Breaking News

जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम |
V. S. News
महावीर जयंतीनिमित्त कत्तलखाने बंद ठेवण्याचे आवाहन

आमदार महेश लांडगे यांचे आयुक्तांना निवेदन

व्हीएस न्यूज - भगवान महावीर जयंती निमित्त शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यात यावेत. महावीर जयंती अंहिसेच्या मार्गाने साजरी व्‍हावी. सर्व मुक जनावरांची होणारी कत्तल थांबविण्याकरीता शहरातील मटण, चिकन व मांस विक्रेते यांनी आपली दुकाने बंद ठेवावीत, असे आवाहन भाजपचे सहयोगी सदस्य आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, महावीर स्वामी यांनी जिओ और जीने दोहा संदेश संपूर्ण जगाला दिला. याच अनुषंगाने या दिवशी शहरातील सर्व कत्तलखाने आणि मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याची गरज आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्वधर्मीय नागरिकांचे वास्तव्य आहे. जैन बांधवही या शहरात गुण्या गोविंद्याने राहत आहेत. सर्व समाजबांधव आपआपले सण-उत्सव साजरे करतात. त्यामुळे जैन बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या महावीर जयंतीनिमित्त सर्व समाजबांधवांनी एकोपा दाखवला पाहिजे.

ब्रिटीश काळापासून महावीर जयंतीला देशातील कत्तलखाने बंद ठेवले जात होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातले सर्व कत्तलखाने महावीर जयंतीला सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. मात्र, तरीही जैन बांधवांच्या भावनांचा विचार करुन सर्व समाज बांधवांनी मांस विक्री आणि कत्तलखाने बंद ठेवावे. त्याबाबत महापालिका प्रशासनाने पुढाकार घेवून संबंधित विक्रेत्यांना आवाहन करावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

भोसरीत अहिंसा रॅलीचे आयोजन

दरम्यान, पिंपरी चिंचवड जैन महासंघाने भगवान महावीर जयंतीनिमित्त दि. २३ मार्चपासून २९ मार्चपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कासारवाडी येथील पगारिया सभागृहात अहिंसा सप्ताह व नवकार महामंत्र जपाने उत्सवाचा शुभारंभ झाला. दि.२९ रोजी दिगंबर जैन मंदिर निगडी अरिहंत व जैन मंदिर चिंचवड, रामस्मृती लॉन्स भोसरी येथे रक्‍तदान व नेत्रदान शिबीर, मोहननगर येथे जैन वसतीगृह व मोरया मंदिर परिसरातील समरथ संस्था गुरुकुल येथे फळ वाटप होणार आहे. तसेच, दि.२९ मार्चला महावीर जयंतीच्या मुख्य दिवशी दुपारी चार वाजता निगडी येथे जैन मंदिरात अहिंसा रॅली व अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी येथे सायं.६ वाजता समारोप होणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जैन महासंघाचे अध्यश वीरेंद्र जैन यांनी केले आहे.

...Read More

V. S. News
ह्युंदाई कारचा ‘फ्री कार केअर क्लिनिक’चा सप्ताह

व्हीएस न्यूज - ह्युंदाईच्या ग्राहकांसाठी २७ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान कंपनीच्या वतीने फ्री कार केअर क्लिनिक’ (चेकअप) सप्ताहामध्ये कारची मोफत तपासणी करुन दिली जणार आहे. कुंदनच्या चिंचवड़ थरमॅक्स चौक, चाकण, पिंपळे सौदागर आणि बावधन शोरूममध्ये मगंळवारी उद्घाटन करण्यात आले असून या ठिकाणी सेवा मिळणार आहे.

देशातील अग्रगण असणाऱ्या आणि ऑटोमोबाइल क्षेत्रात दुसऱ्या स्थानावर असलेल्या ह्युंदाई मोटर इंडिया लि.चे देशभरात २६ व्या फ्री कार केअर क्लिनिकची घोषणा केली आहे. ग्राहकांना याचा चांगला फायदा होणार आहे. हा ग्राहक जोडणी हा उपक्रम २७ मार्च ते ५ एप्रिल २०१८ दरम्यान देशभरातील सर्व सव्हिस सेंटरवर (सेवा आउटलेट) आयोजित केला आहे. २६ व्या FCCC चे उद्घाटन चिंचवड़ थरमॅक्स चौकातील कुंदन कार प्रायव्हेट लिमिटेड या शोरूम मध्ये निगडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय पळसुळे व कुंदन ह्युंदाईचे संचालक हितेश चड्डा, राजकुमार चड्डा यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

मोफत कार केअर क्लिनिक मध्ये इंजिन, ट्रान्समिशन, इलेक्ट्रिकल सिस्टिम, अंडर-बॉडी, एसीचे चेकिंग केले जाणार आहे. यासोबत ग्राहकाना स्पेयर पार्ट्स, लेबर चार्ज आणि अन्य सेवांवर आकर्षक सवलत दिली जनार आहे. तसेच वॉरंटी आणि रोड साइड असिस्टन्स प्रोग्रॅमसाठीही आकर्षक सवलत देऊ केली आहे. ३ वर्षांपेक्षा जास्त दिवसांची वाहने असलेल्या ग्राहकांना खास सवलत आहे. हितेश चड्डा म्हणाले, उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे वाहनांची वेळच्या वेळी देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे आहे. आम्ही कुंदनच्या चिंचवड, पिंपळे सौदागर, चाकण आणि बावधन शोरूम मध्ये ग्राहकांना आकर्षक सवलत देत आहे, त्याचा फायदा सर्वानी घ्यावा.

पळसुळे म्हणाले, ह्युंदाई कंपनीच्या कार चांगल्या आहेत. आपल्याकडील कारची वेळेवर देखभाल केल्यास तिचे आयुष्य वाढते. सध्या सुरु असलेल्या ह्युंदाई फ्री कार केअर क्लिनिकचा फायदा करुन घ्यावा

...Read More

V. S. News
शिवसेनेकडून वाकड पोलीसांचा सत्कार

व्हीएस न्यूज - तीन दिवसात बेपत्ता मुलीचा शोध घेणाऱ्या वाकड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचा शिवसेना रहाटणी काळेवाडी विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

लग्नाची तारीख जवळ येत असल्याचे पाहुन आर्थिक परिस्थितीमुळे हतबल झालेली इयत्ता बारावीची परीक्षा दिलेली विद्यार्थिनी राहत्या घरातून न सांगता निघुन गेली होती. ही गोष्ट आई-वडिलांना समजल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. मात्र, वाकड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तीन दिवसात मुलीला सुखरुप आई-वडिलांच्या स्वाधीन केले.

यानिमित्त शिवसेना प्रभाग प्रमुख युवराज दाखले यांच्या हस्ते पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिव व्यापारी सेना उपशहर प्रमुख गणेश आहेर, गणेश पाडुळे, भरत महानवर,नरसिंग माने, रविकिरण घटकार, भालचंद्र फंडतळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

...Read More

V. S. News
मुरलीकुमारने पटकाविला ‘पिंपरी चिंचवड महापौर चषक भारत श्री 2018’चा किताब

महाराष्ट्र संघाला सांघिक विजेतेपद

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आयोजित केलेल्या 'महापौर भारत श्री 2018' या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड महापौर चषक भारत श्री 2018’चा किताब आयबीबीएफएफच्या मुरलीकुमार याने चॅंपियन ऑफ चॅंपियनचा किताब पटकाविला. पुरुष गटात जम्मू - कश्मिरचा राजकुमार सर्वसाधारण विजेता ठरला. महाराष्ट्राला सांघिक विजेतेपद मिळाले.

माजी महापौर संजोग वाघेरे पाटील महापौर चषक राष्ट्रीय शरीरसौष्ठव भारत श्री 2018 या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ चिखली जाधववाडी येथे शनिवारी (दि. 24 मार्च) महाराष्ट्र बॉडी बिल्‍डर्स असोसिएशनचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

इंडियन बॉडी बिल्‍डिंग ॲण्ड फिटनेस फेडरेशन यांच्या मान्यतेने पिंपरी चिंचवड महापालिका क्रीडा विभाग, महाराष्ट्र बॉडी बिल्‍डर्स असोसिएशन यांच्या व पिंपरी चिंचवड अॅमेच्युअर बॉडी बिल्‍डिंग असोसिएशन यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र बॉडी बिल्‍डर्स असोसिएशनचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. बक्षिस वितरण समारंभात क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते, आयबीबीएफएफचे सचिव डॉ. संजय मोरे, अभिनेता सिध्दांत मोरे, महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सचिव राजेंद्र सातपुरकर, खजिनदार राजेश सावंत, पिंपरी चिंचवड अध्यक्ष राजेंद्रसिंग वालिया, नगरसेविका अश्विनी जाधव, राहुल जाधव, वसंत बोराटे, नितीन बो-हाडे, उद्योजक कार्तिक लांडगे, सुभाष जाधव, संयोजक संतोष जाधव, सागर हिंगणे, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर आदी उपस्थित होते. स्पर्धेत आयबीबीएफएफच्या आवाश खान याला बेस्ट पोझर तर महाराष्ट्राच्या दिनेश कांबळे याला मोस्ट इम्प्रूव्हड किताबाने गौरविण्यात आले. सांघिक गटात दिल्लीचा संघ उपविजेता ठरला.

स्पर्धेचे प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांकाचे निकाल पुढीलप्रमाणे.

55 किलो : अरुण दास (आयबीबीएफएफ), माहेश्वर साहू (ओडिसा), जहीर अहमद (महाराष्ट्र);

60 किलो : पी. संतोष कुमार (कर्नाटक), अंकीत सैनी (दिल्ली), जगेश दाईत (महाराष्ट्र);

65 किलो : स्वप्नील नरवारकर (आयबीबीएफएफ), कमल गोस्वामी (दिल्ली), किरण शिंदे (महाराष्ट्र);

70 किलो : दिनेश कांबळे (महाराष्ट्र), महेश नेगी (दिल्ली), आशिष माने (महाराष्ट्र);

75 किलो : एस. पद्मनाथम (आयबीबीएफएफ), सुमन दास (प. बंगाल), मनजित सोखी (दिल्ली);

80 किलो : राजेश अरले (महाराष्ट्र), संजय सैनी (हरियाना), अर्जिक्य रेडेकर (महाराष्ट्र);

85 किलो : विघ्नेश डी (आयबीबीएफएफ), प्रमोद सिंग (महाराष्ट्र), शाबिद व्ही.पी. (केरळ);

90 किलो : अवास खान (आयबीबीएफएफ), किरत पाल सिंग (पंजाब), हरमीत सिंग (महाराष्ट्र);

100 किलो : मुरली कुमार (आयबीबीएफएफ), प्रवीण कुमार (उत्तर प्रदेश), अभिजित दास (आसाम);

100 किलो पुढील : विनय कुमार (दिल्ली), अनीश, हरिप्रसाद (दोघेही आयबीबीएफएफ);

पुरुष फिजिक (170 सीएम) : रावेश प्रधान (गोरखालँड), वरुण मल्होत्रा (दिल्ली), निखिल मकवाना (हरियाना);

पुरुष फिजिक (170 सीएम): राज कुमार (जम्मू - काश्मीर), अर्जुन सिंग (दिल्ली), प्रवीण कुमार (हरियाना);

वुमेन्स फिजिक (खुला गट) : डॉ. मृदूला (दिल्ली), करिश्मा अरोरा (दिल्ली), करुणा वाघमारे (महाराष्ट्र);

वुमेन्स फिजिक (खुला गट) : निशा भोयर (छत्तीसगड), करिश्मा पारिख (गोवा), अनन्या रॉय (पश्मिच बंगाल);

पुरुष क्लासिक (खुला गट): किसन तिवारी (विदर्भ), संगीत नाथ (पं. बंगाल), महम्मद (उत्तर प्रदेश);

यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच यावेळी गुणवंत खेळाडू गिरीजा लांडगे, विराज लांडगे, योगेश जाधव, प्रसाद सस्ते, बापू शिंदे, पुजा शेलार, विकी बनकर, तेजस बटवाल,शुभदा लोखंडे, पृथ्वीराज इंगळे, विक्रांत लांडगे, युवराज आल्हाट, प्रणव लोंढे, अमिश्री राजपूत आदींचा सत्कार करण्यात आला.

...Read More

V. S. News
महिलेला दुचाकीस्वाराकडून लोखंडी रॉडने मारहाण

व्हीएस न्युज - कात्रज देहूरोड बायपास रोडने दुचाकीवरून जात असलेल्या महिलेला एका दुचाकीस्वाराने लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. सुरुवातीला या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर तो झिरो क्रमांकाने हिंजवडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.
याबाबत संगीता महेश झेंडे (वय 32, रा. झेंडे मळा, देहूगाव) यांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संगीता झेंडे शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास देहूगावकडून कात्रजच्या दिशेने बायपास रोडने जात होत्या. व्ही ऍण्ड पी नर्सरी जवळ एका अज्ञात दुचाकीस्वाराने (एम एच 12, 6639) संगीता यांच्या दंडावर लोखंडी रॉड मारला. यामध्ये संगीता गंभीर जखमी झाल्या. दुचाकीस्वाराने डोक्यावर हेल्मेट घातले होते. त्याच्याकडे काळ्या रंगाची स्पोर्ट बाईक होती. अंगावर हिरवा टी-शर्ट होता. जखमी संगीता झेंडे यांना देहूरोड येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबत सुरुवातीला देहूरोड पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर हा गुन्हा हिंजवडी पोलिसांकडे झिरो क्रमांकाने वर्ग करण्यात आला. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

...Read More

V. S. News
पूर्व वैमनस्यातून एकाच्या अंगावर मोटार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

व्हीएस न्युज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून सराईत गुन्हेगाराने एकाच्या अंगावर मोटार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना नेरे येथे रविवारी पहाटे साडेतीन वाजता घडली. याप्रकरणी सराईत गुन्हेगारासह दोनांना हिंजवडी पोलीसांनी अटक केली आहे.
रूपेश दत्तात्रय तावरे (वय-24) आणि राहुल एकनाथ पाटील (वय-25 दोघेही रा. नेरे ता. मुळशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अजित भालचंद्र पाटील असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ विशाल भालचंद्र पाटील (वय 27) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तावरे हा सराईत गुन्हेगार आहे. अजित पाटील यांची काही दिवसांपूर्वी आरोपी तावरे आणि राहुल पाटील या दोघांशी भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी आपापसात संगनमत केले. रविवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास फिर्यादी विशाल पाटील व सोसायटीचे सदस्य गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी त्यांचा भाऊ अजितही तेथे आला. आरोपी तावरे याने त्यांच्या अंगावर मोटार घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोन्ही आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. पी. सोनवणे अधिक तपास करीत आहेत.

...Read More

V. S. News
अपघातातील जखमी पिकअप चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

व्हीएस न्युज - भरधाव पिकअपने रस्त्यावर थांबलेल्या सफारी मोटारीला जोरदार धडक दिली. यामध्ये पिकअप चालकाचा गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात 8 मार्च रोजी वाकड येथील भुजबळ चौकाजवळ झाला होता.
शंकर धोंडू हाके (वय-59, रा. पंचवटी आरटीओ ऑफिस जवळ, नाशिक) असे मृत्यू झालेल्या पिकअप चालकाचे नाव आहे. याप्रकरणी मनिषकुमार आर्या (वय-33, रा. नेऱ्हे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आर्या व त्यांचे मित्र अमोल राऊत 8 मार्च रोजी वाकड येथील भुजबळ चौकाजवळ त्यांची सफारी मोटार रस्त्यावर लावून बोलत थांबले होते. पाठीमागून आलेल्या भरधाव पिकअपने त्यांच्या मोटारीला जोरदार धडक दिली. पिकअप व सफारी मोटारीचेही मोठे नुकसान झाले होते. पिकअप चालक शंकर हाके गंभीर जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. जी. बिरादार अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
दोन हजारांची लाच घेताना महापालिका कारकुन जाळ्यात

व्हिएस न्युज - सदनिका हस्तांतरणासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरीगाव करसंकलन क्षेत्रीय कार्यालयातील कारकुनाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अमोल चंद्रकांत वाघेरे (वय - 38, रा. धोंडिबा वाघेरे चाळ, पिंपरीगाव, पुणे) असे एसीबीच्या जाळ्यात सापडलेल्या कनिष्ठ कारकुनाचे नाव आहे. याबाबत 45 वर्षीय व्यक्तिने तक्रार दिली आहे. तक्रारदाराने पत्नीच्या नावाने सदनिका घेतली. त्या सदनिकेचे हस्तांतरण करून कर पावती मिळावी, यासाठी अर्ज केला. या कामाच्या मोबदल्यात अमोल वाघेरे याने दोन हजार रुपयांची मागणी केली. याबाबत लाचलुचपत विभागाच्या पुणे विभागाकडे तक्रार करण्यात आली. त्यानुसार एसीबीने सामेवारी सापळा रचला. दोन हजारांची लाच स्वीकारताना अमोल वाघेरे याला रंगेहात पकडण्यात आले. पिंपरी पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक दत्तात्रय भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस एस घार्गे, पोलीस हवालदार खान, पोलीस नाईक विनोद झगडे यांनी ही कामगिरी केली.

दरम्यान, पिंपरी महापालिकेत 1997 पासून आतापर्यत लाचलुचपत विभागाच्या 22 कारवाया झाल्या आहेत. यातील अनेक जण पुन्हा महापालिका सेवेत कार्यरत झाले आहेत.

...Read More

V. S. News
100 नंबरवर अखेरचा कॉल करुन तरुण पुण्यातून बेपत्ता

व्हीएस न्युज - आयएएसच्या परीक्षेची तयारी करणारा तरुण 100 क्रमांकावर अखेरचा कॉल करुन, पुण्यातून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, पुणे पोलिसांसह मुंबई पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

रिजॉय जयराजन पन्थोकुलोथू असं तरुणाचं नाव असून, तो गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता आहे. मूळचा केरळचा रहिवासी असलेला 27 वर्षीय रिजॉय बीएससी झाला आहे. रिजॉय आयएएस परीक्षेची तयारी करत होता.

लग्नानंतर रिजॉय पुण्यात पत्नीसोबत राहत होता. मात्र,लग्नाच्या सहा महिन्यांतच त्यांनी परस्पर सहमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. मात्र तेव्हापासून तो तणावात होता. त्याचा भाऊ झिनॉयही पुण्यात राहतो. तो पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत नोकरीला आहे.

15 नोव्हेंबर रोजी भावाचा रिजॉयसोबत संपर्क झाला. त्याने त्याला नाश्ता करण्यासाठी घरी बोलावलं. रात्रीचं जेवण सोबत करु, असं सांगून रिजॉयने फोन ठेवला. वडिलांसोबतही त्याचं बोलणं झालं. जेवणासाठी रात्री उशिरापर्यंत रिजॉय घरी न आल्याने, त्याच्या भावाने शोधाशोध केली. अखेर भावाने चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात रिजॉय बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

झिनॉयने ‘एबीपी माझा’ला दिलेल्या माहितीनुसार, पुणे सायबर पोलिसही या प्रकरणाचा तपास करत होते. त्यांच्या तपासात रिजॉयने अंधेरीतून 100 क्रमांकावर अखेरचा कॉल केला. तो कॉल 40 सेकंद सुरु होता. मात्र, त्यानंतर तो नॉट रिचेबल झाला. त्यामुळे रिजॉयला शोधण्याचं आव्हान मुंबई आणि पुणे पोलिसांसमोर आहे.

...Read More

V. S. News
पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र आयुक्तालय

व्हीएस न्युज - शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक वर्षांपासून मागणी होणाऱ्या स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची स्वप्नपूर्ती होणार आहे. पिंपरी-चिंचवडसह मीरा-भाईंदर आणि कोल्हापूर येथे स्वतंत्र आयुक्तालय सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र आयुक्तालय देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पुणे सुपरफास्ट' या कार्यक्रमात दिले होते.

शहरातील आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अॅड. गौतम चाबुकस्वार यांच्यासह आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, राहुल कुल, शरद सोनावणे यांनीदेखील लक्षवेधीद्वारे सरकारचे लक्ष वेधले होते. गेल्या अनेक वर्षांपासून हा विषय प्रलंबित होता. माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे यांनीदेखील यासाठी पाठपुरावा केला आहे.

पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये वर्षाला सुमारे चार हजार गुन्ह्यांची नोंद होते. औद्योगिक पट्ट्यामुळे देशातील विविध राज्यांमधून कामगार येथे स्थायिक होत असतात. त्यामुळे त्यांच्या गरजा आणि उपलब्ध सोयी-सुविधा यातूनदेखील अनेकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. हिंजवडी आयटी पार्क, झपाट्याने विस्तार होणारे शहर या सर्व बाबींमुळे आयुक्तालयाची गरज वेळोवेळी अधोरेखित झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी भोसरी येथील कार्यक्रमात शहराला स्वतंत्र आयुक्तालय देण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने गृह विभागाकडे स्वतंत्र आयुक्तालयाचा अहवाल पाठवला होता. त्यामध्ये काही त्रुटी आढळल्याने दुरुस्ती करून हा अहवाल पाठविण्यात आला होता. वित्त विभागासह गृह विभागाने यामध्ये आवश्यक सुधारणा सुचविल्यानंतर हा अहवाल नुकताच मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला होता.

चोर, दहशतवाद्यांचा वावर

शहराला स्वतंत्र आयुक्तालय मिळाल्याने शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यास बरीच मदत होणार आहे. संशयित दहशतवाद्यांचेही येथे वास्तव्य असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. कुदळवाडीत भटकळ बंधूंच्या वास्तव्याची शक्यता, जंगली महाराज रस्ता येथील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींनी कासारवाडीत बॉम्ब तयार करणे, नक्षलवाद्यांचे स्लीपर सेल आणि संशयितांचे वास्तव्य, दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या बांगलादेशींचे बनावट कागदपत्रांद्वारे वास्तव्य आदी बाबी तपास यंत्रणांनी उघड केल्या आहेत. स्वतंत्र आयुक्तालयानंतर या घटनांना काही प्रमाणात तरी चाप बसू शकतो.

जागांच्या पाहणीला सुरवात

मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी (२२ मार्च) आयुक्तालयाची घोषणा केल्यावर दुसऱ्या दिवशी पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांनी आयुक्तालयासाठी शहरातील महापालिकेच्या जागांची पाहणी केली. यामध्ये निगडी प्राधिकरणातील हेडगेवार भवन, चिंचवड प्रेमलोक पार्क येथील महापालिकेची शाळा, निगडी चौकातील 'फ' क्षेत्रीय कार्यालय, नेहरूनगर येथील 'क' प्रभाग कार्यालय, मासूळकर कॉलनी येथील तंत्रनिकेतन विभागाची जुनी इमारत, थेरगाव येथील 'ग' क्षेत्रीय कार्यालय; तसेच चिंचवडमधील कामठे चौकातील महापालिकेच्या इमारतींची पाहणी करण्यात आली आहे. उपायुक्त, सहायक आयुक्त, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त यांच्या कार्यालयांसाठी जागांची पाहणी सुरू करण्यात आली आहे.

चोर, दहशतवाद्यांचा वावर

शहराला स्वतंत्र आयुक्तालय मिळाल्याने शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यास बरीच मदत होणार आहे. संशयित दहशतवाद्यांचेही येथे वास्तव्य असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. कुदळवाडीत भटकळ बंधूंच्या वास्तव्याची शक्यता, जंगली महाराज रस्ता येथील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींनी कासारवाडीत बॉम्ब तयार करणे, नक्षलवाद्यांचे स्लीपर सेल आणि संशयितांचे वास्तव्य, दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या बांगलादेशींचे बनावट कागदपत्रांद्वारे वास्तव्य आदी बाबी तपास यंत्रणांनी उघड केल्या आहेत. स्वतंत्र आयुक्तालयानंतर या घटनांना काही प्रमाणात तरी चाप बसू शकतो.

जागांच्या पाहणीला सुरवात

मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी (२२ मार्च) आयुक्तालयाची घोषणा केल्यावर दुसऱ्या दिवशी पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांनी आयुक्तालयासाठी शहरातील महापालिकेच्या जागांची पाहणी केली. यामध्ये निगडी प्राधिकरणातील हेडगेवार भवन, चिंचवड प्रेमलोक पार्क येथील महापालिकेची शाळा, निगडी चौकातील 'फ' क्षेत्रीय कार्यालय, नेहरूनगर येथील 'क' प्रभाग कार्यालय, मासूळकर कॉलनी येथील तंत्रनिकेतन विभागाची जुनी इमारत, थेरगाव येथील 'ग' क्षेत्रीय कार्यालय; तसेच चिंचवडमधील कामठे चौकातील महापालिकेच्या इमारतींची पाहणी करण्यात आली आहे. उपायुक्त, सहायक आयुक्त, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त यांच्या कार्यालयांसाठी जागांची पाहणी सुरू करण्यात आली आहे.


आयुक्तालयांतर्गत १५ पोलिस ठाणी

या आयुक्तालयात अप्पर महासंचालक किंवा विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती होऊ शकते. नवी मुंबईच्या धर्तीवर शहराचे आयुक्तालय होणार आहे. पुणे शहर पोलिसांच्या झोन तीनमधील पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, एमआयडीसी, सांगवी, हिंजवडी, वाकड यासह दिघी आणि शहर पोलिसांच्या अखत्यारित असलेले अन्य एक पोलिस ठाण्याचा
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात समावेश केला जाणार आहे. या व्यतिरिक्त नव्याने सुरू होणारे चिखली पोलिस ठाणे आणि ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारित असलेली देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, आळंदी व चाकण आदी पोलिस ठाणी नव्याने होणाऱ्या आयुक्तालयाला जोडण्यात येणार आहेत.

...Read More

V. S. News
ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीचा प्रियकराने गळा आवळून केला खून , मृतदेह पेट्रोल टाकून जाळला

व्हीएस न्युज - ब्लॅकमेल करून सतत पैशांची मागणी करणाऱ्या वारजे माळवाडी येथील तरुणीचा प्रियकराने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खून केल्यानंतर प्रियकराने मृतदेह वाघजाई डोंगरात नेऊन पेट्रोल टाकून जाळला. तरुणी गायब झाल्यामुळे वारजे माळवाडी पोलिसांकडून तपास सुरू असताना तिचा खून झाल्याचे समोर आले.

प्रेरणा शशिकांत कांबळे (वय १९, रा. शिवणे, वारजे माळवाडी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी प्रियकर विपुल भवरलाल शहा (वय ३२, रा. गंगा भाग्योदय, माणिकबाग, सिंहगड रोड) याला अटक करण्यात आली आहे. त्याचा साथीदार लहू गोणते (रा. पौड रोड) हा पसार झाला आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई राजेंद्र खामकर यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विपुल शहाचा विवाह झालेला आहे. त्याला एक मुलगा आहे. त्याचे वारज्यात किराणा दुकान आहे. लहू गोणते हा दुकानातील कामगार आहे. तरुणी एका फर्ममध्ये नोकरी करत होती. त्यामुळे त्यांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. विपुल हा तिला मागणीनुसार पैसेही पुरवत होता. काही महिन्यांपासून विपुल तिला टाळण्याचा प्रयत्न करत होता. तरुणी विपुलकडे अधूनमधून पैशांची मागणी करत होती. १५ मार्चला विपुलने तरुणीला फिरायला जायचे असल्याचे सांगितले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ती आल्यानंतर कारमधून विपुल, त्याचा कामगार लहू आणि प्रेरणा तिघे गेले. त्यानंतर ते वाघजाई डोंगर भागात आल्यानंतर तेथे काही वेळ थांबले. त्यावेळी प्रेरणाने विपुलला 'तू माझ्यापासून लांब पळतो,' अशी तक्रार केली. त्यावेळी विपुलने तू मला ब्लॅकमेल का करतेस असे म्हणून वाद सुरू केला. या वादातून विपुलने प्रेरणाचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर दोघांनी मिळून तिचा मृतदेह झाडीत नेला. त्या ठिकाणी पेट्रोल टाकून तिचा मृतदेह जाळला.

...Read More

V. S. News
वाहतूक पोलिसांना मारहाण करणारे तीन कोळीबांधव गजाआड

व्हीएस न्युज - कोळी बांधवांच्या पालखी मिरवणुकी दरम्यान तीन वाहतूक पोलीस आणि दोन वार्डनला जमावाने मारहाण केल्याची घटना लोणावळा येथे आज सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. हा प्रकार लोणावळ्यातील कुमार चौकात घडला. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

पोलीस हवालदार आनंद देवेंद्र रावण, पोलीस शिपाई सि.एफ. गव्हाणे, जिवन आंकुश गवारी, वार्डन प्रकाश मराठे, दर्शन गुरव यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी आक्षय गावडे (वय- 24, रा. सावरकर नगर, ठाणे), प्रतिक साईनाथ पाटील (वय -28, रा. बालकुंभ, ठाणे) आणि दया माणिक पाटील (वय -23, रा. ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

कोळी बांधवांची आज पालखी मिरवणुक निघाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मिरवणुक लोणावळ्यातील कुमार चौकात आली असता या ठिकाणी पोलिसांनी त्यांना यु टर्न घेण्यास मनाई केली. वाहतूकीला आडथळा निर्माण होणार असल्याने पोलिसांनी त्याना यु टर्न घेण्यास मनाई केली. त्यावेळी काही कोळी बांधवांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्याचवेळी पाठिमागून आलेल्या काही कोळी बांधवांनी पोलिसांच्या अंगावर गाडी घातली. पोलिसांनी त्यांना गाडी बाजूला घेण्यास सांगून कारवाई करणार असल्याच सांगितले. या वरुन चिडलेल्या काही कोळी बांधवांनी दोन पोलिसाना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली.

हा सर्व प्रकार कुमार चौकात सुरु असताना त्या ठिकाणी पोलिसांच्या मदतीसाठी असलेले दोन वार्डन मदतीसाठी धाऊन आले. चिडलेल्या काही कोळी तरुणांनी दोन पोलीस आणि दोन वार्डन यांना मारहाण केली. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीसांनी तिघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार युवराज बनसोडे हे करीत आहेत.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!