व्हिएस न्यूज - मागील पाच वर्षात केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणांमुळे देशाचा विकासदर कमी झाला आहे. उद्योग व रोजगारात वाढ होण्याऐवजी घट झाली आहे. राज्य सरकारच्या मुद्रा योजनेसारख्या अनेक योजना फसव्या ठरल्या आहेत. यामुळे तरुणांच्या बेरोजगारीत वाढ होत आहे. त्याच्या निषेधार्थ पुणे व पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने बुधवारी (19 जून) दुपारी 12 वाजता पुण्यातील रास्ता पेठ येथील जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर (एम्प्लॉयमेंट ऑफिस) भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
चिंचवड येथे सोमवारी (17 जून) युवक कॉंग्रेसच्या पदाधिका-यांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे निरीक्षक निशांत वाघमारे यांच्या उपस्थितीत व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी युवक कॉंग्रेसचे प्रदेश संघटक विशाल काळभोर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संदीप (लाला) चिंचवडे, युवक कार्याध्यक्ष योगेश गवळी, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष शेखर काटे, चिंचवड विधानसभा युवक अध्यक्ष शाम जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व युवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002