व्हिएस न्युज - खेड तालुक्यातील डेनेगावमध्ये राहणाऱ्या भाऊ बहिणीचेलग्न ठरत नसल्याने दोघांनी नैराश्यातून आत्महत्या केली.
रंजन गणपत भोपळे (40) तर शैला गणपत भोपळे(38) अशी आत्महत्या केलेल्या भाऊ बहिणीची नावं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊ बहिणीचे
लग्न ठरत नसल्याने दोघांनी नैराश्यातून विषारी औषध पिऊन जीवनयात्रा संपवली. बुधवारच्या सायंकाळी सातच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांना विषारी औषधाचा वास आल्याने, हा प्रकार समोर आला. भाऊ-बहीण दोघेच इथे राहत होते. दोघांचे वय वाढत चालले होते, मात्र लग्न ठरत नव्हते. त्यामुळे दोघे नैराश्यात होते, बऱ्याचदा यावर नातेवाईकांसोबत त्यांच बोलणं ही होत असे. आज मात्र या नैराश्यातून त्यांनी आयुष्य संपवले. खेड पोलीस पुढील तपास करत आहेत.