व्हीएस न्युज - विविधतेने आणि परंपरेने नटलेल्या भारतीय संस्कृतीत सण, उत्सवाला महत्व आहे. खंडप्राय देशात सर्वच धर्मात विविध सण साजरे केले जातात. या सर्व सण - उत्सवाला शास्त्रीय आधार असल्याचे दिसते. शेतीप्रधान देशात भुप्रदेशानुसार संस्कृती विकसित होत गेली. यामध्ये भगवान महावीर यांनी सांगितलेली अहिंसेची परंपरा जपणारी जैन संस्कृती हि देशातील प्राचिन संस्कृती आहे. मातृ - पितृ आणि गुरु परंपरेला महत्व देणारी, अहिंसेचे पालन करणारी जैन संस्कृतीच पाश्चिमात्यांचे अनुकरण करु पाहणा-या ‘युवा डिजीटल पिढीला’ मार्गदर्शक ठरेल असा विश्वास जैन समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते फुलचंद कटारिया यांनी व्यक्त केला.
जैन एकता मंचच्या वतीने आहेर गार्डन चिंचवड येथे नवरात्री निमित्त 15 ऑक्टोबर 2018 रोजी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे चित्रपट कलाकार आलोक नरूला, अंशु मलिक - नरूला, संस्थापक संजय जैन, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा, नगरसेविका करुणा चिंचवडे, उद्योजक दिलीप सोनिग्रा, राजेंद्र मुथा, अशोक बाफना, राहुल मुनोत, करुणेश जैन, कृपाल गेहानी, पंकज सुराणा आदी उपस्थित होते.
जैन एकता मंचचे पदाधिकारी राहुल मुनोत, राजेश सोनिमिढे, भुपेश संकले, भारत बेदमूथा, किरण संचेती, प्रशांत बंब, जितेंद्र संचेती, पारस भटेवरा, विजय सोनी, दिलीप संचेती, संतोष नहार, संतोष लुणावत, आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला होता. सोनिका जैन यांनी नवकार महामंत्राचे पठण केले. स्वागत संजय जैन, सूत्रसंचालन सपना जैन तर आभार राहुल मुनोत यांनी मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002