Breaking News

जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम |
V. S. News
पिंपरी : नागरवस्ती विकास योजने अंतर्गत प्रशिक्षित फॅशन डिजाईनर महिलांना गणेश आहेर यांच्या प्रमूख उपस्थितीत प्रमाणपञ वाटप.

व्हिएस न्युज - पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरवस्ती विकास योजने अंतर्गत महिलांना गेले आनेक दिवस फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण देण्यात येत होत. प्रत्येक महिला बचत गटातील महिलांना दिनांक २५\०६\२०१९ रोजी मातोश्री ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर यांच्या प्रमूख उपस्थिती मध्ये प्रमाणपञ वाटप करण्यात आले.

यावेळी महिला बचत गटाच्या प्रमूख व शिवसेना विभाग संघटिका भाग्यश्रीताई म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली ह्या कार्यक्रमाचे आयोजन काळेवाडी येथे करण्यात आले. तसेच या वेळी शिवसेना मा. विभागप्रमूख खंडू शिरसाठ, शिवसैनिक बाळासाहेब गायकवाड ,विभागप्रमूख गोरख पाटील निलंगेकर, सामाजिक कार्यकर्ते रमेश शिंदे यांचे सहकार्य लाभले.

फॅशन डिझायनर दिपाली अतुल पांडे,किरण प्रकाश नाईक,श्वेता श्रीधर शिर्के,वैशाली अभय कूलथे, दिपाली दिपक मोरे,रोहिणी योगेश सरोदे,जयश्री सूनिल देवकर,चैताली अमोल तांबोळकर, मनीषा अनिल मगर, रूपाली महेश धावरे, पूजा प्रकाश मोरे या सर्व महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

...Read More

V. S. News
श्री गणेश सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी संजय जगताप यांची बिनविरोध निवड

व्हीएस न्युज - नवी सांगवी येथील श्री गणेश सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी संजय गणपत जगताप यांची; तर उपाध्यक्षपदी सुरेश तावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या सभेमध्ये ही निवड करण्यात आली.

यावेळी संचालक सूर्यकांत गोफणे, शिवलिंग किनगे, राजेंद्र राजापुरे, दत्तात्रय चौगुले, शशिकांत कदम, गणेश करंजकर, उद्धव पटेल, अभय नरडवेकर, मनोहर ढोरे, मारुती तरटे, संतोष देवकर, अंकुश जवळकर, संगीता कांकरिया, राजश्री जाधव, शिवाजी शिंदे व वसंत गुंड उपस्थित होते.

ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, कर्जपुरवठा वाढवणे व थकीत कर्ज वसुलीला प्राधान्य देणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय जगताप यांनी या सभेमध्ये सांगितले.

...Read More

V. S. News
महापौर राहुल जाधव यांच्या उपस्थितीत डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात जागतिक योग दिन उत्साहात साजरा.

व्हीएस न्युज - पिंपरी येथील डॉ. डी. वाय पाटील आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र, पिंपरी पुणे येथे केंद्रीय आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार स्वस्थवृत्त व योग विभागाच्या वतीने २१ जून जागतिक योग दिन उत्साहात साजरा झाला सकाळच्या योग सत्राचे उद्घाटन आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रागंणात महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते झाले.

करा योग रहा निरोग हा आरोग्य मंत्र त्यांनी युवकांना दिला आरोग्यासाठी नियमित योग करावा व योगाचे महत्त्व सांगून राहुल जाधव यांनी योग संदेश दिला.

याकार्यक्रमाला विद्यपीठाचे कुलगुरु डॉ. एन. जे पवार, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुणवंत येवला, होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धर्मेद्र शर्मा, भौतिकोपचार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार पालेकर, परिचारिका महाविद्यालयांच्या प्राचार्य रुपाली साळवी, आयुर्वेद उप प्राचार्य डॉ प्रशांत खाडे, योग प्रभारी डॉ. संतोष कांबळे, सल्लागार डॉ. बी.पी पांडे उपस्थित होते.

या योग सत्रात विविध योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ओंकार ध्यान, ध्यानधारणा योगाभ्यास करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ व विद्याप्रतिष्ठान सोसायटी अंतर्गत येणारे विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी योगाभ्यास सत्रात सहभागी होते. एकूण ४१० सह्भागार्थीनी लाभ घेतला.

योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये निबंध स्पर्धा, योग दिंडी, योगाभ्यास वर्ग, भिंती चित्र स्पर्धा, रांगोळी, व्याख्यानमाला इ. चे आयोजन आयुर्वेद महाविद्यालयात करण्यात आले होते. प्रत्येक स्पर्धेतून तीन विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले.

"आपले आरोग्य सुदृढ निरोगी राहावे आणि सर्वांचा कल योग व सूर्यनमस्काराकडे वाढावा. योग विषयी जनजागृती व्हावी तसेच प्रचार व प्रसार व्हावा" या प्रमुख उद्देशाने या विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ स्मृतिका तावरे व आभार प्रदर्शन डॉ प्रशांत खाडे केले. संपूर्ण योगसप्ताह व योग दिनाच्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन योग प्रभारी डॉ संतोष कांबळे स्वस्थवृत्त विभाग यांनी केले.

...Read More

V. S. News
गुरुवारी राष्ट्रवादी युवकचा एम्प्लॉयमेंट ऑफिसवर भव्य मोर्चा

व्हिएस न्यूज - मागील पाच वर्षात केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणांमुळे देशाचा विकासदर कमी झाला आहे. उद्योग व रोजगारात वाढ होण्याऐवजी घट झाली आहे. राज्य सरकारच्या मुद्रा योजनेसारख्या अनेक योजना फसव्या ठरल्या आहेत. यामुळे तरुणांच्या बेरोजगारीत वाढ होत आहे. त्याच्या निषेधार्थ पुणे व पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने बुधवारी (19 जून) दुपारी 12 वाजता पुण्यातील रास्ता पेठ येथील जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर (एम्प्लॉयमेंट ऑफिस) भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

चिंचवड येथे सोमवारी (17 जून) युवक कॉंग्रेसच्या पदाधिका-यांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे निरीक्षक निशांत वाघमारे यांच्या उपस्थितीत व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी युवक कॉंग्रेसचे प्रदेश संघटक विशाल काळभोर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संदीप (लाला) चिंचवडे, युवक कार्याध्यक्ष योगेश गवळी, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष शेखर काटे, चिंचवड विधानसभा युवक अध्यक्ष शाम जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व युवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

...Read More

V. S. News
विश्व संवाद केंद्र व क्रा.चापेकर स्मारक समितीतर्फे नारद जयंती उत्साहात साजरी.

व्हीएस न्युज - आपल्या संस्कृतीत पत्रकारितेतील पितृपुरूष देवर्षी नारद मुनी हे एक विद्यापीठच होते असे प्रतिपादन न्यूज भारती चे संपादक व मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे अ.भा.संयोजक विराग पाचपोर यांनी केले, ते आज विश्व संवाद केंद्र पुणे व क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती चिंचवड तर्फे येथील क्रांतिविर चापेकर वाड्यात आयोजित देवर्षी नारद जयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. पुढे बोलतांना त्यांनी या नारद जयंती दिनाचे महत्व विशद केले तसेच त्यांनी पूर्वांचलातील स्थित्यंतर हा विषय मांडला , पूर्वोत्तर भारतातील आधीची परिस्थिती , प्रतिकूल परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्या भागात केलेली सेवा कार्ये, विद्या भारती च्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील भरीव काम, उभी झालेली शाळा, महाविद्यालये , जनजातीय बांधवांची स्थिती , तेथील विकास या सर्व विषयावर त्यांनी सविस्तर विवेचन केले.

कार्यक्रमाला प्रमुख वक्ते विराग पाचपोर तसेच क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह विलास लांडगे, विश्व संवाद केंद्राचे मिलिंद कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता व देवर्षी नारद यांच्या प्रतिमा पूजनाने झाली, प्रास्ताविक मिलिंद कांबळे यांनी तर आभार चापेकर स्मारक समितीचे सहकार्यवाह रवींद्र नामदे यांनी मानले.

कार्यक्रमात सहभागी सर्व पत्रकार वृंदाचा सत्कार करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने अविनाश चिलेकर, राजन वडके, विश्वास मोरे आदी जेष्ठ पञकार यांचे सह अनेक वृत्तपत्रे, वृत्त वाहिन्या, न्यूज पोर्टल पञकारांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी चिंचवड जिल्ह्याचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

...Read More

V. S. News
हॉटेल पाटील पॅलेस देणार व्हेज आणि नॉनव्हेज जेवणाची वेगळी चव

व्हीएस न्युज - पिंपरी-चिंचवडकरांना व्हेज आणि नॉनव्हेज जेवणाची वेगळी चव आता हॉटेल पाटील पॅलेसच्या माध्यमातून मिळणार आहे. भिगवनच्या मच्छीचा आस्वादही खवैयांना घेता येणार आहे.

चिंचवड-वाल्हेकरवाडी रस्त्यावर प्रशस्त जागेत हॉटेल पाटील पॅलेस सुरू झाले असून, याचे उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपमहापौर सचिन चिंचवडे, उद्योजक शंकर जगताप, नगरसेविका करूणा चिंचवडे, आशा शेंडगे, प्रियांका बारसे, हॉटेलचे मालक बंडू मारकड, राकेश भरणे, राजेंद्र चिंचवडे, शेखर चिंचवडे, उद्योजक अजय दूधभाते, मनोजकुमार मारकड, सुरेश कांबळे, अरविंद पवार, अपर्णा डोके, सिद्धेश्वर बारणे, अनंत कोऱ्हाळे, माऊली सुर्यवंशी, सुर्यकांत गोफणे, अमोल थोरात, श्रीकांत धनगर, बाळासाहेब वाघमोडे, प्रविण काकडे, प्रेमकांत बोबडे, बिरू व्हनमाने, अभिमन्यू गाडेकर, महावीर काळे, काका मारकड, अजित चौगूले, अंबादास पडळकर, डॉ. दिनेश गाडेकर, अंकलेश सरोदे, संतोष मदने, संतोष काशीद, हंसराज बोबडे, दिपक भोजने आदी उपस्थित होते

. उद्घाटक आमदार लक्ष्मण जगताप याप्रसंगी म्हणाले, 'आनंद लुटावा आणि आनंद वाटावा', या उक्तीप्रमाणे हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला आनंद मिळेल. हॉटेल पाटील पॅलेसमुळे पिंपरी-चिंचवडच्या नावलौकिकात निश्चित भर पडेल. गोपीचंद पडळकर यांनी सांगितले, की तत्पर सेवा हा आजच्या युगाचा मंत्र आहे. बाहेरुन पिंपरी-चिंचवडमध्ये येणाऱ्या खवैयांनाही भिगवणच्या मच्छीचा आस्वाद घेता येणार आहे. त्यामुळे हॉटेल पाटील पॅलेस लवकरच नावारुपास येईल, असे गौरवोद्‌गारही त्यांनी काढले.

...Read More

V. S. News
पिंपरी : एच.ए कॉलनी मध्ये प्रियकराने केला प्रेयसीचा खून ; प्रियकराला अटक.

व्हीएस न्युज - लग्नाच्या कारणावरुन झालेल्या वादातून प्रियकरानेच प्रेयसीचा खून केल्याची घटना एच ए कॉलनी पिंपरी येथे घडली. किरण अरुण काते (वय २३, रा. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, एमआयडीसी, भोसरी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी अक्षय विनायक लाखे (वय २०, रा. भोरमळा, जुना ओरा रोड, नाशिक) याला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी तरुणीचा मामा रविंद्र दामोदर ससाणे (वय ३८, रा. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, एमआयडीसी, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनकडूक मिळालेल्या माहितीनुसार , किरण काते आणि अक्षय विनायक लाखे यांच्यात प्रेमसंबंध होते. बुधवारी रात्री ते भेटले असता त्यांच्यात लग्नाच्या कारणावरुन भांडण झाले. त्यावेळी आरोपी अक्षयने किरण हिचा एचए कॉलनीतील बंगला नंबर एफ २ येथे गळा दाबून व डोक्यात वीट घालून खून केला.

ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. त्यानंतर घटनेची माहिती कळताच पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, पिंपरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे रंगनाथ उंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, पोलीस उपनिरीक्षक हरिदास बोचरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांना घटनास्थळी सापडलेल्या मोबाईल वरून मिळालेल्या माहितीनुसार तपास केला असता आरोपी किरण राहत असलेल्या वस्तीतील लोकांकडे चौकशी करुन माहिती घेतली असता अक्षय हा किरणला बुधवारी भेटला असल्याचे समोर आले. तसेच तो बुधवारी रात्री महात्मा फुलेनगर झोपडपट्टी येथे बहिणीकडे आला होता, अशीही माहिती मिळाली. त्यानंतर लगेचेच पोलिसांनी आरोपीच्या बहिणीकडे चौकशी केली असता अक्षय हा नाशिकला जाण्यासाठी नाशिकफाटा येथे गेला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस पथक तातडीने नाशिक फाटा येथे गेले असता आरोपी अक्षय हा शिवशाही बसमध्ये बसला असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

ही कामगिरी वरिष्ठ निरिक्षक कल्याण पवार, निरिक्षक रंगनाथ उंडे, सहायक निरिक्षक अन्सार शेख, उपनिरिक्षक हरिदास बोचरे, उत्कर्षा देशमुख, कर्मचारी राजेंद्र भोसले, आजिनाथ सरक, रमेजा गोलंदाज, प्रतिभा मुळे, रोहित पिंजरकर, अविनाश देशमुख, सुहास डंगारे, नामदेव राऊत यांच्या पथकाने केली.

...Read More

V. S. News
मौजमजेसाठी चोरी करणार्‍या तीन चोरटय़ांना अटक ; निगडी पोलिस तपास पथकाची कामगिरी.

व्हीएस न्युज - मौजमजेसाठी घरफोडी करणाऱ्या तीन चोरट्यांना निगडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोटरसायकल, मोबाईल फोन, आणि घरफोडीचे साहित्य असा एकूण एक लाख 78 हजार 220 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

स्वप्निल सिद्धाराम माडेकर (वय 25, रा. आनंदनगर चिंचवड), काशीमाप्पा शरणप्पा म्हेत्रे (वय 22, रा. चाकण. मूळ रा. गुलबर्गा), राजेंद्र गंगाधर फाकटकर (वय 38, रा. वाल्हेकरवाडी चिंचवड) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल. एन. सोनवणे, पोलिस हवालदार पढेर, पोलीस नाईक मावसकर, ढोले, केकाण आणि पोलीस कॉन्स्टेबल बोडके शहरात गस्त घालत असताना पोलीस नाईक रमेश मावसकर व पोलीस कॉन्स्टेबल राहुल मिसाळ यांना माहिती मिळाली की, दोन मुले रावेत कॉर्नरजवळ थांबले असून त्यांच्याकडे चोरीचा मोबाईल फोन आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक दुचाकी (एम एच 14 / जी झेड 3518), मोबाईल फोन, रोख रक्कम आणि घरफोडीचे साहित्य मिळाले. याबाबत चौकशी केली असता चोरट्यांनी चिंचवड मधील युनिक हॉस्पिटल येथून दोन लाख 47 हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल फोन अशी एकूण दोन लाख 57 हजार रुपयांची चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी चोरट्यांकडून अधिक चौकशी करून त्यांच्या तिसऱ्या साथीदाराला देखील अटक केली.

तिन्ही आरोपींकडून मोटारसायकल, मोबाईल फोन, घरफोडीचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 78 हजार 220 रुपयांचा ऐवज जप्त केला.

...Read More

V. S. News
आईने केली अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाची हत्या.

व्हीएस न्युज - आई व तिच्या प्रियकराने संगनमत करून अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या मुलाचा खून केल्याची घटना आज उघडकीस आली. गौरव ऊर्फ यश प्रकाश चव्हाण (वय १०) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी आई अश्‍विनी प्रकाश चव्हाण (वय २९, रा. वृंदावन कॉलनी, नावेचीवाडी, वाई) व तिचा प्रियकर सचिन शिवराम कुंभार (वय ४१, रा. बावधन, ता. वाई) यांना पोलिसांनी अटक केली आहे.त्यांना न्यायालयाने 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नावेचीवाडीतील वृंदावन कॉलनीतील इयत्ता चौथीत शिकणारा गौरव ऊर्फ यश चव्हाण हा शुक्रवारी (ता. २८) रात्री गंगापुरी यात्रेतील ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो घरी परत आला नाही. त्यामुळे पालकांनी त्याचा शोध घेतला. दुसऱ्या दिवशी आईने वाई पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार मुलगा अल्पवयीन असल्याने अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, त्याच दिवशी दुपारी चारच्या सुमारास देगावच्या हद्दीत जाधव वस्तीजवळ धोम डाव्या कालव्यात मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना काही युवकांना आढळला. त्यांनी भुईंज पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान, गौरव कसा बेपत्ता झाला, याबाबत त्याच्या आईकडे कसून चौकशी केली असता त्यात विसंगती दिसून आली. त्यामुळे पोलिसांनी आईला विश्‍वासात घेतले. त्यावेळी तिने सत्य घटना सांगितली. अश्‍विनी व सचिन हे दोघेही औद्योगिक वसाहतीतील कंपनीत नोकरीला होते. तेथे त्यांचे प्रेमसंबंध जुळले. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे अनैतिक संबंध होते. त्यातूनच हा खून झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

अश्‍विनी ही मुलाला घेऊन कार्यक्रम पाहायला गेली होती. त्यावेळी सचिनचा फोन आल्याने दोघेही दुचाकीवरून शाहीर चौकात आले. त्यावेळी सचिनने मुलाला थंडपेयाची बाटली दिली. ती घेतल्यानंतर तिघेही दुचाकीवरून शेलारवाडी रस्त्याला धोम डाव्या कालव्याजवळ पोचले. दुचाकीवरून उतरल्यानंतर गौरवला गुंगीमुळे चालता येत नव्हते. त्यावेळी मुलाला बाटलीतून काय दिले, असा जाब अश्‍विनीने सचिनला विचारला. त्यावर सचिनने तुला आणि नवऱ्यालाही मारून टाकीन, अशी धमकी देत यशला कालव्यात ढकलून दिले. त्याने आईला हाकही मारली परंतु; अश्‍विनी काहीच करू शकली नाही. दोघांनाही आज अटक करण्यात आली. वाईच्या न्यायालयाने दोघांनाही सोमवारपर्यंत (ता. १३) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सहायक पोलिस निरीक्षक महेंद्रसिंह निंबाळकर तपास करीत आहेत. पोलिस उपअधीक्षक अजित टिके व पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्यांनी तपासात मदत केली.

गौरव हा संशयित सचिनवर होता चिडून

सचिन कुंभार हा रात्री-अपरात्री फोन करून आश्‍विनीशी बोलत असे. या वेळी गौरव हा आईच्या कुशीत झोपलेला असे. त्यामुळे त्या दोघांमधील संवाद तो ऐकायचा. सचिन हा अनेक वेळा तिच्या घरी जात असे. त्यावेळी अनेकदा गौरवही तेथे असायचा. त्याचे घरी येणे व आईला फोन करणे हे गौरवला आवडत नसे. एकदा आई घरी नसताना सचिन हा अश्‍विनीच्या घरी आला होता. त्यावेळी गौरवने त्याला रागामध्ये मला आईविषयी काही विचारायचे नाही, असे सुनावले होते. त्यामुळे आरोपी सचिन गौरववर चिडून होता. गौरवमुळे अनैतिक संबंधाचे बिंग फुटेल, याची त्याला भीती होती. त्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचे पो. नि. खोबरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

...Read More

V. S. News
पुण्यात साडी सेंटरला भीषण आग, 5 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

व्हीएस न्युज - पुणे - देवाची ऊरळी येथील सासवड रोडच्या लगत असलेल्या राजयोग होलसेल साडी डेपोच्या दुकानाला पहाटे आग लागली. या आगीमध्ये धुराने गुदमरून आणि होरपळून पाच कामगारांचा मृत्यू झाला. तसेच सुमारे तीन कोटीचे नुकसान झाले आहे. राकेश रियाड (वय २२),धर्मराम वाडियासार (वय २५),राकेश मेघवाल (वय २५), सुरज शर्मा (वय २५) हे चारही राहणार राजस्थान तर धीरज चांडक (वय २३),रा. लातूर असे मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत.

पहाटे सव्वा चारच्या दरम्यान या दुकानात आतमध्ये झोपलेल्या कामगारांचा मॅनेजरला आग लागल्याचा फोन आला. चोरी होऊ नये या उद्देशाने दुकानाला बाहेरून कुलूप लावण्यात येत असे. आतमध्ये पाच कामगार झोपले होते. शॉर्टसर्किटने आग लागल्याने आम्हाला गुदमरत आहे. बाहेर पडता येत नाही. असा फोन दुकानच्या मॅनेजरला आला. मॅनेजर तेथे जाईपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. बाहेरून कुलूप काढल्यानंतर कपडा असल्याने आगीने जोरात पेट घेतला. दुसऱ्या मजल्यावरील काचा फोडण्यात आल्या. मागून भिंत तोडण्यात आली आणि सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आली. मात्र यातील कामगारांना वाचवण्यात यश आले नाही. त्यांनी खिडक्या वाकविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना बाहेर पडता आले नाही. सुमारे सात हजार स्केअर फुटच्या या दुकानात साडी व रेडीमेड कपड्याचे दालन होते. चार राजस्थानचे तर एक लातूरचा कामगार राहण्याची सोय नसल्याने या दुकानातच आतमध्ये राहत होते.

देवाची ऊरळी येथील राजु भाडळे यांच्या मालकीचे हे दुकान असून सुशील नंदकिशोर बजाज व भवरलाल हजारीलाल प्रजापती यांनी ते चालवण्यासाठी भाडेतत्त्वावर घेतले होते. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि आठ ते दहा टॅंकरने ही आग विझविण्यात आली. सकाळी पावणेसातच्या सुमारास या दुकानामधून पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

...Read More

V. S. News
दलित माओवादी बनत नसून माओवादीच त्यांचा वापर करीत आहेत : कॅप्टन स्मिता गायकवाड

व्हीएस न्युज - भारतातील माओवादी क्रांतीचे मूळउद्दीष्ट हे भारतीय लोकशाहीला मानणा-या नागरिकांचा बुद्धीभेद करणारे आहे. आदिवासींमधून सकारात्मक विचारांचे नेतृत्व उभे राहत असेल तर नक्षलवादी, माओवादी बंदुकीच्या धाकाने अशा व्यक्तींना संपवत आहेत. दलित माओवादी बनत नसून माओवादीच दलितांचा टार्गेट म्हणून वापर करीत आहे. माओवादी हे दलित समाजात आम्ही आंबेडकरवादी आहोत असे सांगतात आणि दुसरीकडे संविधान नाकारतात, हा माओवाद्यांचा दुटप्पीपणा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायमच संसदीय मार्गाचा स्विकार केला आहे. कुठलीही आंबेडकरवादी व्यक्ती माओवाद्यांचे समर्थन करत नाही, असे प्रतिपादन कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी केले.

चिंचवडगावातील गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेचे हे 28वे वर्ष आहे. तिसरे पुष्प गुंफताना कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी उपस्थितांशी स्लाईड-शो व्दारे संवाद साधला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीमा देव, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, मारुती भापकर, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, बाळासाहेब ढसाळ, सुहास पोफळे, गीतल गोलांडे, सुजाता पोफळे, शिल्पा वाघुले, हेमा सायकर, कविता शिंदे, प्रा. महादेव रोकडे, विजय भिसे, कैलास बहिरट, राजेंद्र घावटे, दिलीप बोंबले आदी उपस्थित होते.

कॅप्टन स्मिता गायकवाड म्हणाल्या की, नक्षलवाद किंवा माओवाद हा गेल्या पन्नास वर्षांपासून देशाला पोखरत आहे. यावर अद्यापपर्यंत तोडगा निघाला नाही. नक्षलवाद आता गडचिरोलीपुरता मर्यादित नसून शहरापर्यंत तो फोफावला आहे. 31 डिसेंबर 2017ला पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेनंतर तथाकथित बुद्धीवाद्यांना अटक करण्यात आले. त्यांनतर पुन्हा माओवाद व नक्षलवादावर चर्चा सुरु झाली. नक्षलवाद आणि माओवाद यात फरक नाही. शोषितांच्या, वंचितांच्या हक्कासाठी लढतो असे दाखविणारे हे ‘माओच्या’ विचाराने काम करीत असतात. पश्चिम बंगालच्या नक्षलबाडीत 1967ला उठाव झाला. तो प्रत्यक्ष सत्ता हस्तगत करण्यासाठी होता. हे त्यांच्याच दस्तऐवजामधून दिसते. आदिवासींना जमिनी मिळवून देणे हे त्यांचे उद्दिष्ट नसून मतदानाऐवजी बंदुकीच्या जोरावर सत्ता हस्तगत करायची अशी शिकवण माओची आहे. आदिवासींसाठी माओवाद नसून उलट आदिवासी कायम माओवादासाठी वापरले जातात. पुण्यातील एल्गार परिषदेनंतर शहरी भागातील अनेकांनी सोशल मिडियातून ‘#मी टू अर्बन नक्सल’ अशी भूमिका घेऊन नक्शलवाद्यांना पाठिंबा दिला. आदिवासी भागामध्ये नोक-या व विकास नाही; म्हणून माओवादी विरोध करतात. तर दुसरीकडे शिक्षित व्यक्ती पोलिस भरती झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ठार करतात. आमदार भिमा मंडावी यांना स्फोटकांचा वापर करून माओवाद्यांनी ठार केले. हे माओवादी समोरासमोर लढत नसून स्फोटकांचा वापर करून निव्वळ संशयावरून नक्सली कारवाया करतात. युगेंद्र मेश्राम या शिक्षकाला केवळ संशयावरून माओवाद्यांनी ठार केले. गाववाल्यांच्या जनमताच्या विरोधामुळे नंतर चूक झाली अशी पत्रके वाटून माफी मागितली. दंतेवाड्यात सीरपीएफच्या प्रशिक्षणार्थींचा बळी घेतला जातो. यातील अनेक जवान हे स्थानिकच आहेत. स्थानिकांच्या हक्कासाठी लढतो म्हणायचे आणि त्यांनाच ठार करायचे हा माओवाद्यांचा दुटप्पीपणा आहे. माओवाद्यांना स्थानिकांचा विरोध आहे. त्यांचा फोलपणा उथळपणा मागच्या दोन पिढ्यांनी पाहिला आहे. म्हणून स्थानिक आदिवासी त्यांना आता विरोध करीत आहेत. त्यामुळे आदिवासी त्यांच्या मुलांना दूरच्या शाळेत, आश्रमात शिकवत आहेत. आता माओवाद्यांना भरती करण्यासाठी तरूण मिळत नाहीत. ते तेथील शिक्षित तरूणांवर दबाव आणतात. विरोध केला तर ठार करतात. 2012ला पुण्यात बसेसमध्ये माओवाद्यांनी त्यांच्या नेत्यांना साडावे अशी मागणी करीत भगत सिंग यांचा फोटो वापरून पत्रके लावली होती. त्यातून शहरी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा माओवाद्यांचा हेतू होता. शहरी माओवाद म्हणजे वेगवेगळ्या संस्था, संघटनांमधून, सांस्कृतिक कार्यक्रम, सभांमधून तरुणांना हेरून नक्षली कारवायांसाठी उद्दिपित केले जाते.

शहरी भागातील माओवाद रोखण्यासाठी नागरिकांना शस्त्र हातात घेण्याची गरज नाही तर पोलिसांचे, सीआरपीएफ जवानांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी काम केले पाहिजे. अन्यथा गडचिरोली, छत्तीसगड मधील हिंसकता शहरात फोफावेल. माओवाद रोखण्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था संवेदनशील आणि लोककेंद्रीत असणे आवश्यक आहे. माओवादी भांडवल करत असलेल्या समस्यांवर उपाययोजना केली पाहिजे. विचारधारेचे हे युद्ध शस्त्रांव्दारे जिंकता येत नाही. शहरी आणि जंगल भागातील माओवादी कारवायांना भिन्न प्रतिसाद आहे. वेगाने अस्तित्वात येणा-या फ्रंट संघटना व कायद्याच्या मर्यादा ही माओवाद रोखण्यापुढील आव्हाने आहेत, असेही कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी सांगितले. शुक्रवारी (10 मे 2019) सायं. 7 वाजता गुरुदासी विजयालक्ष्मी शिरगावकर यांचे सती मंदोदरी या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच या वेळी प्रज्ञा पिसोळकर यांना जिजाऊ पुरस्कार, हेमंत वसंत कुंभोजकर यांना क्रांतीवीर चापेकर पुरस्कार आणि कस्तुकरी कल्लपा जमखंडी यांना श्री चिंतामणी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रज्ञा पिसोळकर यांना वृक्ष लागवडीचा छंद असून त्या कनेक्टींग या संस्थेत समुपदेशक म्हणून काम पाहत आहेत. कनेक्टींग ही संस्था आत्महत्या करणा-या व्यक्तीस व आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचलेल्या व्यक्तींसाठी समुपदेशनाचे काम करते.

स्वागत कविता शिंदे, तर सुत्रसंचालन सुजाता पोफळे व आभार हेमा सायकर यांनी मानले.

...Read More

V. S. News
मिलिंद एकबोटेंना सासवड येथील झेंडेवाडी येथे मारहाण.

व्हिएस न्युज - समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना सासवड येथील एका कार्यक्रमात मारहाण झाली आहे. ही घटना मंगळवारी (दि.७) रात्री साडे नऊच्या सुमारास सासवड येथील झेंडेवाडीमध्ये घडली. याप्रकरणी पंडित मोडक, विवेक मोडक यांच्यासह ४० ते ४५ जणांविरोधात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सासवड येथील झेंडेवाडीमध्ये मंगळवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हरिनाम सप्ताह निमित्त मिलिंद एकबोटे हे आले होते. “पंडित मोडका गोशाळा चालवितो आणि तोच गाड्या पकडतो, भ्रष्टाचार करतो”, अशा स्वरूपाची पोस्ट एकबोटेंनी फेसबुकवर लिहिली होती. या रागातून मोडक आणि त्यांच्या ४० ते ४५ समर्थकांनी एकबोटे यांच्यावर हल्ला केला. मोडक यांच्या समर्थकांनी एकबोटे आणि त्यांच्या कार्यकत्यांना लाथाबुक्क्या, दगड आणि मिरचीची पूड टाकून मारहाण केली. मिलिंद एकबोटे यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

या प्रकरणी पंडित मोडक, विवेक मोडक यांच्यासह ४० ते ४५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!