व्हीएस न्यूज - देशात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना शहरातील बॅक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने तरूणांची कर्जप्रकरणे मंजुर करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप दलित युवक आंदोलनच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच कर्जप्रकरणे तात्काळ मंजुर करण्याची कार्यवाही न केल्यास महाराष्ट्र बॅंकेच्या बाहेर हलगी बजाओ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंदोलनाचे अध्यक्ष श्रावण बगाडे यांनी दिला आहे. याबाबत बगाडे यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन दिले आहे.