व्हिएस न्यूज - पायी जाणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी दिड लाख रूपये किंमतीचे मंगळसुत्र हिसका मारून तोडून नेले. दोन्ही घटना शनिवारी सकाळी वाकड परिसरात घडल्या.
पहिल्या घटना विशालनगर येथे घडली. 55 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. महिला दुध आणण्यासाठी दुकाना पायी जात होती. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 39 हजार रूपये किंमतीचे मंगळसुत्र हिसका मारून तोडून नेले. दुसरी घटनेमध्ये 65 वर्षीय ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. महिला पती समवेत डांगे चौक येथून पायी जात होत्या. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 1 लाख 5 हजार रूपये किंमतीचे मंगळसुत्र हिसका मारून तोडून नेले. दोन्ही घटनेत 1 लाख 44 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.