व्हीएस न्यूज - दुचाकीचोर दोन सराईत गुन्हेगाराला गस्तीवरील पिंपरी पोलीस पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आले आहेत. एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दीड लाख रूपये किंमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत.
सतीश दादाराव लोंढे (वय-22, रा. अण्णासाहेब मगर स्टेडियम जवळ, यशवंतनगर, पिंपरी), संतोष बबन लोंढे (वय-29, रा. दत्त मंदिराजवळ गुलाब पुष्प उद्यानासमोर गवळीमाथा, भोसरी) या दोघांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पिंपरी पोलीस ठाण्याचे फौजदार विठ्ठल बढे, बाळासाहेब अंतरकर यांच्यासह आदी पोलीस पथक डी. वाय पाटील महाविद्यालय परिसरात गस्त घालत होते. वेगाने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना थांबण्याची सुचना केली. दुचाकीस्वार तरूण थांबले नाहीत. पोलीसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता उडवा-उडवीचे उत्तरे देऊ लागले. पोलीसी खाक्या दाखवताच आरोपीनी दुचाकी चोरीची असल्याचे कबूल केले. यासह आणखी दोन दुचाकी चोरल्याचे त्यांनी तपासात सांगितले. तर मंगळवारी एका अल्पवयीन दुचाकीचोराला ताब्यात घेवून त्यांच्याकडून एक दुचाकी जप्त केली. तिघांकडून एक लाख 40 हजार रूपये किंमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002