डी. एस. कुलकर्णींना न्यायालयाकडून एक महिन्याचा दिलासा
पुणे
2017-12-23
व्हिएस न्यूज – ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ठेवीदारांचे ५० कोटी रुपये भरण्यासाठी उच्च न्यायालयात दिलेली पहिली तारखी उलटून गेल्यानंतर अटकेची टांगती तलवार असणारे कुलकर्णी यांच्या माध्यमातून एक निवेदन प्रसिद्ध कऱण्यात आले आहे.
या निवेदनामध्ये आम्हाला १९ जानेवारीपर्यंत ५० कोटी भरण्याची मुदत सर्वोच्च न्यायालयाने वाढवून दिल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर सर्व रक्कम सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या मुदतीमध्ये जमा करण्यात येईल. कोणत्याही गुंतवणुकदारांचा एक रुपयाही आम्ही ठेवणार नसून कोणाचीही फसवणूक केली जाणार नाही असे आश्वासनही कुलकर्णी यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे कुलकर्णी यांनी सर्वोच्च न्यायालयाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. आमचे म्हणणे सर्वोच्च न्यायलयाने ऐकून घेत आमच्यावर विश्वास दाखवल्यामुळेच आता सर्व गोष्टी व्यवस्थित होतील आणि व्यवसाय नक्कीच पूर्वपदावर येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे