Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
घरफोडी करणाऱ्या त्रिकुटाच्या निगडी पोलीसांनी आवळल्या मुसक्या

व्हीएस न्यूज - संशयावरून ताब्यात घेतलेल्या तिघांनी चार ठिकाणी घरफोडी केल्याचे पोलीस तपासात कबूल केले. त्यांच्याकडून तीन लाखांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई निगडी पोलीसांनी बुधवारी केली.
सचिन गोरखनाथ काळे (वय-40, रा. जुना ओटास्कीम, निगडी), संतोष लालाजी पवार (वय-30, रा. आझाद चौक, झोपडपट्टी, निगडी), हमीद अंतुम शिंदे (वय-25, रा. गांधीनगर झोपडपट्टी, देहूरोड) असे अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्त घालणाऱ्या पोलीसांना कृष्णानगरमधील एका मेघमल्हार हौसिंग सोसायटीच्या पार्किंगमध्ये तिघे संशयतरित्या पाहिल्याचे त्यांनी पाहिले. यावरून तिघांना ताब्यात घेवून त्यांची झाडाझडती घेतली. त्यांच्याकडील दोन कापडी पिशव्या सापडल्या. त्यांनी मेघमल्हार हौसिंग सोसायटीमध्येच घरफोडीसह इतर गुन्हे केल्याचे कबूल केले. आरोपीकडून 2 लाख 97 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने, 4 हजार 770 रूपयांचे मसाले, रोख रक्कम असा तीन लाख 1 हजार 770 रूपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, पोलीस निरीक्षख गुन्हे निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक देेवेंद्र चव्हाण, तात्या तापकीर, मंगेश गायकवाड आदींनी केली.
...Read More

V. S. News
अज्ञात वाहनाच्या धडकेत सीओडी कामगाराचा मृत्यू

व्हीएस न्यूज - कामावरून घरी जाणाऱ्या दुचाकीस्वार सीओडी कामगाराला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी चारच्या सुमारास मोरवाडी येथे ग्रेडसेपरेटरमध्ये घडली. सुनिल नारायण जाधव (वय-47, रा. गुलमोहर अपार्टमेंट, बालाजीनगर, वारजे, माळवाडी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. जाधव हे देहूरोड सेंट्रल ऑर्डनस डेपोमध्ये कामाला होते.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव बुधवारी दुपारी चारच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होते. मोरवाडीतील ग्रेडसेपटरमध्ये त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये त्यांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे त्यांनी हेल्मेट घातले होते. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई असा परिवार आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
नैराश्यातून इसमाची गळफास घेवून आत्महत्या

व्हीएस न्यूज - आजाराने ग्रस्त व बेरोजगार असल्याने यातून आलेल्या नैराश्यातून एकाने राहत्या घऱी पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना खराळवाडीत बुधवारी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली.
नारायण रामचंद्र ढमाले (वय-48, रा. ए. जे. चेंबर्स, खराळवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण ढमाले गेल्या तीन वर्षांपासून बेरोजगार होते. त्यातच त्यांना आजाराने ग्रासल्याने याच नैराश्यातून बुधवारी घरात कोणी नसताना नॉयलॉनच्या दोरीने पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
फॅक्टरी अधिकाऱ्याच्या बंगल्यात सहा लाखाची चोरी

व्हीएस न्यूज - अँम्युनिशन फॅंक्टरीतील अधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या कंपाऊंटवरून उडी मारून चोरट्यांनी बंगल्याचे कुलूप तोडून बेडरूममधील लाकडी कपाटातील रोख 25 हजार, सोन्याचे दागिने असा 6 लाखांचा ऐवज दिवसाढवळ्या चोरून नेला. ही घटना खडकीतील अर्जुन मार्ग येथे सकाळी सात ते रात्री आठ या कालावधीत घडली.
विश्वजीत मित्रा (वय-39, रा. खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मित्रा हे अँम्युनिशन फॅंक्टरी येथे अधिकारी म्हणुन सेवेत आहेत. अर्जुन मार्ग येथिल बंगल्यात ते कुटुंबिया समवेत वास्ताव्यास आहे. गावावरुण त्यांचे काही नातेवाईक दोन दिवसापुर्वी आले होते. मित्रा या नातेवाईकांना कुटुंबियासमवेत मंगळवारी सकाळी शिर्डीला देवदर्शना साठी घेऊन गेले होते. रात्री ते परत आले. बंगल्यातील बेडरुमचे कपाटेचे टाळे तुटलेले व सामान अस्तव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी बंगल्याची पाहणी केली असता असे दिसुन आले की बंगल्याच्या कंपाउडवरुण उडी मारुन चोरट्यांनी घराचे मागील दाराचे कुलूप तोडले. आतील कडी कोयंडा तोडुन बेडरुममध्ये प्रवेश केला व बेडरुम मधील दोन लाकडी कपाटाचे ताळे तोडुन त्यातील 26 तोळ्याचे सोन्याचे दागिने व रोख 25 हजार रुपये असा 6 लाख 1 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
पोलिसांनी येथिल सर्व्हंट क्वार्टर मधील तीन महिला व दोन पुरुष असे पाच कामगारांना संशयित म्हणुन चौकशी करिता ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्हीतील फुटेज ही पोलिसांना मिळाले असुन पोलिस त्या आधारे आपला पुढिल तपास करीत आहेत.
फौजदार एस. बी. भोसले अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
न्यू पुणे स्कूलच्या चित्रकला स्पर्धेत वाइंगडे, छामेडिया प्रथम

व्हीएस न्यूज - येथील न्यू पुणे पब्लिक स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेत लहान गटात आघना वाइंगडे मोठ्या गटात रितिष्मा छामेडिया यांनी प्रथम क्रमांक पटाकवला. यावेळी बक्षीस वितरणास रिलायन्स एज्युकेशनचे प्रमुख विष्णू साळुंखे, चित्रकार सुनील होले, प्रदीप खंदारे, अमृता खंदारे, प्राचार्य लतीफ मणेर आदी उपस्थित होते.
यावेळी आठशे विद्यार्थी सहभागी झाले होते. होले यांनी विद्यार्थ्यांसमोर आपली कला सादर केली. 3 ते या 6 वयोगटात प्रथम अघना वाइंगडे, द्वितीय रिया माहेश्वरी व तृतीय क्रमांक नैनिका करोला या विजेत्यांना अनुक्रमे इलेक्ट्रिकल मोटरसायकल, स्कूटर सायकल, टिफीन बॉक्स, कलर व पेंसिल बॉक्स बक्षिसे देण्यात आले. तर 7-10 वयोगटातील प्रथम रितिष्मा छामेडिया, द्वितीय स्नेहा जैन, तृतीय सम्राट पाटील यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे मिनी टॅब,सायकल, स्कूल बॅग, टिफीन बॉक्स बक्षिसे देण्यात आले. सहभागाबद्दल प्रमाणपत्र सर्वांना देण्यात आले.
...Read More

V. S. News
वनस्पतीशास्त्राची राज्यस्तरीय परिषद अभयारण्यात

व्हीएस न्यूज - सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ व डॉ.डी.वाय.पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीच्या डॉ.डी.वाय.पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविदयालय आकुर्डी यांच्या संयुक्त विदयामाने घाटघर कळसुबाई हरिषचंद्रगड अभयारण्यात वनस्पती शास्त्राच्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
दुर्मिळ औषधी वनस्पती अभ्यास करणे, त्यांचा अभ्यास करून तेथील आदिवासी बांधवांना त्याची जपवणुक कशी करावी याची माहिती देणे तसेच निसर्ग आणि जैवविविधता यांचा अभ्यास करणे हा हेतु होता. या राज्यस्तरीय परिषदेचे उद्‌घाटन प्रवरा इंन्स्ट्यूटचे कुलगुरू डॉ. वाय.एम.जयराज, स्वामी रांमानंदतीर्थ मराठवाडा विदयापीठाचे कुलगुरू डॉ. पंडीत विदयासागर उपस्थित होते. या परिषदेला महाराष्ट्र राज्यातील विविध विद्यापीठातील वनस्पतीषास्त्रातील तज्ञ व्यक्तींनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये प्रामुख्याने डॉ. सचिन पुणेकर, डॉ. मिलींद सरदेसाई, डॉ.डी.आर शिर्के, डॉ.महेश शिंदीकर यासारख्या वनस्पतीषास्त्रात अभ्यासक असणाऱ्या व्यक्ती होत्या.
या परिषदेमध्ये सहभागी व्यक्तींना नाईट टक करणे, निसर्गाची पाहणी करणे, आपला इतिहास अभ्यासणे या गोष्टींचा अनुभव घेता आला. या परिषदेच्या आयोजनामध्ये महाविदयालयातील वनस्पतीशास्त्राच्या प्रमुख प्रा. अर्चना सुतार, ए. आर.सी.अंजली अकीवाटे, प्रा.हेमल ढगे,प्रा.मुकेष तिवारी यांचा समावेष होता. प्रास्ताविक प्रा. अंजली अकीवाटे यांनी केले. आभार प्रा.अर्चना सुतार यांनी मानले.
...Read More

V. S. News
शहरातील पाणीपुरवठा आज बंद

व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेक्टर क्रमांक येथील जलशुध्दीकरण केंद्रातील पाणी पुरवठा विभागाची नियमित दुरुस्तीसाठी आज (गुरुवार) शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
विद्युत विभागातील रावेत पंपीग स्टेशनमधील तातडीची आवश्यक कामांसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
...Read More

V. S. News
अट्टल दुचाकीचोर गजाआड; सहा दुचाकी जप्त

व्हीएस न्यूज - खडकीसह पुणे शहरात मागील दोन वर्षापासुन दुचाकी चोरुन पसार झालेल्या अट्टल चोरास खडकी पोलिसांनी मंगळवारी गजाआड केले. या चोरट्याकडुन पोलिसांनी 1 लाख 25 हजार रुपये किंमतीच्या सहा दुचाकी जप्त केल्या.
मयुर बबन धांडोरे (वय- 25, रा. पवळे चाळ बोपोडी) असे आहे. चालु वर्षी खडकी पोलिस ठाणे हद्दीत चार दुचाकी तर 2016 व 2017 यावर्षी फरासखाना आणि विश्रामबाग पोलिस ठाणे हद्दीत प्रत्येकी एक दुचाकी असे धांडोरे याने एकुन सहा दुचाकी चोरुन पसार झाला होता. या पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकीचोराच्या नावे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याचा शोध घेत होते. तपास पथकाचे पोलिस उपनिरिक्षक निलेशकुमार महाडीक तपास करताना खडकीतील घटणेच्या परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज पाहुन आरोपी धांडोरे यांस ताब्यात घेतले. धांडोरे याने सर्व गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यास मंगळवारी अटक केली. परिमंडल तिनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक लक्ष्मण बोराटे पोलिस निरिक्षक अजित लकडे यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस उप निरिक्षक निलेशकुमार महाडीक, पोलिस कर्मचारी बाबा शिर्के, प्रदिप गाडे, किरण घुटे, गणेश लोखंडे व सोपान ठोकळ आदींनी ही यशस्वी कामगिरी केली.
...Read More

V. S. News
वाहनतळातील तीन दुचाकी, एक सायकल झाळली, 88 हजारांचे नुकसान

व्हीएस न्यूज - वाहनतळात पार्क केलेल्या तीन दुचाकी व एक सायकलला अज्ञाताने आग लावली. यामध्ये 88 हजारांचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री चिंचवड येथील अजंठानगरातील टीसीआय कंपनीसमोरील वाहनतळ येथे घडली.
सुमन गायकवाड (40, रा. चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड, लता मोहन खरचणे यांची ड्रिम युगा, एक ऍटलस कंपनीची रेंजर सायकल तर भाऊसाहेब सुर्यभान ठोसर यांची हिरो होंडाची दुचाकी अशा तीन दुचाकीला व एका सायकल टीसीआय कंपनीसमोरील वाहनतळात लावली होती. अज्ञात आरोपीने आग लावून 88 हजार रूपयांचे नुकसान केले. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार एस. एस. सुर्यवंशी अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
खडकीत सहा लाखांची दिवसाढवळ्या घरफोडी

व्हीएस न्यूज - बंगल्याच्या कंपाऊंटवरून उडी मारून चोरट्यांनी बंगल्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील लाकडी कपाटातील रोख 25 हजार, सोन्याचे दागिने असा 6 लाखांचा ऐवज दिवसाढवळ्या चोरून नेला. ही घटना खडकीतील अर्जुन मार्ग येथे सकाळी सात ते रात्री आठ या कालावधीत घडली.
विश्वजीत मित्रा (वय-39, रा. खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मित्रा यांचा खडकीतील अर्जुन मार्ग येथे बंगला आहे. मंगळवारी सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. याकालावधीत चोरट्याने बंगल्याच्या कंपाऊंटवरून उडी मारली. घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातील रोख 25 हजार, सोन्याचे दागिने असा 6 लाख 1 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. फौजदार एस. बी. भोसले अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
रस्त्यावर डिझेल सांडल्याने दुचाकी घसरून नागरिक जखमी

व्हीएस न्यूज - येथील शहीद भगतसिंग चौक ते राजमाता गार्डन दरम्यान रस्त्यावर डिझेल सांडल्यामुळे तब्बल 30 ते 40 दुचाकी घसरून पडल्याने अनेकजण जखमी झाले. हा प्रकार सकाळी अकराच्या सुमारास घडला. सकाळची वेळ असल्याने अनेकजण कामावर, तसेच लहान मुलांची शाळा सुटल्याने अनेकजण मुलांना शाळेतून घरी घेऊन जात होते. नेमके या वेळेत रस्त्यावर अज्ञात वाहनातून डिझेल गळती होऊन रस्ता निसरडा झाल्याने अनेक दुचाकी स्लिप होऊन पडत होत्या. दरम्यान, रस्त्यावर डिझेल सांडून अपघात होत असल्याचे समजताच सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर यांनी अग्निशमन दलाला याबाबतची माहिती दिली. तोपर्यंत राहुल जवळकर यांनी दीपक काशिद, आशिष जाधव, राजू काशिद, संतोष काशिद, नवनाथ भिडे व भैरवनाथ मित्र मंडळ, गणेश तरुण मंडळ या कार्यकर्त्यांच्या साहायाने घटनास्थळी माती टाकून रस्ता कोरडा केला. अल्पावधीतच अग्निशमन दलाचे जवान हजर झाले आणि डिझेलयुक्त रस्ता पाण्याने धुवून काढला.
...Read More

V. S. News
इंद्रायणी नेत्र रूग्णालय व फेको सेंटरचे उद्‌घाटन

व्हीएस न्यूज - - नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. पण जनमानसात याविषयी जनजागृती नसल्याने सहसा कुणी नेत्रदान करण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे नेत्रदानाचे महत्व पटवून देण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. नेत्र रूग्णालयाच्या माध्यमातून गोर-गरीब रूग्णांना माफक दरात सेवा उपलब्ध करून दिल्याने ही एक सामाजिक सेवा आहे, असे मत भारत सरकारच्या कस्टम्सचे उपायुक्त भारत नवले यांनी व्यक्त केले. तसेच दृष्टीहीनांसाठी प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.

इंद्रायणी नदीच्या काठी देहूगाव येथे ‘नेत्र सेवेसाठी समर्पित’ या उद्देशाने सुरू केलेल्या इंद्रायणी नेत्र रूग्णालय व फेको सेंटरचे भारत नवले यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी देहूनरीच्या सरपंच उषा चव्हाण, हवेली पंचायत समितीच्या सदस्या हेमलता काळोखे, उपसरपंच संतोष हगवणे, संत तुकाराम महाराज देहूगाव संस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे-इनामदार, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या रत्नमाला करंडे, औंध जिल्हा रूग्णालयाचे डॉ. बाळासाहेब शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळोखे, सुनिल घोडेकर, माजी सरपंच मधुकर यादव, ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ अँड. सुग्रीव नेरे, सरकारी वकील अँड. प्रतिभा नेरे-तांबारे, डॉ. किशोर यादव, डॉ. संतोष सोमटकर, डॉ. परमेश्वर तिडके, डॉ. रोहन चव्हाण, ऍड. निर्मला यादव, डॉ. विद्या यादव, गंगा यादव, जेजेराम यादव, प्राचार्य सदाशिव कांबळे, पंचक्रोशी हायस्कूलचे मुख्याध्यापक नारायण पवार, कर्तव्य फांऊडेशनचे अमित शिवले यांच्यासह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

”देशात लाखो लोक अंध आहेत. त्यांना जगण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आपल्या मृत्यूनंतर शरीराचा काहीही फायदा होत नाही. त्यामुळे अंध व्यक्तींना सुंदर सृष्टी पाहण्यासाठी प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प करावा. नेत्रदानामुळे अंध व्यक्तींना नवसंजीवनी मिळणार असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदान करावे”, असे आवाहनही भारत सरकारच्या कस्टम्सचे उपायुक्त भारत नवले यांनी केले. ”अंध व्यक्तींना नवीन नेत्र बसवून त्यांना नवसंजीवनी देण्याचे तंत्रज्ञान प्रगत आहे. मात्र, नेत्रदात्यांची संख्या अत्यंत कमी असल्याने आपण गरजूंना नवीन नेत्र बसवू शकत नाही. जर आपण मरणोत्तर नेत्रदान केले तर निश्चित गरजूंना त्याचा उपयोग होईल आणि त्यांना नवसंजीवनी देता येईल”, असेही नवले यावेळी म्हणाले. याप्रसंगी देहूच्या सरपंच उषा चव्हाण, हवेली पंचायत समितीच्या सदस्या हेमलता काळोखे, उपसरपंच संतोष हगवणे, रत्नमाला करंडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेजेराम यादव यांनी केले. तर, अँड. निर्मला यादव यांनी आभार मानले.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!