Breaking News

मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. |
V. S. News
रावेत मध्ये पीसीसीओईआर फॉस सेंटरचे उद्घाटन

ग्रामीण भागातील विद्यार्थी व शिक्षकांना मिळणार मोफत प्रशिक्षण व प्रमाणपत्र

व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाच्या (पीसीसीओईआर) संगणक आणि ई अँड टीसी विभागात फ्री ओपन सोर्स सेंटर (फॉस) केंद्राचे उद्घाटन इन्फोसिस एज्युकेशन अँड रिसर्चचे दिनेश अनंतवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना अनंतवार यांनी या सेंटरचा अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी पुरेपूर उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले आणि हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मिळणार्‍या विविध संधींबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी प्राचार्य डॉ. हरीष तिवारी, ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. शितलकुमार रवंदळे, प्रा. महेंद्र साळुंके, प्रा. चंद्रशेखर भावसार, प्रा. शाम मानकर, प्रा. मयुरा येवले, प्रा. सोनाली कणसे आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. हरीष तिवारी यांनी यावेळी बोलताना सांगितले की केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे आय सी टी धोरणानुसार आणि मुंबई आयआयटीच्या सहयोगाने स्पोकन ट्युटोरियल अंतर्गत फॉस सेंटर उभारले आहे. या ‘फॉस’ (FOSS - FREE OPEN SOURCE CENTER) सेंटरमध्ये पिंपरी चिंचवड शहरात शिकणा-या अभियांत्रिकीच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मोफत सर्व सुविधा मिळणार आहेत. त्याचा लाभ घेणा-या यशस्वी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रमाणपत्र देखिल देण्यात येईल. यामध्ये ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या सहाय्याने कॉम्प्युटरच्या सी, सी++, जावा, पायथॉन, पीचपी, लिनकम, लायब्ररी ऑफीस, स्कायलॅब यासारख्या अनेक सेल्फ लर्निंग प्रोग्रॅमींगचा अभ्यास करता येईल. अशीही माहिती प्राचार्य डॉ. हरीष तिवारी यांनी दिली. विभागप्रमुख प्रा. महेंद्र साळुंके व प्रा. चंद्रशेखर भावसार यांनी फॉसच्या अंतर्गत होणार्‍या माहिती तंत्रज्ञान साक्षरता अभियानाची माहिती दिली. हे केंद्र उभारण्यासाठी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवार्धन पाटील, भाईजान काझी, संचालक डॉ. गिरीश देसाई आणि आयआयटी मुंबईच्या विद्या कदम यांनी मार्गदर्शन केले. प्रा. त्रिवेणी ढमाले यांनी सूत्रसंचालन, प्रा. स्मिता लांडगे यांनी आभार मानले.

...Read More

V. S. News
भारतीय संविधान हे विसाव्या शतकातील सर्वांत मोठा आदर्श ग्रंथ - डॉ. यशोधरा नितनवरे

व्हीएस न्यूज - भारतीय संविधानामुळे भारतासारख्या खंडप्राय, बहुसंस्कृती संपन्न देशात जात, वर्ण, वंश, पंथ, धर्म, लिंग या घटकांवर आधारीत कोणताही भेदभाव न मानता सर्व नागरिकांना समान आर्थिक, सामाजिक, राजकीय न्याय व संधी मिळत आहे. भारतीय संविधान हे विसाव्या शतकातील सर्वांत मोठा आदर्श ग्रंथ आहे. यामुळे प्रजासत्ताक व्यवस्थेत सर्व अधिकार नागरिकांना आहेत. न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधूता या सार्वभौम राष्ट्रात वृध्दीगंत होण्यासाठी सर्वांनी या आदर्श संविधानाचे पालन केले पाहिजे. असे प्रतिपादन डॉ. यशोधरा नितनवरे यांनी केले.

भारतरत्न प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव, संयुक्त जयंती समितीच्या वतीने संविधान दिनानिमित्त रविवारी (दि. 26 नोव्हेंबर 17) संस्थेचे अध्यक्ष अमरसिंग आदियाल आणि माजी नगरसेविका शोभाताई आदियाल यांच्या नेतृत्वाखाली पिंपळे गुरव येथील सृष्टी हॉटेल चौकात नागरिकांनी संविधानाचे वाचन केले. यावेळी माजी नगरसेविका शोभाताई आदियाल यांनी दहशतवाद विरोधी तसेच देशात न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता वाढीस लागावी यासाठी प्रयत्नशील रहाण्याची उपस्थितांना सामुहिक शपथ दिली. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, एनसीपीचे युवा नेते शाम जगताप, तानाजी जवळकर, राहुल काकडे, हरीष गायकवाड, हुसेन मुलाणी, संजय साळवे, संदिप नितनवरे, चंद्रकांत वाखोडे, रवी कांबळे, लता शार्दुल, उषा शिंदे, अर्चना सिंग, शितल पाथाडे, प्रदिप पवार, निलचंद्र निकम आदी उपस्थित होते.

डॉ. नितनवरे म्हणाल्या की, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की, लोकशाही संपली की, सामान्य लोकांचे जीवन उध्वस्त होईल. हे व्हायला नको असेल तर भारताच्या संविधानाचे पालन आपण सर्वांनी केले पाहिजे. देशातील सव्वाशे कोटींहून जास्त नागरिकांचे सर्वांगीण हित या संविधानाचे पालन करण्यामुळे होईल.

...Read More

V. S. News
आंबेडकर नगरात " संविधान गौरव दिवस " साजरा

व्हीएस न्यूज - पिंपरी- चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने नेहरूनगर येथील आंबेडकर नगरात "संविधान गौरव दिवस" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने भारताच्या संविधानाचे जनक डॉ. भीमराव आंबेडकर यांना स्मरण करून संविधान प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन आणि संयोजन शहराध्यक्ष उमेश बनसोडे यांनी केले.

प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभाग अध्यक्ष अशोक राव मोरे यांनी आपल्या मनोगतातून बाबासाहेबांचा गौरव करीत जातीवादी संघटन पासून सावध राहण्याचे आवाहन केले. यावेळी, शहर काँग्रेस पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष अर्जुन शिवाजी गायकवाड, मास्टर शाहिद बारस्कर, साहिब राव निंबर्गीकर, सन्मुख आयगोळे, कल्याणी साखरे, परशुराम आयगोळे, चंद्रशहा आयगोळे, रुक्मिणी आयगोळे, शारदा आयगोळे, सुधारानी आयगोळे, रमाबाई आयगोळे, शिवाजी आयगोळे, सिद्धाराम आयगोळे, महादेव कांकरी, शिवलिंग बनसोडे, तुकाराम चंदनशिवे, मौला नदाफ, फातिमा नदाफ, जयश्री निसर्गिकर, पार्वती बनसोडे, शिक्षिका अरूणा चव्हाण, नजीर शेख, रुक्मादीं शेख,सुरेखा बनसोडे, नामदेव मलंगणाकार, शोभा गवई, कल्पना बाई चंदनशिवे, रेखा कामदारी, राजश्री कांकारे, पुतनाबाई गायकवाड, भारतबाई, वैशाली बनसोडे, दत्ता बनसोडे, मिलिंद बनसोडे, दुर्गाबाई बजे आदी उपस्थित होते.

...Read More

V. S. News
स्वच्छतेचे तत्व अवलंबून व्यवसाय वाढवा - गिरीष बापट

व्हीएस न्यूज स्वच्छता हे परमेश्‍वरी तत्त्व असल्याने त्याचा सर्व अन्न व्यावसायिकांनी अवलंब करत आपला व्यवसाय वाढवा, असे आवाहन अन्न व औषध मंत्री गिरीष बापट यांनी केले.

अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील अन्न व्यावसायिकांची एक दिवसाची अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित केलेल्या या कार्यशाळेला महपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, अन्न प्रक्रीया समिती सदस्य आनंद चोरडीया, पिंपरी चिंचवड हॉटेल रेस्टॉरण्ट असोसिएशनचे अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी, कार्याध्यक्ष गोविंद पानसरे सहाय्यक आयुक्त सं. भा. नारागुडे, अ. गो. भुजबळ, सं. पां. शिंदे व शहरातील व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. पल्लवी दराडे यांनी ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हॉटेल व रेस्टॉरण्टमध्ये व्यावसायिकांनी कोणकोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्ट्रीट व्हेंडर व हॉटेल, रेस्टॉरण्ट अशा अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी अन्न पदार्थाच्या दर्जासोबतच स्वच्छतेस प्राधान्य देण्याची सूचना करत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून अशा प्रकारच्या उपक्रमांना नेहमीच सहकार्य करण्याची ग्वाही दिली. अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त संपत देशमुख यांनी अन्न सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेदरम्यान गिरीष बापट यांच्यासह उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक यांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी प्रस्ताविक केले. संतोष सावंत यांनी सुत्रसंचालन केले.

...Read More

V. S. News
पिंपरी महापालिकेचा स्वीडनसोबत करार ?

आयुक्‍त हर्डीकर यांची माहिती, स्वीडनचे शिष्टमंडळ पुढील महिन्यात पालिकेला भेट देणार

व्हीएस न्यूज – प्रदुषणविरहीत सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था आणि दैनंदिन घनकचरा संकलन व त्याचे विघटन व्यवस्थापन करण्यासाठी स्वीडनची राजधानी स्टॉकहोल्ममध्ये राबवलेली संकल्पना पिंपरी-चिंचवडमध्ये राबवता येऊ शकते. त्यासाठी नेमके काय करता येईल, हे जाणून घेण्यासाठी स्वीडन येथील शिष्ठमंडळ पुढील महिन्यात पिंपरी-चिंचवडला भेट देणार आहे. या भेटीदरम्यान स्वीडन आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यातील करार करण्याबाबत चर्चा होईल, अशी माहिती आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

आयुक्त हर्डीकर मागील आठवड्यात स्वीडन देशातील स्टॉकहोल्म शहरात स्मार्ट सिटीविषयक परिषदेसाठी केले होते. या दौऱ्यावरून पतल्यानंतर त्यांनी सोमवारी (दि. 27) पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, आयुक्‍त हर्डीकर म्हणाले की, स्वीडन येथील स्टॉकहोल्ममध्ये एकंदरीत ग्रीन सिटी तयार करण्यावर भर दिला आहे. पर्यटन स्थळे विकसित करण्यात आली आहेत. 4 हजार 500 हेक्‍टर भूखंडावर गार्डन वजा फॉरेस्ट तयार केले आहे. स्मार्ट सिटी साकारण्यासाठी स्वीडन सरकारचा इंधनविरहित मोटारींचे उत्पन्न करण्यावर संशोधन सुरू आहे. प्रदुषण रोखण्यासाठी सायकल चालविणे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर संशोधन चालू आहे. इलेक्‍ट्रीक बसेस सुरू केल्या आहेत. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. प्रत्येक गोष्टीतून वीज वाचविण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले आहे, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

घनकचरा सुका, ओला आणि मिक्‍स अशा तीन वेगवेगळ्या स्वरुपात संकलीत केला जातो. दैनंदीन संकलीत कचरा मोठ्या कंटेनरमध्ये भरला जातो. कंटेनरची रचना अत्याधुनिक पध्दतीची आहे. त्यामधून कचऱ्याची दुर्गंधी बाहेर येत नाही. कचरा डेपोमध्ये वेगवेगळ्या कचऱ्यातील टाकाऊ परंतु वापरण्यायोग्य वस्तुंचा संचय करून त्यापासून कचरा डेपोची रचना केली आहे. ग्रीन बॉण्ड सरोवर केले आहेत. नदी पात्रालगत हिरवळ विकसित केली आहे. मॅक्‍स स्केपींग तयार केले आहे. याचा प्रयोग आपण स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपरी-चिंचवडमध्ये करू शकतो, कारण आपल्याकडे रस्ते मोठे आहेत, आणि पुरेशी जागाही उपलब्ध आहे. यासंदर्भात पाहणी करण्यासाठी स्वीडनचे शिष्टमंडळ पुढील महिन्यात शहराला भेट देणार आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि स्वीडन यांच्यात काही विकासकामे करण्यासाठी करार होईल, अशी माहिती हर्डीकर यांनी दिली.

नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे- आयुक्‍त

स्वीडन सरकार ग्रीन सिटीअंतर्गत विकास प्रकल्प राबविताना जनमताला प्राधान्य देते. नागरिकांच्या सूचनांचा अंतर्भाव केल्याशिवाय कोणताही प्रकल्प मार्गी लागत नाही. तेथील नागरिकांचेही स्वीडन सरकारला मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळते. त्यामुळे चांगले प्रकल्प साकारले जातात. आपल्याकडे उलट परिस्थिती आहे. एखादा प्रकल्प राबविताना विरोधही केला जातो. तर, काही ठिकाणी सहकार्याची भूमिका घेतली जाते. ज्या ठिकाणी नागरिकांचे सहकार्य मिळते, त्याठिकाणी चांगले प्रकल्प राबविताना अडचण निर्माण होते. याकरिता शहराच्या विकासाचे व्हीजन ठरविताना या गोष्टींचा विचार व्हायला हवा, असेही आयुक्‍त हर्डीकर सांगितले.

...Read More

V. S. News
महेश लांडगे यांना खासदारकी नको राज्यातील मंत्रीपदच घ्या !

माजी आमदार दिलीप मोहिते यांचा सल्ला

व्हीएस न्यूज आमदार महेश लांडगे यांनी शिरुर लोकसभा मतदार संघातून खासदार होण्यापेक्षा राज्यात मंत्रीपद घेवून भोसरीसह राज्यातील लोकांची सेवा करावी, असा सल्ला खेडचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप मोहिते-पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आमदार लांडगे कोणती भूमिका घेणार? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे सहयोगी सदस्य आमदार लांडगे यांनी वाढदिवसानिमित्त भोसरीतील गावजत्रा मैदानावर जोरदार शक्‍तीपदर्शन केले. यावेळी सुमारे 25हजार चाहत्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी आमदार लांडगे यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला खेडचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप मोहिते-पाटील यांनीही आवर्जुन उपस्थिती दर्शवली. यावेळी मोहिते-पाटील बोलत होते.

दिलीप मोहिते-पाटील म्हणाले की, भोसरीकरांनी आमदार लांडगे यांचे बालपण पाहिले आहे. आता भोसरीकर दादांचे मोठपणही पाहत आहेत. कार्यकर्त्यांचे प्रेम आणि लोकांचा हा अफाट पाठिंबा कायम ठेवण्याची जबाबदारी माझ्यासह सर्व कार्यकर्त्यांची आहे. आमदार लांडगे खेडचे जावई आणि भाचेही आहेत. त्यामुळे केवळ भोसरीच नाही, तर लांडगे खेडचेही आमदार आहेत. त्यामुळेच आळंदी आणि खेड परिसरात भोसरीपेक्षा जास्त “फ्लेक्‍स’आमदार लांडगे यांचे लागले आहेत.

दरम्यान, दिलीप मोहिते-पाटील आणि आमदार लांडगे यांच्यामध्ये “गुुरु-शिष्य’ असे नाते आहे. त्यामुळे मोहिते-पाटील यांनी दिलेल्या गुरूमंत्राचा आमदार लांडगे गांभीर्याने विचार करणार यात तिळमात्र शंका नाही. त्यातच या कार्यक्रात मंगलदास बांदल यांच्याह अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आमदार लांडगे नेमकी कोणती भूमिका घेणार? याकडे पिंपरी-चिंचवडसह शिरुर लोकसभा मतदार संघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रातील नेता दिल्लीत मोठा होत नाही

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवडसह शिरुर परिसरात आमदार लांडगे लोकसभा निवडणूक लढवणार, अशी चर्चा आहे. पण, माझे अनेक मित्र खासदार होवून दिल्लीत गेले आहेत. ते नेहमी सांगतात, तुम्ही विधानसभा लढवा…मंत्री व्हा, पण खासदार होवून दिल्लीत येण्याचा प्रयत्न करु नका. कारण, महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्लीत मोठे होवू दिले जात नाही, अशी खंतही दिलीप मोहिते यांनी व्यक्‍त केली. तसेच, आमदार लांडगे यांनी खासदारकी न लढवता, राज्यात मंत्रीपदाची संधी मिळाली तर त्याला पहिली पसंती द्यावी. पक्षीय भेद न ठेवता आम्ही कायम त्यांच्या सोबत खंबीरपणे राहणार आहोत, असा विश्‍वासही मोहिते-पाटील यांनी यावेळी दिला आहे.

...Read More

V. S. News
मोटारसायकलच्या धडकेने दुचाकीवरील एक ठार

व्हीएस न्यूज - भरधाव मोटारसायकलची दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार तर एक जण जखमी झाला. तसेचमोटारसायकलस्वारही जखमी झाला. ही घटना पुणे-आळंदी रस्त्यावर चहोली फाटा येथे घडली. मोटारसायकल चालकावर दिघी पोलीसांनी गुन्हा दाखल केलाआहे.

शुभम संतोष जाधव (वय 24 , रा. आळंदी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. रोहन घोडसे (वय 23, रा. आळंदी) याने दिघी पोलीसठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश विठ्ठल साळुंखे (वय 40, रा. धावडे वस्ती, भोसरी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहन आणि शुभम हे 26नोव्हेंबर रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास दुचाकीवरून जात होते. चहोली फाट्याजवळ भरधाव आलेल्या साळुंखे याच्या मोटारसायकलची दुचाकीलाजोरदार धडक बसली. यात गंभीर जखमी झाल्याने जाधव याचा मृत्यु झाला. तर मोटारसायकल चालक साळुंखे हासुद्धा जखमी झाला. फौजदार टोके तपासकरत आहेत.

...Read More

V. S. News
नोकरीच्या आमिषाने तरूणाची अडीच लाखाची फसवणूक

व्हीएसन्यूज- लष्करात वाहन चालक पदावर नोकरी लावण्याच्या बहाण्याने एकाकडून अडीच लाखाची रोकड, शैक्षणिक कागदपत्रे घेऊन नोकरी न लावताफसवणुक केल्याचा प्रकार वाकडमध्ये उघडकीस आला आहे.

गोपाळ पाचंगे (वय 25, रा. डांगे चौक, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रशांत भाऊराव पाटील असे गुन्हा दाखल केलेल्याआरोपीचे नाव आहे. 10 जुलै पासून वाकड येथील पटेल गॅरेजवर हा प्रकार घडला आहे. आरोपी पाटील याने पाचंगे यांना लष्करात वाहन चालक पदावरनोकरी लावतो असे आमिष दाखवले. त्यासाठी त्यांच्याकडून शैक्षणिक कागदपत्रे आणि अडीच लाखाची रोकड घेतली. नोकरीचे नियुक्तीपत्रही पाठवले. मात्र,चौकशीत पाचंगे यांना आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले. सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. घोळवे तपास करत आहेत.

------------------

...Read More

V. S. News
सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याला पेन्शनच्या बहाण्याने तीन लाखाला गंडा

व्हीएस न्यूज - मंत्रालयात ओळख असल्याचे सांगून पेन्शनचे काम करून देण्याच्या बहाण्याने महापालिकेतील निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याला एकाने तीनलाख रूपयांना गंडा घातला . हा प्रकार मुंबई-पुणे महामार्गावर पिंपरी महापालिकेसमोर घडला आहे.

याप्रकरणी, डॉ. भास्कर काळू बच्छाव (वय 67, रा. वास्तुउद्योग कॉलनी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पराग संतोष डिंगणकर(वय-38, रा. शिक्षकनगर, कोथरूड) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. डॉ. बच्छाव हे पिंपरी-चिंचवड महापालिकेतून वैद्यकीय अधिकारीपदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. 15 मार्च 2017 पासून आरोपी डिंगणकर याने डॉ. बच्छाव यांना आपली मंत्रालयात ओळख असल्याचे सांगितले. तुमचेपेन्शनचे काम करून देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्याकडून तीन लाख रूपये घेतले. मात्र, पेन्शनचे काम न करता डॉ. बच्छावयांच्या पैशाचा अपहार करून त्यांची फसवणुक केली. सहायक पोलीस निरीक्षक रामदास मुंढे तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
तमाशा कलावंत व लोककला क्षेत्रातील व्यक्तींचा पुरस्कार सोहळा

व्हीएस न्यूज - तमाशा कलावंत व लोककला क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारा ‘शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ जेष्ठ लावणी नृत्यांगना छाया खुटेगावकर यांना देण्यात येणार आहे. लोकसाहित्यिक ‘डॉ. भास्करराव खांडगे’ पुरस्कार लावणी गायिका नंदा सातारकर यांना व कै.पठ्ठे बापूराव यांचे पट्टशिष्य ‘बापुसाहेब जिंतीकर पुरस्कार’ शाहीर बाळासाहेब मालुसकर यांना देण्यात येणार आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश वाघमारे यांनी दिली.

कै.पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने गेली २० वर्षे हा पुरस्कार दिला जातो. शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार १५००० रुपये, डॉ.भास्करराव खांडगे पुरस्कार १०००० रुपये व बाप्पुसाहेब जिंतीकर पुरस्कार ५००० रुपये, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात दुपारी १ ते सायंकाळी ८ वाजे पर्यंत लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम प्रवेशिका मोफत उपलब्ध आहेत. महिलांच्यासाठी बाल्कनी राखीव ठेवण्यात आली आहे. विजयता व कल्याणी नगरकर, रेश्मा व वर्षा परितेकर, कविता बंड निर्मित ढोलकीचा खनखनाट अशा संगीत पार्टींचे कलावंत आपली कला लावणी महोत्सवात सदर करणार आहेत.

...Read More

V. S. News
पिंपरी वॉर्ड क्रमांक २० मध्ये स्वच्छते बाबत जनजागृती.

व्हीएस न्यूज - पिंपरी येथील वॉर्ड क्रमांक २०(नेपाळी बाजार ,डेक्कन होंडा,क्रोम मॉल ) या परिसरात मध्ये कचऱ्या बाबत जनजागृती अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे 'ह ' प्रभागातील आरोग्य निरीक्षक सतीश इंगेवाड,संभाजी गायकवाड ,सुखपाल जिनवाल आणि कामगार यांनी कचऱ्या संदर्भात मोरवाडी चौक ते बीफ मार्केट रेल्वे पूल पर्यंत प्रत्येक दुकानातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना आपल्या दुकानातील कचरा म्हणजेच प्लास्टिक पिशव्या ,चहाचे कप,वेस्ट भाजी पाला व उरलेले जेवण हे रस्त्यावर आणि गटारात न टाकता डस्टबिन मध्ये जमा करावा असे प्रबोधन केले .जेणे करून रोग राईला प्रतिबंध लागेल. माहिती व प्रबोधन करतानाच ह्या सर्व परिसरची स्वछता केली. या परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!