व्हीएस न्यूज - तडीपारीचा आदेश झुगारून उथळ माथ्याने फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पिस्तुल व एक जिवंत काडतुसासह पिंपरी पोलीसांनी खराळवाडी येथील भागवत गिता मंदीराजवळून अटक केली.
दिनेश विलास शिंगाडे (वय-25, रा. भागवत गिता मंदिराजवळ, खराळवाडी) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पिंपरी पोलीसांनी बातमीदारामार्फत शिंगाडे खराळवाडीत आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पिंपरी पोलीसांनी सापळा लावून सराईत गुन्हेगार शिंगाडेला अटक केली. त्याच्याकडून सात हजार 500 रूपयांचे एक पिस्तुल व एक जिवंत असा ऐवज जप्त केला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, गुन्हे शाखेचे मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विठ्ठल बढे, बाळासाहेब अंतरकर आदींच्या पथकाने केली.