व्हीएस न्युज - औषधांच्या व्यावसायातील भागीदारीचे बनावट कागदपत्रे तयार करुन चौघाजणांनी मिळून एका महिलेला ४३ लाख ३९ हजार रुपयांना गंडा घातला. ही घटना २२ डिसेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ दरम्यान घडली. याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, सवाराम देवासी (वय ३२), चैनी देवासी (वय ३०), स्मिता देशमुख (वय ३९, तिघे रा. ओम चौक, चिंचवड) आणि योगेश देशमुख (वय ४३) या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची ग्लोबल फार्मा या कंपनीत आरोपींसोबत भागीदारी आहे. २२ डिसेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत चौघा आरोपींनी अपसात संगनमत करुन बनावट कागदपत्रे बनवली आणि महिलेची भागीदारी रद्द केली. त्यानंतर आरोपींनी कंपनीच्या बँक खात्यातील ४० लाखांचा चेक फिर्यादी यांना न सांगता एका व्यक्तीला दिला. तसेच महिलेने कंपनीत गुंतवलेले ४३ लाखांची रक्कम परत न करता फसवणुक केली.
याप्रकरणी चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.