Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
विकासकामांसाठी​ शंभर टक्के कृत्रिम वाळूचा वापर

व्हिएस न्यूज - नैसर्गिक वाळूचा तुटवडा असल्याने आणि बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वाळू वापराबाबतचे नवीन धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार या विभागाकडून करण्यात येणारे रस्ते, पूल आणि सरकारी इमारतींसाठी आता शंभर टक्के कृत्रिम वाळू वापरली जाणार आहे. ही वाळू चांगल्या प्रतीच्या खाणीचा दगड भरडून तयार केलेली असणार असून, प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणी जाऊन संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केल्यानंतरच कृत्रिम वाळू वापरण्यात येणार आहे.

कृत्रिम वाळूचा वापर करण्यापूर्वी काही अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामध्ये संबंधित वाळू ही चांगल्या प्रतीचा खाणीचा दगड भरडून तयार केलेली असावी, ही अट आहे. त्या वाळूचा वापर करण्यापूर्वी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी बांधकामाच्या ठिकाणी जाऊन तपासणी केल्यानंतरच कृत्रिम वाळूचा वापर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या वाळूचा वापर करताना आवश्यक त्या चाचण्या सरकारी प्रयोगशाळेतून कराव्या लागणार आहेत. सध्या काम सुरू असलेल्या ठिकाणी कृत्रिम वाळू वापरण्यापूर्वी तांत्रिक अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. कृत्रिम वाळूच्या वापरामुळे आरसीसी बांधकामात जास्त सिमेंट लागल्यास त्याचा अतिरिक्त मोबदला कंत्राटदाराला देण्यात येणार नसल्याचेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्या नैसर्गिक वाळूची वाढती मागणी आणि उपलब्ध वाळू याचे प्रमाण व्यस्त आहे. त्यामुळे बेकायदा वाळू उपसा होऊन नदी आणि नाल्यांच्या प्रवाहात बाधा येते. बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी आणि कृत्रिम वाळूचा वापर वाढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार आता या विभागाकडून करण्यात येणाऱ्या विकासकामांसाठी​ शंभर टक्के कृत्रिम वाळूचा वापर केला जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक या विभागाकडून काढण्यात आले आहे.
...Read More

V. S. News
वार्ताहर मारहाण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा- नीलम गो-हे

व्हीएस न्यूज - सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांनी मुजोरपणाने विनाकारण वार्ताहराला मारहाण करून जबरदस्तीने माफीनामा लिहून घेतल्याबाबतच्या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी शिवसेना आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी केली आहे. याबाबतच्या मागणीचे निवेदन त्यांनी आज पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना दिले आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मांजरी येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या लोकसत्ताचे वार्ताहर ज्ञानेश भुकेले यांना सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांनी शनिवारी मारहाण केली होती. यावेळी शासकीय अधिकारी प्रसाद आयुष यांनी मध्यस्थी करून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले असता आयुष यांनी लेखी खुलासा करावा, अशी मागणी करून विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. त्यानंतर आयुष तेथून निघून जात असताना भुकेले यांनी आंदोलनाशी संबंधित काही प्रश्न आयुष यांना विचारले आणि उत्तराचे त्यांनी मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग करून घेतले.

आंदोलनाच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेले वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे हे भुकेले यांच्याकडे आले. ‘तू मोबाइलवर रेकॉर्डिंग का करतो’ अशी दमबाजी त्यांनी केली. वार्ताहर असल्याचे मोरे यांना ओळखपत्रही दाखविले. भुकेले यांनी मोबाइलवर केलेले रेकॉर्डिंग काढून टाकण्याची मागणी आयुष यांनी केली. भुकेले यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर मोरे यांचा पारा चढला. त्यांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी भुकेले यांना ओढून नेत थेट पोलीस व्हॅनमध्ये बसविले.

पोलीस व्हॅनमध्येच भुकेले यांना मारहाण केली. त्यानंतर एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देऊन भुकेले यांना थेट हडपसर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. भुकेले यांना धमकावून त्यांच्याकडून जबरदस्तीने माफीनामा लिहून घेण्यात आला. ही घटना गंभीर असल्याने याबाबत मोरे यांची चौकशी व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी डॉ. नीलम गो-हे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे यांनी याबाबत माहिती दिली असून या घटनेचा पत्रकार संघाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. पत्रकारांना सौहार्दपूर्ण वागणूक देण्याबाबतच्या सूचना पोलीस यंत्रणेला देण्यात याव्यात असेही या निवेदनात म्हटले आहे.
...Read More

V. S. News
'राहुल गांधींमुळे युवकांमध्ये नवचैतन्य'

व्हिएस न्यूज - भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा कार्यभार राहुल गांधी यांनी स्विकारल्यामुळे देशभरातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. राहुल गांधींपुढे जरी अनेक आव्हाने असली तरी ते अहिंसेच्या तत्वाने पुरोगामी विचारांचा वसा पुढे नेत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या पाठ बळावर पुढील आव्हानांवर मात करतील असा विश्वास कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्त केला.
शनिवारी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा कार्यभार राहुल गांधी यांनी स्विकारला. त्यानिमित्त शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पेढे वाटून, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, प्रदेश सचिव बिंदू तिवारी, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, शहर सेवादलाचे अध्यक्ष संग्राम तावडे, राजेंद्रसिंह वालिया, नरेंद्र बनसोडे, विशाल कसबे, मयूर जैयस्वाल, शहाबुद्दीन शेख, सज्जी वर्की, तुकाराम भोंडवे, राजन नायर, संदेश नवले, आबा खराडे, गौरव चौधरी, कुंदन कसबे, चंद्रशेखर जाधव, शोभा कोराटे, मलीना दास, मेहताब इनामदार, दिलीप पांढारकर, पांडूरंग जगताप, किशोर कळसकर, आण्णा कसबे, भास्कर नारखेडे, हिरा जाधव आदी उपस्थित होते.
साठे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे मंत्रीमंडळाचे सदस्य जन मानसात संभ्रम निर्माण होईल अशी वक्तव्य करुन जाती, धर्मात तेढ निर्माण करीत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे कार्यकर्ते महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्वांचा देशभर प्रचार प्रसार करतील. देशात पुन्हा पुरोगामी विचार वाढवून 2019 ला सत्ता बदल करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
...Read More

V. S. News
पिंपरी- चिंचवड शहरातील विविध प्रश्नासंबंधी पालकमंत्री घेणार नागपुरात बैठक

व्हिएस न्यूज- पहिल्याच टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत नेणे, आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणणे, पवना बंदिस्त जलवहिणी प्रकल्प मार्गी लावणे, शास्तीकर, रिंगरोड आदी शहरातील प्रश्नासंबंधी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट नागपुर येथे पिंपरीतील पदाधिकाऱ्यांसमवेत येत्या दोन दिवसांत बैठक घेणार असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देऊन पिंपरी महापालिकेत भाजपाने सत्ता काबिज केली. मात्र, दहा महिने झाल्यानंतर एकही महत्वाचा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे शहरवासियांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पहिल्याच टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत नेण्य़ाची शहरवासियांकडून जोरदार मागणी होत आहे. यासह आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणणे, पवना बंदिस्त जलवहिणी प्रकल्प मार्गी लावणे, शास्तीकर, रिंगरोड आदी शहरातील महत्वाच्या प्रश्नासंबंधी पालकमंत्री गिरीष बापट यांच्या समवेत य़ेत्या दोन दिवसात भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेवून चर्चा करणार आहेत. त्यानंतर पालकमंत्री बापट यांच्या नेतृत्वाखाली महापौर नितीन काळजे, पक्षनेते एकनाथ पवार यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. हिवाळी अधिवेशनात शहरातील महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार आहेत.
...Read More

V. S. News
भाजप नेत्यांच्या वरदहस्तामुळेच सांगवी परिसरात अनधिकृत बांधकामे बोकाळली

व्हिएस न्यूज - भारतीय जनता पक्षाचे नेते, नगरसेवक यांच्या वरदहस्ताने सांगवी, पिंपळे-गुरव परिसरात बांधकाम व्यावसायिक नदी पात्र, शेती झोनमध्ये राजरोसपणे अनधिकृत बांधकामे करत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केला आहे. याबाबत माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, राज्य सरकारने 2015 पुर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यासाठी नागरिकांकडून अर्जही स्विकारले जात आहेत. परंतु, सांगवी, पिंपळे-गुरव परिसरात भाजपचे नेते, नगरसेवक व त्यांच्या सहकाऱ्यांचा वरदहस्तामुळे सद्यस्थितीत बांधकाम व्यावसायिकांकडून नदी पात्र, शेती झोनसह वाढीव अनधिकृत बांधकामे जोरात सुरू आहेत. या सर्व अनधिकृत बांधकामाची आकारणी सांगवी करसंकलन विभागात कार्यालयीन वेळेआधी, कार्यालयीन वेळेनंतर व शासकीय सुट्टीच्या दिवशीही सुरू आहे.
बांधकाम आकारणी, हस्तांतर करणे, मिळकत उतारा देणे, 600 चौरस फुटाच्या आत बांधकामाची आकारणी करण्यासाठी वरिष्ठांना पैसे द्यावे लागतात. दिले नाही तर तुमचे बांधकाम जमीनदोस्त करू, अशी धमकी देत वरिष्ठ लिपिक, लिपिक तसेच शिपाई सुध्दा पैशांची मागणी करत असल्याचा आरोप जगताप यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे. तसेच सांगवी करसंकलन विभागातील करआकारणी लिपिकांची चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी जगताप यांनी केली आहे.
...Read More

V. S. News
पवनाथडी जत्रेतील 400 स्टॉलसाठी एक हजार अर्ज

व्हिएस न्यूज- महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजने अंतर्गत महापालिका हद्दीतील महिला बचत गट यांनी तयार केलेल्या वस्तू उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या पवनाथडी जत्रेतील 400 स्टॉलसाठी तब्बल 984 अर्ज पालिकेकडे आले आहेत.
सांगवी येथील पी. डब्लु. डी. मैदानानवर दि. 4 ते 8 जानेवारी या दरम्यान भरविण्यात येणाऱ्या पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात य़ेणार आहे. या जत्रेतील स्टॉलसाठी पालिकेच्या वतीने शहरातील महिला बचत गटांकडून अर्ज मागविले होते. यामध्ये तब्बल 984 अर्ज आले आहेत. या अर्जाची येत्या तीन-चार दिवसात छाननी करण्यात येणार आहेत. त्यानंतर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुनिता तापकीर व सदस्यांच्या उपस्थितीत लकी ड्रा काढून स्टॉलचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती नागरवस्ती विभागाचे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली.
...Read More

V. S. News
वाकडमध्ये दोन महिलांचे मंगळसुत्र हिसकावले

व्हिएस न्यूज - पायी जाणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी दिड लाख रूपये किंमतीचे मंगळसुत्र हिसका मारून तोडून नेले. दोन्ही घटना शनिवारी सकाळी वाकड परिसरात घडल्या.
पहिल्या घटना विशालनगर येथे घडली. 55 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. महिला दुध आणण्यासाठी दुकाना पायी जात होती. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 39 हजार रूपये किंमतीचे मंगळसुत्र हिसका मारून तोडून नेले. दुसरी घटनेमध्ये 65 वर्षीय ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. महिला पती समवेत डांगे चौक येथून पायी जात होत्या. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 1 लाख 5 हजार रूपये किंमतीचे मंगळसुत्र हिसका मारून तोडून नेले. दोन्ही घटनेत 1 लाख 44 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत
...Read More

V. S. News
किसान कृषी प्रदर्शनातून स्टॉलधारकाची बॅग लंपास

व्हिएस न्यूज - किसान कृषी प्रदर्शनातील गर्दीचा फायदा घेवून चोरट्याने स्टॉलधारकाची ऑफिस बॅग, टॅब, डेबीट कार्ड व रोख रक्कम असा 55 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरूवारी दुपारी तीन वाजता घडली.
केयुल जोशी (वय-39, रा. तिळकनगर, मुंबई) यांनी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशी यांनी मोशी येथे सुरू असलेल्या किसान कृषी प्रदर्शनात त्यांच्या कंपनीचा स्टॉल लावला आहे. स्टॉलवरून गर्दीचा फायदा घेवून चोरट्याने त्यांची ऑफिस बॅगसह त्यामध्ये ठेवलेला टॅब, डेबीट कार्ड, रोख रक्कम असा 55 हजार 100 रूपयांचा ऐवज चोरून नेला.
एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
कासारवाडीत एसटी चालकाला मारहाण

व्हिएस न्यूज- एसटी बसला मोटार अडवी लावून मोटार चालकाने एसटी बस चालकाला खाली ओढत शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच वाहक महिलेला व प्रवाशांनाही शिवीगाळ केली. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास कासारवाडी येथील सॅंडविक कंपनीसमोर घडली.
हनुमान पवळ (वय-34, रा. चऱ्होली) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी अज्ञात मोटार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवळ हे आळेफाटा ते शिवाजीनगर या मार्गाची एसटी बस घेवून शिवाजीनगरकडे जात होते. बसला एका मोटार चालकाने मोटार अडवी लावली. एसटी चालक पवळ यांना बसमधून खाली ओढत शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच महिला वाहक मीरा चव्हाण व प्रवाशांनाही शिवीगाळ केली.
भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
पुर्ववैमनस्यातून तरूणावर कोयत्याने वार

व्हिएस न्यूज - पुर्ववैमनस्यातून चार जणांच्या टोळक्याने तरूणाला लाथा बुक्यांनी मारहाण करत कोयत्याने वार केले. ही घटना गुरूवारी रात्री साडेआठ वाजता पिंपळे-गुरव येथील शिव साई सोसायटी येथे घडली.
शत्रुघ्न पालमपल्ले (वय-21, रा. पिंपळे सौदागर) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. शुभम कवटे, सुमित सोमवंशी, दिपक धोत्रे, आनंद संगमे (सर्व रा. रहाटणी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये पुर्ववैमनस्य आहे. शत्रुघ्न हा गुरूवारी रात्री साडेआठ वाजता शिव साई सोसायटी येथे थांबला होता. आरोपी शुभम कवटे साथीदारासह तेथे आला. आरोपींनी शत्रुघ्नला लाथा बुक्यांनी मारहाण केली तर शुभम कवटे याने त्याच्यावर कोयत्याने वार केले.
फौजदार एम. के. आहेर अधिक तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
मोटारीखाली सापडून चिमुरडीचा मृत्यू

व्हिएस न्यूज - घराच्या अंगणात खेळणाऱ्या 14 महिन्याच्या चिमुरडीच्या अंगावरून इनोव्हा गाडी गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही
घटना शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास दत्त मंदिरा शेजारी वाकड रस्त्यावर घडली.
खुशी सुरेश चौधरी (14 महिने, रा. वाकड) असे मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. याप्रकरणी मोटार चालक अरविंद कलाटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वाकड येथील दत्त मंदिरा शेजारी छोट्या गल्ली आहेत. चौधरी कुंटुंबिय येथेच कलाटे यांच्या चाळीत भाड्याने राहत आहे. खुशीचे वडील सुरेश एका हॉटेलमध्ये कुकचे काम करतात. शनिवारी सकाळी खुशी अंगणात खेळत होती. त्यावेळी अरविंद इनोव्हा मोटार पाठीमागे घेता असताना अंगणात खेळणारी खुशी खेळता-खेळता घरासमोर असलेल्या अंतर्गत रस्त्यावर आली आणि मोटारीच्या मागच्या चाकाखाली सापडल्याने तीचा दुर्दैवी अंत झाला.
वाकड पोलीस तपास करत आहेत.
...Read More

V. S. News
पीएमपीएमधील प्रवाशांचे पाकीट लांबविणारी महिला जेरबंद

व्हिएस न्यूज - पीएमपीएमएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेत प्रवाशांची पर्स, पाकीट, बॅग लांबविणाऱ्या सराई त चोर महिलेला वाकड पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास डांगे चौकात करण्यात आली.
वनिता राख साखरे (वय 40, रा. हडपसर) असे सराईत चोर महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनिता साखरे पीएमपीएमल बसमधील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांची पर्स पाकिट लांबवित आहे. बसमधील महिलेच्या पाकिट मारल्याप्रकरणी तिच्यावर स्वारगेट आणि खडकी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. 12 डिसेंबरला प्रवासादरम्यान एका महिलेची दीड तोळ्याची चैन असलेली पर्स तीने पळविली होती. तो गुन्हा वाकड ठाण्यात दाखल आहे. तिचे छायाचित्र वाकड पोलिसांकडे असल्याने तपास पथक अनेक महिने तिच्या मागावर होते.
वाकड पोलीस शुक्रवारी साध्या वेशात पीएमपीएमएल बसमधून प्रवास करत होते. दुपारी बाराच्या सुमारात ती डांगे चौकातील बीआरटी बस थांब्यावर बसच्या प्रतीक्षेत थांबली होती. पोलिसांनी छायाचित्रे पाहिले आणि ती पाकिट मारणारी महिला असल्याचे लक्षात येताच तिला ताब्यात घेतले. तिने वाकड हद्दीत केलेला गुन्हा कबूल केला आहे, असे वाकड पोलिसांनी सांगितले.
...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!