Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
स्वच्छता मोहिमेत इंदिरा ग्रुपचे योगदान मोलाचे – दिलीप गावडे

व्हीएस न्यूज - शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून देखील स्वच्छता मोहिमेत इंदिरा ग्रुपचे योगदान मोलाचे आहे. इंदिरा ग्रुपचा आदर्श घेउन इतर संस्थानी स्वच्छता मोहिमेत योगदान देवून शहराचा नावलौकिक वाढवावा, असे अवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेचे सह.आयुक्त दिलीप गावडे यांनी केले.

वाकड येथील इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने “इंदिरा स्वच्छता अभियान अंतर्गत इंदिरा कॉलेजच्या परिसरातील कचरा संकलनासाठी कायमस्वरुपी सुरू केलेल्या कचरा गाडीचे लोकार्पण केले. यावेळी ते बोलत होते. इंदिरा ग्रुपच्या तपस्या कॅम्पसमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छता अभियानाच्या राजदूत (ब्रँड अँबेसिडर) प्रसिद्ध नेमबाज अंजली भागवत यांच्या हस्ते कचरा गाडीचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या अध्यक्षा डॉ. तरिता शंकर आणि इंदिरा समूहाचे संचालक प्रा. चेतन वाकडकर तसेच इंदिरा ग्रुपचे विश्वस्त शार्दुल गांगल,मनुष्यबळ व प्रशासकीय संचालक संदीप गायकवाड,प्रकल्प संचालक आदेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

गावडे पुढे म्हणाले कि, परदेशात गेल्यावर आपण तेथील त्यांचे कडक नियमांचे पालन करतो. तेच नियम आपल्या देशात पाळल्यास आपला देश जगात चमकेल. इंदिरा ग्रुपच्या पुढाकाराने सुरू केलेल्या उपक्रमामुळे सामाजिक जागरूकता निर्माण होईल. परिसरात कचरा आणि घाण कुठे हि न फेकता तो कचरा कुंडी मध्येच टाकावा आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा जेणे करून रोगराई पसरण्याचा धोका टळेल व ती आपण पार पाडलीच पाहिजे अशी विचारधारणा असलेला इंदिरा ग्रुप कंबर कसून स्वच्छता अभियान राबवत आहे. शिवाय लोकांनी प्लास्टिक बॅग वापरणे टाळून जिथे तिथे कचरा करू नये.

इंदिरा ग्रुपच्या अध्यक्षा डॉ. तरिता शंकर यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगत म्हणाल्या कि, हि कचरा गाडी कचरा उचलण्यासाठी कायमस्वरूपी जनसेवेत उपलब्ध करून देत आहोत “स्वच्छ ठिकाणी देवाचा वास असतो” असे मानतो. केवळ इंदिरा कॉलेजचा परिसर नव्हे तर सभोवतालच्या २ किलोमीटर अंतरावरचा परिसर स्वच्छ राहावा या हेतूने ७ लाख रुपये खर्च करून गाडी खरेदी केली. हि गाडी दिवसभर कचरा उचलून विल्हेवाट लावेल. यासाठी ड्रायव्हर व हेल्पर, डिझेलचा येणारा महिन्याचा ४५ हजार रुपये खर्च इंदिरा ग्रुप करणार आहे.

...Read More

V. S. News
विकासाचे ‘राजकारण’ करु नका – महेश लांडगे

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले आहे. ही गावे कोणत्याही सुविधांपासून वंचित राहणार नाही. कोणत्याही प्रकारचे आरोप करताना पुरावासहित सादर करा, विकासाचे ‘राजकारण’ करु नका, असे मत आमदार महेश लांडगे यांनी मोशी येथे व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांवर २० वर्षांपासून अन्याय होत होता. तो अन्याय दूर करण्याचा ‘शब्द’ या परिसरातील नागरिकांना मी दिला होता. तो पाळला असून या भागात रस्त्यांची कामे सुरु होत आहेत. याचा मला मनस्वी आनंद आहे. आगामी काळात पालिकेतील या समाविष्ट गावांत रस्ते, मुबलक पाणी, उड्डाण पूल, क्रीडांगणे, उद्याने विकसित करण्यावर माझा भर असणार आहे. शहराच्या इतर परिसराचा ज्या पद्धतीने विकास झाला आहे. त्याच पद्धतीने समाविष्ट गावाचा विकास करुन गावाचा कायापालाट केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.

समाविष्ट गावातील पहिल्या टप्प्यातील ९० कोटींच्या रस्त्यांच्या कामाचे आज आमदार लांडगे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या कामांमध्ये मोशी येथील गट क्रमांक ५७ ते ६१ पर्यंतचा १८ मीटर डीपी रस्ता, शिवाजीवाडी ते मोशी, मोशी आळंदी रस्ता ते इंद्रायणी नदी (केळगावपुलापर्यंतचा) १८ डीपी रस्ता डुडुळगाव, च-होली पठारे मळा, डी वाय पाटील कॉलेज विकास आराखड्यातील ३० मीटर रुंदीच्या रस्त्याचे उर्वरित (पूर्व पठारे मळा, च-होली) च-होली मुख्य रस्ता, दाभाडे वस्ती ते इंद्रायणी नदीपर्यंतचा ४५ मीटर रुंद रस्ता, पुणे आळंदी रस्ता ते दाभाडे वस्ती येथील ३० ते ४५ मीटर डीपी रस्ता विकसित करणे आझादनगर च-होली या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते, सारंग कामतेकर, भीमा फुगे नगरसेविका सुवर्णा बुर्डे, ई क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि पदाधिकारी आदी उपस्थित होते. आमदार महेश लांडगे म्हणाले, ”महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांकडे आजवर सर्वांनी दुर्लक्ष केले. त्यांना विविध सोयी-सुविधांपासून वंचित ठेवले. त्यांच्याकडे केवळ मतपेढी म्हणून पाहिले गेले. मी आमदार झाल्यापासून गेल्या तीन वर्षांत समाविष्ट गावातील विकासासाठी सर्वाधिक निधी खर्च केला आहे. महापालिका निवडणुकीत समाविष्ट गावातील नागरिक भाजपच्या पाठीमागे उभे राहिले. त्यांना आम्ही गावांच्या विकासाचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आम्ही शब्द पाळला आहे. भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, मी, महापौर नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, पक्षनेते एकनाथ पवार आम्ही सर्वांनी समाविष्ट गावाचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे”. तसेच कचरा डेपो, शहराचा विकास आदींबाबत त्यांनी भाष्य केले.

”समाविष्ट गावात ४२५ कोटी रुपयांच्या खर्चाची कामे केली जाणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यातील ९० कोटींच्या कामांचे आज भूमिपूजन झाले आहे. गेल्या २० वर्षांत विकासापासून वंचित असलेल्या समाविष्ट गावांमधील अविकसित रस्ते आणि आरक्षणांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. भाजपने समाविष्ट गावातील नागरिकांना न्याय दिला आहे. समाविष्ट गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जाणार आहेत. गेल्या २० वर्षांत विकासापासून वंचित असलेल्या समाविष्ट गावांमधील अविकसित रस्ते आणि आरक्षणांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे”, असेही आमदार लांडगे म्हणाले.

आताच्या पाच वर्षाचा शहराचा विकास व मागील २० वर्षाचा शहराचा विकास कसा झाला हे नागरिकांनीच तपासून पहावे. कोणत्याही विषयात विकासाच राजकारण करु नका. समाजाचे प्रश्न कसे सोडवता येतील याकडे पहा. ”शहराचा इतर भागात चांगल्या पद्धतीने विकास झाला आहे. त्याच धर्तीवर समाविष्ट गावांत प्रशस्त रस्ते करण्यात येत आहेत. उद्याने, क्रीडांगणे, मुलबक पाण्याची सोय करण्यात येणार आहे. समाविष्ट गावातील चांगला विकास होऊन नागरिकरण वाढेल. मोठ-मोठे प्रकल्प येतील. त्याचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. भाजपचा अजेंडा विकास कामांचा आहे. त्यानुसार पक्षाने विकास कामे सुरु केली आहेत. सत्तेच्या माध्यमातून आम्ही जनसेवा करत आहोत”, असेही आमदार लांडगे म्हणाले. महापौर नितीन काळजे म्हणाले, ”पालिकेतील समाविष्ट गावात २० वर्षांपासून रस्ते झाले नव्हते. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत होते. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्याने आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून समाविष्ट गावाचा विकास होत आहे. रस्ते झाल्यावर शेतक-यांना मोठा फायदा होईल. हे रस्ते करत असताना गेल्या २० वर्षांत विकासापासून वंचित असलेल्या समाविष्ट गावांमधील अविकसित रस्ते आणि आरक्षणांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. याचे सर्व श्रेय भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांचे आहे”.

...Read More

V. S. News
पिंपरी चिंचवडमधील १ लाख ९७ हजार बालकांना पोलिओचे लसीकरण

व्हीएस न्यूज - राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत आज पिंपरी चिंचवड शहरातील १ लाख ९७ हजार ७७८ बालकांना पोलिओचे लसीकरण देण्यात आले असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकिय संचालक डॉ. पवन साळवे यांनी दिली.

या पोलिओ लसीकरण मोहिमेचे आज सकाळी भोसरी रूग्णालयात महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकिय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, रोटरी क्लबचे पदाधिकारी तसेच महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. महापालिकेच्यावतीने संपूर्ण शहरात ८५५ केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. ८ प्रभारी वैद्यकिय अधिकारी रूग्णालय व ५३ वैद्यकिय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली २७३४ लसीकरण कर्मचारी नेमण्यात आले होते.

...Read More

V. S. News
रिमांड ॲडव्होकेट म्हणून ॲड. अतिश लांडगे, ॲड. प्रसन्ना लोखंडे यांची नियुक्ती

व्हीएस न्यूज - पिंपरी न्यायालयात केस चालविण्यासाठी ‘रिमांड अॅडव्होकेट’ म्हणून अॅड.अतिश लांडगे व अॅड. प्रसन्ना लोखंडे यांची पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने नियुक्ती केली आहे. ज्यांना आपल्या न्यायालयीन प्रक्रियेसाठी वकील नेमणे परवडणारे नाही, अशा नागरिकांना न्यायालयात हक्काचा वकील मिळणार आहे.

अॅड.अतिश लांडगे हे मागील दहा वर्षांपासून पिंपरी न्यायालयात फौजदारी क्षेत्रात वकिली करत असून ते येरवडा कारागृह, बाल सुधारगृह, तसेच पोलीस कोठडी येथील बंद्यांना मागील पाच वर्षांपासून पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत कायदेविषयक सेवा देत आहेत. आतापर्यंत कारागृहातील ३०० ते ४०० कैद्यांना त्यांनी केसमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन केले आहे. अभिनेता संजय दत्त येरवडा कारागृहात असताना त्यानेही लांडगे यांच्या कामाची पत्राद्वारे प्रशंसा केली आहे.

हिंजवडी येथील ज्योतीकुमारी खून खटल्यात आरोपीस फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीच्या वतीने राष्ट्रपतींना शिक्षा माफीसाठी विधीसेवा प्राधिकरणाने त्यांची नियुक्ती केली होती. त्याचा निकाल प्रलंबित आहे. त्यांची आता पिंपरी न्यायालयात “रिमांड अॅडव्होकेट’ म्हणून नियुक्ती झाल्यामुळे पिंपरी न्यायालयात वकील नाही या कारणामुळे कोणीही न्याय हक्कापासून वंचित राहणार नाही. न्यायालयात अटक करून आणल्यानंतर आरोपीतर्फे रिमांडला हजर राहणे, त्यांचा जामीन अर्ज ठेवणे, त्यांच्या केसेस चालविणे गरीब पक्षकारांना यामुळे सोपे होणार आहे.

...Read More

V. S. News
पुण्यात आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरूणीची आत्महत्या

व्हीएस न्यूज - पुण्यातील मुंढवा परिसरात एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीने सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज (सोमवार) दुपारी घडली. अश्विनी गवारे (वय २२, रा. शिरूर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून ती एका आयटी कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होती. या घटनेचा अधिक तपास मुंढवा पोलिस करत असून कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढव्यातील ग्लोबल टॅलेंट ट्रॅक या आयटी कंपनीमध्ये आश्विनी गवारे ही तरूणी नोकरीस होती. मागील सात दिवसांपासून ती रजेवर होती. आजच सकाळी ती कामावर आली होती. त्यानंतर काही वेळाने अचानक ती इमारतीच्या सातव्या मजल्यावर गेली आणि तेथून उडी मारून आत्महत्या केली. तर या आत्महत्येमागे कौटुंबिक कारण असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

...Read More

V. S. News
चिंचवडला मंगळवारी महापौर चषक 'वेटलिफ्टिंग' स्पर्धा

व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे महापौर चषक माजी महापौर विलास लांडे जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडांगण येथे येत्या मंगळवारी व बुधवारी होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण चार लाख 22 हजार रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली.
या स्पर्धा दोन गटात होणार आहेत. पुरुष विभागात 50,56, 62, 69, 77, 85, 94, 105 आणि 107 किलोंवरील असे एकूण नऊ वजन गट आहेत. महिला विभागात 44,48,53,63, 69,75 आणि 75 किलोंवरील असे एकूण आठ गट आहेत. स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद व उपविजेतेपद आणि वैयक्तिक बक्षिसे आहेत.
स्पर्धेत राज्य व राष्ट्रीय पातळीवरील एकूण 107 खेळाडू सहभागी होणार आहेत. नागरिक व खेळाडूंनी या स्पर्धेस उपस्थिती लावून आंनद घ्यावा, असे आवाहन महापौर काळजे यांनी केले आहे.
...Read More

V. S. News
'ज्येष्ठ नागरिक वयाने मोठे असले तरी मनाने लहान मुलांसारखे'

व्हीएस न्यूज - "ज्येष्ठ नागरिक हे वयाने मोठे असले तरी मनाने लहान मुलांसारखे असतात" असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक प्रा.तुकाराम पाटील यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.
चिंचवडगाव येथे विरंगुळा केंद्रात चिंचवड ज्येष्ठ नागरिकांच्या 26 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी 'जिव्हाळा' या विशेषांकाचे प्रकाशन करताना प्रा. पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक सुरेश भोईर, चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कृष्णाजी जगताप, उपाध्यक्ष सूर्यकांत पारखी, कार्यवाह गोपाळ भसे, सहकार्यवाह चंद्रकांत कोष्टी, 'जिव्हाळा' विशेषांकाचे संपादक नंदकुमार मुरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. पाटील पुढे म्हणाले की, "वयोवृद्धा मनोयुवा' हे ब्रीद अंगीकारून चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सभासद क्रियाशील आहेत, ही अभिनंदनीय बाब आहे. व्यक्तिचित्रणे, कथा, संस्था परिचय, वैचारिक लेख, प्रवासवर्णने, आध्यात्मिक निरूपणे, कविता असा भरगच्च वाचनीय मजकूर यांनी नटलेला 'जिव्हाळा' हा विशेषांक मनोरंजनाबरोबरच अप्रतिम अनुभवांचा अनमोल खजिना असल्याचे पाटील म्हणाले. 'जिव्हाळा' विशेषांकाच्या निर्मितीस सहाय्य करणाऱ्या कुमार बोत्रे, वैशाली बोत्रे, प्रदीप गांधलीकर यांचा याप्रसंगी विशेष सन्मान करण्यात आला. तसेच ज्या सभासद दांपत्यांच्या वैवाहिक जीवनाला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांचा सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारार्थींच्या वतीने प्रातिनिधिक मनोगते व्यक्त करण्यात आली.
कृष्णाजी जगताप यांनी प्रास्ताविक केले. नारायण दिवेकर, जयमाला विभुते, रमेश डोंगरे, चंद्रकांत पारखी, सुदाम गुरव यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहकार्य केले. रमेश इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. उषा गर्भे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
...Read More

V. S. News
देहुगावात किरकोळ वादातून दोघांना टोळक्याची मारहाण

व्हीएस न्यूज - किरकोळ वादातून दोघांना सहा जणांनी जबर मारहाण केली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री दहा वाजता देहुगाव येथील महालक्ष्मी चौकातील संत तुकाराम इमारती जवळ घडली.

याप्रकरणी सचिन काळोखे, बबलू काळोखे, सख्या विजय काळोखे, प्रशांत साळुंखे, हर्षद काळोखे, अमित हगवणे (सर्व रा. काळोखे वाडा, देहुगाव) यांच्यावर देहुरोड पोलीस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दीपक रावसाहेब मोहिते (वय 27 रा. देहुगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक हा त्याच्या मित्रा सोबत कॅरम खेळत बसला होता. यावेळी झालेल्या किरकोळ वादातून सचिन हा त्याच्या मित्रांना तेथे घेऊन आला व त्याने शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने, सिमेंट ब्लॉक यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दिपकचा मित्र अजय गायकवाड हा भांडणे सोडविण्यास गेला असता त्यालाही टोळक्याने जबर मारहाण केली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवरही निगडी येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. देहुरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
एसटीची तोडफोड करून चालकाला मारहाण

व्हीएस न्यूज - टेम्पोचालकाने एसटी बस थांबवून एसटीची तोडफोड करून चालकाला मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास वाकडमधील शनि मंदिराजवळ घडली असून संबधित टेम्पोचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
एसटी चालक सचिन जाधव (वय-38, रा. दौड, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैजनाथ कदम (वय 27, रा. पडवळनगर, थेरगाव, पुणे) या टेम्पोचालकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव हे बोरविली ते सासवड एसटी बस घेऊन जात होते. दरम्यान, वाकड शनि मंदिराजवळ महामार्गावर कदम याने एसटीला टेम्पो आडवा लावला. एसटी थांबवून दगड मारून तोडफोड केल. तसेच, शिवीगाळ व हाताने मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणला. सहायक पोलीस निरीक्षक एम. पी. सोनवणे तपास करीत आहेत.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!