राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलाचे घर सील करण्यासाठी गेलेल्या मुकादमाला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच 'तु काम करतो ते मी बघतो, तुला कोणास काय सांगायचे ते सांग' अशी धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी सकाळी 11 वाजता सांगवीतील पीडब्ल्युडी कॉलनीत घडला.
पीडब्ल्युडीचे मुकादम विश्वनाथ साठे (वय-58, रा. आनंद पार्क, पिंपळे-गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. योगेश विजय गायकवाड (रा. पीडब्ल्युडी कॉलनी, डी 1/14 नवी सांगवी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याबाबत फौजदार एस. जी. पाटील यांनी माहिती दिली. योगेश गायकवाड याचे वडील पीडब्ल्युडीमध्ये कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांना नवी सांगवीतील पीडब्ल्युडी कॉलनीत घर मिळाले आहे. योगेश याने त्यांच्या घराशेजारील मोकळे असलेले घर बळकावून त्यात राहू लागला. याची माहिती मुकादम साठे यांनी वरिष्ठांना दिली. त्यानंतर त्याच्या वडीलांच्या पगारातून घराचे पैसे जमा करण्यात येऊ लागले. योगेशचे घर सील करण्यासाठी मुकादम साठे मंगळवारी पीडब्ल्युडी कॉलनीत कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी योगेशने साठे यांना शिवीगाळ करत धक्का-बुक्की केली. 'तु काम करतो ते मी बघतो, तुला कोणास काय सांगायचे ते सांग' अशी धमकी दिली. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
हॉर्न वाजविल्याचा जाब विचारत व्यावसायिकाला दोघांची मारहाण

व्हीएस न्यूज - रस्ता न देणाऱ्या मोटारीला हॉर्न दिल्याच्या कारणावरून मोटारीतील दोघांनी मेडीकल व्यावसायिकाला हाताने मारहाण केली. ही घटना सोमवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर कासारवाडीतील कलासागर हॉटेलजवळ घडली.
ललित बाफना (वय-35, रा. दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत फौजदार काळूराम लांडगे यांनी माहिती दिली. बाफना हे सोमवारी मुंबई-पुणे महामार्गावरून दापोडीकडे मोटारीने जात होते. कासारवाडी येथे समोरून जाणारा मोटार चालक रस्ता देत नसल्यामुळे त्यांनी मोटारीचा हॉर्न वाजविला. याचा राग आलेल्या मोटार चालकांनी बाफना यांना मोटार थाबविण्यास भाग पाडले. हॉर्न का वाजविला,असा जाब विचारत त्यांना हाताने मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैनही झटापडीत पडली. मात्र, चैन मोटारीतच सापडली आहे. बाफना यांचे पिंपरीत मेडीकल आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
इसमाची सोनसाखळी हिसकावली

व्हीएस न्यूज - रस्त्याने जाणाऱ्या इसमाची चोरट्यानी गळ्यातील 70 हजार रूपये किंमतीच्या दोन सोनसाखळी जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेली. ही घटना मंगळवारी रात्री सव्वा दहा वाजता जगताप डेअरी ते काळेवाडी फाटा दरम्यान घडली.
प्रत्युश नंदवयोलियार (वय 39 रा. व्हिसडम कल्चर सोसायटी, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदवयोलियार रस्त्याने पायी घरी जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 70 हजार रूपये किंमतीच्या दोन सोनसाखळी हिसकावून पसार झाले.
वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
दोन अज्ञातांकडून तरुणीचे अपहरण करुन बलात्कार

व्हीएस न्यूज - पायी जाणाऱ्या तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा निगडी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. ही घटना प्राधिकरण येथे दहा महिन्यापुर्वी घडली. 22 वर्षीय पिडीत मुलीची प्रसूती झाली असून घराच्यांच्या व डॉक्टरांच्या मदतीने तिने निगडी पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी 22 वर्षाय तरूणी प्राधिकरणातील एका पाळणाघरात कामाला होती. दहा महिन्यापुर्वी ती सकाळी नऊ वाजता प्राधिकरण येथून पायी जात होती. रस्त्याच्या कडेला एक ओमीनी गाडी उभा होती. यावेळी गाडीमध्ये एकजण होता तर गाडी बाहेर एकजण उभा होता. त्या दोघांनी तिला बळजबरीने गाडीत टाकले व तोंडाला रुमाल बांधून बेशुद्ध केले. तिला अज्ञात स्थळी घेऊन गेले व त्यांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर सायकांळी साडेसहाच्या सुमारास तिला जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती आकुर्डी येथील रल्वे पुलाच्याखाली होती. तिच्या अंगावरचे कपडे देखील फाटलेले होते. ती कशीबशी तिच्या घरी गेली. त्यानंतर काही दिवसांनी तिला त्रास सुरु झाल्यानंतर ती रुग्णालयात तपासणीसाठी गेली असता ती गरोदर असल्याचे समोर आले. काही दिवसांपूर्वी तिची प्रसुती झाली असून तिने घरच्यांच्या मदतीने निगडी पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.
...Read More

V. S. News
विजेच्या समस्येबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांचे ऊर्जामंत्र्यांना साकडे

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवडमधील विजेच्या विविध तक्रारींबाबत तसेच वीजवितरण विभागात असलेल्या विविध समस्यांचे निराकरण करण्याची मागणी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांची बैठक झाली. या बैठकीत आमदार जगताप यांनी पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना विजेसंदर्भात येणाऱ्या अडचणी ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्यासमोर मांडल्या. शहराच्या अनेक भागात वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याकडे त्यांनी ऊर्जामंत्र्यांचे लक्ष वेधले. त्याचप्रमाणे इन्फ्रा १ व २ (पायाभूत सुविधा) ची उभारणी व कार्यवाही चुकीच्या पद्धतीने झाले असल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी आमदार जगताप यांनी केली. शहरातील नादुरूस्त असलेले वीजमीटर तक्रारीनंतर तातडीने बदलले जात नसल्याचेही आमदार जगताप यांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या निदर्शनास आणून दिले. शहरातील सहा सबस्टेशन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याची आग्रही मागणी आमदार जगताप यांनी केली. त्यावर ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी आमदार जगताप यांनी मांडलेल्या सर्व समस्यांचे येत्या १५ जानेवारीपर्यंत निराकरण करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीला महावितरणचे मुख्य व्यवस्थापन संचालक संजीवकुमार, अधीक्षक अभियंता दिवाकरन, कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर, वीजवितरण समितीचे सदस्य रामकृष्ण राणे, गोरक्ष अंबरुळे आदी उपस्थित होते. दरम्यान, ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या उपस्थित होणाऱ्या या बैठकीबाबत पूर्वकल्पना देऊनही पुणे विभागाचे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे बैठकीला गैरहजर होते. त्यामुळे ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दूरध्वनीवरून शिंदे यांना चांगलेच फैलावर घेतले. तसेच प्रशासकीय शिस्त पाळण्याची सक्त ताकीद दिली.

...Read More

V. S. News
पिंपळे सौदागरमध्ये ३५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारणार

व्हीएस न्यूज - पिंपळे सौदागरमध्ये ‘अमृत योजने’अंतर्गत ३५ लाख लिटर पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी आज पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून टाकी उभारण्याची जागा निश्चित केली आली.

शत्रुघ्न काटे म्हणाले की, पिंपळे सौदागर परिसरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. वाढती लोकसंख्या पाहता भविष्यात पाण्याची कमतरता पडू शकते. त्यामुळेच परिसरात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, तसेच पाणीसाठा वाढावा म्हणून येथे पाण्याची टाकी उभारण्यात येत आहे. ‘अमृत योजने’अंतर्गत ही टाकी बांधण्यात येणार असून जमिनीवर २५ लाख लिटर आणि भूमिगत १० लाख लिटर अशी एकूण ३५ लाख लिटर पाण्याची टाकी बांधण्याचे काम सुरु करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

निर्मला कुटे म्हणाल्या की, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे, उपअभियंता राजेंद्र जावळे, उद्यान स्थापत्य विभाग अधिकारी संजय कांबळे, नगररचना विभागाचे संतोष जगदाळे आदींसोबत आज टाकी बांधण्याच्या जागेची पाहणी केली. येथील आयसीआयसीआय बँके समोरील उद्यानामध्ये टाकीची जागा निश्चित करण्यात आली. या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन १५ जानेवारी पर्यंत करण्याचा प्रयत्न असून त्याबाबत संबंधित अधिकार्यांना तशा सुचना दिल्याचे नगरसेवक शत्रुघ्न काटे व निर्मला कुटे यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
वार्ताहराला मारहाणप्रकरणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून पोलिस आयुक्तांना निवेदन

व्हीएस न्यूज - मांजरी येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या वार्ताहराला सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांनी शनिवारी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी, अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. यासंदर्भात योग्य कारवाई करण्याचे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिले.

वार्तांकन करीत असताना पत्रकार ज्ञानेश भुकेले यांना वानवडीचे सहायक पोलिस आयुक्त निलेश मोरे यांनी शासकीय कर्तव्य बजावण्याचा आव आणत थेट गाडीत डांबून नेले. त्यांनी वार्ताहराला शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच, ‘विद्यार्थी आंदोलनाबाबत चुकीच्या पद्धतीने प्रश्न विचारून मोबाइलवर रेकॉर्डिंग केले’, असा माफीनामाही लिहून घेतला. शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून विविध मागण्यांबाबत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ‘लोकसत्ता’चे वार्ताहर ज्ञानेश भुकेले या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी वसतिगृहाच्या आवारात आले होते. आंदोलनाच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलीस अधिकारी व त्यांच्यासोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी भुकेले यांना ओढून नेत थेट पोलीस व्हॉनमध्ये बसविले. त्यानंतर एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देऊन भुकेले यांना थेट हडपसर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. भुकेले यांना धमकावून त्यांच्याकडून जबरदस्तीने माफीनामा लिहून घेतला. हा सर्व प्रकार पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या निदर्शनास आणून दिला. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अनिल मोरे, सीताराम लांडगे, धनराज माने, सागर बोदगिरे, तुकाराम गोडसे, दिगंबर माने, अमित कुचेकर, दीपक पाटील, तुषार पायगुडे, विशाल भालेराव, दीपक बल्हाडे आदी उपस्थित होते. याबाबत योग्य कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिले.

...Read More

V. S. News
महाराष्ट्र केसरीचा थरार रंगणार आजपासून

व्हीएस न्यूज - समस्त ग्रामस्थ भूगांव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ व मल्लसम्राट प्रतिष्ठान यांच्यावतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने ६१ वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुळशी तालुक्यातील भूगाव येथे ही स्पर्धा होणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी मानाच्या चांदीच्या गदेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय कुस्ती पंच चंद्रकांत मोहोळ आणि संग्राम मोहोळ यांनी केले होते. यावेळी शांताराम इंगवले, शिवाजी तांगडे, अनिल पवार, कैलास मोहोळ, सुरेश हरपुडे, अनिल मोहोळ, विजय मोहोळ, सुरेश मोहोळ गणेश मोहोळ, रमाकांत साळुंके, निवृत्ती चोंधे, अजिंक्य मोहोळ, विजय जाधव, संजय भामरे उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद मान्यतेने होणारी ही स्पर्धा भूगाव येथील कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत २४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने नामवंत मल्लांच्या माती व गादीवरील कुस्त्या चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहेत.

सर्वाधिक उत्कंठा असलेली महाराष्ट्र केसरीची लढत शनिवार दिनांक २४ डिसेंबर रोजी होईल. स्पर्धेत महाराष्ट्रातील ४५ जिल्हा व शहर तालीम संघातील तब्बल ९०० मल्ल सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर ९० मार्गदर्शक आणि संघव्यवस्थापक, १२५ तांत्रिक अधिकारी व ८० पदाधिकाऱ्यांचे स्पर्धेसाठी सहकार्य मिळणार आहे. मंगळवार खेळाडूंची वजने आणि वैद्यकीय तपासणी झाली. शिवाय, अनेक संघ पुण्यात दाखल झाले. तसेच दुपारी पंच उजळणी वर्ग घेण्यात आला. यात आंतरराष्ट्रीय पंच आणि कुस्तीगीर परिषदेचे तांत्रिक अधिकारी दिनेश गुंड यांनी सर्व तांत्रिक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

दुपारच्या सत्रात गादी व माती विभागातील अ गटात ५७, ७४, ७९ किलो वजनी गटातील मल्लांचे वजन आणि वैद्यकीय तपासणी झाली. स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी पालकमंत्री गिरीष बापट, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकात, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर रविवार, दिनांक २४ डिसेंबर रोजी स्पर्धेच्या समारोपाला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आदी उपस्थित राहणार आहेत.

२१ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता स्पर्धेत सहभागी पैलवानांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक जिल्हा व शहर तालीम संघाचे कुस्तीपटू आपल्या जिल्हयाचे प्रतिनिधीत्व करतील. तसेच महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढणारे मल्ल एकाच जीपमधून मिरवणूकीत सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्र केसरीमध्ये प्रथमच महिला कुस्तीपटूंची लढत –
यंदा महाराष्ट्र केसरीमध्ये प्रथमच महिलांच्या कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी महिलांच्या प्रातिनिधीक कुस्तीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक २३ डिसेंबर २०१७ रोजी महाराष्ट्राची महिला कुस्तीपटू अंकीता गुंड आणि हरीयाणाची कुस्तीपटू ममता यांच्यात लढत रंगणार आहे.

– अशी आहे गदा –
गदेची उंची साधारण २७ ते ३० इंच असून, व्यास ९ ते १० इंच इतका असतो. तिचे वजन ८ ते १० किलो असते. गदा संपूर्ण लाकडी असून, त्यावर चांदीचे नक्षीकाम केले जाते. २८ गेज चांदीचा पत्रा यासाठी वापरला जातो. या गदेवर कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांचे छायाचित्र असते व कुस्तीचे दैवत असणाऱ्या हनुमानाचेही छायाचित्र असते. मागील ३४ वर्षांपासून पानगरी कुटुंबीय गदा बनविण्याचे काम करते.


...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!