Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
भोसरी पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकपदी संपतराव भोसले

व्हीएस न्यूज - भोसरी पोलिस ठाण्याच्या प्रभारी प्रमुखपदी (वरिष्ठ निरीक्षक) संपतराव भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भोसरीचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक दिलीप कुलकर्णी यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वी भोसरी पोलिस ठाण्यात नियुक्त असणा-या सहाय्यक निरीक्षकास व शिपाईला ५० हजारांची लाच घेताना अटक करण्यात होती. तसेच मागील अनेक महिन्यांपासून भोसरीच्या तपास पथकाकडून कोणताही मोठा गुन्हा उघडकीस आणलेला नाही. तसेच चो-या रोखण्यात यश आलेले नाही. त्यामुळे भोसले यांना भोसरीच्या वरिष्ठ निरीक्षकपदी नियुक्त केल्याचे समजते. तर कुलकर्णी यांनी वैद्यकीय कारणामुळे स्वत:हून बदली मागून घेतल्याचे सांगितले जात आहे.

...Read More

V. S. News
आकुर्डीत डंपरच्या धडकेत महाविद्यालयीन तरूणाचा मृत्यू

व्हीएस न्यूज - आकुर्डी येथील म्हाळसाकांत शाळेजवळ आज सकाळी नऊच्या सुमारास एका डंपरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला.

आशिष दीपक पावसकर (वय, २१ शुभश्री सोसायटी, आकुर्डी) असे मयत तरुणाचे नाव असून तो सिम्बायोसिस महाविद्यालयात इंजिनिअरिंगला शिकत होता. तर त्याचे वडील मुंबईला राहतात. आई शिक्षिका असून आई व मुलगा दोघेही आकुर्डीत राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष त्याच्या मित्रासोबत (एम एच १४ एआय ८७४८) या अॅक्टिव्हा गाडीवरून खंडोबा चौकातून म्हाळसकांत चौकात जात होता. यावेळी त्याला नवीन चासी असणाऱ्या डंपरने धडक दिली. यात आशिषच्या डाव्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व तो जागीच मरण पावला तर त्याचा मित्रही गंभीर जखमी झाला आहे. जखमी मित्र व आशिषला वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले असून डंपर चालकाला निगडी पोलिसांच्या ताब्यात आहे.

...Read More

V. S. News
प्रा.रामकृष्ण मोरे सभागृहात शनिवारी अभिव्यक्ती कथक नृत्य

व्हीएस न्यूज - गुरुपौर्णिमेनिमित्त पायल नृत्यालयाच्या वतीने ‘’अभिव्यक्ती’’ हा कथक नृत्याचा कार्यक्रम शनिवार ४ नोव्हेंबर रोजी चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दुपारी १२ ते ३ या वेळेत होणार आहे. जगप्रसिद्ध नृत्यांगना पंडीता मनिषा साठे यांच्या ज्येष्ठ शिष्या पायल गोखले आणि त्यांच्या विद्यार्थिनी कार्यक्रम सादर करतील.

या कार्यक्रमाला गुरु पंडिता मनिषा साठे, गुरु पं. नंदकिशोर कपोते, प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत निगुडकर उपस्थित राहणार असून कार्यक्रमात वैविध्यपूर्ण कथकाविष्कारांचा आनंद उपस्थितांना घेता येईल. कथक नृत्याविष्काराने परिपूर्ण अशा या कार्यक्रमात कथकचे विविध रंग पाहायला मिळतील. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनाने होणार असून सरस्वतीवंदना, झपताल, खंडिता गुरु पायल गोखले सादर करतील. तर, अभंग, तराणा, तालप्रस्तुती, होरी, शिवस्तुती, ठुमरी, सतारवर कथकनृत्य हे प्रकार विद्यार्थीनी सादर करतील. गेली १० ते ११ वर्षे पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत असलेल्या पायल नृत्यालयाने आजवर कथकच्या विविध कार्यक्रमांची मेजवानी रसिकांनी दिली आहे. अभिव्यक्तीतूनही सुरेख कथकचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पायल नृत्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

...Read More

V. S. News
शासकीय गोदामाची जागा मेट्रोच्या ताब्यात

व्हीएस न्यूज - पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात होत असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी आवश्‍यक असलेल्या शिवाजीनगर शासकीय गोदामाच्या जागेचा आगाऊ ताबा महामेट्रोला मिळाला आहे. सदर जागा मेट्रोला सुपूर्द करण्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने नुकताच अध्यादेश जारी केला आहे. त्यामुळे 2.67 हेक्‍टरची जागा महामेट्रोच्या ताब्यात मिळेल, असे महामेट्रोच्या वतीने कळविण्यात आले आहे.

याबाबत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मेट्रो मार्गिकां दरम्यान शिवाजीनगर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणी शिवाजीनगर ते हिंजवडी ही मेट्रो लाईन देखील एकत्र येणार आहे. त्यामुळे हे ठिकाण पुणेकरांसाठी महत्त्वाचे असेल. याच बरोबरच या जागेचा आगाऊ ताबा मिळाल्याने प्रकल्पाला आणखी वेग येणार आहे. ही जागा मेट्रोला आगाऊ ताब्यात देण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नाबद्‌ल शासनाचे महामेट्रोच्या वतीने आभार मानले आहेत.

...Read More

V. S. News
जिल्हा रुग्णालयाचा आमदार जगताप यांनी घेतला आढावा

व्हीएस न्यूज - औंध येथील जिल्हा रुग्णालयात अनेक समस्या आहेत. या समस्यांचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सोमवारी (दि. 30) रुग्णालयाला भेट दिली. या वेळी रुग्णालयाच्या कामकाजावर नाराजी दर्शवत काम सुधारण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. के. शेळके यांना त्यांनी दिल्या.

यावेळी आमदार जगताप यांनी रुग्णालयाच्या ओपीडी (बाह्यरुग्ण विभाग), केसपेपर विभाग, महिला विभाग, डोळ्यांचा विभाग, लॅब व लहान मुलांच्या लसीकरण विभागाला भेट दिली. प्रत्येक विभागाच्या अडचणी विचारून घेतल्या. या अडचणी त्वरित सोडविण्याची सूचना डॉ. आर. के. शेळके यांना दिली. जिल्हा रुग्णालयात प्रतीक्षालय लाखो रुपये खर्च करून बांधले आहे. तरी अद्याप ते बंद अवस्थेतच आहे. सार्वजनिक बाधकाम विभागाकडून काही काम अपूर्ण असल्याचे डॉ. शेळके यांनी सांगितले; तसेच त्यांनी महिला प्रतीक्षालयाला भेट दिली. सदर प्रतीक्षालय गेले वर्षभर बंद असल्याचे दिसून आले. या वेळी सदर प्रतीक्षालयात लिफ्टचे सामान असल्याचे डॉ. आर. के शेळके यांनी सांगितले. आ. जगताप यांनी हे प्रतीक्षालय त्वरित सुरू करण्याच्या सूचना दिल्या. यावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. के. शेळके व सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा प्रमुख कदम यांना पुढील कार्यवाहीसाठी सूचना दिल्या;

तसेच त्यांनी रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी कार्यालयाला भेट दिली. प्रशासकीय कार्यालयात भेट दिली असता, मोजकेच कर्मचारी उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. प्रशासकीय अधिकारी संजय राठोड व कार्यालयाच्या अधीक्षक या ठिकाणी उपस्थित नव्हते. पुणे जिल्हा रुग्णालयाचा एकूण कारभार सुधारण्यासाठी डॉ. आर. के. शेळके यांना सूचना व कडक शब्दांत समज त्यांनी दिली.

...Read More

V. S. News
ताल मॅन्युफॅक्‍चरिंगच्या कामगारांना वेतनवाढ

व्हीएस न्यूज टाटा मोटर्सची उपकंपनी असलेल्या ताल मॅन्युफॅक्‍चरिंग सोल्युशन कंपनीच्या सुमारे सव्वाशे कामगारांना आठ हजार सहाशे रुपयांची भरीव वेतनवाढ देण्यात आली आहे. टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे कामगार प्रतिनिधी आणि व्यवस्थापन यांच्यात हा करारकरण्यात आला. गेली 25 महिने रखडलेला करार अखेर झाल्याने कामगारांना दिलासा मिळाला आहे. हा करार एक सप्टेंबर 2015 ते 31 ऑक्‍टोबर 2018 या तीन वर्षांसाठी असणार आहे.

करारानुसार पगारातील वाढीव रक्‍कम तीन टप्प्यात देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक वर्षी फिक्‍स 3400 रुपये वाढ ही देण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या वर्षी 9 हजार 592, दुसऱ्या वर्षी 10 हजार 882 तर तिसऱ्या वर्षी 12 हजार रुपये इतकी वेतनवाढ होणार आहे.

टाटा मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक सतीश बोरवणकर, ताल कंपनीचे अध्यक्ष आर.एस.ठाकूर यांच्यामुळे हा करार होऊ शकला. व्यवस्थापनाच्या वतीने मुख्य संचालन अधिकारी अमित भिंगुर्डे, शंतनू सील, सुहास कुलकर्णी आदींनी तर युनियनच्यावतीने अध्यक्ष समीर धुमाळ, कार्याध्यक्ष सतीश काकडे, महासचिव उत्तम चौधरी, तालचे प्रतिनिधी राम भगत, राजेंद्र पाटील आदींनी स्वाक्षरी केली. तांत्रिक सहायक म्हणून संदीप पिंगळे यांनी काम पाहिले.

...Read More

V. S. News
प्राणी संग्रहालयातील सर्पांसाठी उंदीर खरेदी घोटाळा



व्हीएस न्यूज संभाजीनगर येथील महापालिकेच्या निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले नाहीत. याचाच फायदा घेवून तेथील मानधनावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने मगरीची पिल्ले, अजगर, मांडूळाच्या चोरीसह त्यांच्याविषाची तस्करी करु लागले आहेत. तसेच, प्राणी संग्रहालयात दिल्ली सेंट्रल झू ऍथोरिटीच्या नियमांची पायमल्ली करुन संबंधित अधिकाऱ्यांस राहण्यास घर उपलब्ध केले आहे. विशेष म्हणजे, सर्पांसाठी खाद्य म्हणून उंदीर खरेदी केली जाते. हाफकिन या संस्थेकडून एक उंदीर 75पैशाला मिळतो. मात्र, जीबी एन्टरप्रायझेस या खासगी संस्थेकडून तब्बल 138 रुपयाला एक उंदीर खरेदी करण्यात येत आहे. यामध्ये संबंधितांनी लाखो रुपयांचा घोटाळा केला आहे, अशी टीका आता होवू लागली आहे.

दरम्यान, उंदीर खरेदी आणि सर्व अनागोंदी कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी लोकशाही संस्थेच्या वतीने आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. संभाजीनगर (चिंचवड) येथे महापालिकेने निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय उभाण्यात आलेले आहे.त्या प्राणी संग्रहालयाचा राज्याच्या प्राणी संग्रहालय प्राधिकरणात समाविष्ठ करण्यात आलेला आहे. दिल्लीच्या सेंट्रल झू ऍथोरिटीच्या परवानगीने बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयात स्थापत्य विषयक कामे सुरु करण्यात आली. तसेच पक्षी, प्राणी यांच्या राहणीमानच्या अनुषंगानेसंग्रहालयात विविध बदल करण्यात येवू लागले आहेत. त्यानूसार प्राणी संग्रहालयात ऍनाकोंडा देखील आणण्याची तयारी महापालिकेने दर्शवली होती.

परंतु, त्या ऍनाकोंड्यास राहण्यास योग्य जागा व पुरक वातावरण नसल्याने तो प्रस्ताव अद्याप बारगळला आहे. बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील सुरुवातीच्या काळातील पक्षी, प्राणी अन्यत्र स्थलातंर केले आहेत. सध्यस्थितीत काही मोजकेच प्राणी, पक्षी पाहावयास मिळतआहेत. प्राणी संग्रहालयातील मानधनावरील कर्मचाऱ्याकडून योग्य हाताळणी होत नसल्याने सर्पांसह पक्ष्यांची विक्री होवू लागली आहे. महापालिकेचे योग्य नियंत्रण नसल्याने कर्मचाऱ्यामार्फत हे प्रकार वाढले आहेत. संग्रहालयातून सर्पांची चोरी होवूनही पालिकेने अद्याप धडाघेतलेला नसून त्या ठिकाणच्या अतंर्गत भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत.

दरम्यान, महापालिकेने दिल्लीच्या सेंट्रल झू ऍथोरिटीच्या नियमांची पायमल्ली करुन प्राणी संग्रहालयात राहण्यास घर देतो येत नाही.पण, तरीही संबंधित अधिकाऱ्यास घर उपलब्ध करुन दिले आहे. प्राणी संग्रहालयात अधिकारी वास्तव्य करीत असतानाही पक्षी, प्राणी यांची तस्करीआणि सर्पांच्या विषाची तस्करी होवू लागली आहे. प्राणी संग्रहालयातून अजगर, मगर, मोर, मांडूळ यांची चोरी होवूनही उर्वरित प्राण्याची नोंद ठेवलेली नाही. प्राण्यांच्या खाद्य खरेदीत प्रचंड अपहार होत आहे, त्यानूसार हापकिनमधून 75 पैशाला 1 उंदीर हे सापाला खाद्य मिळतअसताना जीबी एटरप्रायझेस यांच्याकडून 138 रुपयाला 1 उंदीर खरेदी करुन लाखो रुपयांची उधळपट्टी सुरू आहे.याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. याविषयी अधिक माहिती देण्यास संबंधित उद्यानातील अधिकारी टाळाटाळ करीत आहेत.

महापालिका प्राणी संग्रहालयात सर्पांची चोरी, त्यांच्या विषाची तस्करी होवूनही आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतलेले नाही, अजगराची चोरी झाल्यानंतर तीन दिवस विलंब लावून हा प्रकार दाबण्याचा प्रकार सुरु होता. सुरुवातील मगर चोरीलागेल्यानंतर त्या प्रकरणी सुरु असलेली चौकशी तपास थांबविण्यात आला, त्यानंतर पुन्हा एक मगर चोरीला गेल्याचे दिसून आले. तसेच सात मोरापैकी एक मोरही गायब आहे. सर्प उद्यानात सापांच्या मृत्यूचे प्रमाण अचानक वाढले आहे. त्याशिवाय ऍनिमल किपर भरती प्रकरणातगुणांमध्ये घोळ करुन वशिलेबाजीने प्रशिक्षित नसलेल्या उमेदवाराची भरती झाल्याचे दिसून आले आहे. एवढे गंभीर प्रकार घडूनही महापालिका आयुक्‍त हर्डीकर हे जणु काही घडलेच नाही, अशा अविभार्वात राहिले आहेत. प्राणी व पक्षी चोरी प्रकरणाचा तपास दप्तरी दाखलकरण्यात आल्याची चर्चा आहे. याबाबत वरील प्रकरणाची तत्काळ चौकशी करुन संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी लोकशाही संस्थेचे अजय लोंढे यांनी मुख्यमंत्र्यासह आयुक्‍तांकडे केली आहे.

...Read More

V. S. News
टेम्पोच्या धडकेने नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

व्हीएस न्यूज चिंचवड येथील महावीर चौकात रस्ता ओलांडत असलेल्या नऊ वर्षांच्या मुलाचा टेम्पोने धडक दिल्यामुळे मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञात टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगेश भोसले वय 34, रा. मंचर, शिंदेवाडी, आंबेगाव यांनी फिर्याद दिली आहे. भोसले यांचा नऊ वर्षांचा मुलगा राजवीर सोमवारी (दि.30)हा जेवण बनविण्यासाठी पाणी आणायला महावीरचौक येथून भारत पेट्रोल पंपावर चालला होता. त्यावेळी वेगाने आलेल्या एका टेम्पोने त्याला जोरदार धडक दिली. यामुळे गंभीर जखमी झालेल्या राजवीरचा मृत्यू झाला.

...Read More

V. S. News
देशात अखंडता राखण्याचे काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले – आयुक्त श्रावण हार्डीकर

व्हीएस न्यूज - लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी देशभरात सर्वत्र “एकता दिवस” साजरा करण्यात येत आहे. त्या निमीत्ताने पिंपरी-चिंचवड सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समितीच्यावतीने आज(मंगळवार, दि.३१ रोजी) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एकता दौडचे आयोजन करण्यात आले. चिंतामणी चौक ते भेळ चौक, प्राधिकरण अशा “एक भारत, श्रेष्ठ भारत –एकता दौड”चा प्रारंभ आयुक्त श्रावण हर्डीकरयांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून चिंतामणी चौक येथून करण्यात आला.

यावेळी, चिंतामणी चौक येथे उपस्थित असलेल्या नागरिकांना आयुक्त हार्डीकर यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. या कार्यक्रमास, स्वच्छ भारत अभियानाचे ब्रॅन्ड ॲम्बेसेडर चंद्रकांत कुलकर्णी, सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार, उपमहापौर शैलेजा मोरे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, नगरसेवक नामदेव ढाके, ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, नगरसेविका करुणा चिंचवडे, नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, नगरसेविका अनुराधा गोरखे, माधुरीकुलकर्णी, उद्योजक कुंदन ढाके, मिलिंद चौधरी, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, बिभीषण चौधरी, शंकर पाटील, रुपेश पाटील, दिपक महाजन, प्रदिप पटेल, भुषण पाटील, प्रमोद चौधरी, अनुप मोरे, प्रवीण पाटील, किरणचौधरी, रविंद्र बऱ्हाटे, डॉ. प्रशांत पाटील, किरण पाचपांडे, गौरी सरोदे, निना खर्चे, दत्ता पाटील उपस्थित होते.

या दौडमध्ये, सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठाण, समता भातृ मंडळ, गुजर स्नेहवर्धिनी, केदारेश्वर प्रतिष्ठाण, लेवा पाटीदार संघ (भातृ मंडळ), लेवा पाटीदार मित्र मंडळ सांगवी, लेवा युवा संघ, लेवा संघिनी मंच, लेवा शक्ती यासंघटनांसह विद्यार्थी, क्रीडा संघटना तसेच, महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. चिंतामणी चौक येथून सुरुवात झालेल्या दौडचा समारोप भेळ चौक ते पुन्हाचिंतामणी चौक असा झाला.

यावेळी, आयुक्त हार्डीकर म्हणाले, देशाची अखंडता राखण्याचे काम लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले असून देशभरात त्यांच्या जयंतीनिमीत्त एकता दौड आयोजित केली जाते. ही दौड देशातील राष्ट्रीय एकात्मताटिकवून ठेवण्यासाठी मदत करीत असून यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सहभागी होत आहे. त्यामुळे हा देश एक राहिल, देशाची अखंडता कायम राहणार असून कोणतीही शक्ती देशात दुरावा निर्माण करू शकणार नसल्याचेत्यांनी सांगितले.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या सामर्थ्याने, आपल्या बौद्धिक कौशल्याने, आपल्या राजकीय इच्छाशक्तीने देशाला एकतेचा संदेश दिला. त्यानुसार, प्रत्येक भारतीयाने देखील देशभक्तीच्या भावनेने भारताची एकता मजबूतबनवण्यासाठी आपापली जबाबदारी पार पाडायला हवी. देशात अंतर्गत विरोध जागृत करण्यासाठी, अनेक प्रकारच्या शक्ती कार्यरत आहेत. अशा वेळी एकतेसाठी जागरूक प्रयत्न करणे आवश्यक असते, हा उद्देश्य समोर ठेवूनरॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे मत नगरसेवक नामदेव ढाके यांनी व्यक्त केले.

रक्तदान शिबीरात १०५ बाटल्यांचे संकलन

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमीत्त मंगळवारी चिंचवडमधील आहेर गार्डन येथे केदारेश्वर प्रतिष्ठान व पिंपरी सिरॉलॉजिकल इन्स्टीट्यूट ब्लॅड बँक यांच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात १०५रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबीरासाठी डॉ. धर्मेंद्र गांधी, डॉ.ई.बी.पाटील, डॉ. जितेंद्र कोलते, डॉ. सदानंद नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष कांबळे, अमोल जानुगडे, तेजंद्र गिरासे, किरण वानखेडे, दिपक पाटील आदींनीसहकार्य केले.

...Read More

V. S. News
भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

व्हीएस न्यूज काळेवाडी येथील उड्डाणपुलावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचालकाने धडक दिल्याने एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना 10 ऑक्‍टोबर रोजी रात्री आठ वाजता घडली.वाकड पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल केला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीकांत यशवंत कांबळे (वय.28, रा.सिद्धार्थनगर, दापोडी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. 10 ऑक्‍टोबर रोजी रात्री आठ वाजता डांगे चौक ते काळेवाडी या उड्डाणपुलावरुन श्रीकांत दुचाकीवरून जगताप डेअरी चौकाकडे येत होता. यावेळी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका कारने श्रीकांतच्या दुचाकीला धक्का दिला. यामध्ये श्रीकांत गंभीर जखमी झाला.

कारचालक अपघात झाल्यानंतर घटनास्थळी थांबला नाही किंवा श्रीकांतला रुग्णालयातही न नेता तेथून पळ काढला. इतर नागरिकांनी तातडीने श्रीकांतला दवाखान्यात दाखल केले मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात कारचालका विरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक टी.एस.भोगम पुढील तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
लोगो बनवा स्पर्धेसाठी मुदतवाढ

व्हीएस न्यूज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संभाजीनगर, चिंचवड येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान व प्राणिसंग्रहालयासाठी लोगो बनवा स्पर्धा आयोजित केली आहे. त्यासाठी 20 ऑक्‍टोबरपर्यत मुदत होती. ही मुदत वाढवून 10 नोव्हेंबर 2017 करण्यात आली आहे.

महापालिकेतर्फे निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाचा बृहत्‌ विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने विविध विकासकामे सध्या सुरू आहेत. स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने प्राणिसंग्रहालयाचा नवीन लोगो बनविण्याचे प्रस्तावित होते.

स्पर्धेतील विजेत्या लोगोकरिता 15 हजार रुपये आणि 5 हजार रुपयांची प्रत्येकी दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धा नागरिकांसाठी खुली असून; व्यावसायिक, विद्यार्थी, हौशी कलाकार या स्पर्धेतून आपल्या कल्पना मांडू शकतात. स्पर्धेतील विजेता लोगो निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाचा अधिकृत लोगो म्हणून स्वीकारण्यात येणार आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर या स्पर्धेच्या प्रवेशिका उपलब्ध आहेत; तसेच स्पर्धकांनी तयार केलेले लोगो आणि प्रवेशिका ऑनलाईन पद्धतीने zoopcmcindia.gov.in या “ई-मेल’वर “जेपीईजी’ किंवा “पीडीएफ’ स्वरूपात 10 नोव्हेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. याविषयीची सविस्तर माहिती www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरील पर्यटन, बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय या पानावर उपलब्ध आहे.

...Read More

V. S. News
शाळांमध्ये राष्ट्रीय एकता दिवस साजरा होणार

व्हीएस न्यूज - महापालिकेच्या प्राथमिक शाळा, अनुदानित, खासगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये 31 ऑक्‍टोबर हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तसेच, शाळांमध्ये पाठोपाठ इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे. तसेच भ्रष्टाचार विरोधी जनजागृती समितीच्यावतीने दक्षता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. दक्षता सप्ताह कार्यक्रमाचे देखील शाळांमध्ये साजरा करण्याचे नियोजन करण्यास सांगितले आहे. नुकत्याच शाळा सुरू झालेल्या आहेत. शाळांमध्ये हे कार्यक्रम राबविण्यात यावेत, असे पिंपरी-चिंचवड शिक्षण मंडळ विभागाच्यावतीने परिपत्रक काढले आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!