Breaking News

जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम |
V. S. News
यशवंतराव चव्हाण मराठी मनांचा मानबिंदू : राजेंद्र पाटील

व्हीएस न्यूज - महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण हे मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारे, राज्यात सहकार क्षेत्राची पायीभरणी करणारे आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्यांच्या लोकशाही हक्क मिळवून देणारे नेते म्हणून अवघा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण यांच्याकडे बघतो, अशा या द्रष्ट्या नेत्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युवकांनी समाजकारण व राजकारणात पुढे यायला हवे, असे आवाहन मार्गदर्शन ज्येष्ठ व्याख्याते निवृत्त मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांनी भोसरी येथे केले.

भोसरीतील कै. पै. धोंडीबा उर्फ गणपत फुगे (पाटील) क्रीडा मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात ‘यशवंतराव चव्हाण उत्तुंग व्यक्तिमत्व’ या विषयावर व्याख्यान देताना पाटील बोलत होते. या महोत्सवाचे आयोजन युवानेते अमर फुगे यांनी केले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव कदम, पिंपरी चिंचवड सेवानिवृत्त संघटनेचे विलास देसाई, दादाराव सोनवणे, शांताराम वाळुंज, हनुमंत पोखरकर, वसंत जाचक, आप्पा घुले, शंकर मुळे, पंढरीनाथ गोरडे, धनंजय गोरे, अशोक हुंबे, अनिल हुंबे, बाळासाहेब लाकाळ, आत्माराम लाकाळ, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

पाटील यांनी सांगितले की, यशवंतराव चव्हाण यांचा जन्म क-हाड तालुक्यातील देवराष्ट्रे या गावात 12 मार्च 1913 ला कराड तालुक्यात झाला. तर 25 नोव्हेंबर 1984 ला त्यांचे निधन झाले. 71 वर्षांच्या त्यांच्या कार्यकीर्दीत त्यांनी समाजकारण, राजकारण, शेती, सहकार, उद्योग, शिक्षण या क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव पुढे आणले. तीन पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात यशस्वीपणे जबाबदारी पार पाडलेल्या यशवंतरावांना राजकीय जीवनात अवघड परिस्थितीशी मुकाबला करावा लागला. प्रशासनावर त्यांचा आदरयुक्त दबदबा होता. देशातील सरकारपूढे ज्वलंत परिस्थिती उभी राहावी आणि ती शमवण्याची जबाबदारी यशवंतरावांनी पार पाडावी, असे अनेकदा घडले. बांगलादेशच्या युध्दामुळे निर्माण झालेल्या अवघड आर्थिक परिस्थितीत देशाचे अर्थमंत्रिपद त्यांना सांभाळावे लागले. 1962 च्या चीन युद्धाच्यावेळी त्यांनी पुण्यात शनिवारवाडा येथे घेतलेल्या सभेत नागरिकांना देशसेवेसाठी मदतीचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्यावेळी पुण्यातील नागरिकांनी लाखो रुपयांचा निधी व पाच पोत्यांपेक्षा जास्त सोने देशासाठी दान दिले होते. मुंबई राज्यातील दोन प्रमुख भाषिकांत विश्र्वास निर्माण करणे. सैन्यदल व उच्च अधिका-यांचे मनोधैर्य वाढवणे आणि संसदीय कार्यपद्धतीस निर्माण होणारा धोका टाळणे, ही मोठी जबाबदारी यशवंतरावांनी पेलली. हे पंतपधान नेहरू यांनी पाहिले. मुंबई महाराष्ट्रालाच मिळाली पाहिजे ही यशवंतराव चव्हाण यांची आग्रही भूमिका पंतप्रधान पंडीत नेहरू यांना मान्य करावी लागली; महाराष्ट्र कलश महाराष्ट्रात आणण्याचे काम यशवंतराव यांनी केले. महाराष्ट्राच्या औद्यागिक सहकार क्षेत्राच्या पायाभरणीचे श्रेय यशवंतरावांनाच द्यावे लागेल, असेही पाटील यांनी सांगितले.

स्वागत अमर फुगे, सुत्रसंचालन शंकर मुळे आणि आभार परशुराम फुगे यांनी मानले.

...Read More

V. S. News
मातोश्री सामाजिक संस्थेचा पिंपरी विधानसभेत भगवा फडकवण्याचा निर्धार ; गौतम चाबुकस्वार यांना जाहीर पाठिंबा.

व्हीएस न्युज - पिंपरी येथील मातोश्री सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पिंपरी विधानसभेत भगवा फडकवण्याचा निर्धार करत पिंपरी विधानसभेचे शिवसेना- भाजपा - आर.पी.आय महायूतीचे अधिकृत उमेदवार गौतम चाबूकस्वार यांना पाठींबा जाहिर करण्यात आला.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघातून चाबुकस्वार यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी कंबर कसली आहे. पिंपरी येथून आमदार महायुतीचाच होणार असा विश्वासही गणेश आहेर यांनी दिला.

मातोश्री संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर यांच्या संग पदाधिकारी गोरख पाटील, बाळासाहेब गायकवाड, मारुती म्हस्के, माऊली जाधव, दत्ता गिरी, निलेश भोरे, महेश गूळगोंडा, जितेंद्र चौधरी, नरसिंग माने, संदिप कारंडे, नारायण खूशलानी, उमेश भायानी, रामू चयंन्दास, विनोद वावरे, सत्तार सय्यद,आणा नायडू, ताराचंद क्रिपलानी, राहूल कदम, पिंट्या वावरे, तसेच मातोश्री सामाजिक संस्थेचे सर्व शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभेचे इच्छुक उमेदवार अजूनही गॅस वरच..!

व्हीएस न्युज - आगामी विधानसभा निवडणुकीची उमेदवारी जवळजवळ सर्व पक्षांनी जाहिर केली आहे. भाजपकडून १२५ शिवसेनेकडून 70 मनसेकडून 27 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

बुधवारी रात्री ( दि.०२) राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पक्षाच्या ७७ उमेदवारांची यादी जाहीर केली,परंतु ७७ उमेदवारांच्या यादीत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी ची उमेदवारी अद्याप जाहिर झाली नसल्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

७७ उमेदवारांची व त्यांच्या मतदार संघाची माहिती खालील प्रमाणे

1 सिंदखेडा – संदिप बेडसे

2 चोपडा – जगदीश वळवी

3 जळगाव ग्रामीण- पुष्पा ज्ञानेश्वर महाजन

4 अमळनेर – अनिल पाटील

5 एरंडोल – डॉ. सतिश पाटील

6 चाळीसगाव – राजीव देशमुख

7 पाचोरा – दिलीप वाघ

8 जामनेर – संजय गरुड

9 सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे

10 मुर्तीजापूर- रविकुमार राठी

11 हिंगणघाट – राजू तिमांडे

12 काटोल- अनिल देशमुख

13 हिंगणा- विजय घोडमारे

14 पुसद- इंद्रनिल मनोहर नाईक

15 किनवट- प्रदिप नाईक

16 लोहा- दिलीप धोंडगे

17 वसमत- चंद्रकांत नवघरे

18 जिंतूर – विजय भांबळे

19 घनसांगवी- राजेश टोपे

20 बदनापूर – बबलू चौधरी

21 भोकरदन – चंद्रकांत दानवे

22 कळवण – नितीन पवार

23 येवला – छगन भुजबळ

24 सिन्नर – माणिकराव कोकाटे

25 निफाड – दिलीप बनकर

26 दिंडोरी – नरहरी झिरवळ

27 विक्रमगड – सुनिल भुसारा

28 शहापूर- दैलत दरोडा

29 मुरबाड – प्रमोद हिंदुराव

30 उल्हासनगर – भरत गंगोत्री

31 कल्याण पूर्व – प्रकाश तरे

32 मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड

33 विक्रोळी – धनंजय पिसाळ

34 दिंडोशी – विद्या चव्हाण

35 अणुशक्ती नगर – नवाब मलीक

36 श्रीवर्धन – अदिती तटकरे

37 जुन्नर- अतुल बेनके

38 आंबेगाव – दिलीप वळसे पाटील

39 दौंड – रमेश थोरात

40 इंदापूर – दत्तात्रय भरणे

41 बारामती – अजित पवार

42 वडगाव शेरी – सुनिल टिंगरे

43 खडकवासला – सचिन दोडके

44 पर्वती – अश्वीनी कदम

45 हडपसर – चेतन तुपे

46 अकोले – किरण लहामटे

47 कोपरगाव – आषुतोष काळे

48 शेगाव – प्रताप ढाकणे

49 पारनेर – निलेश लंके

50 अहमदनगर शहर- संग्राम जगताप

51 कर्जत जामखेड – रोहीत पवार

52 गेवराई – विजयसिंह पंडीत

53 माजलगाव – प्रकाश सोळंखे

54 बीड – संदीप क्षीरसगार

55 केज – पृथ्वीराज साठे

56 परळी – धनंजय मुंडे

57 अहमदपूर – बाबासाहेब पाटील

58 उदगीर – संजय बनसोडे

59 परांडा – राहूल मोटे

60 पंढरपूर – भारत भालके

61 फलटण – दीपक चव्हाण

62 वाई – मकरंद जाधव

63 कोरेगाव – शशिकांत शिंदे

64 कराड उत्तर – बाळासाहेब पाटील

65 पाटण – सत्यजित पाटणकर

66 सातारा – दीपक पवार

67 दापोली – संजय कदम

68 गुहागर – सह्देफव बेटकर

69 चिपळूण – शेखर निकम

70 रत्नागिरी – सुदेश मयेकर

71 सावंतवाडी – बबन साळगावकर

72 राधानगरी – के पि पाटील

73 कागल – हसन मुश्रीफ

74 इस्लामपूर – जयंत पाटील

75 शिराळा – मानसिंग नाईक

76 तासगाव(कवठे महांकाळ) – सुमन आर पाटील

77 शिरुर – अशोक पवार

...Read More

V. S. News
भोसरी मधून महेश लांडगेंना तर चिंचवडमधून लक्ष्मण जगताप यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर

व्हीएस न्युज - भारतीय जनता पार्टीने १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात पिंपरी-चिंचवडमधील आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांचा समावेश आहे. महेश लांडगे हे २०१४ ची निवडणूक अपक्ष लढले होते. मात्र, यावेळी ते भाजपा पक्षाकडून अधिकृत उमेदवार ठरणार आहेत. तर विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप हे भाजपाकडून विधानसभा लढवली होती.

भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीत पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप यांना चिंचवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. जगताप हे २००९ मध्ये अपक्ष निवडून आले होते. त्यानंतर २०१४ ला त्यांनी भाजपाच्या साथीने निवडणूक लढवली होती. यातही त्यांना यश आले आणि मताधिक्याने ते विजयी झाले होते. दरम्यान, २०१४ च्या मोदी लाटेत भोसरी मतदारसंघातून आमदार महेश लांडगे निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी भाजपाला साथ देत सहयोगी सदस्यत्व स्वीकारले होते.

भोसरी विधानसभा मतदारसंघात तर्क-वितर्क लढवण्यात येत होते. आमदार महेश लांडगे हे अपक्ष लिवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, भाजपाने अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात या दोन्ही विद्यमान आमदारांच्या विरोधात राष्ट्रवादी कोणते तगडे उमेदवार देणार हे महत्वाचे ठरणार आहे.

...Read More

V. S. News
पिंपरी; सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख यांची बदली रद्द करावी - गणेश आहेर.

व्हीएस न्युज - पिंपरी चिंचवड शहरातील कार्यक्षम पोलीस अधिकारी तसेच शहरातील गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे मोहननगर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख यांची तत्काळ बदली करण्याची मागणी पिंपरी येथील मातोश्री सामाजिक संस्थाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अहिरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली.

गणेश अहिरे म्हणतात की "पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी वाढत असल्याची कबुली एकीकडे पोलीस आयुक्तांनी दिली असताना अन्सार शेख सारख्या कार्यक्षम पोलीस अधिकारी पिंपरी पोलीस स्टेशन मधून बदली करणे कितपत योग्य आहे, राजकिय दबवापोटी जर चांगल्या अधिकार्यांच्या बदल्या होत असेल तर असा स्वार्थ बाळगनाऱ्यांचा मातोश्री सामाजिक संस्थेच्या वतीने तसेच सर्वसामान्य जनतेच्या वतीने जाहिर निषेध व्यक्त केला.

...Read More

V. S. News
पिंपरीत पिस्तुलाच्या धाकाने लुटण्याचा प्रयत्न फसला

व्हीएस न्युज - पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवून तीन चोरट्यांनी साडेतीन लाखांची रोकड आणि गळ्यातील सोन्याची चैन लुटण्याचा प्रयत्न फसला. ही घटना बुधवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

संदीप श्रीपती ढवले (वय 33, रा. मु.पो. हुंडारे वस्ती, पिंपरी बुद्रुक, ता. खेड, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याचा साथीदार किरण जाधव आणि अन्य एकजण अंधाराचा फायदा घेत पळून गेले. विशाल घनश्‍याम सोमानी (वय 40, रा. कोकणे चौकाजवळ, रहाटणी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमानी यांचे चाकण येथे वाईन शॉप आहे. रात्री दुकान बंद करून जमा झालेले साडेतीन लाख रुपये घेऊन आठ कामगारांसह ते आपल्या घरी जाण्यास निघाले. यातील तीन आरोपी दोन दुचाकीवरून त्यांचा चाकणपासून पाठलाग करीत होते. ते पिंपरी येथील अशोक टॉकीजजवळ आले असता दुचाकीवरील चोरट्यांनी त्यांना अडविले. पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवून सोमानी यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र सोमानी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आरोपी ढवले याला पकडून ठेवले. यामुळे घाबरलेले इतर दोघेजण पळून गेले.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी ढवले याला चाकूसह ताब्यात घेतले. याबाबत अधिक तपास उपनिरीक्षक ज्ञानोबा निकम करीत आहेत.

...Read More

V. S. News
कॅम फॉउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ यांच्या वतीने पुणे महानगरपालिकेतील 35 सफाई कामगाराना प्रशस्तीपत्र प्रदान

व्हीएस न्युज - पुणे महानगरपालिकेने ड्रेनेज कामगार यांच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे.सामाजिक न्याय व सक्षमिकरण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करण्याऱ्या एनएसकेएफडीसि व एससिजिजे या दोन्ही संस्थाच्या माध्यमातून काम करणाऱ्या कॅम फॉउंडेशन या संस्थेच्या वतीने इंद्रधनुष्य हॉल नवी पेठ पुणे येथे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.

या प्रशिक्षणच्या माध्यमातून सफाई कामगारांचा दर्जा उंचवण्यासाठी व त्यांचा कामामध्ये गर्व निर्माण करण्यासाठी सफाई कामगारांवर भर देण्यात आला. पुणे येथील कैम-फॉउंडेशन या अधिकृत प्रशिक्षण संस्थेच्या जनरल मॅनेजर स्मिता सिंग, प्रशिक्षक शिवराज जाधव व ईश्वर इंगळे हे GOI certified ट्रेनर असून त्यानी सफाई कामगारांना उत्कृष्ट पद्दतीने प्रशिक्षण देण्याचे काम केले.

सदर प्रशिक्षनात पिपीटी ,फोटो, व्हिडिओ,प्रात्याशिक ई .वापर करून सोप्या पद्दतीने प्रशिक्षण दिले गेले. रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ यांच्या वतीने या 35 सफाई कर्मचाऱ्याना बॅग, सेफ्टी गॉगल, मास्क, ग्लोज, रेफ्लेकटिंग जॅकेट,हॅन्ड वॉश, गम बूट हे साहित्य मोफत देण्यात आले. सदर प्रशिक्षण घेतल्यानंतर आज त्यांना प्रमाणपत्र आणि सेफ्टी किट बॅग देण्यात आली.

सदर प्रशिक्षण सफाई कामगारांसाठी उपयोगी असून भविष्या मध्ये उर्वरित सफाई कामगारांना सुद्धा प्रशिक्षण देण्याचा मानस माननीय ज्ञानेश्वर मोळक सहाय्यक आयुक्त घन कचरा व्यवस्थापन विभाग पुणे महानगरपालिका आणि आदरनिय अभिजीत जोग अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ यांनी व्यक्त केला.

या प्रशिक्षणासााठी पुणे महानगरपालिका चे सहाय्यक आयुक्त घनकचरा व्यवस्थापण ज्ञानेश्वर मोळक , महानगरपालिका च्या डॉ. केतकी घाटके, कॅम अवीदा एनवायरो इंजिनीरिंग या कंपनी चे मा. संचालक आदरनिय मनोहर कृष्णा, कॅम फॉउंडेशन च्या जनरल मॅनेजर स्मिता सिंग, ऍडमिन ऑफिसर ऐश्वर्या जोशी ट्रेनर शिवराज जाधव,ईश्वर इंगळे तसेच पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे इ. उपस्थित होते.

...Read More

V. S. News
वर्गणी मागणाऱ्या तीन कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा

व्हीएस न्युज - लघुउद्योजकांकडे जबरदस्तीने पाच हजार रुपयांची वर्गणी मागणाऱ्या गणपती मंडळाच्या तीन कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी भोसरी एमआयडीसी येथे घडली. जावेद पठाण (रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) आणि त्याचे दोन साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. हलागौडा शिवलिंग ओंकार (वय ४३, रा. दुर्गा निवास इंद्रायणी नगर, भोसरी) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आरोपी व त्याचे साथीदार हे फिर्यादी हलागौडा यांच्या भोसरी एमआयडीसी येथील साई इंजिनीअरिंग या कंपनीत आले. त्यांनी ‘क्रांतीवीर तरुण मित्र मंडळ’ असे नाव लिहिलेली पाच हजार रुपयांची पावती जबरदस्तीने फिर्यादी हलागौडा यांना दिली. तसेच पैसे नेण्यासाठी नंतर येतो, असे सांगून जर वर्गणी दिली नाही तर पाहून घेतो, अशी धमकी दिली. दोन महिन्यांपूर्वी मीच तुम्हाला मारले होते, ओळखले ना? असे म्हणून शिवीगाळ करून पुन्हा धमकी देऊन आरोपी निघून गेले. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे करीत आहेत.

...Read More

V. S. News
पिंपरी येथून मातोश्री सामाजिक संस्थेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात; पिंपरीला परतताना ट्रक कलंडला.

व्हीएस न्युज - कोल्हापूर, सांगली या महाराष्ट्रातील दोन सधन जिल्ह्यांना प्रलयकारी महापुराचा तडाखा बसला असल्यामुळे दोन्ही जिल्ह्यांत शेतीचे तसेच जनावरांचे, प्रापंचिक साहित्याचे आतोनात नुकसान झाले आहे. देशात कोठेही आपत्ती ओढवली तर, सढळ हाताने मदत करणाऱ्या या दोन्ही जिल्ह्यांना आज मदतीची गरज आहे.

या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथील तांदुळवाडी,घोटावळे , फूलेवाडी ,वाघूर्डे ,दोनवडे या गावांमध्ये तसेच माने हाॅल येथे पूरात बेघर झालेल्या बांधवांनसाठी पिंपरी येथील मातोश्री संस्थांचे संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर आणि त्यांच्या सहकाऱ्यंनी मदतीचा हात पुढे केला आहे.

यामध्ये पूरग्रस्त कुटुंबाला लागणाऱ्या सर्वे खाद्य वस्तू बरोबर पाण्याच्या बाटल्या,टूथपेस्ट,ब्रश,साबण,भांडी,कपडे, पांघरणे, बेडसीट, चादर या सर्व वस्तू पूरबाधितांची प्रत्यक्ष भेट घेऊन देण्यात आल्या.

पूर्गग्रस्तांसाठी मदतीस गेलेल्या मातोश्री संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कोल्हापूर पासून ६५ किलो मिटर अंतरावर असणाऱ्या तांदुळवाडी गावाजवळील रस्त्यावर पिंपरी येथून नेलेल्या मालवाहतूक ट्रॅक रस्ता काच्चा असल्यामुळे कलंडला असल्यामुळे दुर्घटनेला सामोरे जावे लागले. अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

गणेश आहेर यांनी दिलेल्या माहितनुसार ट्रॅक बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांची मोठी मदत लाभली, जे.सी.बी च्या साहाय्याने ट्रक बाहेर कडण्यात आला. धीर आणि जिद्द न सोडता घेतलेला वसा पूर्ण करूनच घरी परतलो असल्याची माहिती गणेश आहेर यांनी दिली.

यावेळी तांदूळवाडी गावचे सरपंच सिध्दार्थ कांबळे,वाघूर्डे गावचे कृष्णाकांत शिक्रे (उपतालूका प्रमूख, शिवसेना) गावातील सरपंच संगिता पाटील,पोलीस पाटील,खंडू शिरसाठ,दिपक कांबळे,प्रकाश झा,रविकिरण घटकार. गोरख पाटील,प्रदिप दळवी,नरसिंग माने, सचिन जाधव, अकूंश कोळेकर, माऊली जाधव,दत्ता गिरी,बाळासाहेब गायकवाड,मारूती म्हस्के,निलेश भोरे,छञपती यूवा प्रतिष्ठाण काळेवाडी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाच्यावतीने कोल्हापूर व सांगलीतील पूरग्रस्त भागात वैद्यकीयआरोग्य पथक रवाना

व्हीएस न्यूज - पिंपरी येथील डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाच्यावतीने कोल्हापूर व सांगलीतील पूरग्रस्त भागात वैद्यकीय आरोग्य पथक रवाना करण्यात आले आहे. कोल्हापूर व सांगली या दोन भागासाठी दोन वैद्यकीय पथक तयार करण्यात आले आहे. यामध्ये सर्व सेवासुविधांनी युक्त रुग्णवाहिका,डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, दहा लाखांहून अधिक किमतीची आवश्यक औषधे तसेच पाणी शुद्ध करण्यासाठी लागणारी औषधे आणि वैद्यकीय साहित्य, व उपकरणांचा यात समावेश आहे.

यावेळी डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाच्या उपाध्यक्षा मा. भाग्यश्रीताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमरजित सिंग, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जे. एस भवाळकर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच चव्हाण उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, ट्रस्टी डॉ स्मिता जाधव, कोशाध्यक्ष डॉ. यशराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही दोन्ही वैद्यकीय आरोग्य पथके कोल्हापूर व सांगलीतील पूरग्रस्त भागात पाठविण्यात अली आहे.

...Read More

V. S. News
मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

व्हीएस न्युज - अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तानच्या सैन्याला नेस्तनाबूत करून भारतीय सैनिकांनी विजय संपादन केल्याचा दिन म्हणजे कारगिल विजय दिन उत्साहात साजरा आला. देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड शहर तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अमर जवान स्तंभाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आणि मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच कारगील युद्धाच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. सर्व उपस्थितांनी सर्व जवानांच्या शौर्याला सलाम केला. मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार, श्रीकृष्ण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.दामोदर पतंगे, डॉ दामोदर पतंगे प्राचार्य गोरख घोडके, प्रा. अभयकुमार हिरास, भूगोल फाउंडेशन अध्यक्ष डॉ. विठ्ठलराव वाळूंज, शंकर तांबे, प्रकाश इंगोले, शिवलाल कांबले, प्रीती काळे, समाजप्रबोधनकार शारदा मुंढे, साहेबराव गावडे, डी.एस. राठोड, राजेंद्र मोरे, शशिकांत दुधारे, रमेश जाधव, शिवलाल काबळे, आण्णा जोगदंड, तसेच भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघ, भीष्माचार्य जेष्ठ नागरिक संघ, संत गाडगे बाबा जेष्ठ नागरिक संघ, मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्टचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कारगिल युद्ध भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अण्वस्त्रसंपन्न झाल्यानंतरचे पहिलेच युध्द होते. हिंदुस्थानी सैन्याने आपल्या प्राणाची बाजी लावून व साहसाचे प्रदर्शन करीत अति उंचावरच्या लढाईत भारताच्या अजेय शक्तीचे जगाला दर्शन घडविले. दक्ष राहण्याचा निश्चय हीच त्या संग्रामातील हुतात्मांना आदरांजली आहे, असे डॉ. दामोदर पतंगे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे सचिव सूर्यकांत कुरुलकर यांनी, तर आभार प्रकाश इंगोले यांनी मानले.

...Read More

V. S. News
हृदयातील ८.६ सेमीची गाठ (ट्युमर) काढण्यात यश; डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयाची यशस्वी कामगीरी.

व्हीएस न्युज - डॉ. डी. वाय पाटील रुग्णालय, पिंपरी, पुणे येथील हृदय, फुफ्फुस आणि रक्तवाहिन्या (CVTS) शस्त्रक्रिया विभागाच्या टीमने हृदयामधील ८.६ सेमीची गाठ (ट्युमर) यशस्वी रित्या बाहेर काढली. शस्त्रक्रियेच्या दोन दिवस आधी ७४ वर्षीय महिलेले अचानक दम लागल्याने व श्वास घेताना त्रास होऊ लागल्यामुळे रुग्णालयाच्या आपत्कालीन विभाग दाखल करण्यात आले, लगेच सर्व तपासण्या करण्यात आल्या त्यांच्या फुफ्फुसांमध्ये पाणी भरले होते तसेच हृदयामधील असणाऱ्या चार कप्प्यामधील एका कप्प्यात गाठ (ट्युमर) असल्याचे दिसून आले. तसेच हृदयाची एक झडप कार्यकरत नव्हती. हृदयामधील गाठ आणि बंद पडलेली हृदयाची झडप, फुफ्फुसांमधील पाणी यामुळे रुग्णाचा जीव जाण्याचा धोका अधिक होता.

रुग्णालयाच्या डॉक्टर्स टीमने तातडीने मेरॉथॉन सर्जरी करण्यात आली यामध्ये (Heart lung Machine) हृदयाचे कार्य चालविणाऱ्या मशीनवर रुग्ण ठेऊन पूर्णपणे हृदय बंद करून हृदयवर शस्त्रक्रिया करून ही गाठ बाहेर काढली सोबतच हृदयाची झडप पुन्हा कार्यरत करण्यात यश आले. शस्त्रक्रिया पूर्ण होण्यास ६ तासांचा अवधी लागला. शस्त्रक्रियेनंतर दोनतासांनी रुग्णाला जीवनरक्षक प्रणाली व्हेंटिलेटर वरून बाहेर काढले. रुग्ण महिलेची ताबेत आता स्थिर आहे. त्यांच्यावर योग्यते औषधोपचार सुरु आहेत. या शस्त्रक्रियेत विभागप्रमुख डॉ. अनुराग गर्ग, डॉ. आशिष डोळस, डॉ. स्मृती हिंदारिया, डॉ. रणजित पवार, भूल तज्ञ् डॉ. विपुल शर्मा, डॉ. संदीप जुनघरे यांचा सहभाग होता. सदर रुग्ण महिलेवर केली गेलेली शस्त्रक्रिया व उपचार हे महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत करण्यात आले आहे.

या आगोदर दोन महिन्यापूर्वी सहा महिन्याच्या बाळावर अश्याच प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्यावेळी २.५ सेमीची गाठ काढण्यात आली होती अशी माहिती विभाग प्रमुख डॉ अनुराग गर्ग यांनी दिली ते म्हणाले या विभागाने आतापर्यंत ४०० हुन अधिक हृदय संदर्भातील शस्त्रक्रिया केल्याअसून त्यापैकी ९० टक्के शस्त्रक्रिया या मोफत करण्यात आल्या आहेत यामध्ये २३ दिवसांच्या बाळापासून ते ८७ वर्षीय वृद्ध रुग्णांचा समावेश आहे. या यशस्वी कामगिरीबाबत डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयाच्या टीमचे कुलपती डॉ. पी. डी पाटील व उपाध्यक्षा भाग्यश्रीताई पाटील यांनी कौतुक केले आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!