व्हीएस न्यूज- महापालिकेच्या प्राथमिक शाळा, अनुदानित, खासगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये 31 ऑक्टोबर हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तसेच, शाळांमध्ये पाठोपाठ इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे. तसेच भ्रष्टाचार विरोधी जनजागृती समितीच्यावतीने दक्षता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. दक्षता सप्ताह कार्यक्रमाचे देखील शाळांमध्ये साजरा करण्याचे नियोजन करण्यास सांगितले आहे. नुकत्याच शाळा सुरू झालेल्या आहेत. शाळांमध्ये हे कार्यक्रम राबविण्यात यावेत, असे पिंपरी-चिंचवड शिक्षण मंडळ विभागाच्यावतीने परिपत्रक काढले आहे.