व्हीएसन्यूज चिंचवड येथील महावीर चौकात रस्ता ओलांडत असलेल्या नऊ वर्षांच्या मुलाचा टेम्पोने धडक दिल्यामुळे मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञात टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगेश भोसले वय 34, रा. मंचर, शिंदेवाडी, आंबेगाव यांनी फिर्याद दिली आहे. भोसले यांचा नऊ वर्षांचा मुलगा राजवीर सोमवारी (दि.30)हा जेवण बनविण्यासाठी पाणी आणायला महावीरचौक येथून भारत पेट्रोल पंपावर चालला होता. त्यावेळी वेगाने आलेल्या एका टेम्पोने त्याला जोरदार धडक दिली. यामुळे गंभीर जखमी झालेल्या राजवीरचा मृत्यू झाला.