Breaking News

जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम |
V. S. News
अमेरिकेतील स्वाहिली विद्यापीठाकडून सौ. भाग्यश्रीताई पाटील यांना डॉक्टरेट पदवी प्रदान

व्हिएस न्युज - अमेरिकेतील स्वाहिली विद्यापीठाच्या वतीने डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्षा सौ. भाग्यश्रीताई पाटील यांना ‘व्यवसाय व्यवस्थापन’ विषयात मानद डॉक्टरेट ऑफ आर्ट्स ही पदवी देऊन गौरवण्यात आले. विद्यापीठाच्या वतीने गोवा येथे झालेल्या कार्यक्रमात पदवीप्रदान समारंभ झाला.

सौ. भाग्यश्रीताई पाटील यांचे शिक्षण, आरोग्य सेवा, बायोटेक्नॉलॉजी, फलोत्पादन आणि फ्लोरीकल्चर तसेच महिला सबलीकरण या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान आहे. या क्षेत्रातील त्यांचे अमूल्य योगदान आणि भावी पिढीला प्रेरणा देण्यात त्यांनी बजावलेली भूमिकेची विशेष दखल स्वाहिली विद्यापीठाने घेतली.

पिंपरी येथे डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रूग्णालय व संशोधन केंद्र स्थापन करण्यात त्यांचा पती डॉ. पी.डी पाटील यांच्यासह मोठा वाटा आहे. या रुग्णालयास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकतेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत खाजगी क्षेत्रातील रूग्णालयामध्ये "कायाकल्प पुरस्कार 2019" देऊन देशातील सर्वोत्कृष्ट रुग्णालय म्हणून घोषित केले. उच्च प्रतीची रुग्णसेवा या जनहितार्थ विनामूल्य व काही सेवा या रुग्णालयात माफक शुल्कात दिल्या जातात.

शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी सौ. भाग्यश्रीताई पाटील यांनी 2004 मध्ये ‘राईझ एन शाइन बायोटेक’ कंपनीची स्थापना केली गेली. या कंपनीच्या त्या व्यवस्थापकीय संचालिकाही आहेत.

आयएसओ 9001-2015 मानांकीत ही कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील वनस्पतींची जगभरातील 30 हून अधिक देशांना निर्यात करते. यामध्ये मोठ्या आणि सुसज्ज टिशू कल्चर प्रयोगशाळेतही गुंतवणूक केली गेली आहे जी वर्षाला 40 दशलक्षाहून अधिक रोपे तयार करते. सौ. पाटील यांचा महिला सक्षमीकरणावर विश्वास आहे. थेऊर येथे ग्रामीण भागातील 95 टक्के महिला नोकरी उपलब्ध करून दिली आहे आणि त्यांना उत्पादन प्रक्रियेत तांत्रिक प्रशिक्षण दिले. महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी. “बचतगट” सारख्या विशेष योजना सुरू केल्या आहेत.

पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातील पदाधिकारी कर्मचारी वर्ग यांनी सौ भाग्यश्री ताई पाटील यांचे अभिनंदन केले आहे

...Read More

V. S. News
सासवड - पुरंदर - हवेली चे महाआघाडीचे उमेदवार संजय जगताप यांना मोठ्या प्रमाणात युवकांचा,महिलांचा आणि वयोवृद्दांचा पाठिंबा.

व्हिएस न्युज - सासवड-पुरंदर-हवेली या विधानसभा मतदार संघाचे महाआघाडीचे लोकप्रिय उमेदवार संजय चंदुकाका जगताप यांना त्यांच्या मतदारसंघातील युवक, महिला भगिनींचा आणि वयोवृद्दांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे.

आघाडी झाल्यापासून पहिल्यांदाच या मतदारसंघात काँग्रेसला निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हुरूप वाढलाय,संजय जगताप यांना राष्ट्रवादीचे भक्कम पाठबळ आहे आणि राजकीय पार्श्वभूमी असलेला कौटुंबिक वारसा लाभलेले आहे.

संजय जगताप हे गेल्या अनेक वर्षांपासून लोकसेवा करीत आहेत.त्यांच्या गेल्या १५ वर्षांच्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेत मतदारसंघातील तरुणपिढी आणि महिला भगिनींनी संजय जगताप यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून देण्यासाठी कंबर कसली आहे. सासवड पुरंदर हवेली येथून आमदार महाआगाडीचाच होणार असा विश्वास अनेक महिलांनी व्हिएस न्युज प्रतिनिधी सुजाता गुरव यांच्याकडे व्यक्त केला.

संजय जगताप यांनी सत्ता नसताना देखील अनेक तरुणांना नोकरीसाठी सहाय्य केले आहे. अनेक बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याची त्यांची धडपड पाहून तरुण पिढी त्यांच्या पाठीशी आहे. महिलांसाठी बचत गट, स्वयंरोजगारासाठी कर्जसहाय्य अनेक दिवसांपासून ते करताहेत,योगा, व्यायाम शाळा, भजनी मंडळींसाठी साहित्य वाटप अशी अनेक कामे त्यांनी विकासाच्या दिशेने साकारलेली आहेत. दुष्काळात पाण्याच्या टँकर सोडून तर जनावरांसाठी छावणी उभारून लोकसेवा केली. त्यांना प्रचंड प्रमाणात महिला भगिनींची आणि वयोवृद्धांची साथ लाभली आहे.

संपूर्ण मतदारसंघातील मतदारांना प्रत्यक्ष भेटणे, गावभेट कोपरासभा अनेक रॅली मतदारसंघात काढण्यात आल्या. शनिवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पालखीतळ सासवड येथील प्रचार सभा प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडली त्यावेळी काही महिलांनी आपले मनोगत व्हिएस न्युज कडे व्यक्त केले.

...Read More

V. S. News
आयुर्वेदातील संशोधनावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषदेचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न

व्हिएस न्युज - डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी येथे दि. १९ ऑक्टोबर २०१९ रोजी "आयुर्वेदातील संशोधन" या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन श्री डॉ. के. एस. धीमान (डायरेक्टर जनरल, सी सी आर ए एस, नवी दिल्ली ) यांच्या हस्ते झाले . डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद व आय एम ए व्ही एफ नेदरलँड यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन केले . वेगवेगळ्या देशातील आरोग्यतज्ञ् , संशोधक, विद्यार्थी असे एकूण ४०० पेक्षा अधिक सहभागार्थी उपस्थित होते.

"आयुर्वेदातील संशोधनाचा प्रचार व प्रसार व्हावा, आयुर्वेदातील नवनवीन संशोधन करण्यास गती प्राप्त व्हावी तसेच या क्षेत्रात नवपिढीचे योगदान वाढावे आणि गुणवत्तापूर्ण संशोधन कार्य घडावे" या प्रमुख उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रसंगी मान्यवरांनी आपली मते मांडली श्री डॉ. के. एस. धीमान डायरेक्टर जनरल, सी सी आर ए एस, नवी दिल्ली) यांनी "भारत सरकारच्या आयुष विभागामार्फत आयुर्वेदाच्या संशोधनासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबत मार्गदर्शन केले व आयुर्वेद संशोधनातील संधींवर भाष्य केले"

मा.डॉ . जोस रुगे (शुद्ध धर्म मंडळ, ब्राझील) यांनी "ब्राझील मध्ये आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार कश्या पद्धतीने झाला व ब्राझील मध्ये कोण कोणत्या आयुर्वेदिक वनस्पती उपलब्ध आहेत! याबद्दल मार्गदर्शन केले तसेच भारतातील आयुर्वेद तज्ञांकडून मदतीची अपेक्षा केली"

मा. डॉ. सुभाष रानडे (अध्यक्ष - इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद, पुणे) याप्रसंगी "इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद मार्फत डॉ डी वाय पाटील आयुर्वेद महाविद्यालयात विदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळतात व आयुर्वेदाचे यथार्थ ज्ञान मिळते"

मा. डॉ एन जे पवार (कुलगुरू,डॉ डी वाय पाटील विद्यापीठ) यांनी "आयुर्वेदातील संशोधनासाठी अन्य वैद्यकीय शाखांनी मदत करणे, त्यासाठीच्या सर्व मूलभत गोष्टी विद्यापीठात उपलब्ध असल्याची माहिती दिली"

मा डॉ गुणवंत येवला (प्राचार्य, डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय ) यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्वांचे स्वागत केले कार्यक्रमाची रूपरेषा सांगून डॉ. जोस रुगे यांच्या मानपत्राचे वाचन केले.

मा. डॉ पी. डी. पाटील (कुलपती,डॉ डी वाय पाटील विद्यापीठ) व मा. सौ. भाग्यश्रीताई पाटील उपाध्यक्षा डॉ डी वाय पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटी) यांच्या मार्गदर्शनाखाली ही आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात आली.

या परिषदेच्या कार्यक्रमास मा. सौ. डॉ. स्मिता जाधव (विश्वस्त व कार्यकारी संचालक, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ )मा. डॉ एन जे पवार (कुलगुरू,डॉ डी वाय पाटील विद्यापीठ) मा. डॉ ए.एन. सूर्यकार (कुलसचिव, डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ) मा.डॉ . जोस रुगे (शुद्ध धर्म मंडळ, ब्राझील) मा. डॉ. सुभाष रानडे (अध्यक्ष - इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद, पुणे) मा. डॉ सुनंदा रानडे(उपाध्यक्ष, इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद, पुणे) मा डॉ गुणवंत येवला (प्राचार्य, डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय ) मा. डॉ बी.पी पांडे (सल्लागार, डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय) मा.डॉ. दिगंबर दिपंकर (आयोजन सचिव, डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय) मा. डॉ मंदार बेडेकर यांच्या उपस्थितीत परिषद संपन्न झाला. या

दोन दिवसीय परिषदेत विविध विषयांवर देश विदेशातील तज्ञ् डॉक्टर्स परिषदेला संबोधित करतील. या मध्ये डॉ श्रीराम सावरीकर नवीदिल्ली, डॉ एम एस बघेल व डॉ अनुप ठकार , जामनगर, डॉ रमेश भोंडे , पुणे, डॉ. एन. श्रीकांत, नवीदिल्ल्ली, डॉ. सुप्रिया भालेराव, रणजित पुराणिक (धूतपापेश्वर) हे प्रमुख वक्त्यांनी संशोधनावर आधारित मते मांडली .

या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये विविध विषयांवर शिक्षणतज्ञ् व्यावसायिक डॉक्टर्स, पद्युत्तर पदवी चे विद्यार्थी यांनी आयुर्वेदात केलेल्या संशोधनावर एकूण १३५ पेपर सादरीकर व २५ भिंतीपत्रक सादरीकरण केले . परदेशातून आलेल्या सहभागार्थीसाठी भारतीय संस्कृती दर्शन पर सांस्कृतिक कार्यक्रम व दीपोत्सवाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते . डॉ स्मृतिका तावरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन डॉ. दिगंबर दिपंकर यांनी केले.

...Read More

V. S. News
भोसरीत अपना वतन संघटना विलास लांडेंच्या पाठीशी.

व्हिएस न्युज - भोसरी परिसरातील, वाढलेली गुन्हेगारी , हफ्तेवसुली , रेड झोन , झपडपट्टीचे प्रश्न ,आरोग्य ,शिक्षण , मूलभूत सुविधा , भ्रष्टाचार , जनतेच्या पैशाची अवास्तव उधळपट्टी , मतदार संघातीलविकास कामांमध्ये नातेवाईकांची भागीदारी , वाहतूक समस्या ,कामगारांचे प्रश्न अशा असंख्य प्रश्नांमुळे भोसरीचा विकास खुंटलेला आहे.या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सक्षम पर्याय म्हणून अपना वतन संघटनेच्या वतीने भोसरीचे अपक्ष उमेदवार विलास लांडे याना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.

त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष हरिशचंद्र तोडकर , संचालक सिद्दीकभाई शेख ,शहराध्यक्ष राजश्री शिरवळकर , प्रवक्ते सॅन्ड्रा डिसोझा , तौफिक शेख यांसह मोठ्या प्रमाणवर कार्यकर्ते उपस्थित होते. रा

एकात्मतेसाठी व आपल्या सर्वांगीण विकासासाठी जातीयवादी प्रवृत्तीच्या पक्षांना अद्दल घडवण्यासाठी भोसरी मतदार संघातील सर्व मतदाराना संघटनेच्या वतीने भोसरी मतदार संघातून अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

...Read More

V. S. News
आयुर्वेदातील संशोधनावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषद

व्हिएस न्युज - डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी येथे दि. १९ व २० ऑक्टोबर २०१९ रोजी "आयुर्वेदातील संशोधन" या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद व आय एम ए व्ही एफ नेदरलँड यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या देशातील आरोग्यातज्ञ् , संशोधक, विद्यार्थी असे एकूण ४०० पैक्षा अधिक सहभागार्थी असतील.

"आयुर्वेदातील संशोधनाचा प्रचार व प्रसार व्हावा, आयुर्वेदातील नवनवीन संशोधन करण्यास गती प्राप्त व्हावी तसेच या क्षेत्रात नवपिढीचे योगदान वाढावे आणि गुणवत्तापूर्ण संशोधन कार्य घडावे" या प्रमुख उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचा उदघाटन कार्यक्रम दि १९ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ११:३० वा मा श्री डॉ. के. एस. धीमान (डायरेक्टर जनरल, सी सी आर ए एस, नवी दिल्ली ) यांच्या हस्ते होणार आहे.

मा. डॉ.पी.डी पाटील (कुलपती, डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ) मा.सौ. भाग्यश्रीताई पाटील (उपाध्यक्षा डॉ. डी.वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटी ) मा. सौ. डॉ. स्मिता जाधव (विश्वस्थ व कार्यकारी संचालक, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ ) मा. डॉ. एन. जे.पवार (कुलगुरू, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ) मा. डॉ ए.एन. सूर्यकार (कुलसचिव, डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ) मा.डॉ . जोस रुगे (शुद्ध धर्म मंडळ, ब्राझील) मा. डॉ. सुभाष रानडे (अध्यक्ष - इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद, पुणे) मा. डॉ सुनंदा रानडे(उपाध्यक्ष, इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद, पुणे) मा डॉ गुणवंत येवला (प्राचार्य, डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय ) मा. डॉ बी.पी पांडे (सल्लागार, डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय) मा.डॉ. दिगंबर दिपंकर (आयोजन सचिव, डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय) मा. डॉ मंदार बेडेकर यांच्या उपस्थितीत परिषद संपन्न होणार आहे या दोन दिवसीय परिषदेत विविध विषयांवर देश विदेशातील तज्ञ् डॉक्टर्स परिषदेला संबोधित करतील यामध्ये डॉ. के. एस. धिमान (सी सी आर ए एस, नवी दिल्ली ) डॉ श्रीराम सावरीकर नवीदिल्ली, मा. डॉ .जोस रुगे, ब्राझील, डॉ एम एस बघेल व डॉ अनुप ठकार , जामनगर, डॉ रमेश भोंडे , पुणे, डॉ. एन. श्रीकांत, नवीदिल्ल्ली, डॉ. सुप्रिया भालेराव, रणजित पुराणिक (धूतपापेश्वर) हे प्रमुख वक्ते उपस्थित असतील. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये विविध विषयांवर शिक्षणतज्ञ् व्यावसायिक डॉक्टर्स, पद्युत्तर पदवी चे विद्यार्थी यांनी आयुर्वेदात केलेल्या संशोधनावर पेपर सादरीकर व भिंतीपत्रक सादरीकरण करणार आहेत. पहिल्या दिवसाच्या सांगतेला परदेशातून आलेल्या सहभागार्थी साठी भारतीय संस्कृती दर्शन पर सांस्कृतिक कायक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही आंतरराष्ट्रीय परिषद डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

...Read More

V. S. News
विधानसभा आघाडीचे उमेदवार मा. संजयजी जगताप यांची आज उंड्री येथे सभा व पदयात्रेस मतदारांचा प्रचंड प्रतिसाद.

व्हिएस न्युज - उंड्री येथे श्री. भैरवनाथ मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून प्रचारसभा व पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिक विविध सोसायटींचे पदाधिकारी व महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवून प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याची विश्वासार्हता दाखवली.

मा. संजयजी जगताप यांनी नागरीकांकडून उंड्रीतील समस्या जाणून घेतल्या. पाण्याचा प्रश्न व रस्ते समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असलेचे त्यांनी सांगितले. यावेळी सासवड, जेजुरी नगरपरिषद विकासाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

गावातील व विविध सोसायटीतील महिला भगिनींनी पुरंदर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार मा. संजयजी जगताप यांना औक्षण केले. मतदारांनी चौका चौकात फटाके वाजवून त्यांचे स्वागत केले.

उंड्री गावात पदयात्रेसाठी मतदारांचा प्रचंड प्रतिसाद. पदयात्रेत पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार मा. संजयजी जगताप यांचेसह मा. सचिन पुणेकर, उपसभापती सचिन घुले, निवृत्ती बांदल, संदीप बांदल, गौरीताई फुलावरे, दत्तात्रय बांदल, तानाजीराव कड, दत्तोबा होते, योगेश कामठे, विशाल कामठे, अविनाश पुणेकर, प्रतीक कड, मंगलाताई आंबेकर, दीपक कामठे, डॉक्टर बालगुडे, मा. प्रवीण पुणेकर, शरद देशमुख, गीतांजली पुणेकर आदी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
बंडखोरी केल्यास कारवाई करु – राष्ट्रवादी

व्हिएस न्युज - पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर पक्षाकडून कारवाई केली जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिरूर येथे दिला. शिरूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपला पाठिंबा दिल्याच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला आहे.

आघाडीचे उमेदवार, माजी आमदार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ शिरूर येथील कापड बाजारात पाटील आणि अमोल मिटकरी यांची सभा झाली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, नगराध्यक्षा वैशाली वाखारे आदी त्या वेळी उपस्थित होते. पाटील म्हणाले, पक्षातून अनेकजण बाहेर पडत असल्याचे मला विचारले जाते. पण, पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. शरद पवार यांचे सच्चे कार्यकर्ते संपूर्ण ताकदीने काम करून राज्यात सत्ता संपादन करणार आहेत.

मिटकरी म्हणाले की, शिरूर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होणार आहे. सत्ताधारी विचारतात शरद पवार यांनी काय केले. कांद्याला बाजारभाव का नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल काय, हा त्यांना आमचा सवाल आहे. राज्याच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री बोलत नाहीत. हे सरकार संवेदनशील नाही.

...Read More

V. S. News
पिंपरीचे डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल देशात सर्वोत्तम राष्ट्रीय सर्वेक्षणात प्रथम क्रमांकाचा ‘कायाकल्प-२०१९’ पुरस्कार प्रदान

व्हिएस न्युज - राष्ट्रीय आरोग्य मिशन व भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाच्या सर्वेक्षणात पिंपरी (पुणे) येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल हॉस्पिटल व संशोधन केंद्र देशात सर्वोत्तम ठरले आहे. या कामगिरीबद्दल राष्ट्रीय पातळीवरील ‘कायाकल्प २०१९’ हा पुरस्कार देऊन हॉस्पिटलचा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते नवी दिल्लीत सन्मान करण्यात आला. संस्थेचे ट्रस्टी डॉ. यशराज पाटील, अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी श्री अश्विनी कुमार चौबे राज्यमंत्री, आरोग्य व कुटुंब कल्याण, प्रीती सुदान, सचिव - आरोग्य व कुटुंब कल्याण , डॉ. बी. के राव, अध्यक्ष एन ए बी एच व इतर मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यावर्षी प्रथमच कायाकल्प पुरस्कार स्पर्धेसाठी देशातील ६५३ खाजगी रुग्णालयांचाही सर्वेक्षणास सहभाग केला होता. रुग्णसेवेचा दर्जा, स्वच्छता, देखभाल, संसर्ग नियंत्रण, जैविक कचर्याचे व्यवस्थापन, निर्जंतुकीकरण प्रक्रिया, स्वच्छता जनजागृती, आदी प्रमुख घटकांचा सर्वेक्षणात समावेश करण्यात आला होता. यात डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटलने सर्वाधिक गुण प्राप्त केले व सर्वेक्षणात देशात प्रथम क्रमांक मिळवला. कुलपती डॉ. पी. डी. पाटील, उपाध्यक्षा सौ. भाग्यश्रीताई पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, संचालक डॉ. स्मिता जाधव, ट्रस्टी डॉ. यशराज पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलने ही कामगिरी केली.

महाराष्ट्राचा बहुमान : डॉ. पी.डी. पाटील

“राष्ट्रीय पातळीवरचा देशातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळणे, हा फक्त आमच्या हॉस्पिटलचा बहुमान नसून महाराष्ट्राचा तसेच आमच्या पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीचाही बहुमान आहे. पिंपरीसारख्या उद्योगनगरीत जागतिक स्तरावरील सोयीसुविधांनी युक्त हॉस्पिटल व रिसर्च सेंटर उभारण्याचे माझे स्वप्न होते. ते पूर्ण होतानाच राष्ट्रीय स्तरावरचा प्रथम पुरस्कार मिळणे हा दुग्धशर्करा योग आहे. मी अजिबात अतिशयोक्ती न करता सांगतो की, या हॉस्पिटलला आजवर देश-विदेशातील असंख्य मान्यवरांनी भेट दिली आणि प्रत्येकजण येथील सुविधा पाहून थक्क झाला आहे. सध्याच्या काळात अतिशय भयावह आजार बळावले आहेत. सर्वसामान्य रुग्णांना त्यावरील उपचार अजिबात परवडणारे नाहीत. अशा काळात केंद्र व राज्य शासनाच्या रुग्णसेवेच्या सर्व योजना या हॉस्पिटलमध्ये राबविण्यात येतात. रुग्णांना सर्वाधिक सुविधा देणारे हे राज्यातील प्रथम क्रमांकाचे हॉस्पिटल आहे.”

जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा

डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलची २०१८ मध्ये गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. येथे अद्ययावत २००० बेड असून अतिदक्षता विभागात १७५ बेड आहेत. अत्यंत उच्च दर्जाचे ३० मॉड्युलर ऑपरेशन थिएटर तसेच १९ बाह्यरुग्ण विभाग आहेत. हॉस्पिटलमध्ये जागतिक स्तरावरील हायटेक रोबोटिक सेंटर आहे. हृदयरोग, कर्करोग, मेंदू विकार, हाडांचे विकार आदी गंभीर आजारांपासून जवळपास सर्व आजारांवर या ठिकाणी अद्ययावत उपचार केले जातात. येथील बालरुग्ण विभाग देशात सर्वोत्तम ठरावा. २ लाखांहून अधिक मोठ्या, ३ लाख छोट्या शस्त्रक्रिया, ७५ हजारांवर प्रसूती या हॉस्पिटलमध्ये झाल्या आहेत.

...Read More

V. S. News
भाजपने केलेली चुकीची कामे लोकांसमोर मांडा अजित पवार यांचे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आवाहन

व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत गाफील न राहता प्रभागवार प्रचारयंत्रणा राबवावी. भाजपने केलेली चुकीची कामे लोकांसमोर मांडावीत, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आघाडीचे पिंपरी मतदारसंघातील उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांनी आज पिंपरीत नगरसेवकांची बैठक घेतली.या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आघाडीचे पिंपरी मतदारसंघातील उमेदवार अण्णा बनसोडे, पिंपरी चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर मंगलाताई कदम, योगेश बहल, रंगनाथ फुगे, वैशाली घोडेकर, कविचंद भाट, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा वैशाली काळभोर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, स्थायी समितीचे माजी सभापती जगदीश शेट्टी, अजित गव्हाणे, शमीम पठाण, राष्ट्रवादीचे प्रवक्ते फजल शेख, आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, भाजपच्या वतीने 370वे कलम रद्द केल्याचा मुद्दा फोकस केला जात आहे. अर्थात्‌ 370वे कलम रद्द केल्याचे राष्ट्रवादीने स्वागतच केले आहे. मात्र, शेतक-यांचे प्रश्न, महिला सुरक्षेचा प्रश्न, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न 370वे कलम रद्द करून सुटणार नाहीत. हे लोकांमध्ये जाऊन सांगितले पाहिजे. प्रत्येक निवडणुकीत मतदार वेगळा विचार करून मतदान करत असतो. त्यामुळेच छत्तीसगढ, राजस्थान, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यात कॉंग्रेसच्या विचाराची सरकारे आली. हे लक्षात घ्या व कामाला लागा, असे आवाहन पवार यांनी केले.

यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. शहरात गुन्हेगारी वाढत आहे, महिला व मुली सुरक्षित नाहीत. पोलिस आयुक्तालय होऊनही काहीही उपयोग झालेला नाही. राष्ट्रवादीच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. मात्र, भाजपने शहराची वाट लावून टाकली आहे, असे पवार म्हणाले.

...Read More

V. S. News
विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून अण्णा बनसोडे यांनी घेतल्या गाठीभेटी

व्हीएस न्युज - पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस - कॉंग्रेस मित्रपक्षा आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी आज विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून शहरात मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच मतदारांशी संपर्क साधला.

अण्णा बनसोडे यांनी काल (सोमवारी) ज्येष्ठ नेते, माजी महापौर आझमभाई पानसरे, माजी महापौर मंगलाताई कदम, माजी उपमहापौर राजू मिसाळ, दिनकर दातीर पाटील, पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती जगदीश शेट्टी, नगरसेवक जावेद शेख, माजी नगरसेवक दिगंबरशेठ काळभोर, संतोष कुदळे, प्रसाद शेट्टी, निलेश पांढारकर, काळूराम पवार, उद्योजक किर्ती शहा, व्यंकटेश देवगीरीकर, दादा नाईक, चतुर पांढारकर, निलेश शिंदे, बाळासाहेब ठाणगे, राजू कोहली, भरत सोळंकी, दिपक चोप्रा आदींच्या भेटीगाठी घेतल्या.

दरम्यान आज विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून माजी आमदार बनसोडे यांनी शहरात मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच मतदारांशी संपर्क साधून त्यांना विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्राधिकरण आकुर्डी येथील तक्षशिला बुध्द विहार येथे धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त काढण्यात आलेल्या शांती मिरवणूकीत ते सहभागी झाले होते. यावेळी प्रताप सोनवणे, हिरामण रामटेके, दत्तात्रय मिसाळ, मंगला मुनेश्वर, निर्मला वालकर, रंजना निमगडे, इंदूमती वाघमारे, रंजना निमगरे, गुणवंत रामटेके, बाळासाहेब कांबळे, सुनिल तायडे, यशवंत भालेराव, संजय शिंदे, उत्तम गायकवाड, गौतम जाधव, कश्यप ठमके, अर्जुन सावंत, अजय जगताप आदी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने पिंपरीतील डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने पुष्प सजावट.

व्हीएस न्युज - धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आज रोजी लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने पिंपरीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या आवारात फुलांच्या माळा लावून सजावट करण्यात आली.

या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन लोकजनशक्ती पार्टीचे प्रदेश सचिव धुराजी शिंदे यानी केले.

यावेळी लोकजनशक्ती पार्टीचे दिनकर ओव्हाळ, अरूण मैराळे, विनोद भालेराव, नवनाथ धोत्रे, कांचन जावळे, दिलीप कांबळे, गिरीश सोनवणे, हरीभाऊ गायकवाड, विठ्ठल गायकवाड, आदी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
आमदार लांडगे यांच्या प्रयत्नांमुळे गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पावणेदोन कोटीची मदत माजी नगरसेवक दत्तात्रय गायकवाड यांचे प्रतिपादन.

व्हिएस न्युज - राज्य सरकारकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील रूग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून भोसरी विधानसभा मतदारसंघातील 156 गरजू रुग्णांना 1 कोटी 65 लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली. त्यामुळे गरजूंना मोठा आधार मिळाला, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक दत्तात्रय गायकवाड यांनी येथे केले.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ दिघी येथे आयोजित बैठकीत माजी नगरसेवक गायकवाड बोलत होते.

या वेळी ते म्हणाले की, सरकारतर्फे मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम अंतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी या न्यासाची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्याचे व्यवस्थापन केले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली. भोसरी मतदारसंघातील गरजूंना त्याचा लाभ मिळावा यासाठी आमदार महेश लांडगे यांनी प्रयत्न केले. त्यातून गरजू रुग्णांना मदत मिळाल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

यावेळी गायकवाड म्हणाले की, भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्वच मोठ्या रुग्णालयांमध्ये आमदार महेश लांडगे यांनी आमदार कार्यालय प्रतिनिधी नियुक्त केला आहे. त्यांच्या आधारे रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यापासून ते त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेपर्यंत सर्व मदत केली जाते. कोणत्याही व्यक्तीला रुग्णालयासंदर्भात व रुग्ण सेवेबाबत समस्या उद्‌भवू नये ही यामागची संकल्पना आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चालविल्या जाणा-या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) आमदार महेश लांडगे यांनी सुरू केलेल्या ‘डेस्क’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशाच प्रकारे भोसरीतील आरोग्य सुविधा सक्षम करण्याबाबत पावले टाकण्यात येत आहेत, असे ते म्हणाले. ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 65 वरून 60 करण्यात यावी त्यांना रक्तदाब व मधुमेह असल्यास औषधे मोफत द्यावीत. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत ज्येष्ठांचा समावेश करावा, ज्येष्ठांसाठी स्वतंत्र आयुक्तालय स्थापन करावे आदी मागण्यासांठी ज्येष्ठ नागरिक महासंघाने राज्यातील जिल्हाधिकारी व तहसिलदार कार्यालयासमोर आंदोलने केली होती.

त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा आमदार महेश लांडगे यांनी केला, असे सांगून गायकवाड म्हणाले की, पालक आणि ज्येष्ठ नागरिक परिक्षा आणि कल्याण अधिनियम 2007 या कायद्यानुसार ज्येष्ठ नागरिकांना मासिक खर्च देण्याचे दायित्व मुलांवर असावे. तसेच ज्येष्ठांचे जीवन व मालमत्ता सुरक्षित रहावी अशा तरतूदी राज्य सरकारच्या धोरणात करण्यात याव्यात, अशी मागणी आमदार लांडगे यांनी विधानसभेत केली होती. त्याबाबत भाजप सरकार सकारात्मक विचार करत असल्याचे सांगण्यात आले. पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर याबाबत निर्णय अपेक्षित असल्याचे माजी नगरसेवक गायकवाड यांनी सांगितले.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!