धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने पिंपरीतील डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने पुष्प सजावट.
पिंपरी
2019-10-08
व्हीएसन्युज - धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आज रोजी लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने पिंपरीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या आवारात फुलांच्या माळा लावून सजावट करण्यात आली.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन लोकजनशक्ती पार्टीचे प्रदेश सचिव धुराजी शिंदे यानी केले.
यावेळी लोकजनशक्ती पार्टीचे दिनकर ओव्हाळ, अरूण मैराळे, विनोद भालेराव, नवनाथ धोत्रे, कांचन जावळे, दिलीप कांबळे, गिरीश सोनवणे, हरीभाऊ गायकवाड, विठ्ठल गायकवाड, आदी उपस्थित होते.