Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये वॉटर एटीएम मशीन बसविण्याची तयारी

व्हीएस न्यूज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये वॉटर एटीएम मशीन बसविण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. हे मशीन बसविण्याचा सर्व खर्च करण्याची समितीने तयारी दर्शविली आहे.

यासंदर्भात जलकल्याण समितीने आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जलकल्याण समितीमार्फत समाजातील विविध क्षेत्रात लोकोपयोगी सेवाकार्य केले जातात. त्यानुसार चिंचवड, संभाजीनगर येथील धनश्री रुग्णालय परिसरात समितीमार्फत २० जानेवारी २०१८ रोजी वॉटर एटीएम मशीन बसविण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्याची सोय होत असून, त्याला नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालयांत गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. यातील अनेक रुग्णांकडे अगदी माफक दर असलेले केसपेपर काढण्यासाठी तसेच औषधोपचारासाठी देखील पैसे नसतात. असे रुग्ण पिण्यासाठी २० रुपये किंमतीची पाण्याची बाटली घेऊ शकत नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना एक ते दोन रुपयांत पिण्याचे शुद्ध पाणी मिळाल्यास त्यांचे आरोग्य चांगले होण्यास मदत होईल. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने सर्व रुग्णालयांमध्ये वॉटर एटीएम मशीन बसविण्याची जलकल्याण समितीला परवानगी द्यावी. हे मशीन बसविण्याचा सर्व खर्च समितीमार्फत केले जाईल. तसेच मशीनच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारीही समिती घेईल.आयुक्तांना निवेदन देताना जलकल्याण समितीचे प्रकल्प प्रमुख नंदकिशोर डंबे, सहप्रकल्प प्रमुख संतोष निंबाळकर, अध्यक्ष डॉ. राजीव पटवर्धन, उपाध्यक्ष समीर पाटील, डॉ. गीता आफळे, कार्यवाह योगेश थेटे, आरोग्य प्रकल्प प्रमुख डॉ. अविक्षित काळे, कार्यालय प्रमुख भालचंद्र देशपांडे, निधी व संपर्कप्रमुख चिन्मय कवी आदी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
नगरसेवक तुषार कामठे यांना जीवे मारण्याची धमकी

व्हीएस न्यूज - पिंपळे निलख परिसरातील अनधिकृत पोस्टरविरुद्ध केलेले आंदोलन मागे घेण्यासाठी कार्यालयात येवून जीवे मारण्याची धमकी देत असल्याची तक्रार भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी सांगवी पोलिस ठाण्यात दिली आहे. नगरसेवक तुषार कामठे यांनी एकुमसिंग कोहली (रा. दापोडी) यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

तुषार कामठे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एकुमसिंग हा मला सातत्याने फोन करत आहे. तसेच अनधिकृत पोस्टरविरुध्द केलेले आंदोलन मागे घेण्यासाठी प्रत्यक्ष आमच्या कार्यालयात येवून मला दमदाटी केली. त्याने अनेक वेळा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, आम्ही त्याला सौजन्याने फोनवर बोलूनसुद्धा त्याचा उर्मटपणा थांबला नाही. तो सातत्याने अनधिकृत पोस्टरविरुद्ध आम्ही उचललेले धोरण थांबविण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देत आहे. एकुमसिंग हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. तरी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच मला पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी देखील कामठे यांनी तक्रारीत केली आहे.

...Read More

V. S. News
पुण्यातील ट्रम्प टॉवरचे जुनिअर ट्रम्पच्या हस्ते उद्घाटन

व्हीएस न्यूज - पुण्याच्या कल्याणीनगर भागात उभारल्या गेलेल्या ट्रम्प टॉवर या अलिशान इमारतींचे उद्घाटन ट्रम्प व्यवसायाचे प्रमुख ज्युनिअर डोनाल्ड ट्रम्प याच्या हस्ते पुण्यात पार पडले. पंचशील डेव्हलपर याच्या भागीदारीत या दोन इमारती बांधल्या गेल्या असून येथे ऋषीकपूर पासुन कतरिना कैफ पर्यंत अनेक सेलेब्रिटीजच्या सदनिका आहेत असे समजते. देशातला हा दुसरा इको फ्रेंडली २३ मजली टॉवर असल्याचे पंचशीलचे अतुल चोरडिया यांनी सांगितले. येथील सदनिकांची किंमत १५ कोटींपासून आहे व अमेरिका, इंग्लंड येथील ट्रम्प टॉवर्सपेक्षा या इमारती अधिक चांगल्या बांधल्या गेल्याचे ते म्हणाले.

या दोन्ही टॉवर्स मधील बहुतेक सदनिका विकल्या गेल्या आहेत. टॉवर बी मधील सदनिका ग्राहकांना ट्रम्प ज्युनिअर याच्या हस्ते टोकन ऑफ अॅप्रिसिएशन देण्यात आले. येथील सदनिका ६१०० चौरस फुटांच्या आहेत आणि आधुनिक फिटनेस सेंटर, स्विमिंग पूल, बायोमेट्रिक कार्ड प्रवेश, वल्डक्लास स्पा, १३५०० चौरस फुटांचे कलादालन, वल्डक्लास सिक्युरिटी सिस्टीम अश्या सुविधा आहेत.

...Read More

V. S. News
खराळवाडी ते हॅरिस ब्रिज पर्यंत मेट्रो प्रकल्पाच्या पल्ल्याचे २०% काम पूर्ण

व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवड ते पुणे मेट्रो प्रकल्पास सुरवात झाली आहे ,त्या दरम्यान खराळवाडी ते हॅरिस ब्रिज पर्यंत मेट्रो प्रकल्पाचे २०% काम पूर्ण झाले आहे . या मध्ये ८८ पिलरचे फाउंडेशन झाले व फिक्सर कॅप २० आणि ५० पिलरचा समावेश आहे. खराळवाडी ते नाशिक फाटा ५ मीटर ची उंची ठेवण्यात येणार आहे व नाशिक फाटा उड्डाणपूलावर १७ मीटर ची उंची ठेवण्यात येणार आहे . पिंपरी चिंचवड ते पुणे मेट्रो प्रकल्पामध्ये १३५ झाडे काढली व त्या पैकी ५ झाडांचे वल्लभनगर एस टी बसस्थानकाच्या परिसरात प्रत्यारोपण झाले आणि ९ झाडांचे डेक्कन नदी पात्रात प्रत्यारोपण करण्यात आले आहे. हे प्रत्यारोपण अत्याधुनिक पध्दतीचे असल्यामुळे प्रत्यारोपण केलेली झाडे १००% जगतात.

अशी माहिती मेट्रो प्रकल्पाचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक मा .श्री सुनील म्हस्के यांनी दिली .

...Read More

V. S. News
लालटोपी नगर मधील समस्यांकडे पालिकेचे दुर्लक्ष

व्हीएस न्युज - गुरूवार दि.२२ रोजी लालटोपी नगर मधील अनेक समस्या (पाणी,चेंबर्स,शौचालयांचा निधी,राजाराम जोशी चौकात स्पिड ब्रेकर्स फोटोपास,नळ कनेक्शन) साठी संमती या अशा महत्वाच्या समस्येकडे पालीका आयुक्तांचे लक्ष वेधून तत्पर कारवाई व्हावी म्हणून मोर्चा काढण्यात आला होता.पोलीसांनी परवानगी नाकारली होती,परंतु त्यांना महत्वाचे प्रश्ना बाबत माहीती देवून फक्त महिलांचाच मोर्चा असेल आणि जास्त गर्दी न करता शिस्त व शांततेत मोर्चा असेल हे सांगितल्या नंतर परवानगी दिली व मोर्चा यशस्वी पार पडला. मा.आयुक्तांना निवेदन देण्यात आले. पुढील काळांत जर समस्या सुटल्या नाहित,तर रास्ता रोको सारखे तीव्र आंदोलन केले जाइल. मा. आयुक्तांना निवेदन देतांना,मा.नसिमा सैय्यद,शाम जोशी,शंकरराव तायडे,लक्ष्मी जोशी, कविता खराडे,ललीता जोशी,मेहबूब शेख,तिमय्या जेकलेट,प्रविण भोसले उपस्थित होते.

...Read More

V. S. News
युवराज दाखले यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन

व्हीएस न्यूज-पिंपरी चिंचवड महानगरपालिका 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर शिवसेना रहाटणी - काळेवाडी विभागप्रमुख युवराज दाखले यांनी विविध सामाजिक कार्य केले असून नुकताच त्यांच्या कामाचा आढावा प्रकाशीत झाला. आकुर्डी येथील शिवसेना कार्यालयात शिव संपर्क अभियान निरीक्षक सत्यवान उभे व चिंचवड विधानसभा संपर्क प्रमुख वैभव थोरात यांच्या हस्ते कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, संपर्क अभियानात युवराज दाखले यांनी केलेल्या कामाचे कौतुकही मान्यवरांनी केले. यावेळी, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, शहर संघटीका सुलभाताई उभाळे, युवासेना चिंचवड विधानसभा अधिकार राकेश वाकुडे, सल्लागार भगवान वाल्हेकर, मधुकर बाबर, शिवसैनिक मोहन बारटक्के, शिव व्यापारीसेना उपशहरप्रमुख गणेश आहेर, निलेश भोरे, गोरख पाटील, रविकिरण घटकार, सुशीलाताई पवार, सुनिताताई चव्हाण, शहरसंघटीका भाग्यश्रीताई मस्के, अनिताताई तुतारे, वैशाली मराठे, मंगला भोकरे, चिंचवड विधानसभा प्रमुख गजानन चिंचवडे, शाखाप्रमुख अंकुश कोळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
‘पावर’बाज मुलाखतीत पवारांची ‘पावर’बाज उत्तरे

व्हिएस न्यूज – बुधवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घेतलेल्या मुलाखतीदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. यावर ‘पावर’बाज उत्तरे पवारांनीही दिली. या मुलाखती दरम्यान आपल्यावर अनेक आरोप झाले त्याचे आपण कधीच लगेच खंडण न केल्यामुळे गैरसमज वाढले का? या राज ठाकरे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दाऊदशी संबंध असल्याच्या त्यांच्यावरील आरोपाचा किस्सा शरद पवार यांनी ऐकवला.

पवार याविषयी सविस्तर बोलताना म्हणाले, अनेक आरोप आतापर्यंतच्या राजकीय आयुष्यात झाले. पण मला या आरोपांचे खंडण करत त्यांचे स्पष्टीकरण करणे कधी महत्वाचे वाटले नाही. आपल्याला या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे माहीत होते आणि त्यामुळे अशा आरोपांची पर्वा कधी केली नाही. अनेक आरोप होऊनही त्यातून काय समोर आले हे स्पष्ट असल्यामुळे आपण खोट्या आरोपांची चिंता केली नाही. माझे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपांनी एकेकाळी मोठी राळ उठवून देण्यात आली होती. त्यावेळी अनेक आरोप झाले पण त्यात काही तथ्य नाही. मात्र, हा आरोप कसा झाला त्याच्या मुळाशी जाऊन माहिती घेतली.

पवार या आरोप होण्यामागचा किस्सा सांगताना म्हणाले,त्यावेळी एका वर्तमानपत्राचा पत्रकार दुबईमध्ये असलेल्या दाऊदच्या भावाला भेटला आणि त्याला मुंबईबाबत प्रश्न विचारले. मुंबई पोलीस दाऊदमुळे आपल्यालाही पकडतील त्यामुळे दुबईत राहत असल्याचे सांगत मुंबईत परतण्याची खूप इच्छा असल्याचेही त्याने सांगितले होते. पत्रकाराने त्यावर त्याला बॉलिवूड मधले कोण आवडते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत, वैगरे प्रश्न विचारले. त्यावर त्याने महाराष्ट्राच्या सीएमना कोण ओळखत नाही, आपण त्यांना ओळखतो, असे उत्तर दिले आणि संबंधित पत्रकाराने बातमीचा फक्त तेवढाच भाग हेडलाईन करून वापरला. खासदार राम नाईक यांनी पुढे याच बातमीचा आधार घेत संसदेत हा मुद्दा उपस्थित करून प्रकरणाला वेगळेच वळण दिले आणि दाऊदच्या संबंधांबाबत अधिकच राळ उठली, असा किस्सा शरद पवार यांनी ऐकवला.

...Read More

V. S. News
अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून संशोधनवृत्ती जोपासण्याचे कार्य - डॉ. रघुनाथ माशेलकर

आकुर्डीतील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात 'केपीआयटी स्पार्कल - 2018' स्पर्धेची सांगता

व्हीएस न्यूज - ऊर्जा आणि वाहतुकीच्या साधनांची सर्वच स्‍तरांवर मागणी वाढली आहे. एकीकडे ही वाढ होत असताना पर्यावरणाचा -हास होत असून तो रोखण्यासाठी जागतिक पातळीवर मोठ्याप्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. त्‍यातुनच अपारंपारिक ऊर्जा तसेच पर्यावरणपुरक वाहनांची निर्मिती करण्याकडे कंपन्यांचा कल वाढला आहे. भारतात ही सौर-पवन ऊर्जा, बॅटरी-वीजेवर चालणारी वाहने यावर संशोधन होत आहे. भारतीयांमध्ये संशोधनवृत्ती जोपासण्याचे काम होत असून अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून 'स्पार्कल' सारख्या स्पर्धा विद्यार्थ्यांच्या नवसंकल्‍पना, विचारांना खतपाणी घालण्याचे कार्य करीत आहेत. ही बाब स्वागतार्ह आहे, असे मत ज्‍येष्ठ संशोधक पद्म विभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्‍त केले.

केपीआयटी कंपनीने आयोजित केलेल्या 'केपीआयटी स्पार्कल - 2018' या अभियांत्रिकी स्पर्धेमधील विजेत्‍या संघांचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील पीसीसीओई महाविद्यालय शैक्षणिक भागीदार व भारत सरकारच्या विज्ञान, तंत्रज्ञान विभागाने ज्ञान भागीदार म्हणून काम केले. सुमारे 21 लाखांच्या पारितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्‍यावेळी डॉ. माशेलकर बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी इस्‍त्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन, केंद्र सरकारच्या ऊर्जा-तंत्रज्ञान विभागाचे सल्‍लागार सदस्य हरकेश मित्तल, प्रो. डॉ. पिटर ट्रोपश्च, डॉ. कार्लोस बिलक्‍ल, केपीआयटीचे सीईओ रवि पंडित, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर, एनसीएलमधील शास्‍त्रज्ञ डॉ. आशिष लेले, डॉ. सी. एस. कुमार, डॉ. मिलन राणे, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर आदी उपस्थित होते.

डॉ. के. राधाकृष्णन विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्‍हणाले की, तुमच्याध्ये अफाट आणि चाकोरी बाहेरील विचार करण्याची क्षमता आहे. विचारांना चालना देऊन तुम्‍ही मोठे संशोधन उभे करू शकता. मागील चार-पाच वर्षांचा विचार केला तर भारताचा मोठा विकास झाला आहे. रवि पंडित म्‍हणाले, केपीआयटीने आयोजित केलेल्‍या स्पार्कल स्पर्धेस प्रत्‍येक वर्षी वाढ होत आहे. संशोधनात्‍मक प्रकल्‍पांमध्ये दर्जात्‍मक आणि गुणात्‍मक वाढ झाली असून विद्यार्थ्यांनी शास्‍त्रीयदृष्टया विचार करून आपले प्रकल्‍प सादर केले. ऊर्जा आणि वाहतुक क्षेत्रातील समस्यांवर आपण चांगले मार्ग काढू शकतो.

स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे - प्लॅटिनम ॲवॉर्ड - आयआयटी खरगपूरच्या टीम इलेक्‍ट्रोडस्‌ - (बॅक्‍टेरिया पॉवर बॅटरी) या प्रकल्‍पास; गोल्‍ड ॲवॉर्ड - मंगलोर येथील सहयाद्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या टीमला - (स्मार्ट हेल्‍मेट) प्रकल्‍पास मिळाले. सिल्व्हर अॅवॉर्ड दोन संघांना देण्यात आले - त्यामध्ये पुणे विद्यार्थीगृहाच्या इंजिनिअरिंगच्या टीम नॅनोवोक्‍सला (ऑईल मिश्रीत पाणी शुध्द करण्याच्या संशोधनास) तर पिंपरीतील डॉ. डी.वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या टीम थर्मोला (स्वयंपाकाच्या वाया जाणा-या उष्णतेपासून ऊर्जा निर्मितीच्या) प्रकल्‍पास मिळाले. मोस्ट पॉप्युलर ॲवॉर्ड - हमिरपूर येथील नॅशनल इन्स्टिट्युटच्या (वाहनांचे अपघात रोखण्यासाठी केलेल्‍या जनजागृती) प्रकल्‍पास मिळाले.

यावेळी प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर आभार व्यक्‍त करताना म्हणाले, पीसीसीओई विद्यार्थ्यांच्या उज्‍ज्‍वल भवितव्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. स्पार्कल स्पर्धेमध्ये सुमारे 12 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले 1500 पेक्षा अधिक संशोधन प्रकल्‍प सादर केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पार्कल स्पर्धेव्दारे उत्तमोत्तम संशोधन प्रकल्‍प पाहण्याची, ज्‍येष्ठ संशोधकांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. प्रा राहुल पाटील आणि रामकृष्ण वडाळी यांनी पीसीसीओई कडून समन्वयक म्हणून काम केले.

या कार्यक्रमाच्या आयोजनास उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विविध विभागाचे प्रमुख, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

...Read More

V. S. News
अमरावतीचा विजय भोईर राज्यस्तरीय शरिरसौष्ठव स्पर्धेत विजयी

व्हीएस न्यूज - खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शरिरसौष्ठव स्पर्धेत अमरावतीच्या विजय भोईरने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. पुण्याच्या गणेश शेडगेने मोस्ट इम्प्रुव्हड तर पुण्याच्याच विशाल साळुंकेने बेस्ट पोजरचा किताब पटकविला.

या स्पर्धेत राज्यभरातील एकूण १६५ स्पर्धक सहभागी झाले होते. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडलेल्या या स्पर्धेचे उद्‌घाटन प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पारितोषिक वितरण सिने अभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी केले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, नगरसेवक डब्बु आसवानी, धनाजी बारणे, नारायण बहिरवाडे, आयोजक सुनील पाथरमल आदी उपस्थित होते.

55 किलो वजनगटात -1) नीलेश कोळेकर (मुंबई उपनगर), 2) आशिष बिलीया (चंद्रपूर), 3) अक्षय पार्टे (पुणे), 4) शैलेश कुलकर्णी (पुणे), 5) मोहंद आयाझ (परभणी). 60 किलो वजनगटात -1) विशाल साळुंखे (पुणे), 2) प्रथमेश कांबळे (पुणे), 3) उस्मा शेख (पुणे), 4) अब्दुल रेहमान(परभणी), 5) महेश मनोहर (पुणे). 65 किलो वजनगटात -1) निखील गोळे (मुंबई उपनगर), 2) प्रविण मगावणे (मुंबई), 3)अक्षय सरवण (पुणे), 4) कश्‍यप खंडागळे (पुणे), 5) अमोल कामटे (पुणे) 70 किलो वजनगटात -1) आतिक शेख (पुणे), 2) सोमनाथ पानसरे (पुणे), 3) बाबु चव्हाण (पुणे), 4) यतीन फुटेकर (पुणे), 5)शैलेंद्र पिंपळकर (औरंगाबाद)

75 किलो-1) गौरव शिंदे (पुणे), 2) ऋषिकेश पासलकर (पुणे), 3) अक्षय पवार (पुणे), 4) दिलीप राजीवडे (पुणे), 5) अमीर पठाण(अमरावती) 80 किलो वजनगटात -1) विजय भोईर (अमरावती), 2)असिफ अहमद (पुणे), 3) गणेश थेरगळ (पुणे), 4) संदेश नलावडे (पुणे), 5) रोशन पाटील (बारामती) 80 किलो व त्यावरील 1) गणेश शेडगे (पुणे), 2) मोहसीन नाजीम (औरंगाबाद), 3) विक्रम चांडक (अमरावती), 4) आकाश नाटेकर (पुणे), आशिष कांबळे (पुणे).

...Read More

V. S. News
तडीपार गुंड दिनेश शिंगाडेला  पिस्तुलसह अटक

व्हीएस न्यूज - तडीपारीचा आदेश झुगारून उथळ माथ्याने फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पिस्तुल व एक जिवंत काडतुसासह पिंपरी पोलीसांनी खराळवाडी येथील भागवत गिता मंदीराजवळून अटक केली.

दिनेश विलास शिंगाडे (वय-25, रा. भागवत गिता मंदिराजवळ, खराळवाडी) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पिंपरी पोलीसांनी बातमीदारामार्फत शिंगाडे खराळवाडीत आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पिंपरी पोलीसांनी सापळा लावून सराईत गुन्हेगार शिंगाडेला अटक केली. त्याच्याकडून सात हजार 500 रूपयांचे एक पिस्तुल व एक जिवंत असा ऐवज जप्त केला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, गुन्हे शाखेचे मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विठ्ठल बढे, बाळासाहेब अंतरकर आदींच्या पथकाने केली.

...Read More

V. S. News
'समाज जीवनाशी एकरूप होऊन  पत्रकारिता करावी'

व्हीएस न्यूज - पत्रकारांनी समाज जीवनाशी एकरूप होऊन आपली पत्रकारिता करावी, असे आवाहन संत साहित्याचे अभ्यासक हभप डॉ रामचंद्र देखणे यांनी येथे व्यक्त केले. तळेगाव शहर पत्रकार संघ आणि योगीराज फाऊडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 206 व्या जयंती निमित्त कार्यक्रमात डॉ देखणे हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णराव भेगडे तर व्यासपीठावर नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील वाळूंज, जेष्ठ पत्रकार सुरेश साकवळकर, बाळशास्त्री जांभेकर यांचे वंशज सुधाकर जांभेकर, तळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुकुट पाटील, पुणे पीपल्स बॅंकेचे अध्यक्ष बबन भेगडे, पक्षप्रतोद सुशील सैदाणे, माजी नगराध्यक्ष रविद्र दाभाडे, बाळासाहेब जांभूळकर, सुरेश धोत्रे, यादवेंद्र खळदे, गणेश भेगडे, उद्योजक किशोर आवारे, नगरसेविका सुलोचना आवारे आदि उपस्थित होते. समाजाच्या मार्गदर्शनासाठी पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता करावी असे नगराध्यक्षा चित्रा जगनाडे म्हणाल्या. पत्रकार हा समाजाला आधार देणारा आणि दिशा देणारा असावा अशी भावना माजी आमदार कृष्णाराव भेगडे यांनी व्यक्त केली. यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पणतू प्रा. बाजीराव जांभेकर यांनी सकारात्मक उत्तर दिले. रामनाथ पंडित यांच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या हस्तलिखित साहित्य प्रदर्शन मांडल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास गणेश खांडगे, संग्राम काकडे, अशोक काळोखे आदींचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, पंडित आल्पे, संपदा थिटे तसेच श्रुती देशपांडे यांची संगीत मैफल आयोजित केली होती. त्यास हर्मोनियामाची साथ हिमांशू जोशी आणि तबल्याची साथ संतोष साळवे यांनी दिली. सूत्रसंचालन अतुल पवार व कांचन सावंत यांनी केले. नियोजन आशिष पाठक, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मनोहर दाभाडे, सचिव अतुल पवार, बी एम भसे, सोनबा गोपाळे, तात्या धांडे, श्रीकांत चेपे यांनी केले.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!