Breaking News

जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम |
V. S. News
पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्यावर बलात्कार व अँट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल

व्हिएस न्यूज - महिलेवर लैंगिक अत्याचार करत त्याचे चित्रीकरण करून ते युट्युबवर अपलोड करणाऱ्या पुणे पोलिस दलातीस कर्मचारी असिफ पटेल याच्यासह दोघांवर कोंढवा पोलिस ठाण्यात बलात्कार बलात्कार व अँट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडित युवतीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिस कर्मचारी असिफ पटेल, सनी सुरेश डिंबर व चिराग त्रिवेदी अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत युवती व पटेल यांची ओळख होती. त्याने पिडीतेवर 2009 सालापासून वेळोवेळी बलात्कार केला. तसेच अत्याचार करतानाच्या घटनेचे चित्रीकरण करून ते युट्युबवर अपलोड केले होते. त्यानंतर पटेल व त्याच्या दोन साथीदारांनी तिच्यावर अत्याचार करून जातिवाचक शिवीगाळ करण्यात येत होता.

अखेर या सर्व प्रकाराबाबत वरिष्ठांकडे तक्रार केल्यावक असिफ पटेलला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...Read More

V. S. News
केएसबी पंप कंपनीमध्ये दहा हजारांची वेतनवाढ

व्हिएस न्युज - केएसबी पंप कंपनी व्यवस्थापन आणि केएसबी मजदूूर युनियन यांच्यात नुकताच वेतनवाढीचा करार संपन्न झाला. कामगारांना सरासरी दहा हजारांची वाढ दिली असून किमान 66 हजार 910 तर कमाल 79 हजार 772 रूपये कमाल वेतन मिळणार आहे. यामुळे कामगारांनी गुलालाची उधळन करून आंनद साजरा केला.

करारावर कंपनीच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक राजीव जैन, संचालक गिरीष कुलकर्णी, फारूख भतैना, मिलिंद खाडिलकर, महाव्यवस्थापक नितीन पाटील, रवींद्र सवदीकर यांनी तर कामगारांतर्फे युनियनचे श्याम चक्रनारायण, महासचिव संजय कदम, सतिश सगळगिके, अविनाश कवडे, दत्तात्रेय कारभारी यांनी स्वाक्षरी केल्या.

सोळा महिन्यांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर व्यवस्थापनाने ही वाढ केली आहे. तीन वर्षांसाठी ही वेनतनाढ असून नोव्हेंबर 2016 ते 2019 पर्यंत लागू असणार आहे. त्याचबरोबर वैद्यकीय खर्च, जेवण, कामगारांच्या मुला-मुलींना शैक्षणिक शिष्यवृत्ती आदी सोई-सुविण्या देण्यात येणार आहेत

...Read More

V. S. News
निरामय रूग्णालयात आरडा-ओरड करणाऱ्या माय लेकांवर गुन्हा 

व्हिएस न्यूज - पतीच्या उपचाराची कागदपत्रे घेवून जाण्यासाठी आलेल्या पत्नी व मुलाने रूग्णालयात आरडा-ओरड करून एका महिलेचा मोबाईल हिसकावून नेला. याप्रकरणी माय लेकांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास चिंचवड येथील निरायम रूग्णालयात घडला.

निरायम रूग्णालयातील महिला कर्मचाऱ्याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अनुज कनवलराज डॅंग (वय-27) व त्याची आई या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी महिलेच्या पतीने निरामय रूग्णालयात उपचार घेतले होते. त्या उपचाराची कागदपत्रे घेवून जाण्यासाठी महिला व तिचा मुलगा अनुज शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास रूग्णालयात आले होते. उपचाराची कागदपत्रे उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मागितली. डॉक्टरांनी कागदपत्रे संबंधित टेबलवरून घेवून जाण्यास सांगितले. टेबलवरील महिलेशी कागदपत्रे घेताना आरोपी महिलेचा व तिच्या मुलाचा वाद झाल्याने दोघांनी फिर्यादी महिलेला शिवीगाळ करत आरडा-ओरड केली. फिर्यादी महिलेच्या हातातील मोबाईल घेवून पसार झाले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर सुर्यवंशी अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
मोटारीची दुचाकीला धडक; दोघांचा उपचारापुर्वीच मृत्यू , एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

व्हिएस न्यूज - मित्रासोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी दुचाकीवरून जाताना भरधाव वेगातील मोटारीने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पौड रस्त्यावरील वुड्‌स हॉटेलसमोर शनिवारी पहाटे घडली.

मानस उपाध्याय (वय-18, रा. न्याती एम्पायर खराडी) आणि कुणाल शर्मा (वय-18, रा. विमाननगर, पुणे) अशी मृत्यू झालेल्या तरूणाची नावे आहेत. मोटार चालक दर्शन विजय जमदाडे (वय-25, रा. बावधन) याला हिंजवडी पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अमरनाथ सिंग राजेशसिंग (वय-18, रा. खराडी) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमरनाथसिंग, धु्रव बिष्णोई, शुभम मदार, कुणाल शर्मा आणि मानस उपाध्याय हे शनिवारी पहाटे दुचाकीवरून भुगांव येथील कॅफ सीओ-2 या हॉटेलमध्ये जेवनासाठी जात होते. हॉटेल वुड्‌स समोर भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने धु्रव, मानस आणि शुभम व कुणाल यांच्या दोन्ही दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये कुणाल आणि मानस यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर धु्रव व शुभम हेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मानस, कुणाल, शुभम आणि ध्रुव हे चौघे खराडी परिसरातील एका महाविद्यालयात बीबीएच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होते . आरोपी दर्शन जमदाडे हा भांडारकर रोड येथील एका कंपनीत मार्केटींग हेड म्हणून काम करतो. शुक्रवारी रात्री तो जेवन करून होंडा एकॉर्ड कारने बावधन येथील आपल्या घरी निघाला होता. भरधाव वेगात असलेल्या त्याच्या कारने तीन दुचाकींना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की तीनही दुचाकींचा चक्काचुर झाला.

याप्रकरणाचा अधिक तपास हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद पगारे करीत आहेत.

...Read More

V. S. News
पादचारी वृध्द महिलेचे मंगळसुत्र हिसकावले 

व्हिएस न्यूज - पायी घरी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी 87 हजार रूपये किंमतीचे मंगळसुत्र हिसकावले. महिलेने प्रतिकार केल्याने अर्धे मंगळसुत्र घेवून चोरटे पसार झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास वाकड पोस्ट कार्यालयाजवळ घडली.

60 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला पती, भावजय व भाऊ यांच्यासह मुंबई येथे जाणाऱ्या गाड्यांचा थांबा बघून पायी घरी जात होती. समोरून आलेल्या दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावण्याचा प्रयत्न केला. परंतू, महिलेने प्रतिकार करत मंगळसुत्र पकडून ठेवल्याने अर्धे मंगळसुत्र हिसकावून चोरटे पसार झाले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. आर. लोंढे अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
दुचाकीची ट्रकला धडक, तरूणाचा मृत्यू 

व्हिएस न्युज - दुध पिशवी टाकणाऱ्या तरूण दुचाकीस्वाराने ट्रकला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन तरूणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी सात वाजता आकुर्डीतील खंडोबा माळ चौकात घडली.

अनिकेत अण्णासाहेब जकाते (वय-18, रा. दळवीनगर, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. प्रतिक गायकवाड (वय-19) याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रतिक व अनिकेत दुध पिशवी टाकण्याचे काम करतात. शुक्रवारी सकाळी सात वाजता निगडीत दुध पिशवी टाकून खंडोबा माळ चौकातून भरधाव वेगाने जाताना अनिकेतचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकीने निगडीच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकला धडक दिल्याने अनिकेतचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेला प्रतिकही किरकोळ जखमी झाला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. बी. खारगे अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
वाल्हेकरवाडीतील गोळीबार किरकोळ कारणावरून  

व्हीएस न्युज-दारू पिऊन रस्त्याच्या मध्ये बुलेट आडवी लावून थांबलेल्या दोघांना बुलेट काढण्यास सांगितली. यावरून झालेल्या भांडणातून दोघांनी मोटार चालकाला मारहाण केली. चालकाने आपल्या साथीदारांना येऊन आल्यानंतर झालेल्या भांडणातून एका सराईत गुन्हेगारावर 20 मार्च रोजी गोळीबार झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीकडून एक पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. दौला जबार नदाफ (वय-27, रा. पिंपळे-गुरव), अजमत शेख (वय-28, रा. वेताळनगर, चिंचवड), सद्दाम शौकत अली नदाफ (वय-27, रा. बिजलीनगर,चिंचवड) शिवाजी तानाजी सोलनकर (वय-21, रा. मोरयानगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सराईत गुन्हेगार जयवंत चितळकर याच्यावर गोळीबार झाला होता. त्याचा साथीदार निलेश कोळपे हा मारहाणीत जखमी झाला होता. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 मार्च रोजी सराईत गुन्हेगार चितळकर व त्याचे साथीदार मकरंद वाल्हेकर, निलेश कोळपे शिवाजी चौकात दारू पिऊन बसले होते. त्यांची बुटेल भरस्त्यात आडवी लावली होती. यावेळी आरोपी दौला नदाफ याचा मामा अजमर शेख मोटारीने जात होते. त्यांनी हॉर्न देऊन बुलेट रस्त्यामधून काढण्यास सांगितली. यावरून चितळकर व कोळपे यांनी शेख यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यामुळे शेख यांनी आरोपी दौला नदाफ, सद्दाम नदाफ, शिवाजी सोलनकर यांना बोलवून घेत चितळकर व कोळपे यांना मारहाण केली. या वादावादीमध्ये चितळकर याने दौला नदाफ याच्यावर पिस्तुल रोखले. त्याचवेळी सद्दामने पिस्तुल हिसकावून घेवून गोळीबार केल्याने चितळकरच्या दंडाला गोळी लागली. दरम्यान, जखमी चितळकर व कोळपे यांनी याबाबत फिर्याद देण्यास नकार दिल्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलीसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला. त्याच अंनुुषगाने पोलीसांनी तपास करत चारही आरोपींना अटक केली. निलेश कोळपे याला अटक करत त्याच्याकडून एक पिस्तुल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कामगिरी चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, फौजदार रघुनाथ सोडनवर, पोलीस नाईक सुधाकर आवताडे, ऋषिकेश पाटील आदींच्या पथकाने केली.

...Read More

V. S. News
पिंपरीगावातील शशिकांत वाघेरे यांचे दुख:द निधन

व्हीएस न्यूज - पिंपरीगावातील शशिकांत सोपानराव वाघेरे पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज पहाटे निधन झाले, ते G.K.N. SINTER METALS PVT. LTD कंपनी मध्ये गेली ३० वर्षे काम करत होते. तसेच गेली १५ वर्षे ते कामगार युनियनचे पदाधिकारी होते, त्यांच्या मागे पत्नी दोन मुले एक मुलगी, नातवंडे व भाऊ असा परिवार आहे, त्यांचे वय ६२ वर्षे होते. आज सकाळी ११.०० वाजता पिंपरीगावातील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांचे ते चुलते होते. तर शहर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष संतोष वाघेरे यांचे ते वडील होते. गुरूवार दि.२९ मार्च रोजी सकाळी पिंपरीगावातील पवना नदीच्या घाटावर दशक्रिया विधी होणार आहे.

...Read More

V. S. News
‘बबन’ चित्रपटात पिंपरी-चिंचवडची जान्हवी कांबीकर

व्हीएस न्यूज - शुक्रवारी प्रदर्शित होणा-या बबनया मराठी चित्रपटात पिंपरी चिंचवड मधील जान्हवी कांबीकर या बालकलाकाराला छोटीसी भुमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. ख्वाडाया पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पारितोषिक मिळालेले दिग्दर्शक भाऊसाहेब क-हाडे यांचा बबनचित्रपट शुक्रवारी राज्यातील बहुतांश चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तुत व चित्राक्ष फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे बहुतांश शुटिंग रांजणगाव येथे झाले. कष्टकरी शेतक-यांच्या जीवनप्रवासावर आधारीत कथानक असलेल्या या चित्रपटात चिखली शरदनगर येथील अमृता विद्यालयात आठवी इयत्तेत असणारी जान्हवी कांबीकर हिने एमआयडीसीतील गरीब कामगार मुलीची भूमिका साकारली आहे. भाऊसाहेब शिंदे, गायत्री जाधव हे मुख्य कलाकार आहेत. रांजणगाव येथे ३५ सेंटीग्रेड तापमानात भर उन्हात प्रथमच कॅमेरासमोर उभी राहिलेली जान्हवी म्हणाली मागील वर्षी बालेवाडी येथे या चित्रपटाच्या ऑडीशन्स झाल्या तेव्हा माझीभाऊकाकांनीनिवड केली. ज्याप्रमाणे आपण घरी आई वडीलांशी बोलतो अगदी तसेच चित्रपटातील संवाद माझ्याकडून भाऊकाकांनी वदवून घेतले. माझी भुमिका यात छोटीशी असली तरी प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी आहे. स्वप्निल पटेकर, नितीन वाघ हे देखील पिंपरी चिंचवड मधील कलाकार यात आहेत. कष्टकरी युवा शेतक-याच्या जीवनातील संघर्षमय वास्तव प्रवास आणि त्याला गुलाबी प्रेमाची झालर असे कथानक असलेल्या बबन चित्रपटातील स्थानिक कलाकारांचे काम पाहण्यासाठी प्रेक्षकांना शुक्रवारी २३ मार्चला चित्रपटगृहात जायला हवे असे ती म्हणाली.

...Read More

V. S. News
शहरातील महापुरूषांच्या पुतळ्यांना मेघडंबरी बसवा – अमित बच्छाव

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या अर्धकृती पुतळ्यास मेघडंबरी बसवा,अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केली आहे.

अमित बच्छाव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी पेट्रोल पंम्पाच्या जवळ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व चिंचवड पेट्रोल पंम्पाच्या जवळ आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे आणि त्यांचे शिष्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा अर्धकृती पुतळा उभारण्यात आला होता. परंतु पुतळा परिसराची दुर्दशा झाली आहे. या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याकडे पालिकेचा आरोग्य विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. तरी पुतळा परिसराची स्वच्छता करण्यात यावी. तसेच सदर पुतळ्यांना उत्कृष्ठ प्रतीची, दर्जेदार, आकर्षक मेघडंबरी उभारण्यात यावी, असे बच्छाव यांनी म्हटले आहे.

...Read More

V. S. News
पुण्यात पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे

व्हीएस न्यूज - आता पुण्यात रस्त्यावर गाडी पार्क करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. ही मंजुरी महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली असून दुचाकीसाठी तासाला २ ते ४ रूपये तर चारचाकी गाडीसाठी १० ते २० रूपये तासाला मोजावे लागणार आहे.

संपुर्ण शहरभर पे अँन्ड पार्क योजना आणण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून शहराचे वेगवेगळे झोन त्यासाठी करण्यात आले आहेत. त्यामध्ये अ झोनमध्ये कमी वर्दळ पार्किंग, ब झोनमध्ये तीव्र वर्दळ आणि क झोनमध्ये अती तीव्र अशी विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पार्किंगचे दर ठरवण्यात आले आहे. दुचाकीला रस्त्यावरील पार्किंगसाठी अ भागासाठी २ रूपये तासाला आकारण्यात येणार आहे. तर क भागासाठी ४ रूपये आकारण्यात येणार आहेत. तर चार चाकी वाहनांसाठी प्रति तासासाठी १० आणि २० रूपये अशा पध्दतीचे शुल्क आकारण्यात येणार आहेत. रात्री पार्किंगसाठी रात्री १० ते सकाळी ८ असा कालावधी असेल. एका दिवसासाठी १० रूपये आकारण्यात येतील. पुणे महापालिका प्रशासनाकडून शुल्क मोजनीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. त्या प्रस्तावाला आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

...Read More

V. S. News
आता डीझेल मिळणार घरपोच

व्हीएस न्यूज - आजकाल आपण गर्दी टाळावी म्हणून आवश्यक वस्तू ऑनलाईन खरेदी करण्यास प्राधान्य देतो. त्यात आता पेट्रोल पंपावरील गर्दी टाळण्याची सोय झाली असून ग्राहक आता घरपोच डीझेल मिळवू शकणार आहेत. सध्या ही सेवा पुणे शहरात सुरु झाली असून इंडिअन ऑइल कार्पोरेशन हि सेवा देत आहे. त्यांच्या ट्विटर अकौंटवर हि माहिती दिली गेली आहे.

काही दिवसापूर्वी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वाहनचालकांचा पेट्रोल पंपावर इंधन घेण्यासाठी जाणारा वेळ वाचवा म्हणून सरकार ग्राहकांना घरपोच इंधन पुरविण्याचा विचार करत असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार डीझेल घरपोच देण्याच्या सेवेला पेट्रोलियम व एक्सप्लोझीव सेफ्टी ऑर्गनायझेशनने मान्यता दिली आहे. पेट्रोलचा मानाने डीझेल कमी ज्वलनशील असल्याने सध्या डीझेल घरपोच दिले जात असल्याचे सांगितले जात आहे. कालांतराने पेट्रोलसाठीही हि सेवा सुरु केली जाणार आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!