व्हीएस न्यूज - इंडीयन बिझनेस क्लबच्या (IBC)च्या वतीने पिंपरी चिंचवड मधील एमएसएमई (सुक्ष्म लघु मध्यम उद्योजक) उद्योजकांना व कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी लॉन टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी (पुणे) येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत इंडीयन बिझनेस क्लबचे (आयबीसी) संस्थापक अध्यक्ष अनिल मित्तल यांनी माहिती दिली.
शनिवारी, रविवारी (दि. 10 ते 11 फेब्रुवारी) रोजी परंदवडी, उर्से (ता. मावळ) येथील वेदांन्त स्पोटर्स ॲकेडमीच्या क्रिडांगणावर या लॉन टेनिस क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. यामध्ये पिंपरी चिंचवड मधील एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. स्टिल केस, स्ट्राईकर्स, आयबीसी रॉयल, रवी ॲव्हेंजर्स, एडीयंट आर्या,जेसीबी लॉयन्स, जय भवानी वॉरीयर्स, रोहित रायझिंग स्टार्स, आणि वसंत जग्वार्स हे संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी सकाळी 8वाजता आणि स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ रविवारी सायंकाळी 5 वाजता होणार आहे.
विजेत्या संघांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रायोजक वसंत ग्रुप, सह प्रायोजक के. मिंन्ट, आयव्हरी स्पेसेस आहेत. आयोजक केलक्टिव्ह मार्केटिंग ॲण्ड सर्व्हिसेस आणि धनलक्ष्मी इंटरप्राईजेस हे आहेत.
व्हिएस न्युज - पिंपरीतील भाटनगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासुन स्थानिक राजकिय पुढार्यांच्या अनास्थेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. येथील घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र शिवव्यापारी सेनेच्या आंदोलनामुळे आज या घाणीच्या साम्राज्यावर यशस्वी ‘सर्जिकल स्टाईक’ झाला असल्याची माहिती शिवव्यापारीसेना शहरप्रमुख युवराज दाखले यांनी दिली.
याबाबत युवराज दाखले म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून भाटनगर परिसरात घाणीचे साम्राज्य होते. मात्र शिवसेना प्रणित शिवव्यापारीसेनेने या समस्येला वाचा फोडण्यासाठी मोरवाडी चौकातील आहिल्यादेवी पुतळा येथे निदर्शने केली होती. या आंदोलनानंतर महापालिका प्रशासनाला खडबडून जाग आली. सहाय्यक आयुक्त प्रमोद अष्टिकर यांनी तात्काळ दखल घेऊन आरोग्य निरिक्षकांना या ठिकाणी स्वच्छतेचे आदेश दिले. त्यानंतर आज भाटनगर येथील विद्युत पुरवठा खंडीत करून स्वच्छता मोहीम करण्यात आली. यावेळी दोन ट्रक कचरा उचलून नेण्यात आला. तसेच परिसरात औषध फवारणी देखील करण्यात आली.
या घाणीच्या साम्राज्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ शिवसेना प्रणित शिवव्यापारीसेना शहरप्रमुख युवराज दाखले व शिवव्यापारीसेना उपशहरप्रमुख गणेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेनेच्या महिला शहर संघटिका भाग्यश्री मस्के,शिवसेना महिला विभागप्रमुख सारीका तामचिकर, शिवसैनिक दिपक कांबळे, मारूती म्हस्के, दत्ता गिरी, नवनाथ गारगुटे यांच्यासह शिवसैनिक व परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते
व्हीएस न्यूज - सलाईनद्वारे विषारी इंजेक्शन घेऊन एका डॉक्टरने आत्महत्या केली. ही धक्कदायक घटना गुरूवारी दुपारी मोशी येथे उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. महेश महादेव मोहिते (वय-27, रा. सेक्टर नं.4 संतनगर, मोशी) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. मोहिते यांचे भोसरीत जयहिंद नावाचे रूग्णालय आहे. त्यांची पत्नीही डॉक्टर आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक केदारी यांनी माहिती दिली. डॉ. महेश यांनी बुधवारी रात्री घरात त्यांच्या बेडरूममध्ये सलाईनव्दारे विषारी इंजेक्शन घेतले. सकाळी 11 वाजल्यानंतर रूग्णालयात आले नव्हते. त्यामुळे त्यांच्या चुलत भावाने डॉ. महेश यांच्या मोबाईलवर गुरूवारी सकाळी फोन केला. त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांचा चुलत भाऊ घरी आला. त्यांनी डॉ. महेश यांच्या बेडरूरमचा दरवाजा वाजविला. आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, त्यावेळी डॉ. महेश यांच्या हाताला सलाईन लावले होते. बेशुद्ध अवस्थेतील महेश यांना खासगी संत ज्ञानेश्वर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. भोसरी, एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - येथील 11 ते 15 वयोगटातील अमृता विद्यालयातील नऊ शाळकरी मुलींनी या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी सह्याद्रीच्या पर्वत रांगात चढाईसाठी कोणताही मार्ग नसलेला कातळकडेचा खडतर तैलबेला किल्ला सर केला व तेथे भारताचा तिरंग फडकवला. त्यांच्या या अभिमानास्पद कामगिरीमुळे महापालिकेतर्फे महापौर नितीन काळजे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. स्थायी समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती सीमा सावळे, अतिरिक्त आयुक्त प्रविण अष्टीकर, कला क्रीडा साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, अपक्ष आघाडी गटनेता कैलास बारणे, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसदस्या आशा धायगुडे, माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे, कोमल मेवाणी, अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर, नगरसेवक लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, अमित गावडे, बाळासाहेब ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते. सन्मान करण्यात आलेल्यांमध्ये चेलूवी ढोकले, वैदही भोंगे, मानसी मगर, आकांक्षा पवार, श्रेया भदे, तानीक्षा पवार, वैष्णवी गवळी, मृणाल ठाकर, सई भालेघरे यांच्यासह मार्गदर्शक एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकले यांचा समावेश होता.
व्हीएस न्यूज - पिंपरीतील गरवारे नायलॉन कंपनी बंद होऊन 22 वर्ष झाली. परंतू, या कामगारांना अद्यापही सेवा उपदान, भविष्यनिर्वाह निधीची रक्कम मिळाली नसल्यामुळे उतारवयात कामगारांची मोठी परवड होऊ लागली आहे. कंपनी मालकाने याप्रश्नी योग्य तो न्याय देण्याची मागणी कामगारांच्या वतीने करण्यात आली आहे. गरवारे नायलॉनच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आपल्या न्याय हक्कासाठी गरवारे कामगार कृती समितीची स्थापना केली. या समितीच्या पदाधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची गुरूवारी निगडी येथे एक बैठक पार पडली. समितीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय खैरे, उपाध्यक्षपदी मोरया बहिरट, सत्येन राव, कार्याध्यक्ष मुरलीधर चिन्हे, सेक्रटरी रमेश बोंद्रे, सह सेक्रटरी शिवाजी साळुंखे, खजिनदार उदय भागवत यांची निवड करण्यात आली. याबाबत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गरवारे नायलॉन कंपनी बंद होऊन 22 वर्ष झाली. कामगारांना अद्यापही सेवा उपदान, भविष्यनिर्वाह निधीची रक्कम मिळाली नाही. ही रक्कम मिळविण्यासाठी कृती समितीने न्यायालयात धाव घेतली आहे. कायदेशीर सल्लागार म्हणून अभिजीत देसाई यांची निवड करण्यात आली आहे. कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याच्या मागणीसाठी समितीचे पदाधिकारी शहरातील खासदार, आमदार, महापौर, पालिका आयुक्त आदींची भेट घेणार आहेत. तसेच कंपनीच्या जागेवर कोणाताही प्लॉन मंजुर करू नये, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष दत्तात्रय खैरे यांनी निवेदनाव्दारे सांगितले आहे.
व्हीएस न्यूज - आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचा खेळाडू घडविण्यात शालेय जीवनातील प्राथमिक प्रशिक्षक महत्त्वाचा असतो. त्यांच्यामुळेच खेळाडू स्पर्धेचे विविध स्तर पार करीत राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवर चमकू शकतो, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांनी केले. पिंपरी-चिंचवड शहर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेच्या वतीने राष्ट्रीय खेळाडू, गुणवंत क्रीडा शिक्षक, पत्रकार व जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा निगडीतील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाच्या मनोहर वाढोकर सभागृह येथे नुकताच झाला. कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी अर्जुन पुरस्कार प्राप्त कबड्डीपटू शांताराम जाधव व शकुंतला खटावकर,ऑलिम्पिक मॅरेथॉन धावपटू बाळकृष्ण अकोटकर, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपतराव मोरे, क्रीडा भारतीचे राज्य कार्यवाह राज चौधरी, निगडी केंद्राचे उपप्रमुख मनोज देवळेकर, शरद इनामदार आदी उपस्थित होते. शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर यांना जीवनगौरव पुरस्कार, क्रीडा शिक्षक सचिन खांदवे, जगदीश सोनवणे, बन्सी आटवे, संपदा कुलकर्णी यांना गुणवंत क्रीडा शिक्षक आणि मिलिंद कांबळे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच जिल्हा क्रीडा परिषदेचे गुणंवत क्रीडा शिक्षक राजेंद्र महाजन, शबाना शेख, सुवर्णा घोलप यांचाही गौरव करण्यात आला. त्याचबरोबर विविध शाळा व महाविद्यालयांतील 90 राष्ट्रीय व राज्य खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. अंजली भागवत म्हणाल्या की, खेळात करिअर करताना आपले ध्येय निश्चित करा. राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय, ऑलिम्पिक, विश्व स्पर्धेत पदक जिंकण्याचे ध्येय समोर ठेवून शिस्त, सराव आणि जिद्दीने मार्गाक्रमण करा. मात्र, त्यासाठी शालेय वर्गाप्रमाणे पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग पार करीत म्हणजे जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तर टप्प्या-टप्प्याने स्पर्धा स्तर पार करून खेळाडूंनी पुढे गेले पाहिजे. त्यानुसार प्रशिक्षकांची भूमिकाही महत्त्वाची आहे. त्यांच्या शिवाय खेळाडूच कामगिरी करूच शकत नाही, असे त्या म्हणाल्या. मोरे, अकोटकर, आटवे यांनी मनोगत व्यक्त केले. कविता आल्हाट व अशोक जाधव यांनी सुत्रसंचालन केले. संघटनेचे अध्यक्ष चांगदेव पिंगळे यांनी प्रास्ताविक केले. सचिव अंगदराव गरड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भगवान सोनवणे, शेखर कुलकर्णी, चंद्रकांत पाटील, सोपान खोसे, अनिल नाईकरे, अशोक अवारी, संजय देवरे, सुरेश मुळूक, ज्ञानेश्वरी लोखंडे, सुजाता चव्हाण आदींनी विशेष परिश्रम घेतले.
व्हीएस न्यूज - पती समवेत फिरायला गेलेल्या ज्येष्ठ महिलेची दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी 75 हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन हिसकावली. ही घटना 23 जानेवारी रोजी वाकड येथे घडली. महिलेच्या 43 वर्षीय सुनेने बुधवारी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेचे सासू-सासरे 23 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता फिरण्यास बाहेर गेले होते. माऊंट बेस्ट बिबांत सोसायटीजवळ दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 75 हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसका मारून तोडून नेली. सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. आर. लोंढे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - दुचाकीचोर दोन सराईत गुन्हेगाराला गस्तीवरील पिंपरी पोलीस पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आले आहेत. एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दीड लाख रूपये किंमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत. सतीश दादाराव लोंढे (वय-22, रा. अण्णासाहेब मगर स्टेडियम जवळ, यशवंतनगर, पिंपरी), संतोष बबन लोंढे (वय-29, रा. दत्त मंदिराजवळ गुलाब पुष्प उद्यानासमोर गवळीमाथा, भोसरी) या दोघांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पिंपरी पोलीस ठाण्याचे फौजदार विठ्ठल बढे, बाळासाहेब अंतरकर यांच्यासह आदी पोलीस पथक डी. वाय पाटील महाविद्यालय परिसरात गस्त घालत होते. वेगाने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना थांबण्याची सुचना केली. दुचाकीस्वार तरूण थांबले नाहीत. पोलीसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता उडवा-उडवीचे उत्तरे देऊ लागले. पोलीसी खाक्या दाखवताच आरोपीनी दुचाकी चोरीची असल्याचे कबूल केले. यासह आणखी दोन दुचाकी चोरल्याचे त्यांनी तपासात सांगितले. तर मंगळवारी एका अल्पवयीन दुचाकीचोराला ताब्यात घेवून त्यांच्याकडून एक दुचाकी जप्त केली. तिघांकडून एक लाख 40 हजार रूपये किंमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - ओढ्याच्या कडेला असलेल्या शिवरीच्या झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने एका वाहन चालकाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सकाळी पुनावळे येथे उघडकीस आली. महादेव दत्तात्रय बारसकर (वय-45, रा. पुनावळे) असे आत्महत्या केलेल्या वाहन चालकाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारसकर यांनी गुरूवारी सकाळी पुनावळे येथील ओढ्याच्या कडेला आले. त्यांनी शिवरीच्या झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्या मुलगा किरणने हा प्रकार पहिल्यानंतर त्यांना त्वरीत खाली उतरवत वायसीएम रग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यांच्य़ा आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. वाकड पोलीस तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - अमृत योजने अंतर्गत चिखली, पिंपळे निलख व बोपखेल येथे मैलाशुद्धीकरण प्रकल्प बांधण्यात येणार आहेत. शहरातील जुन्या २०९ किलोमिटर ड्रेनेज लाईन बदलण्यात येणार आहेत. त्यासाठी येणा-या सुमारे १५६ कोटी रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यात देण्यात आली. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील २०१८-२०१९ या वर्षासाठी करांचे व करेत्तर शुल्क निश्चित करण्यास अंतिम मान्यतेसाठी महापालिका सभेकडे पाठविण्याची शिफारस स्थायी समिती सभेत करण्यात आली. यासह शहरातील विविध विकास विषयक कामे कारण्यासाठी येणा-या सुमारे २५७ कोटी ५३ लाख ९३ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यात देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. शहरामध्ये ज्या मिळकतींना पाणी कनेक्शन नाही परंतु त्यांना स्वत्रंत कनेक्शन घेण्याच्या दृष्टीने महानगरपालिके मार्फत पाणीपुरवठा लाईन टाकणेत आलेली असते. निर्धारित तरतूदीनुसार त्याकरिता पाणी कनेक्शन नसणा-या मिळकतींना मिळकत करामध्ये पाणीपट्टी कर आकारणी करता येईल. त्या अनुषंगाने सन २०१८-२०१९ पासून पाणी कनेक्शन नसणा-या मिळकतींना मिळकत कराचे बिलात त्यांचे कर योग्य मूल्याचे ५% दराने पाणीपट्टी कर लागू करणेबाबत प्रस्तावित केले आहे. सन २०१८-१९ या वर्षाकरिता महानगरपालिका करांचे दर आणि करेत्तर बाबीची फी/शुल्क निश्चित करण्याचा व खाजगी मराठी माध्यामांच्या शाळा इमारतींना मालमत्ता कर हा बीगरनिवासी दराचे ऐवजी निवासी दराने आकारणी करणेस तसेच करयोग्यमूल्य निश्चित करणेकामी जे अ,ब,क,ड विभाग करणेत आलेले आहेत त्याची पुनर्रचना करण्यास मान्यता देणेकामी महापालिका सभेकडे पाठविण्याची शिफारस यावेळी बैठकीत करण्यात आली.
रहाटणी येथे कोकणे चौक ते काळेवाडी फाटा चौकापर्यंत उच्चक्षमता दृतगती मार्ग HCMTR विकसीत करण्यासाठी येणा-या सुमारे २८ कोटी ४५ लाख ५१ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. २४ मध्ये नव्याने ताब्यात येणा-या आरक्षित जागेस सिमाभिंत बांधणे व उद्यान विकसित करण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी ५२ लाख ७० हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. पुनावळे प्रभाग क्रमांक ५२ आ.क्र.४-७१ येथे उद्यान विकसित करण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी ५४ लाख ०४ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. च-होली येथील मैलाशुध्दीकरण केंद्राची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी येणा-या सुमारे २ कोटी ०७ लाख ०४ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. ७ च-होली येथील आ.क्र.२-६४ येथील उद्यानाची उर्वरित कामे करण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी ०८ लाख २२ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. मनपाचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी यांना इन्स्ट्रुमेंट मॅकेनिकल या व्यवसायाकरीता ट्रेनिंग वर्क बेंचेस खरेदी करण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी ०५ लाख ०४ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
थेरगाव सर्व्हे.न.०९ येथे बहुउद्देशीय इमारत बांधण्यासाठी येणा-या सुमारे ११ कोटी ८० लाख ८७ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. जुन्या तालेरा हॉस्पिटलची इमारत पाडुन नविन इमारत बांधण्यासाठी येणा-या सुमारे ३९ कोटी १३ लाख ७० हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१८ मध्ये चापेकर चौक ते केशवनगर काळेवाडी रस्त्यांच्या क्रॉक्रीटीकरणाचा दुसरा टप्पा विकसीत करण्यासाठी येणा-या सुमारे ११ कोटी ०७ लाख १६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. ०५ जाधववाडी कुदळवाडी मधील ताब्यात आलेल्या आरक्षणांच्या जागा विकसीत करण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी ४७ लाख ५२ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.५३ वाकड मध्ये नव्याने ताब्यात येणा-या जागेनुसार विकास आराखड्यातील रस्ते विकसीत करण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी २६ लाख ०६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
व्हीएस न्यूज - पिंपळे निलख येथील चौंधे पाटील स्पोर्टसच्या वतीने तिस-या वार्षिक इंटर सोसायटी स्पोर्टस मिटचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन रविवारी (दि. 11 फेब्रुवारी) सकाळी 10 वाजता महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, आमदार महेश लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेविका आरती चौंधे, ममता गायकवाड, नगरसेवक संदिप कस्पटे, तुषार कामठे, पीसीएमटीचे माजी चेअरमन सुरेश चौंधे आदी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती संचालक संकेत चौंधे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
या इंटर सोसायटी स्पोर्टस मिट अंतर्गत क्रिकेट, फुटबॉल, स्केटिंग, बास्केटबॉल, बॅडमिंटन आणि लॉन टेनिसच्या स्पर्धा होणार आहेत. वयोगट मुले व मुली 10,13 व 16 वर्षांखालील सोसायटी संघाने सहभाग घ्यावा. तसेच पुढच्या रविवारी (दि. 25 फेब्रुवारी) राजी सकाळी 6वाजता सर्व वयोगटातील इच्छुकांसाठी 2,4 व 6 किलोमीटर खुल्या मॅरेथोन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ रविवारी 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 वाजता पिंपळे निलख येथील चौंधे पाटील स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये होणार आहे. या स्पर्धांमध्ये भाग घेऊ इच्छिना-या स्पर्धकांनी 9158961010 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
व्हीएस न्यूज - अतिशय कार्यक्षमतेने पुण्यातील सार्वजनिक बस वाहतूक सुधारण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे (पीएमपीएमएल) अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली असून मुंढे यांच्या बदलीने पुणेकरांना धक्का बसला आहे. नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याचबरोबर पुणे महापालिकेच्या उपायुक्त प्रेरणा देशभ्रतार यांचीही बदली करण्यात आली आहे. मागील काही काळापासून हे दोन्ही अधिकारी सत्ताधारी भाजप नेत्यांची डोकेदुखी ठरताना दिसत असल्यामुळेच त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. भाजप नेत्यामुळे मुंढे यांची बदली झाली असल्याचा आरोप सेनेच्या गटनेत्यांनी केला आहे.
मुंढे यांनी पीएमपीएमएल कारभाराला शिस्त लावण्यासाठी सतत प्रयत्न केले. त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना घरी पाठवले होते. त्यामुळे कामगार संघटनाही त्यांच्यावर नाराज होत्या. पिंपरीत किंवा पुण्यात डॉ. श्रीकर परदेशी, तुकाराम मुंढे यांच्यासारखे कार्यक्षम अधिकारी हे आपला कार्यकाल पूर्ण करू शकत नाहीत, हे पुन्हा सिद्ध झाले. मुंढे यांनी गेल्या वर्षी २९ मार्चला पीएमपीएमएलचा कारभार हाती घेतला होता.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002