व्हीएस न्यूज - मोलकरणीने मालकीनीच्या दोन लाख रूपये किंमतीच्या मंगळसुत्रावर डल्ला मारला. ही घटना भोसरी येथे शनिवारी उघडकीस आली.
प्रिती रासकर (वय-32, रा. नारायण सोसायटी, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोलकरणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रासकर यांच्याकडे आरोपी महिला घरकामासाठी येते. तिने 21 ते 23 जानेवारी या कालावधीत आरोपी महिलेने घऱातील कपाटात ठेवलेले 1 लाख 80 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावले. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.