व्हीएस न्यूज - प्रजासत्ताक दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने लांडेवाडीतील डॉ. आंबेडकर नगर येथे पोलीस निरीक्षक विभांडीक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबीरात 400 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 110 नागरिकांना चष्माचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी रिपाईचे शहराध्यक्ष सुधाकर वारभुवन, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष खाजा शेख, जितेश पुलवळे, अमोल वारभुवन, केतन हाके, किरण जोदगंड, सुरेश दुनघव, सुमित जाधव, दिलीप थोरात, दिपक कसबे, महावीर क्षिरसाठ, जहीर खान आदी उपस्थित होते.