विजय दिवस उत्साहात साजरा ..
व्हीएस न्यूज - चिखली रोडवरील इंद्रायणी वजन कट्याजवळ कचरा व भंगाराच्या सामानाला गुरूवारी रात्री दहाच्या सुमारास आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. पिंपरी, भोसरी, निगडी प्राधिकरण, तळवडे येथील अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि स्थानिक रहिवासी दिनेश जाधव यांच्या 2 टॅंकर पाण्याने ही आग विझवण्यात आली. आगीचे कारण अद्याप कळू शकते नाही. सुका कचरा व भंगरामधील प्लॅस्टिकच्या सामानामुळे आग जास्त भडकली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने तीन तासांच्या प्रयत्नानंतर रात्री एकच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले. आग पूर्णपणे विझली असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही....Read More
व्हीएस न्यूज - कर्नाटक बॅंकेचे एटीएम मशीन उचकटून चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना बावधन येथे गुरुवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. याप्रकरणी अनुपम कुलकर्णी (वय 36 रा. बालेवाडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथे कर्नाटक बॅंकेची शाखा आहे. शाखेच्या शेजारी असणाऱ्या बॅंकेच्या एटीएम मशीन रुममध्ये अज्ञाताने मशीन उचकटून चोरीचा प्रयत्न केला आहे. पोलीसांनी एटीएम रुम व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे. ...Read More
व्हीएस न्यूज - रिक्षा चालक मालकांनसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करू, ओला उबेर या भांडवलदार कंपन्याना नियम तयार करू, त्यांना परिवहन कायदा लागू करू, रिक्षा पॅसिगसाठी अद्यावत ट्रॅक उपलब्ध करून हा प्रश्न सोडवू असे आश्वासन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नागपूर येथे महाराष्ट्रातील रिक्षा चालक मालकांच्या र्मोर्चाला आश्वासन दिले. ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील 15 लाख रिक्षा चालक मालकांच्या विविध मागण्यांसाठी कृती समिती अध्यक्ष शशांक राव, सरचिटणीस बाबा कांबळे, कार्याध्यक्ष विलास भालेकर यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर गुरूवारी महामोर्चा काढण्यात आला. नागपूर येथील यशवंत स्टेडियम येथून सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्रातील सर्व जिल्यातील रिक्षा संघटना आणि रिक्षा चालक मालक मोठया संख्येने उपस्थित होते. विधानभवना समोर पोलिसांनी मोर्चा अडवला. याठिकाणी रिक्षा चालकांनी ठिय्या मांडत जाहिरसभा घेतली. परिवहन मंत्री यांनी स्वतः येऊन रिक्षा चालकांचे निवेदन स्विकारावे अन्यथा तीव्र आंदोलन करू अशी भूमिका रिक्षा चालकांनी स्विकारल्यामुळे परिवहनमंत्री रावते स्वतः निवेदन घेण्यासाठी आंदोलनस्थळी आले. आमदार गौतम चाबुकस्वार, प्रतापराव पाटील चिखलीकर, कपिल पाटील, जयदेव गायकवाड यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी महाराष्ट्रातील रिक्षा चालकांचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिक्षा चालक मालकांसाठी परिवहन विभागाच्या अंतर्गत स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात यावे. पुणे सह महाराष्ट्रातील सर्व जिल्यात रिक्षा पासिंग साठी ट्रॅक उपलब्ध करावे रिक्षा साठी 100 मिटर ट्रॅक ला मान्यता देण्यात यावी, रिक्षा चालक मालकांसाठी सरकारने मोबाईल ऍप तयार करावे आदी मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन परिवहन मंत्री रावते यांनी दिले. ...Read More
व्हीएस न्यूज - बजाज एज्युकेशन इनिशिएटीव्ह अंतर्गत जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या वतीने व पुणे डस्ट्रीक्ट योगा फिटनेस इन्स्टिट्यूट ज्ञान प्रबोधिनी यांच्या तांत्रिक सहकार्याने आंतरशालेय क्रीडा योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 10 शाळेतील 80 योगा स्पर्धकांनी उर्त्स्फूत प्रतिसाद नोंदविला. आकुर्डी येथील बजाज कल्चर सेंटरमध्ये झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन जानकीदेवी बजाज संस्थेचे मुखर्जी, बजाजचे असिस्टंट मॅनेजर चंद्रकांत पांगारे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत मुलींच्या गटात प्राधिकरणातील मुकबधीर विद्यालयाची समृध्दी मोलपोटे प्रथम, सुहाना अन्सारी व्दितीय, आकुर्डीतील वसंतदादा पाटील विद्यालयाची लक्ष्मी बाजेनोर तृतीय तर संजना साळवे चतुर्थ तर प्राधिकरण मुकबधीर विद्यालयाच्या प्रिया यादव हिने पाचवा क्रमांक पटकाविला. मुलांच्या गटामध्ये निगडीतील मॉडर्न हायस्कूलचा शंतनू सकट प्रथम, आदित्य खंडाळे द्वितीय, अर्थव गुरव तृतीय, चिंचवडच्या मातृसेवा विद्यालयाचा अमित शिंदे चतुर्थ तर मॉडर्नचा अजिंक्य साठेने पाचवा क्रमांक पटकाविला आहे. ...Read More
व्हीएस न्यूज - बांधकाम साईटवर दुसऱ्या मजल्यावरून काम करताना मजुराचा तोल गेल्याने खाली पडून जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजता घडली. याप्रकरणी बांधकाम ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला.
जयलाल बोनेला महतो (वय-38, रा. वाघीरे चाळ, पिंपरी) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. राजकुमार लालबाबु पटेल (रा. ओव्हाळ वस्ती, पुनावळे गावठाण) असे गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. याप्रकरणी हरीकिसान मेहता (वय32) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठेकेदार पटेल यांची पुनावळे येथे बांधकाम साईट सुरू आहे. याठिकाणी महतो मजुर म्हणून काम करत होते. बुधवारी ते दुसऱ्या मजल्यावर काम करताना त्यांचा तोल गेल्याने खाली पडून जागीच मृत्यू झाला. कामगारांना सुरक्षितेची कोणतीच साधने न पुरविल्याबद्दल ठेकेदारावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - एटीएम मशीनच्या वीज पुरवठ्यामध्ये बिघाड करून चोरट्याने पैसे काढले. पैसे न मिळाल्याची ऑनलाईन तक्रार करून स्वतःच्या खात्यात बॅकेला पैसे जमा करण्यास भाग पाडून चोरट्याने भारतीय स्टेट बॅंक पिंपरी शाखेची दोन लाखांची फसवणूक केली. हा प्रकार बुधवारी उघडकीस आला. जयश्री अय्यर (वय-43, रा. रहाटणी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय स्टेट बॅंकेची पिंपरी येथे शाखा आहे. या शाखेशेजारील एटीएममध्ये एका चोरट्याने मशीनच्या वीज पुरवठ्यात 3 जुलै ते 17 ऑगस्ट 2017 या कालावधीत 18 वेळा तांत्रिक बिघाड केला. त्यानंतर पैसे काढून घेतले. पैसे न मिळाल्याची बॅकेकडे तक्रार करून पुन्हा स्वतःच्या खात्यावर पैसे जमा करण्यास भाग पाडून 1 लाख 90 हजार रूपयांची आर्थिक फसवणूक केली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - शेजारचे व्हिडीओ सेंटरचा चांगला धंदा होत असल्याच्या रागातून दहा ते अकरा जणांच्या टोळक्याने व्हिडीओ सेंटरची लाकडी दांडक्याने, तलवारीने तोडफोड केली. हा प्रकार मंगळवारी दुपारी चार वाजता काळेवाडी येथे घडली. याप्रकरणी तीन आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे.
अजित दत्तात्रय मासाळ (वय-23), बालाजी हरिदास कांबळे (वय-35), बळीराम ऊर्फ भैय्या श्रीधर मासाळ (वय22, सर्व रा. रूपीनगर, निगडी यांना अट केली असून त्याचे 7 ते 8 साथीदार फरार आहेत. याप्रकरणी सचिन पोळ (वय-38, रा. हडपसर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपींचे काळेवाडीतील आठवण चौकात व्हिडीओ सेंटर आहेत. फिर्यादीचे व्हिडीओ सेंटर चांगले चालत असून आपला धंदाच होत नसल्याच्या राग आरोपींना होता. या कारणावरून मंगळवारी दुपारी दहा ते अकरा जणाच्या टोळक्याने फिर्यादीच्या व्हिडीओ सेंटरमध्ये घुसून लाकडी दांडक्याने, तलवारीने 10 व्हिडीओ गेम मशिन, सीसीटीव्ही, एलसीडी व काऊंटरची तोडफोड केली. कामगार अशोक माने याला धमकी देत शिवीगाळ केली. याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून त्याचे साथीदार फरार आहेत. सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. घोळवे अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज – पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत आयोजित विविध उपक्रमात जेष्ठ नागरिक महासंघ सहभागी होणार आहे. तसेच, स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्याबरोबरच स्वच्छता रॅलीतसहभाग घेतली, अशी माहिती पिंपरी- चिंचवड जेष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर कोळी यांनी दिली. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्याबाबत जेष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत संत तुकाराम नगर येथील जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी “क” क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, डी.सी.एफ. च्या अनुपमा शास्त्री, जेष्ठ नागरिक महासंघाचे सरचिटणीस सुर्यकांत मुथियान, सहाय्यक आरोग्याधिकारी बी.बी.कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक रमेश भोसले यांच्यासह जेष्ठ नागरिक महासंघाचे सुमारे २०० पदाधिकारी सहभागी झाले होते. पिंपरी चिंचवड शहर हे स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. स्वच्छता अॅप मोबाईलवर डाऊनलोड करून आपल्या भागातील स्वच्छता विषयक समस्या निदर्शनास आणून दिल्यास त्यावर महापालिकेच्या वतीने कार्यवाही केली जाईल. येत्या १६ डिसेंबर रोजी ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या सहकार्याने स्वच्छता विषयक जनजागृती रॅली काढण्यात येणार असून त्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले. स्वच्छता अॅप बाबतची माहिती सहाय्यक आरोग्याधिकारी बी.बी. कांबळे व मुख्य आरोग्य निरीक्षक रमेश भोसले यांनी दिली.
व्हीएस न्यूज - राहुल गांधी यांची आखिल भारतीय काँग्रेस समिती च्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण पिंपरी विभागाच्यावतीने लाडू वाटप करून जल्लोष करण्यात आला. तसेच कवी आवेश हिन्दुस्तानी द्वारा राहुल गांधी यांच्यावर लिहिलेली कवितेचे वाचन झाले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोकराव मोरे, महासचिव अशोक मंगल, जेष्ठ काँग्रेस नेता बारस्कर, पिं. चिं. काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष उमेश बनसोडे, प्रवक्ता आयुष मंगल, रवी अगरवाल, मिताली चक्रवर्ती, राजेश नायर, अर्जुन शिवाजी गायकवाड, सन्मुख आयगुले, सौ. निंबर्गीकर, पार्वती बनसोडे, शिवलिंगा बनसोडे उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - पुण्याच्या कोंढवा परिसरात एका २३ वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही तरूणी येरवडा परिसरात वास्तव्याला होती. घरच्यांशी कडाक्याचे भांडण झाल्यामुळे रागाच्या भरात ही तरूणी रात्रीच्यावेळी घरातून बाहेर पडली. यावेळी तिने नातेवाईकांकडे जाण्यासाठी रिक्षा पकडली. मात्र, रिक्षाचालकाने रात्रीच्या वेळी रस्त्यावर कोणीही नसल्याचा फायदा घेत तिला निर्जनस्थळी नेले. याठिकाणी त्याने आपल्या दोन मित्रानांही बोलवून घेतले. त्यानंतर या तिघांनी मिळून या मुलीवर बलात्कार केला. या घटनेमुळे कोंढवा परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सतीश जयपाल माने (वय २३) आणि मारुती शिंदे (वय ३१) या दोन नराधमांना सिद्धार्थनगर येथून अटक केली. तर आणखी एकजण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तिला निर्जनस्थळी नेऊन दारू पाजली. त्यानंतर बळजबरीने शरीरसंबंध ठेवायला भाग पाडले. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास ठार मारु अशी धमकीही दिली. बलात्कार केल्यानंतर आरोपींना आपल्याला कॅम्प परिसरातील एम जी रोडवर सोडून दिल्याचे तरूणीने तक्रारीत म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - देशातील युवक हे भारताचे भविष्य आहे. देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी युवकांना सक्षमपणे स्वत:च्या पायावर उभे करणे आवश्यक आहे. त्यासाठी आजच्या युवकांना केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याच्या मार्गदर्शनाची आणि संसदीय बोर्ड समितीचे अध्यक्ष खासदार चिराग पासवान सारख्या युवा नेतृत्वाची गरज आहे. असे प्रतिपादन लोक जनशक्ती पार्टीचे प्रदेश अध्यक्ष शमिम हवा यांनी केले.
लोक जनशक्ती पार्टी (युवा) पिंपरी चिंचवड शाखेचे शहराध्यक्ष धुराजी राणुजी शिंदे यांनी शनिवारी (दि. 9 डिसेंबर) पिंपरीतील नारायण मेघाजी लोखंडे सभागृहात आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शमिम हवा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मेळाव्याचे अध्यक्ष धुराजी शिंदे, युवा प्रदेश अध्यक्ष मोहन अनमोलू, प्रदेश सचिव सचिन जाधव, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रशांत म्हस्के, कायदा सल्लागार ॲड. सुनिल जामनिक, शहर महिला अध्यक्षा सरिता जामनिक, उपाध्यक्षा शोभा वाळके, कार्याध्यक्ष दत्ता गोडसे, शहर प्रवक्ता चंद्रशेखर गायकवाड, शहर सचिव अरुण मैराळे, दिनकर ओव्हाळ, अनिल मखरे, सुभाष विद्यागर, डॉ. काशीनाथ बामणे, विनु वर्गिस, विनायक ओव्हाळ, कमल पारडे, सुमित बांबळ, कांचन जावळे, राहुल प्रधान, जावेद शेख आदींसह शहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शमिम हवा मार्गदर्शन करताना म्हणाले की, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेला लोक जनशक्ती पार्टी हा पक्ष एनडीएचा घटक पक्ष आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक अन्न धान्य व वितरण व्यवस्थेमार्फत राज्यातील ग्रामिण गोरगरिब जनतेला सुरळीत स्वस्त धान्य पुरविण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. तसेच युवा खासदार चिराग पासवान यांच्या मार्गदर्शनखाली सुशिक्षित बेरोजगार युवकांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध अर्थ सहाय्य योजनेतून उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी मदत करण्यात येत आहे. लोक जनशक्ती पार्टी हा पक्ष राज्यातील गोरगरिब जनतेला, युवकांना, दलित, आदिवासींना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शहरी भागातील सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आता लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. त्याअंतर्गत शहरातील पहिला कार्यकर्ता मेळावा अध्यक्ष धुराजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला आहे. तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन रामविलास पासवान यांचे विचार व धोरणे जनते पर्यंत पोहचविण्यासाठी धुराजी शिंदे प्रयत्न करीत आहेत. केंद्र सरकारने राष्ट्रीय युवा आयोगाची स्थापना करावी. याबाबत खासदार चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली देशभर युवकांचे संघटन करुन जनजागृती करण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात लोजपा आपले उमेदवार उभे करण्यासाठी संघटना बांधणी करीत आहे. असे शमिम हवा यांनी सांगितले. स्वागत शहराध्यक्ष धुराजी शिंदे, सुत्रसंचालन दिनकर ओव्हाळ आणि आभार अरुण मैराळे यांना मानले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002