पॉलिश करण्याच्या बहाण्याने महिलेचे दागिने लांबविले
वाकड
2017-12-22
व्हिएस न्यूज - दागिन्यांना पॉलिश करुन देतो असे सांगून हातचलाखीने एका महिलेचे दोन भामट्यांनी नऊ हजार रूपयांचे दागिने लांबविले. ही घटना गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास रहाटणी येथे घडली.
रिजवाना शेख (वय 45 रा, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दागिने पॉलिश करुन देतो असे म्हणून दोन भामट्यांनी हातचलाखीने नऊ हजार रुपये किंमतीचे दागिने लांबविले. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.