Breaking News

मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू | विद्यार्थी आंदोलनाचा विजय; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा | जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्याची मागणी; तीन महिन्यांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा | मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा; दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय विरोधी पक्षांचे प्रतिनिधींची मागणी | मोशीतील कचरा प्रश्नावर जनप्रतिनिधी आक्रमक; अन्य मतदारसंघांचा कचरा स्वीकारण्यास नकार | मोरवाडी न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढली; मात्र कर्मचारी व मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम | भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमध्ये महाबैठक; पदवीधर मतदार नोंदणी व रक्तदान मोहिमेला गती देण्याचे निर्देश | बालाजीनगर एसआरए प्रकल्पात ५०० चौ. फूट घरांसह सर्व आधुनिक सुविधांची मागणी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा | मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन | पर्यावरण संरक्षणासाठी एसटीपी अनिवार्यच; पिंपरी चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेची भूमिका | पिंपरी चिंचवड पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान | पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. |
V. S. News
पोटच्या मुलाकडून आई-वडिलांची हत्या

व्हीएस न्यूज - पुण्यात मायलेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. शनिवार पेठेत पोटच्या मुलाने आई-वडिलांची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पराग क्षीरसागर (वय 30 वर्ष) असं आरोपी मुलाचं नाव आहे.

आज सकाळी ही घटना घडली आहे. आरोपी मुलाने वडिलांची गळा चिरुन तर आईचा गळा दाबून खून केला. प्रकाश क्षीरसागर (वय 60 वर्ष) आणि आशा प्रकाश क्षीरसागर (वय 55 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. महत्त्वाचं म्हणजे आई-वडिलांच्या हत्येनंतर मुलानेही हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलं. मात्र त्याला वाचवण्यात आलं आहे. आरोपीला जुळा भाऊ असून तो देखील घटनेच्या वेळी घरातच होता. आरोपी परागचे आई-वडील नोकरी करत होते. त्याला दारुचं व्यसन होतं. शिवाय तो काही कामही करत नव्हता. त्यातूनच त्याने आई-वडिलांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी पराग क्षीरसागरला ताब्यात घेतलं असून विश्रामबाग पोलिस पुढील तपास सुरु आहे.

...Read More

V. S. News
आगीत फर्निचरचे दुकान खाक, ९० लाखांचे नुकसान

व्हीएस न्यूज - हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे लागलेल्या आगीत फर्निचरचे दुकान जळून खाक झाले आहे. या आगीत ९० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. उरुळी कांचन,येथे अशा प्रकारच्या आगीची पंधरा दिवसातील ही दुसरी घटना असून व्यापारी वर्गात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कृष्णा गंगाराम जगताप (रा. आश्रम रोड, उरुळी कांचन, ता. हवेली) यांचे नेत्रा फर्निचर नावाचे दुकान आहे. या दुकानाला रात्रीच्या वेळी अचानक आग लागली होती. यावेळी आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे दोन गाड्या व ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा विभागाच्या टँकरने ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु या भीषण आगीत हे फर्निचरचे संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

या आगीत ९० लाखांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अशाचप्रकारे साडी डेपो व फर्निचरच्या सात दुकानांना आग लागून साधारणत: दोन कोटींचे नुकसान झाले होते. पंधरा दिवसात या दुसऱ्या आगीच्या घटनेने व्यापारी वर्गात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही घटनेत मध्यरात्रीच्या वेळीच आग लागली असल्याने ही आग लागली की लावली गेली याबाबत शंका उपस्थित होत आहे.

...Read More

V. S. News
गंभीर आजारावरील उपचारासाठी घरफोड्या करणारा पोलिसांच्या ताब्यात

व्हीएस न्यूज - ब्लड कॅन्सर सारखा मोठा आजार, दर दोन महिन्याला बदलावे लागणारे रक्त आणि त्यासाठी प्रचंड महागड्या उपचारासाठी चक्क वयाच्या १७ व्या वर्षापासून घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार निगडी पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. मुकेश उर्फ मुन्ना उर्फ धन्या उर्फ धनंजय बबन मुने (वय-२१, राहणार कोथरुड, पुणे) असे या आरोपीचे नाव आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातल्या घरफोड्या रोखण्यासाठी पोलिसांनी सध्या गस्त वाढवली आहे. ही गस्त सुरू असतानाच निगडी पोलिसांनी मुकेश उर्फ धन्या उर्फ धनंजय बबन मुने या २१ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली आणि पोलिसांना धक्काच बसला. १७ व्या वर्षापासून त्याने घरफोडी करायला सुरुवात केल्याचे त्याने सांगितले. घरफोडी आणि इतर असे तब्बल ३२ गुन्हे त्याच्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आणखी तपास केल्यावर तो घरफोड्या का करत होता हे त्याने सांगितले. त्याचे कारण ऐकून पोलीस ही चक्रावले आहेत. मुकेशला ब्लड कॅन्सर असल्याने त्याला दर दोन महिन्याला रक्त बदलावे लागते. एवढे महागडे उपचार करण्यासाठी तो चोरी करत असल्याचे त्याने सांगितले. पोलीस आता त्याच्या या दाव्याचा तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
घरात भरदिवसा घुसून चोरी करणारा चोरटा जेरबंद

व्हीएस न्यूज - गेल्या काही दिवसांपासून निगडी प्राधिकरणात भरदिवसा घरात घुसून एका चोरट्याने घरातील सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. या घटनेतील सराईत चोराला निगडी पोलिसांनी गजाआड केले आहे.

मुकेश उर्फ मुन्ना ऊर्फ धन्या उर्फ धनंजय (वय-21 रा सुटरदरा, कोथरूड) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 13 लाख 57 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोथरूड पोलीस ठाण्याचा तडीपार गुन्हेगार असून त्याच्यावर 32 गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुमार पळसुले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर औवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली निगडी पोलीस पथकाने केली.

...Read More

V. S. News
नोकरीचे आमिष देवून तरुणाला एक लाखांचा गंडा

व्हीएस न्यूज - मंत्रालयात शिपायाची नोकरी लावतो असे सांगून एका इसमाने चिखलीच्या तरुणाला एक लाख रुपयांना गंडा घातला आहे. गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत ही फसवणूक करण्यात आली आहे.

हेमंत रासकर (वय-47 रा. विठ्ठलवाडी देहुगाव) याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी याकुब देवाशीश पैलवान (वय-22 रा. घरकुल चिखली) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माझे वडील कस्टममध्ये ऑफीसर आहेत. त्यांच्या ओळखीने मंत्रालयात नोकरी लावतो असे आमिष दाखवून आरोपीने याकुब यांच्याकडून मे ते नोव्हेंबर या काळात एक लाख रुपये घेतले. मात्र सहा महिने झाले तरी नोकरी लावली नाही तसेच पैसे मागण्यसाठी गेले असता मारहाण करु अशी धमकीही आरोपीने दिली. निगडी पोलीस तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
पतीचा पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; विवाहितेची पोलीसात तक्रार

व्हीएस न्यूज - माहेराहून पैसे आणण्यासाठी मानसिक छळ केल्याची आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार एका विवाहितेने केली आहे. याप्रकरणी पतीसह सासू व नणंद यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत 23 वर्षीय विवाहितेने तक्रार दिली आहे. तिचा विवाह ठाणे येथील तरुणाशी झाला आहे. जानेवारी 2016 पासून माहेरुन पैसे आणण्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. तसेच पती वारंवार तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत होता. या अत्याचाराला कंटाळून पीडित विवाहिता पिंपरी येथे माहेरी राहण्यास आल्या. छळ असह्य झाल्यानंतर विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर सोमवारी रात्री उशीरा पती, सासू व नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

...Read More

V. S. News
पुर्ववैमनस्यातून टोळक्याकडून मोटारींची तोडफोड

व्हीएस न्यूज - तरूणाबरोबर झालेल्या पुर्वीच्या भांडणातून नऊ जणांच्या टोळक्याने दहशत माजवित तीन मोटारींची तोडफोड केली. ही घटना 29 नोव्हेंबर रोजी भोसरीतील संभाजीनगर कॉलनीत रात्री आठ वाजता घडली.

गजानन पवार (वय-50, रा. संभाजीनगर भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश तानाजी साबळे (वय-20, रा. आदर्शनगर, दिघी), शुभम देविदास खंदारे (वय18, रा. सावंतनगर, दिघी) या दोघांना पोलीसांनी अटक केली होती. त्यांना जामीनही मंजुर झाला आहे. सनी रामदास भागरे (वय-27, रा. भोसरी) याच्यासह सहा जण फरार आहेत.

याबाबत फौजदार चामले यांनी माहिती दिली. संभाजीनगर येथील एका तरूणाबरोबर आरोपींची भांडणे झाली होती. या भांडणातून नऊ आरोपींनी 29 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता फिर्यादी व त्यांचे शेजारी संदिप दौंडकर, दत्तात्रय ठाकरे यांच्या मोटारींची लाकडी दांडक्याने तोडफोड केली. परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
जीवे मारण्याची धमकी देत मित्रांनीच तरूणाला लुटले

व्हीएस न्यूज - दारू पिताना झालेल्या भांडणामधून तरूणाला जीवे मारण्याची धमकी देत तीन मित्रांनी तरूणाकडील चौदाशे रूपये काढून घेतले. हा प्रकार रविवारी पिंपरीतील नव महाराष्ट्र शाळेच्या पाठीमागील झाडीमध्ये रात्री साडेअकरा वाजता घडला.

करण तुलसाणी (वय-18, रा. साई चौक, पिंपरी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. जतिन बिपीन टाक (वय-22), लक्ष्मण मसरू गुंजाळ (वय-23), संतोष जमादार (वय-23, सर्व रा. पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फौजदार अंतरकर यांनी माहिती दिली. करण व आरोपी मित्र आहेत. रविवारी रात्री साडे अकरा वाजता चौघेही पिंपरीतील नव महाराष्ट्र शाळेच्या पाठीमागील झाडीत दारू पित बसले होते. त्यांच्यामध्ये पैशांवरून वाद झाला. करणला जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी त्याच्या खिशातील चौदाशे रूपये जबरदस्तीने काढून घेतले. पिंपरी पोलीस अधिक तुपास करत आहेत.

...Read More

V. S. News
अभियंता तरूणीची सव्वा लाखांची फसवणूक

व्हीएस न्यूज - 'क्लीक इन पोर्टल'वरून कंपनीत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून दोन भामट्यांनी अभियंता तरूणीला ऑनलाईन पैसे भरण्यास सांगून एक लाख 30 हजार रूपयांची फसवणूक केली. हा प्रकार थेरगांव येथे नुकताच उघडकीस आला. रेखा अर्जुन (वय-25, रा. थेरगांव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजेद्र मोक्र व राजन मोक्र (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फौजदार घोळवे यांनी माहिती दिली. फिर्यादी तरूणी बी.ई अभियंता आहे. ती गेल्या काही दिवसांपासून नोकरीच्या शोधात होती.'क्लीक इन पोर्टलवरून' आरोपींनी फिर्यादीशी संपर्क साधला. कंपनीत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून तिचा विश्वास संपादन करून एक लाख 30 हजार रूपये भरण्यास सांगितले. नोकरी न मिळाल्याने घाबरलेल्या तरूणीने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात फिर्याद दिली. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

...Read More

V. S. News
महाराष्ट्र राज्य डेन्टल असोशिएशनची 56 वी राज्य परिषद पिंपरी मध्ये 



देशभरातून चार हजार दंत वैद्य उपस्थित राहणार

व्हीएस न्यूज - इंडियन डेन्टल असोशिएशनच्या महाराष्ट्र राज्य डेन्टल असोशिएशनची 56 वी राज्य परिषद पिंपरी चिंचवड येथे आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार दि. 8 डिसेंबर ते रविवार 10 डिसेंबर या कालावधीत चिंचवड मधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह व ॲटो क्लस्टर येथे राज्य परिषद होणार आहे. शुक्रवार दि. 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयपीएस आधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल. यावेळी इंडियन डेन्टल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. विश्वास पुराणिक, राष्ट्रीय सचिव डॉ. अशोक ढोबळे, राज्य शाखा अध्यक्ष डॉ. विकास पाटील, सचिव डॉ. नितीन बर्वे, मुख्य मार्गदर्शक डॉ. माऊली फरांदे, स्वागताध्यक्ष डॉ. राकेश प्रसाद, सचिव डॉ. अभिजीत फरांदे, शहराध्यक्ष डॉ. प्रमोद वाघमारे, सचिव डॉ. मनिषा गरुड, वायसीएम रुग्णालयाचे प्रमुख डॉ. यशवंत इंगळे आदी उपस्थित राहणार आहे.

तसेच या परिषदे अंतर्गत दंत वैद्यकीय महाविद्यालयातील विध्यार्थ्यांची राज्यस्तरीय दंत वैद्यकीय विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन शुक्रवार दि. 8 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सिने अभिनेते तुषार कपुर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर. डॉ. संदेश मयेकर आदींसह डेन्टल असोशिएशनचे राष्ट्रीय व राज्य कमिटीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

शनिवार दि. 9 डिसेंबर रोजी चिंचवड येथील अॅटो क्लस्टरच्या मुख्य सभागृहात व इतर चार हॉलमध्ये सकाळी 9.30 पासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत विविध चर्चासत्र, व्याख्यान व मार्गदर्शन सत्र होणार आहेत. यामध्ये देश विदेशातील ज्येष्ठ दंत शल्य विशारद, मान्यवर व्याख्याते, दंत महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये थायलंड येथील डॉ. बी. बी., डॉ. संदेश मयेकर, डॉ. शाम महाजन, डॉ. हेमंत उमरजी, डॉ. माऊली फरांदे यांचे मुख्य मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच या डॉक्टरांची मागील 40 वर्षातील या क्षेत्रातील वाटचाल व अनुभव या विषयांवर डी.वाय. पाटील दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिपक कुलकर्णी हे प्रकट मुलाखत घेणार आहेत. या परिषदेमध्ये देशभरातील सुमारे चार हजार दंत वैद्य व दंत वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार आहे. अशी माहिती मुख्य मार्गदर्शक डॉ. माऊली फरांदे यांनी दिली. यावेळी स्वागताध्यक्ष डॉ. राकेश प्रसाद, स्वागत सचिव डॉ. अभिजीत फरांदे, शहराध्यक्ष डॉ. प्रमोद वाघमारे, वायसीएम रुग्णालयाचे दंत विभाग प्रमुख डॉ. यशवंत इंगळे आदी उपस्थित होते.

या ठिकाणी दंत चिकित्सेसाठी लागणा-या विविध उपकरणांचे व साहित्यांचे प्रदर्शन स्टॉल लावण्यात येणार आहे. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे होणारी प्रगत उपचार पध्दती, दंत उपकरणे तयार करण्याची पध्दती व फायदे याबाबत माहिती मिळणार आहे. या परिषदेचे रविवार 10 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता अॅटो क्लस्टर येथे संपन्न होणार आहे. या परिषदेचा उपयोग दंत वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी व या क्षेत्रातील संबंधितांना होईल.

चौकट - पिंपरी चिंचवड डेन्टल असोशिएशन व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दि. 15 डिसेंबर ते दि. 31 डिसेंबर या कालावधीत शहरातील नागरिकांची मोफत मौखिक आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. सिगरेट, तंबाखु, मावा, गुटका आदीं व्यसनांमुळे होणा-या तोंडाच्या कर्करोगाने शरीराची हानी होते या विषयी जनजागृती करण्यात येणार आहे. या तपासणी पथकामध्ये शहर व परिसरातील दोनशे दंत वैद्य दि. 15 डिसेंबर ते दि. 31 डिसेंबर या कालावधीत मोफत तपासणी करणार आहेत अशीही माहिती मुख्य मार्गदर्शक डॉ. माऊली फरांदे यांनी दिली.
अधिक माहितीसाठी संपर्क - डॉ. माऊली फरांदे - 9822023835, डॉ. यशवंत इंगळे - 9922501579.


...Read More

V. S. News
पहिल्या टप्प्यात ‘मेट्रो’ निगडी पर्यंत धावण्याची शक्यता कमी

व्हीएस न्यूज - पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीचे स्वागतच आहे. भविष्यात नक्कीच याचा फायदा होईल, प्रवासी संख्या वाढेल. आता महापालिकेसोबत त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारच्या परवानगी महत्वाच्या आहेत. मेट्रो निगडीपर्यंत नेण्यास आम्ही सकारात्मक आहोत. मात्र त्यासाठी आवश्यक परवानगी आणि निधी हे दोन्हीही नसल्याचे सांगत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षीत यांनी या प्रश्नावर थेट उत्तर देणे टाळले. त्यामुळे तुर्तासतरी मेट्रो निगडीपर्यंत धावण्याची शक्यता ‘धुसरच’ झाली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात सध्या महामेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मेट्रोचे काम हे सध्या नाशिकफाटा ते खराळवाडी आणि सीएमई ते मेगामार्ट या दोन ठिकाणी सुरू आहे. आतापर्यंत संपूर्णपणे ४ खांब उभारण्यात आले आहेत. याबरोबर पीअर कँप शिवाय ११ खांब उभारले गेले आहेत. तर ४८ खांबांचा पाया रचण्यात आला आहे. हँरिस ब्रिज येथील काम हे ७ डिसेंबर पासून सुरू होणार असून पावसाळ्यापूर्वी ३० जून २०१८ पर्यंत तेथील सबस्ट्रक्चरल पूर्ण होईल. याशिवाय मेट्रोसाठी आवश्यक ४१ सेगमेंट देखील तयार असून व्हायाडक्टचा पहिला स्पँन हा अंदाजे २६ डिसेंबर पर्यंत तयार असेल अशी माहिती डॉ. ब्रिजेश दिक्षित यांनी यावेळी दिली.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!