Breaking News

मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. |
V. S. News
' कुस्तीचा लौकीक वाढविण्यासाठी प्रयत्नशील' – अजित पवार

व्हीएस न्यूज - महाराष्ट्रातील तमाम जनतेचे कुस्तीवर मनापासून प्रेम आहे. मुलांमध्ये क्रीडा नैपुण्य वाढीस लागावे म्हणून प्रशिक्षक परिश्रम घेतात. त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी आघाडी सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्र केसरी,हिंद केसरी, भारत केसरी, रुस्तम-ए-हिंद या मल्लांना मासिक मानधनाची योजना सुरू केली. महाराष्ट्र ऑलिंम्पिकचा अध्यक्ष या नात्याने देखील मी कुस्तीचे जगभर नाव लौकिक वाढावे म्हणून काम करीत असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपळे सौदागर येथे सांगितले.

एकसष्टाव्या राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड शहरातील पैलवानांची निवड चाचणी स्पर्धा झाली. यामध्ये महाराष्ट्र केसरी गट (८६ ते १२५ किलो) गादी विभागात खुल्या गटात रहाटणीच्या पै. किशोर नखाते याने भोसरीतील हर्षवर्धन माने वर १२ विरुध्द २ असा भारंदाज डावावर तांत्रिक गुणांनी विजय मिळविला. महाराष्ट्र केसरी गट (८६ ते १२५ किलो) माती विभागात खुल्या गटात रहाटणीच्या पै. वैभव तुपे याने पिंपळे सौदागरच्या पै. कानिफनाथ काटेला बांगडी डावावर चितपट करुन विजय मिळविला. गादी विभागातून निवड झालेला पै. किशोर नखाते हा चालू वर्षीचा महाराष्ट्र युवा केसरी आहे. तो पुण्यातील सह्याद्री कुस्ती संकुल येथे सराव करीत आहे तर माती विभागातून निवड झालेला पै. वैभव तुपे हा एचए तालीम येथे सराव करीत आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची ६१ वी राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २० ते २४ डिसेंबर २०१७ ला (भुगाव, ता. मुळशी, जि. पुणे) येथे होणार आहे. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील कुस्तीपटूंसाठी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघ आणि नाना काटे सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने कै. पंढरीनाथ फेंगसे यांचे स्मरणार्थ पिंपळे सौदागर पोलीस चौकी शेजारी कै. देवराम काटे पाटील क्रीडानगरीत रविवारी निवड चाचणी कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. पै. किशोर नखाते विरुध्द पै. हर्षवर्धन माने यांची गादी विभागातील महाराष्ट्र केसरी खुला गटातील अंतिम सामना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लावण्यात आला.

...Read More

V. S. News
दारुसाठी पैसे न दिल्याने दोघांवर वार

व्हीएस न्यूज दारु पिण्यास पैसे दिले नसल्याचा राग मनात धरून दोघांनी दोन तरुणावर लोखंडी कोयत्याने वार केले. ही घटना शनिवारी (दि. 25) रात्री साडेनऊ वाजता घडली.

ओमकार बाळू सरोदे व सागर खळगे (दोघे रा. काळेवाडी) यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अनिल नागनाथ बनपट्टे (वय 28, रा. ओंकार कॉलनी, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा भाऊ सचिन बनपट्टे याला दारुसाठी पैसे मागितले होते. मात्र सचिनने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने संगनमताने सचिन याच्यावर लोखंडी कोयत्याने वार केले. यावेळी फिर्यादी सचिन यांना वाचविण्यासाठी गेला असता त्याच्यावरही आरोपींनी वार केले. यामध्ये सचिनच्या डाव्या कानाच्यावर तर फिर्यादीच्या हातावर वार करण्यात आले आहेत. तसेच या भांडणात इतर व्यक्तिंनाही आरोपीने जखमी केले आहे. वाकड पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू

व्हीएस न्यूज पुण्याला जाणाऱ्या रेल्वे खाली सापडून महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 22) रात्री साडेदहाच्या सुमारास तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन येथे घडली. दरम्यान, अद्याप या महिलेची ओळख पटलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेदहाच्या तळेगाव रेल्वे स्टेशनमधील दोन लेनच्या मध्ये पुण्याला जाणाऱ्या अज्ञात एक्‍सप्रेस गाडी खाली सापडून या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचे वय अंदाजे 35 वर्षे आहे. उंची 5फूट 2 इंच, चेहरा गोल, अंगाने सडपातळ रंग नीम गोरा, लांब काळे केस, असे या महिलेचे वर्णन आहे.

तिच्या अंगात गुलाबी रंगाचा कुर्ता, पांढऱ्या रंगाचा सलवार, कानावर पिवळ्या धातुची कर्णफुले, बोटात 2 अंगठ्या, पायात पैंजण, असा पेहराव आहे. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.वरील वर्णनाच्या महिलेला ओळखणाऱ्या व्यक्तिने पुणे रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

...Read More

V. S. News
पद्यावती चित्रपटाविरोधात पिंपरी महापालिकेवर मोर्चा

पद्यावती चित्रपटाविरोधात पिंपरी महापालिकेवर मोर्चा

व्हीएस न्यूज संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती चित्रपटात पद्मिनी राणीचा अपमान केला असल्याचा आरोप करत या चित्रपटाच्या विरोधात पिंपरी चिंचवड राजपूत समाज संघटनेने आज (सोमवारी) महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी संजय लीला भन्साळी यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. तसेच राजपुत समाज संघटनेच्या वतीने पालकमंत्री गिरीश बापट यांनी निवेदन देण्यात आले.

पिंपरी-चिंचवड राजपूत समाज संघटनेने हा महामोर्चा शहर प्रमुख नीता परदेशी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. या मोर्चात राजपूत नागरिक सहभागी झाले होते. यावेळी नीता परदेशी म्हणाल्या की, राजपूत समाजात पद्मिनी हे देवीचे स्वरूप आहे. तिने आपली अब्रू वाचविण्यासाठी आपल्या 16 हजार दासी आणि राण्यांसोबत जोहर (सती) केला होता.

अशा राणीचा अपमान चित्रपटाच्या माध्यमातून करण्याचा लाजिरवाणा प्रयत्न संजय लीला भन्साळी यांनी केला आहे. दिंग्दर्शकाने केवळ टीआरपीसाठी इतिहासात हस्तक्षेप केला जात आहे. यापूर्वी देखील जोधा अकबर, बाजीराव मस्तानी अशा चित्रपटांच्या माध्यमातून इतिहासात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून आम्ही पद्यावती चित्रपट प्रदर्शित होवू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

...Read More

V. S. News
तालुकास्तरीय व्यावसायिक विकास अविरत प्रशिक्षणाचा समारोप

व्हीएस न्यूज चिंचवड येथील श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात तालुकास्तरीय सातत्य पूर्ण व्यावसायिक विकास अविरत प्रशिक्षणाचा समारोप झाला. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व महाराष्ट्र शासन आयोजित जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभाग आणि चिंचवड येथील श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात तालुकास्तरीय सातत्य पूर्ण व्यावसायिक विकास अविरत प्रशिक्षणाचा समारोप झाला.

यावेळी शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या राज्य समन्वयक पल्लवी देव आणि जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, पुणे येथील वरिष्ठ अधिव्याख्याता तथा संपर्क अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर पाटील यांनी दोन दिवस प्रशिक्षणास उपस्थित असलेल्या शिक्षकांना मार्गदर्शन करून प्रशिक्षणाचा समारोप केला. यावेळेस विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष अण्णा जाधव यांनी संस्थेच्या वतीने मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि ज्ञानेश्वरी भेट देवून सत्कार केला.

सेवांतर्गत प्रशिक्षणाचा उद्देश शालेय नेतृत्व या नात्याने मुख्याध्यापक व शिक्षकांचा सातत्याने व्यावसायिक विकास हा या अविरत प्रशिक्षणाचा मुख्य हेतू आहे. प्रशिक्षण सुरुवातीला दोन दिवस इंडक्‍शन कोर्स या स्वरुपात देण्यात आले असून उर्वरित 8 दिवस पुढे प्रात्याक्षिक व क्षेत्रभेटीच्या माध्यमातून पूर्ण करून घेतले जाणार आहे. प्रशिक्षणात माहिती तंत्रज्ञानाचा वापरावर विशेष भर देण्यात आला. संरक्षण शास्त्र, कलारसास्वाद व किशोरवयीन विद्यार्थ्यांना समजून घेणे या घटकांवर विशेष लक्ष देण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील 100 शाळांचे मुख्याध्यापक आणि वरिष्ठ शिक्षक सहभागी झाल्याने कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रशिक्षण जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, पुणेच्या प्राचार्या डॉ. कमलादेवी आवटे व प्रशासन अधिकारी बजरंग आवारी यांच्या नेतृत्वाखाली कार्यान्वित झाले होते. प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. सूर्यकांत आरेकर, एकनाथ बुरसे, उमाकांत काळे, साधना दातीर, नारायण पाटील या मुख्याध्यापकांनी मार्गदर्शन केले. या प्रशिणासाठी विद्यालयाचे प्राचार्य बाळाराम पाटील, पर्यवेक्षक अनिल करपे, प्रशिक्षण समन्वयक प्रदीप शिंदे आणि मधुकर क्षीरसागर, सुरेखा खैरनार यांनी विशेष परिश्रम घेतले.

...Read More

V. S. News
स्वप्नील सावंत, स्वाती गाढवे यांनी पटकाविला महापौर चषक

व्हीएस न्यूज पिंपरी-चिंचवड महापालिका व पुणे डीस्ट्रीक्‍ट ऍथलेटिक असोसिएशन यांच्या वतीने सिटी ऍथलेटिक असोसिएशन सहकार्याने आज (रविवारी) चऱ्होली येथे अर्ध मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला खेळाडूंनी उत्स्फूर्त दिला. पुरुषांच्या गटात स्वप्नील सावंत तर महिलांच्या गटात यावेळी माजी महापौर कै. सादबा ऊर्फ आप्पासाहेब काटे महापौर चषक स्वाती गाढवे यांनी प्रथम क्रमांक पटकावत महापौर चषकावर मोहर उमटवली.

जिल्हास्तर 2017 अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे उद्‌घाटन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, क्रीडा कला व सांस्कृतिक समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, नगरसदस्य राजेंद्र लांडगे, विलास मडिगेरी, नगरसदस्या सुवर्णा बुर्डे, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, प्रशासन अधिकारी राजेश जगताप, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे आदी उपस्थित होते.

या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे खेळांडूना चऱ्होली, मोशी, चिखली, कुदळवाडी, स्पाईनरोड, संत ज्ञानेश्‍वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर मार्गावरुन घेण्यात आली. तसेच स्पर्धेचा समारोप इंद्रायणीनगरातील संत ज्ञानेश्‍वर क्रीडा संकुलात पार पडला. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना महापौर नितीन काळजे व सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते बक्षिस व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी महापौर चषक अर्ध मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विविध वयोगट आणि किलो मिटरनुसार झालेल्या स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना एकूण 4 लाख 49 हजार रुपयांची रोख बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

या स्पर्धेत पुरुष खुला गट 21 कि.मी. स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वप्नील सावंत (बक्षीस 51 हजार रुपये), व्दितीय क्रमांक सेहेंदर सिंग (बक्षीस 35 हजार रुपये), तृतिय क्रमांक किशोर गव्हाणे (बक्षीस 25 हजार रुपये) तर महिला खुला गट10 कि.मी. स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वाती गाढवे (बक्षीस 51 हजार रुपये), व्दितीय क्रमांक मनिषा साळुंखे (बक्षीस 35 हजार रुपये), तृतीय क्रमांक विनया मालुसरे (बक्षीस 25 हजार रुपये) देण्यात आले.

18 वर्षीय शालेय मुले 6 कि.मी. स्पर्धेत प्रथम क्रमांक विकास पुनिया (बक्षीस 7 हजार रुपये), व्दितीय क्रमांक बाला किसन (बक्षीस 5 हजार रुपये), तृतीय क्रमांक अजय क्षीरसागर (बक्षीस 3 हजार रुपये) तर 18 वर्षीय शालेय मुली 6कि.मी. स्पर्धेत प्रथम क्रमांक पायल आमले (बक्षीस 7 हजार रुपये), व्दितीय क्रमांक पायल भालेकर (बक्षीस 5 हजार रुपये), तृतीय क्रमांक अंकिता कोळपे (बक्षीस 3 हजार रुपये) देण्यात आले.

16 वर्षीय शालेय मुले 4 कि.मी. स्पर्धेत प्रथम क्रमांक सौरभ अनिल (बक्षीस 5 हजार रुपये), व्दितीय क्रमांक सौरभ रावत (बक्षीस 3 हजार रुपये), तृतीय क्रमांक मोनु लाठर (बक्षीस 2 हजार रुपये) तर 16 वर्षीय शालेय मुली 4 कि.मी. स्पर्धेत प्रथम क्रमांक अनुष्का मोरे (बक्षीस 5 हजार रुपये), व्दितीय क्रमांक आदिती जगताप (बक्षीस 3 हजार रुपये), तृतीय क्रमांक श्रावणी कोल्हे (बक्षीस 2 हजार रुपये) देण्यात आले.

14 वर्षीय शालेय मुले 3 कि.मी. स्पर्धेत प्रथम क्रमांक जितेंद्र मोनु (बक्षीस 5 हजार रुपये), व्दितीय क्रमांक अजय चंद्र (बक्षीस 3 हजार रुपये), तृतीय क्रमांक साहिल खान (बक्षीस 2 हजार रुपये), तर 14 वर्षीय शालेय मुली 3 कि.मी. स्पर्धेत प्रथम क्रमांक सायली गांजाळे (बक्षीस 5 हजार रुपये), व्दितीय क्रमांक सपना चौधरी (बक्षीस 3 हजार रुपये), तृतीय क्रमांक मनाली रतनोजी (बक्षीस 2 हजार रुपये) यांना देण्यात आले.

...Read More

V. S. News
‘डी. वाय.’ ला “सेंटर ऑफ एक्‍सलन्स’ पुरस्कार

व्हीएस न्यूज – चेन्नई येथे झालेल्या देशभरातील नामांकित महाविद्यालयांच्या गुणगौरव सोहळ्यामध्ये आकुर्डी येथील डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट ऍन्ड रिसर्च महाविद्यालयाला व्हर्च्युसा कंपनीने “सेंटर ऑफ एक्‍सलन्स’ हा पुरस्कार प्रदान केला.

यावेळी प्राचार्य अनुपमा पाटील, डीन प्लेसमेंट जस्मिता कौर आदी उपस्थित होते. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना प्रशिक्षण, थेट रोजगाराच्या संधी, संस्थेबाहेरील विद्यार्थ्यांना देखील प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळेच हे यश महाविद्यालय संपादन करू शकले आहे. महाविद्यालयाला हे यश मिळवून देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष व आमदार सतेज पाटील, निवृत्त संचालक कर्नल ए. के. जोशी, संगणक विभाग प्रमुख प्रतीक्षा शेवतेकर, कुलसचिव वाय. के. पाटील यांनी मार्गदर्शन केले.

...Read More

V. S. News
नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्‍न सोडविण्यात सरकार अपयशी – अजित पवार

व्हीएस न्यूज - सरकार एकही काम वेळेवर करत नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्‍नांसाठी मला रस्त्यावर उतरावे लागत आहे. शेतकरी कर्जमाफी, अनधिकृत बांधकामे, शास्ती कर असे नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्‍न सोडविण्यात सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेसह राज्यव्यापी प्रलंबित प्रश्‍न घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निगडी ते आकुर्डीतील तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला. या मोर्चात शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील,माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, नेते नाना काटे, माजी महापौर मंगला कदम, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर आदी सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांचा सरकारच्या विरोधात उद्रेक दिसून आला.

अजित पवार म्हणाले की, सरकार जबाबदारपणे वागत आहे. त्यामुळे अशा प्रकारची आंदोलने करावी लागत आहेत. सरकारच्या विरोधात यापुढे संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारची आंदोलने करणार असून या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा मुख्य मुद्दा असणार आहे. मुंबई सारख्या विद्यापीठामध्ये पेपर तपासले न गेल्याने विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेले. राष्ट्रवादीच्या राज्यात वीज कपात बंद होती. यांनी कोळसा घ्यायला पैसे नाहीत म्हणून वीज कपात केली. आज राज्याचे पोलिस जनतेला मारत आहेत. सांगली जिल्ह्यात जिवंत माणसाला मारुन जाळण्याचा प्रकार घडला. असं जिवंत माणसाला मारणार हे सरकार आहे, अशा शब्दात पवार यांनी सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठविली.

जीएसटी लावताना सामान्यांचा विचार केला नाही. आमची सत्ता असताना शहराला स्वच्छतेचा मान मिळवून दिला. आत्ताचे शहर बघितले तर सगळीकडे कचऱ्याचे ढिग साचले आहेत. शास्ती कर रद्द करणार होते, पण तो रद्द झाला नाही. त्याचप्रमाणे रेड झोनचा प्रश्नही सोडविला नाही. प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये देणार होते. परंतु, एकाच्याही हातावर दमडीही ठेवली नाही. कोपर्डी प्रकरणात दिरंगाई केल्याने हे हल्लबोल आंदोलन करावे लागत आहे,असेही पवार यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
दहावीचे अतिरिक्त गुण होणार बंद

कौशल्यानुसार टक्केवारीवर गुण, शिक्षण विभागाचा निर्णय

व्हीएस न्यूज – दहावीच्या बोर्ड परीक्षेत कला आणि क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने देण्यात येणा-या अतिरिक्त गुणांच्या खैरातीला आता आळा घालण्यात येणार आहे. यामुळे या अतिरिक्त गुणांमुळे निर्माण होणारा गुणांचा फुगवटा अखेर फुटणार आहे. या परीक्षेत बसणा-या विद्यार्थ्यांना सरसकट गुण देण्याऐवजी, त्यांच्या कौशल्यानुसार टक्केवारीच्या आधारावर हे गुण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शुक्रवारी जीआरच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

शिक्षण विभागातर्फे कला, क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य मिळविणा-या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण दिले जातात. त्यामुळे या निर्णयाच्या मदतीने मुंबईसह राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळविले होते. दरम्यान निकालाचा टक्का वाढविण्यासाठी या निर्णयाचा उपयोग करून घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर, शिक्षण विभागाने या अतिरिक्त देण्यात येणा-या गुणांच्या निकषात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

शुक्रवारी जाहीर झालेल्या नव्या निर्णयानुसार, शास्त्रीय नृत्य, गायन आणि वादनात तिसरी आणि पाचवी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण दिले जातील. सांस्कृतिक कार्यालयाकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थांमधूनच परीक्षा देणे बंधनकारक आहे. चित्रपटासाठी राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवणा-या बालकलाकाराला दहा गुण, तर राज्य पातळीवर पुरस्कार मिळवणा-या विद्यार्थ्यांला पाच गुण अतिरिक्त दिले जाणार आहेत. प्रयोगात्मक लोककलेसाठी अभ्यासक्रम तयार करण्याची सूचना शिक्षण विभागाने सांस्कृतिक विभागाला केली आहे. या अभ्यासक्रमानुसार गुणदान ठरवले जाणार आहे.

इंजरमिजिएट चित्रकला परीक्षेत अ श्रेणी मिळाल्यास सात गुण, ब श्रेणीसाठी पाच गुण, क श्रेणीसाठी तीन गुण दिले जातील. लोककलेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या प्रयोगांच्या संख्येनुसार गुण दिले जाणार आहेत. त्यानुसार २५ ते ४९ प्रयोग केलेल्या विद्यार्थ्यांना पाच गुण, पन्नासपेक्षा जास्त प्रयोग करणा-या विद्यार्थ्यांना दहा गुण दिले जाणार आहेत.

...Read More

V. S. News
वाहनचालक गाडीत असेल तर गाडी ‘टो’ करू नका!

वाहतूक विभागाची नवी नियमावली जारी

व्हीएस न्यूज – वाहतूक विभागाकडून टोईंगबाबत नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. या नियमावलीमध्ये अनेक नव्या नियमांचा अंतर्भाव करण्यात आला असल्याचे सांगण्यात येते.

नुकतीच मुंबईतील मालाड परिसरात महिला आणि तिचा लहान मुलगा कारमध्ये असताना वाहतूक पोलिसांकडून त्यांची गाडी उचलून नेण्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. सुरुवातीला ही गोष्ट समोर आल्यानंतर वाहतूक पोलिसांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र, काही दिवसांतच या घटनेची दुसरी बाजू दाखवणारा व्हिडिओ समोर आला. यामध्ये संबंधित महिलेची चूक असल्याचेही स्पष्ट झाले.

त्यामुळे भविष्यात असा कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी वाहतूक विभागाकडून टोईंगबाबत नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. यामध्ये अनेक नव्या नियमांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. एखादे वाहन उचलत असताना त्या वाहनाचा मालक तेथे आल्यास दंडाची रक्कम आणि टोईंग शुल्क आकारून ते वाहन सोडण्यात यावे. तसेच गाडी टो करण्यापूर्वी ध्वनिक्षेपकावरून गाडी काढण्यासाठी एकदा सूचनाही देण्यात येणार आहे.

याशिवाय, एखादी गाडी नो-पार्किंग क्षेत्रात उभी असेल, पण गाडीचा चालक आतमध्ये बसला असेल तर ती गाडी उचलू नये. तसेच या गाडय़ा उचलण्यासाठी पोलिसांना मदत करणा-या कर्मचा-यांनी संबंधित वाहनाच्या मालकाशी गैरवर्तन किंवा उद्धटपणे वागू नये, असे या परिपत्रकात म्हटले आहे.

...Read More

V. S. News
काळूराम पवार आणि अण्णा बनसोडे यांच्यात हाणामारी

व्हीएस न्यूज - माजी नगरसेवक काळूराम पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्यात जोरदार हाणामारी झाली.रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास चाफेकर चौकात हा प्रकार घडला. चिंचवड पोलिस ठाण्यात दोघांचे परस्परविरोधी तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्राधिकरण नवनगरच्या कार्यलायवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चास माजी आमदार बनसोडे आणि माजी नगरसेवक पवार हे दोघे स्वतः व त्यांचे कार्यकर्ते घेऊन गेले होते. मोर्चा सुरू असताना दोघांमध्ये वाद झाला. या वादामुळेच मोर्चा संपवून परत जात असताना चाफेकर चौकात तुफान हाणामारी झाली अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिली.माजी नगरसेवक काळूराम पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्यात जोरदार हाणामारी झाली.रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास चाफेकर चौकात हा प्रकार घडला. चिंचवड पोलिस ठाण्यात दोघांचे परस्परविरोधी तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्राधिकरण नवनगरच्या कार्यलायवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चास माजी आमदार बनसोडे आणि माजी नगरसेवक पवार हे दोघे स्वतः व त्यांचे कार्यकर्ते घेऊन गेले होते. मोर्चा सुरू असताना दोघांमध्ये वाद झाला. या वादामुळेच मोर्चा संपवून परत जात असताना चाफेकर चौकात तुफान हाणामारी झाली अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिली.
...Read More

V. S. News
चिंचवड पोलीस स्टेशन मध्ये शहीदांना श्रद्धांजली

व्हीएस न्यूज - मुंबई येथे दहशतवादी हल्ल्यात शाहीद झालेल्या जवानांना मेणबत्त्या लाऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. चिंचवड येथे पोलीस स्टेशन मध्ये श्रद्धांजली च्या कार्यक्रमात चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.विठ्ठल कुबडे यांनी शहिद जवानांना मेणबत्ती लावून,पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली त्यांच्या बरोबर तेथील पोलीस निरीक्षक व्ही. एस. साळुंखे,सौ.एस.ए.देवतळे,एस.एस.कांबळे, पोलीस ऊप निरीक्षक पी.डी. महाले,आर.बी.सोडनवार,आर.जे.ढेरे,एच.आर.केदार,एस.के.जाधव, धोंडिभाऊ बोरकर तसेच सर्व पोलीस
कर्मचारी वर्ग त्याच प्रमाणे स्वायत्र श्रमिक महिला प्रतिष्ठान चे सभासद,संस्कार प्रतिष्ठान चे सर्व पदाधीकरी ,पोलीस मित्र संघटनेचे सर्व सभासद त्यात गोपाळ बिरारी,गजानन चिंचवडे, रमेश होतारी, मोहन गायकवाड,निर्मला जगताप, स्मिता दुसाने,निलेश सायकर,सुभाष मालुसरे,धनंजय कुलकर्णी,मदन जोशी आदी मान्यवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!