व्हीएस न्यूज - अतिशय कार्यक्षमतेने पुण्यातील सार्वजनिक बस वाहतूक सुधारण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे (पीएमपीएमएल) अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली असून मुंढे यांच्या बदलीने पुणेकरांना धक्का बसला आहे. नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याचबरोबर पुणे महापालिकेच्या उपायुक्त प्रेरणा देशभ्रतार यांचीही बदली करण्यात आली आहे. मागील काही काळापासून हे दोन्ही अधिकारी सत्ताधारी भाजप नेत्यांची डोकेदुखी ठरताना दिसत असल्यामुळेच त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. भाजप नेत्यामुळे मुंढे यांची बदली झाली असल्याचा आरोप सेनेच्या गटनेत्यांनी केला आहे.
मुंढे यांनी पीएमपीएमएल कारभाराला शिस्त लावण्यासाठी सतत प्रयत्न केले. त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना घरी पाठवले होते. त्यामुळे कामगार संघटनाही त्यांच्यावर नाराज होत्या. पिंपरीत किंवा पुण्यात डॉ. श्रीकर परदेशी, तुकाराम मुंढे यांच्यासारखे कार्यक्षम अधिकारी हे आपला कार्यकाल पूर्ण करू शकत नाहीत, हे पुन्हा सिद्ध झाले. मुंढे यांनी गेल्या वर्षी २९ मार्चला पीएमपीएमएलचा कारभार हाती घेतला होता.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002