Breaking News

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी | सागर सूर्यवंशी यांचे फ्लेक्स काढले! विरोधकांना कसली भीती! | जिजाऊ महिला प्रतिष्ठान व नवनाथ नढे सोशल फाउंडेशन तर्फे न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन | कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात अल्फा लवाल लिमिटेड कंपनीची बैठक संपन्न व श्रमिक नेते बाबा आढाव यांना वाहिली श्रद्धांजली! | पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी संस्था मर्यादितला पुणे विभागातून प्रथम क्रमांक. | काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी; वाहन चोरीचे १० गुन्हे उघड, २० दुचाकी हस्तगत. | स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते | संत तुकाराम नगर येथे भाजप आणि राष्ट्रीय समिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन | महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन | इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त | पिंपरी चिंचवडमध्ये पाणी काटकसरीने वापरावे लागणार ,शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार | शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सागर गंगाराम साळुंके यांची नियुक्ती जाहीर. | महावितरणचा लाचखोर सहायक अभियंता एसीबी ने रंगेहाथ पकडला | ‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा | बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा | व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे | कामगार अन्यायावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची ठाम भूमिका: राज्यभरातील हजारो पीडित कामगारांसाठी पावले उचलली – यशवंतभाऊ भोसले | कौशल्य प्रशिक्षणा मुळे व्यसनाधीन लोकांच्या पुनर्विकासासाठी मदत -मुक्ता पुणतांबेकर यांचे प्रतिपादन | जय परशुराम सेवा संघ समिती च्या वतीने भगवान परशुराम जयंती भोसरी येथे उत्साहात साजरी | पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेत पत्रकारांचे स्वागत | आखिल भारतीय छावा संघटनेचा आजित गव्हाणे यांना जाहीर पाठिंबा | गद्दारांना माफी नाही - डॉ. अमोल कोल्हे ; कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल | महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे | थेरगाव: कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी राहुल सरोदे यांनी तिसऱ्यांदा केले केस दान | खेड तालुक्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींची वाराणसी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. | प्रजासत्ताक दिनानिमित्त एस.पी.इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलच्या उपाध्यक्ष ॲड.दीप्ती देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण | पुण्यात भर रस्त्यात सराफावर गोळीबार करून लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली दिल्लीतून अटक | वीटभट्टी मजूर असल्याचे भासवत मानपाडा पोलीसांनी चोराला पकडले, २१ लाख २६ हजाराचे दागिने केले हस्तगत | कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिका खर्च करणार सातव्या वेतन आयोगाच्या निधीतील ३० कोटी;राज्य सरकारकडून २०० कोटी अद्याप मिळेनात | किरकोळ कारणावरून प्रेयसीने केले प्रियकरावर धारदार कोयत्याने वार; हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. | भोसरी परिसरातील मोबाईल शॉपीतील महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, ११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त | लाच स्वीकारताना पोलीस हवालदारसह झिरो पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात | बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळत नाही; मग २६ कोटी रुपयांचा खर्च कसा काय झाला? | महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत निश्चय जिनवाल ने पटकावले सुवर्ण पदक | माथाडीच्या नवखली लुटमार करणाऱ्या टोळीला अटक; वाकड तपास पथकाची कामगिरी | एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | पालिकेच्या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्याची हनुमंत लांडगे यांची मागणी. | चाकण - मूकबधीर शेतकऱ्याची ३१ लाखांची फसवणूक ; बाप लेकाचा १४५ गुंठे जमीन बळकावण्याचा कट. | उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे | जळगाव मनपाने, ६४५ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासह, वेतन फरकाच्या ९६ कोटींच्या रकमेपैकी ४८ कोटींची रक्कम जमा करावी - औद्योगिक न्यायालय | चित्रपटांमधून नवीन काहीतरी सांगणे अपेक्षित - डॉ. जब्बार पटेल यांचे मत | पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कार्यक्रमात 'ट्रान्सफॉर्मिंग नॉर्थ ईस्ट इंडिया' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन | चित्रपटांमधून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे,दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय मांडले पाहिजेत-प्रसिध्द दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचे प्रतिपादन | पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’! | पुण्यात घडली संतापजनक घटना, शुल्लक कारणावरून विद्यार्थ्याकडून आईची हत्या | द एलिफंट व्हिसपर्स' आणि 'नाटू नाटू' च्या चमूचे उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत केले अभिनंदन | गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक आणि शाळांच्या गुणवत्तेचे कौतुक | पिंपरी चिंचवड मध्ये एकाला ४ लाख ९५ हजारांचा गंडा ; मोबाइल फोन वर आलेल्या त्या लिंक मुळे गेले पैसे . | आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी | "सलाम 2022 पुरस्कार" डॉ.भाग्यश्रीताई पाटील यांना प्रदान | कोंढव्यातील ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एकजण ताब्यात ; घर झडतीत एनआयए च्या हाती लागली महत्वाची कागदपत्रं | नागराज मंजुळेंच्या चित्रपटाच्या स्थगितीची मागणी, निर्मात्याला कोर्टानं ठोठावला दहा लाखांचा दंड | महिला दिनानिमित्त ‘त्या’ तिघींनी केला ४५० फूट उंचीचा भैरवगड सर | सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे | भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन  | ती’ ची सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज : डॉ. भारती चव्हाण | मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून शहर कॉंग्रेसची निदर्शने | भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उद्‌घाटनास क्रीडा प्रेमी आणि कुस्ती शौकिनांनी उपस्थित रहावे : ॲड. नितीन लांडगे | राज्यपाल आणि दानवे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी | नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करण्याचे निश्चित : डॉ. कैलास कदम | ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणूका नको : सदाशिव खाडे | ८२ कोटी रुपयांच्या कामांना स्थायी समितीने दिली मंजूरी : ॲड. नितीन लांडगे | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप | परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षाचालकांचे कल्याणकारी मंडळ करा : बाबा कांबळे | व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले : ओजस्वी सपतनीकर | शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक पदी गणेश आहेर यांची नियुक्ती | पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय | सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांनी डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटला भेट दिली. | पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत. | म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा – उपमुख्यमंत्री अजित पवार | विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासोबत त्यांच्या कौशल्य विकासावरही भर द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन . | युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश | माजी नाराजी पक्षावर नसून भाजपच्या स्थानिक आमदार व पदाधिका-यांवर आहे : तुषार कामठे | ओला उबेर बेकायदेशीर दुचाकी व्यवसाय बंद करण्यासाठी २५ हजार रिक्षाचालक मालक एकत्र; पुणे आरटीओ वर मोर्चा | ३३ लाखांच्या मुद्देमालासह अंमली पदार्थ गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी जेरबंद | खराळआई तरुण मित्र मंडळा तर्फे गणेश जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा | रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा | 'भारतीय वारसा’ परिचय आणि संवर्धन कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते बुधवारी उद्‌घाटन | सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडून पळ काढणाऱ्याला १०० सीसीटीव्ही तपासून केली अटक, वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी | भिमाकोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण.....राहुल डंबाळे | एस. टी. च्या विविध करातून जमा होणा-या कोट्यावधी रुपयांचा हिशोब व्यवस्थापनाने द्यावा - डॉ. भारती चव्हाण | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १ ली ते ७ पर्यंतच्या शाळा सुरु होणार... | महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी गुरुवारी उपस्थित रहावे.....डॉ. कैलास कदम | ॲड. अनिरुध्द कांबळे व दिलीप पांढारकर यांची शहर कॉंग्रेस कार्याध्यक्षपदी नियुक्ती | विनयभंग प्रकरणातील आरोपीला ४८ तासात शिक्षा ; २४ तासात चार्जशीट दाखल. | पुणे ; मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला जमीन मंजूर | पक्ष वाढीसाठी सर्वांनी एक दिलाने काम करु या.....डॉ. कैलास कदम | पाणी रोखून शहरवासीयांना वेठीस धरू नका – संजोग वाघेरे | म्हाडा : पेपरफुटी प्रकरणी सहा आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी | पंतप्रधान येत्या 13 डिसेंबर रोजी वाराणसी इथे श्री काशी  विश्वनाथ धाम चे उदघाटन करणार | भारतासमोर अब्जावधी समस्या असू शकतात पण या समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी हुशार उद्योजकही आहेत: पीयूष  गोयल | अनुसूचित जाती/जमातींवरील अत्याचाराविरुद्ध राष्ट्रीय हेल्पलाइन उद्या सुरू होणार | स्नातकांनी प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंचा पंतप्रधान मोदींना टोला. | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातृसेवा सेवाभावी संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन | दफनभूमीसाठी मुस्लिम समाज आक्रमक ; मृतदेह महापालिका आवारात दफन करण्याचा इशारा |
V. S. News
जातीय तेढ प्रकरणी MIM नगरसेवक अटकेत, भाजपाच्या ५ नगरसेवकांवरही गुन्हा

व्हीएस न्युज - औरंगाबादमध्ये जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी एमआयएम नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. तर भाजपाच्या पाच नगरसेवकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल शुक्रवारी औरंगाबाद महानगर पालिकेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावावरून भाजपा आणि एमआयएम नगरसेकांमाध्ये हाणामारी झाली होती. यामध्ये महापालिकेत भाजपा नगरसेवकांनी एमआय़एमच्या नगरसेवकाला बेदम मारले होते. त्यानंतर बाहेर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेत्यांवर हल्ला केला होता. त्यामुळे काल शहरात तणावाचे वातावरण निर्णाण झाले होते.

भाजपच्या पाच नगरसेवकांविरोधात शुक्रवारी (ता.17) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयएम नगरसेवक सय्यद मतीनने यांच्या जबाबावरून हा गुन्हा नोंद करण्यात आल्याचे क्रांती चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादाराव शिनगारे यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
भाजपा नेत्याची गाडी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी फोडली, चालकाला मारहाण

व्हिएस न्युज - औरंगाबाद महानगरपालिकेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावावरून शुक्रवारी सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला होता. भाजपाच्या काही नगरसेवकांनी एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना बेदम मारहाण केली होती. त्याचे पडसाद लगेच उमटले आहेत. एमआयएम नगरसेवक समर्थकांनी औरंगाबाद महानगरपालिका परिसरात दगडफेक केली. एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयासमोर भाजपा संघटन मंत्र्यांच्या गाडीची तोडफोड करून चालकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयएम नगरसेवक मतीन यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप आमदार अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर औताडे, प्रमोद राठोड यांनी पोलीस आयुक्त प्रसाद यांची भेट घेतली. हे सर्व जाताना भाजपा संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांच्या वाहनावर २० ते २५ जणांच्या टोळक्याने काठी, दगडाने हल्ला केला.

...Read More

V. S. News
वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला बेदम मारहाण

व्हीएस न्युज - औरंगाबाद महानगरपालिकेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची श्रद्धांजली सभा आयोजित केली होती. या सभेला एमआयएमच्या नगरसेवकाने विरोध केल्यानंतर भाजपाच्या नगरसेवकांनी बेदम मारले आहे. शुक्रवारी दुपारी विशेष सभेत ही घटना घडली आहे. एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या ठरावाला विरोध दर्शवला. त्यानंतर संतप्त भाजपा नगरसेवकांनी त्यांना बेदम मारहाण केली. भरसभागृहात अक्षरश: चपलेनं मारलं.

त्यानंतर सुरक्षारक्षकांनी कडे करून मतीन यांना सभागृहाबाहेर काढले. समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा विषय महापौरांनी घेतला. वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चित्रफित सभागृह दाखविण्यात आली. त्यानंतर एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी श्रद्धांजली अर्पण करण्याच्या ठरावाचा विरोध केला. त्यानंतर भाजपा नगरसेवक प्रमोद राठोड, दिलीप थोरात, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, राज वानखेडे यांनी मतीन यांना लाथा-बुक्क्यांनी तुडवत बेदम मारहाण केली. त्यानंतर सय्यद मतीन यांना कायमस्वरूपी निलंबन करावे अशी मागणी भाजपाच्या नगरसेवकांनी केली आहे.

...Read More

V. S. News
जामखेडमध्ये गोळीबार : एस.टीचा वाहक गंभीर जखमी

व्हीएस न्युज - जामखेड-बिड रस्त्यावर बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास जामखेड एसटी बसचा वाहकावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये वाहक सुग्रीव जायभाय गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जामखेड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमीला नगर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मागील सहा महिन्यात जामखेड शहरात झालेला तिसरा गोळीबार आहे.याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, तालुक्यातील सुग्रीव गहिनीनाथ जायभाय ( वय -४३, रा. जायभायवाडी सध्या राहणार - गोडाऊन गल्ली, जामखेड ) हे रात्री अडीच वाजता जामखेड ग्रामीण रुग्णालयात चालत आले. त्यावेळी जायभाय यांच्या मांडीतून रक्त येत होते. गोळीबारात जखमी झालेले सुग्रीव जायभाय जामखेड आगारात वाहक म्हणून कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यात डॉ. पठाण यांच्या मांडीवर दिवसाढवळ्या गोळीबार झाला होता. त्यांच्यासह आणखी एक जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर २९ एप्रिल रोजी योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्यावर गोळीबार होऊन दोघे मृत्यू पावले होते. त्यानंतर बुधवार दि. १५ आॅगस्ट रोजी पहाटे अडीच वाजता सुग्रीव जायभाय यांच्यावर गोळीबार होऊन जखमी झाले आहेत. गोळीबाराच्या या घटनेमुळे जामखेड शहरसह तालुक्यात घबराटीचे वातावरण झाले आहे.

...Read More

V. S. News
गोवारी समाज आदिवासीच, एसटीमध्ये आरक्षण मिळणार!

व्हीएस न्युज - गोवारी समाज आदिवासीच असल्याचा ऐतिहासिक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. या निर्णयामुळे गोवारी समाजाला आता अनुसूचित जमातींमध्ये आरक्षण मिळणार आहे.

गोवारी समाजाला आदिवासी घोषित करा जेणेकरुन आम्हाला अनुसूचित समातीमध्ये आरक्षण मिळेल, अशी मागणी समाजाची होती. सध्या गोवारी समाजाला विशेष मागास वर्ग (एसबीसी) अंतर्गत दोन टक्के आरक्षण मिळत आहे. या मागणीच्या अनेक याचिका हायकोर्टात प्रलंबित होत्या, ज्याचा एकत्रित निर्णय आज दिला.

न्यायमूर्ती उपाध्ये आणि न्यायमूर्ती देशपांडे यांच्या खंडपीठाने गोंडगोवारी अशी कुठलीही जमात नाही, असं सांगत गोवारी समाजाला अनुसूचित जमातीच्या सुविधांपासून वंचित ठेवता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. 23 वर्षांपूर्वी 114 जणांचा मृत्यू गोवारी समाजाला अनुसूचित जमातींमध्ये आरक्षण मिळावं या मागणीसाठी 23 वर्षांपूर्वी म्हणजेच 23 नोव्हेंबर 1994 रोजी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान,

गोवारी समाजाने मोठा मोर्चा काढला होता. यावेळी पोलिसांच्या लाठीमारानंतर चेंगराचेंगरी होऊन 114 जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हा राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्त्वात सरकार होतं. या प्रकरणी चौकशी समितीने तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना क्लीन चिट दिली. रोष पवारांवर भरपूर होता, पण बळी गेला तो आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांचा, त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला अखेर आज हा समाज आदिवासी असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निर्णय म्हणजे 114 जणांना खरी श्रद्धांजली असल्याचं म्हटलं जात आहे.

...Read More

V. S. News
सिडको’ची वर्षाअखेरपर्यंत आणखी २५ हजार घरांची योजना – मुख्यमंत्री

व्हीएस न्युज - शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) तर्फे ‘सर्वांसाठी घरे’ धोरणाअंतर्गत आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ‘महागृहनिर्माण योजनेत’ साकारण्यात येणाऱ्या १४ हजार ८३८ परवडणाऱ्या घरांच्या ऑनलाईन सोडतीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. पुढच्या टप्प्यात आणखी २५ हजार घरांची सोडत वर्षाअखेरीस जाहीर करण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देऊन प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सिडकोने एक लाख घरे बांधण्यांचे उद्दिष्ट ठेवावे, असे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येकाला घर मिळावे, यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची महत्त्वाकांक्षी घोषणा केली. सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याच्या या योजनेत महाराष्ट्र राज्याने ६.५० लाख घरे बांधून पहिल्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे. राज्यात मुंबई व मुंबई महानगर परिसरात सर्वात जास्त घरांची मागणी आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. म्हाडाला पीपीपी योजनेतून १ लाख घरे मिळणार आहेत. तसेच घरांसाठी संयुक्त भागीदारी मंजूर केली आहे. घरांच्या या योजनेत सिडकोसुद्धा सहभागी झाली असून नवी मुंबई परिसरात त्यांनी आता ही १४ हजार घरांची योजना सुरू केली आहे. यामुळे गरिबांना चांगल्या किंमतीत व चांगल्या ठिकाणी पायाभूत सुविधांसह घरे मिळणार आहेत.

यंदाच्या घरांच्या योजनेत प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांचा समावेश केला आहे. या लॉटरीतील अर्जांची योग्य प्रकारे छाननी करून गरजू नागरिकांनाच घरे मिळतील, याची दक्षता घ्यावी. सामान्य माणसांना या योजनेत सहभागी करून घ्यावे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

...Read More

V. S. News
वकिलाला जशास तसे उत्तर देणाऱ्या पंढरपूरच्या पोलिस निरीक्षकाची पोस्ट व्हायरल!

व्हीएस न्युज - मराठा आरक्षण आंदोलनात राज्यात अनेक ठिकाणी एसटी बसवर दगडफेक झाली. या गाड्यांची तोडफोड झाली. पोलिसांनी काही ठिकाणी कारवाई केली. इतर ठिकाणी अजून गुन्हे नोंदविणे, आरोपी अटक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

पंढरपूरमध्ये झालेल्या अशाच गुन्ह्यात एका वकिलाला अटक झाली. त्यानंतर तेथे सोशल मिडियात सध्या चर्चा सुरू झाली आहे. तेथील पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्याविरुद्ध एका वकिलाने तक्रा केली. या तक्रारीत जधव यांच्यावर आरोप करण्यात आले होते. या आरोपाला जाधव यांनी एक पोस्ट स्वतः लिहिली आणि त्याला उत्तर दिले. पोलिस अधिकारी शक्यतो सोशल मिडियातून आपली बाजू मांडत नाहीत. पण जाधव यांनी या धोका पत्करला.

त्यांची पोस्ट त्यांच्या शब्दांत पुढीलप्रमाणे

एसटी बस तोडफोडीच्या गुन्ह्यामध्ये पोलिस ठाणे पंढरपूर तालुका येथे पाच आरोपींना अटक केली. त्यामध्ये व्यवसायाने वकील असलेल्या एका आरोपीचा समावेश आहे. सदर वकील यांचा गुन्ह्यामध्ये स्पस्टपणे सहभाग दिसुन आला आहे, वकील आरोपीने देखील मान्य केले आहे, त्याचे विडीओ रेकॉर्डींग देखील केले आहे. वकील आरोपीस त्याचे "वकील मित्र, नातेवाईक, परिचीत" भेटण्यास आले होते, परवानगी नंतर त्यांना भेट देखील करू दिली आहे, त्याची सरकार दप्तरी नोंद देखील आहे, त्याचे चित्रण CCTV मध्ये देखील आहे.

परंतु एक वकील महोदय कोणाला काही ही न-विचारता लॉक-अपकडे गेले, लॉक-अप मध्ये गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत, त्यांची पूर्ण जबाबदारी पोलिसांवर आहे. पहाऱ्यावरील अंमलदाराने अटकाव केला असता शाब्दिक वादावादी केली. मला आवाज आला म्हणुन मी उठुन कक्षाच्या बाहेर गेलो, मी त्यांना परवानगी शिवाय भेटता येणार नाही असं सांगताच त्यांना खूप राग आला मी त्यांना बसण्याची सुचना केली असता "मी निषेध करतो" असे म्हणुन निघुन गेले. याच ही रेकॉर्डींग पोलिसांकडे आहे.

सदर वकील आरोपीसह या गुन्ह्यातील आरोपींना मे. न्यायालयाने दोन दिवस PCR दिला आहे. त्या नंतर ही दिवस भरामध्ये वकील आरोपीचे नातेवाईक, परिचीत" भेटण्यास आले होते, परवानगी नंतर त्यांना देखील भेट करू दिली आहे, त्याचे ही चित्रण CCTV मध्ये देखील आहे. आज ही कोणी आलं तरी ही नियमांचे अधिन राहुन आम्हीं भेटू देवु.

मी कोणी अमुक आहे म्हणुन मला सरळ जावु द्यावे, आणी विचारले तर आम्ही त्याच भांडवल करू असे जर असेल तर येणारा काळ पंढरपूरसाठी चांगला नसेल, असं माझं मत आहे. पोलिसांना कायदा व नियमाप्रमाणे काम करू द्यावं, असं आम्ही आवाहन करतो.

माझ्यावर मुजोरपणाचा आरोप लावला आहे, मी स्पस्ट करू इच्छितो की, मी जशास तसं वागणारापैकी आहे. पोलिस ठाण्यात दिन, दलित, दुबळा गरीब आला तर आम्ही त्यांच्याशी जास्त सन्मानाने वागतो किंबहुना त्यांची तक्रार प्राधान्याने ऐकण्याची माझी पद्धत आहे. स्वच्छ कपडे घातलेल्याचे लगेच ऐकले जाते. मळकट, जुनी कपडे घातल्याचे सर्वसाधारणपणे लगेच ऐकले जात नाही असा आमच्या समाजाचा अलिखीत नियम आहे. एक वेळ अशी कमी शिकलेली माणसे सरळ लॉक-अपकडे गेली तर आम्ही समजु शकतो. परंतु ज्यांना कायदे, नियम सर्व समजते तर त्यांनी त्याचे पालन केले पाहिजे. खुर्चीची चिंता नाही..... या व्यवस्थेने जेवढ्या दिवस ही खुर्ची बसायली दिली आहे, त्या अधिकाराचा पुरेपुर वापर करू.

मला खुर्चीची अजिबात चिंता नाही.

मी कोणत्याही दबावाला भिणारा घाबरणाऱ्यापैकी नाही. अजिबात कचारणार किंवा मागे हटणारापैकी मी नाही. जेवढ्या दिवस आहे तेवढ्या दिवस ठणकावुन काम करू. व्यवस्था, नैतिकता असलेली चांगली माणसं, समजदार/जबाबदार पंढरपुरकर माझ्या सोबत असतील याची मला खात्री आहे.

येणाऱ्या काळात ही आम्ही याच पद्धतीने सर्व सामान्य लोकांना न्याय कसा मिळेल असा प्रमाणिक प्रयत्न करू. "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" (सजनांचे रक्षण आणी दुर्जनांचा संहार) या उक्ती प्रमाणेच निष्पक्ष काम करू.

कोणाला आव्हान देण्याचा आमचा उद्देश नाही, आमचा पक्ष आम्ही मांडला आहे, जनतेने दिलेल्या टॅक्सच्या पैशामधुन आम्हाला पगार मिळतो. पोलीस खरच कस काम करतात हे त्यांना समजणे आवश्यक आहे म्हणुन ही पोस्ट लिहिली आहे.

...Read More

V. S. News
शिवसेनेतून दोघे निलंबित - उद्धव ठाकरे यांची कारवाई

व्हीएस न्युज - मुंबईचे माजी महापौर व ईशान्य मुंबईचे विभागप्रमुख दत्ता दळवी यांचे फोन टॅप केल्या प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलुंडचे उपविभाग प्रमुख जगदीश शेट्टी यांना निलंबित केले आहे. तसेच तेथील शाखा प्रमुख दीपक सावंत यांनाही पक्षविरोधी कारवायांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

ईशान्य मुंबईत शिवसेनेत अंतर्गत वाद सुरु होते. या वादाला कंटाळून दत्ता दळवी यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिला होता. ही कुरबूर उद्धव ठाकरे यांच्या कानावर गेल्याने त्यांनी तातडीने कारवाई करत शेट्टी यांना निलंबित केले. तसेच पक्षविरोधी बैठका घेतल्याच्या आरोपाखाली शाखाप्रमुख दीपक सावंत यांनाही निलंबि करण्यात आले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातले अंतर्गत मतभेद मिटवून पक्षसंघटनेला बळकटी आणण्याचा आणि पक्षाची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जात आहे. त्याचेच एक पाऊल म्हणून ही कठोर कारवाई करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतल्याचे बोलले जाते.

...Read More

V. S. News
सुधन्वा गोंधळेकरचे पुण्यातील घर जणू 'मिनी शस्त्रागारच ';दहशतवाद विरोधी पथकाच्या छापेमारीत घातक शस्रे व हत्यारे जप्त 

व्हीएस न्युज-मुंबईतील नालासोपऱ्यात जप्त करण्यात आलेल्या स्फोटक प्रकरणात राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुणे, सातारा, सोलापूर भागांतून बारा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून एका पथकाने गोंधळेकर याच्या पुण्यातील घरी छापेमारी केली. यामध्ये तब्बल दहा पिस्तूले, गावठी कट्टा, चाकू आणि चॉपर मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. मागील तीन ते चार दिवसांपासून एटीएसची पथके शहरात “सर्च ऑपरेशन’ राबवत आहेत.

राज्य दहशतवाद विरोधी पथकाने गुरूवारी रात्री केलेल्या धडक कारवाईत नालासोपारा भागातील वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर यांना अटक केली. राऊत याच्या घरातून वीस गावठी बॉम्ब, स्फोटके, बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. राऊतच्या संपर्कात असलेल्या सोळा जणांची एटीएसकडून चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान, पुणे, सातारा, सोलापूर भागांतून एटीएसच्या पथकाने बारा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. यातील दोघे जण पुण्यातील कोंढवा व पर्वती परिसरात वास्तव्यास असल्याचे समजते. एटीएसकडून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी राऊत आणि त्याचे साथीदार मुंबई, पुणे, सोलापूर भागांत घातपाती कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचा संशय एटीएसने व्यक्त केला आहे. दरम्यान, हे “ऑपरेशन’ अतिशय गुप्तरित्या राबविण्यात येत असून त्याची कोणतीच माहिती पुणे पोलिसांना देण्यात आलेली नाही. त्यांच्याकडून पुण्यात काही घातपात घडवण्यात येणार होता का? याची माहिती एटीएसकडून घेतली जात आहे.

गोंधळेकरचा पुण्यात ग्राफिक डिझायनिंगचा व्यवसाय...

गोंधळेकर हा मूळचा साताऱ्यातील आहे. त्याचा पुण्यात ग्राफिक डिझायनिंगचा व्यवसाय असल्याची माहिती मिळाली आहे. राऊत, कळसकर, गोंधळेकर हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत. दरम्यान, राऊत, कळसकर, गोंधळेकर यांच्या संपर्कात असलेल्या बारा जणांना मुंबई एटीएसने शनिवारी ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेले राऊत, कळसकर, गोंधळेकर यांना न्यायालयाने 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, कामगार चळवळीतील ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे, बंगळुरुतील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या अनुषंगाने राऊत, कळसकर, गोंधळेकर यांची चौकशी केली जाणार आहे.

सुधन्वाच्या घरातून मिळालेला शस्त्रसाठा.

१० पिस्तुले, १० पिस्टल बॅरल, ६ अर्धवट तयार पिस्टल बॉडी, ६ पिस्टल मॅगझीन, तीन अर्धवट तयार मॅग्झीन, ७ अर्धवट तयार पिस्टल स्लाईड, १६ रिले स्विच, ६ वाहनांच्या नंबर प्लेटस, १ ट्रिगर मॅकॅनिझम, १ गावठी कट्टा, १ एअर गण, १ चाकू आणि १ चॉपर अशी घातक हत्यारे मिळाली. याबरोबरच पेनड्राइव्ह, हार्डडिस्क, मेमरी कार्डहि जप्त करण्यात आले आहे.

...Read More

V. S. News
संभाजीराजेंच्या दोन सूचना, व्यंकय्या म्हणाले- मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाऊ न देणं कितपत योग्य?

व्हीएस न्युज - मराठा आरक्षणाचा मुद्दा आज संसदेच्या दोन्ही सभागृहात गाजला. लोकसभेत शिवसेना खासदार विनायक राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. तर राज्यसभेत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी निवेदन दिलं. संभाजीराजेंनी मराठीत आपलं म्हणणं मांडलं.

संभाजीराजे काय म्हणाले?

"राजर्षी शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा 1902 साली आरक्षण दिलं होतं. बहुजन समाजाला जे आरक्षण दिलं होतं. त्यामध्ये एससी, एसटी, ओबीसीसह सर्व जातींचा समावेश होता. त्यामध्ये प्रामुख्याने मराठा समाजाचाही समावेश होता. आज स्वातंत्र्यानंतर मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने भावना तीव्र झाल्या आहेत.

अनेक मोर्चे मागील वर्षी निघाले. त्याची दखल देशानेच नव्हे तर जगाने घेतली. पण आता भावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाला माझ्या दोन सूचना आहेत.

पहिली सूचना म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातील सर्व घटकांना बोलवावं आणि त्यांच्या मागण्या मान्य करावं.

दुसरी सूचना - राजकारण करण्यापेक्षा सर्व पक्षांना एकत्र बोलवून, मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा"

राज्यसभा सभापतींची टीपणी

संभाजीराजेंच्या या निवेदनानंतर उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडून यांनी, आरक्षणाची मागणी योग्य आहे, पण मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाऊ न देणं कितपत योग्य, असा सवाल उपस्थित केला.

महाराष्ट्र बंद

मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने आज 24 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.

आज सकाळी 11 च्या सुमारास काकासाहेब शिंदे यांच्यावर गंगापूर तालुक्यातील कायगावात अंत्यसंस्कार झाले. लहान भाऊ अविनाश शिंदेने काकासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी दिला.

सकल मराठा मोर्चाच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात खबरदारी म्हणून शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्यात आली आहेत. बीडमधल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बंदमुळे शहरातून एकही बस शहराबाहेर पडू शकलेली नाही. दररोज बीडमधून ये-जा करणाऱ्या 431 बस फेऱ्या आज बंद आहेत. काही ठिकाणी टायर जाळण्यात आल्यानं एसटी महामंडळानं वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

परभणी रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलकांनी रास्तारोको केला. यामुळे काही काळ सचखंड , परळी पॅसेंजर आणि हैद्राबाद पॅसेंजर ट्रेन रोखण्यात आली होती. रुळावर बसून आंदोलकांनी आंदोलन करत सरकारविरोधात घोषणा दिल्या. उस्मानाबादमध्येही आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. उस्मानाबाद येथील जिल्हा विधीज्ञ मंडळाने एकमतानं मराठा मोर्चाला पाठिंबा दिला. यासोबत नांदेडसह अनेक तालुक्यांमध्ये बंद पाळला जातोय.

...Read More

V. S. News
दीपक मानकर यांना अटक निश्चित, सुप्रीम कोर्टानेही जामीन नाकारला

व्हीएस न्युज - पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला आहे. तसंच दहा दिवसांच्या आत पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दीपक मानकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात हायकोर्टानेही मानकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे मानकरांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

जितेंद्र जगताप हे अनेक वर्ष दीपक मानकर यांच्याकडे काम करत होते. त्यांनी 2 जून रोजी आत्महत्या केली होती. जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात दीपक मानकर यांचं नाव चर्चेत आलं होतं. जितेंद्र जगताप यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पाच जणांच्या नावाचा उल्लेख करत त्यांना आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं होतं. या पाच जणांत दीपक मानकर यांच्याही नावाचा समावेश आहे. या प्रकरणात पोलिसांनी अटकसत्र सुरू करताच मानकर यांनी हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. कर्मचाऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये मानकरचं नाव मानकर यांच्याकडे गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या जितेंद्र जगताप नावाच्या व्यक्तीने 2 जूनला घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी जितेंद्र जगताप यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये दिपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे.

रास्ता पेठेतील एका जागेच्या वादातून हा प्रकार घडला. जितेंद्र जगताप हा गेली अनेक वर्ष दीपक मानकरांचे जमिनीचे व्यवहार पाहात होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून समर्थ पोलिस स्टेशनसमोर असलेल्या जागेवरुन दोघांमध्ये वाद सुरु होता. त्यासाठी मानकर, कर्नाटकी, भोळे यांच्या अनेकवेळा बैठकाही झाल्या होत्या. जागेचा ताबा सोडण्यासाठी मानकर जितेंद्र जगतापवर दबाव टाकत होते.

दरम्यान जितेंद्र जगताप हा खंडणी उकळण्यासाठी आत्महत्येची धमकी देत होता आणि त्याबद्दलचा अर्ज आपण 1 जूनलाच पोलिस आयुक्तालयात दिल्याचं म्हटलं आहे.

दीपक मानकर यांची कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिली आहे. काँग्रेसमध्ये असताना नातू वाड्यातील जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांना अटक झाली होती. अनेक दिवस येरवडा कारागृहात जावं लागलं होतं.

...Read More

V. S. News
काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी बीआरटीएस मार्ग सुरू करा - अमित गोरखे

- पिंपरी चिंचवड महापालिकेने बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम अर्थात बीआरटीएस प्रकल्प हाती
घेतला. सुरुवातीला मोठा गाजावाजा झाला. परंतु, मागील अडीच वर्षात बीआरटीएस प्रकल्पांकडे
महानगरपालिका प्रशासनाने पुर्णत: दुर्लक्ष झाले आहे. काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता हा बीआरटीएस
मार्ग सुरू करण्यामधील प्रमुख अडथळा चिंचवड येथील एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाचा होता. हा उड्डाणपूल
सुरू झाल्याने महापालिकेने हा रखडलेला काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी बीआरटीएस मार्ग तातडीने सुरू
करावा, अशी मागणी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे यांनी महापालिका आयुक्त श्रावण
हर्डीकर यांच्याकडे केली आहे.


या संदर्भात अमित गोरखे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात
अमित गोरखे यांनी म्हटले आहे की, अहमदाबादच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरात बीआरटीएस प्रकल्प
केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय नागरी पुननिर्माण (जेएनएनयुआरएम) योजनेअंतर्गंत राबवण्यात
आला. त्यावर महापालिकेच्या बीआरटीएस विभागाने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. शहरात
प्रमुख पाच मार्गावर बीआरटीएस बससेवा सुरू करण्याचा महापालिकेचा मानस होता. मात्र्, सप्टेंबर २०१५
मध्ये औध-रावेत आणि नोव्हेंबर २०१५ मध्ये नाशिका फाटा ते वाकड या मार्गावर महापालिकेने
बीआरटीएस बससेवा सुरू केली. परंतु, त्यानंतर अडीच वर्षात बीआरटीएसचे काम संथ गतीने सुरू केला
आहे. अडीच वर्षात एकही नवीन बीआरटी मार्ग महानगरपालिकेला सुरू करता आलेला नाही.
सांगवी-किवळे बीआरटी मार्ग व देहू-आळंदी रस्ता या दोन रस्त्यांना जोडणारा काळेवाडी फाटा ते देहू-
आळंदी रस्ता हा बीआरटीएस मार्ग शहरवासीयांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. एकूण १०.७० कि.मी. लांबीचा
हा बीआरटी मार्ग आहे. काळेवाडी फाट्यापासून स्पाईन रस्त्यापर्यंत एकूण ११ बसथांबे आहेत. या मार्गाचे
२०१० पासून वेगवेगळ्या पाच टप्प्यात काम सुरू असून हे काम जवळपास पूर्ण झालेले आहे. बसथांबे
कॅरिडॉर महानगरपालिकेने तयार केलेले आहेत. मात्र, या बीआरटीएस मार्गावरील एम्पायर इस्टेट

उड्डाणपूल हा प्रमुख अडथळा होता. हा उड्डाणपूल महानगरपालिकेने नुकताच खुला केला आहे. त्यामुळे
काळेवाडी, पिंपरी, चिंचवड, चिखली, मोशी, हिंजवडी, वाकड, देहू आणि आळंदी या भागातील नागरिकांना
या रस्त्याचा फायदा होत आहे. या मार्गावरील बीआरटीएस रस्ता सुरू झाल्यानंतर या मार्गाचा फायदा
सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. मात्र, बीआरटीएस विभागाच्या नियोजनाअभावी हा मार्ग सुरू
करण्यास विलंब होत आहे.
बीआरटीएस मार्गात मोरवाडी येथे आयुक्त बंगल्याजवळील एका कंपनीचा न्यायालयीन वाद सुरू आहे.
त्यामुळे बीआरटीएस मार्ग सुरू करण्यास विलंब होत असल्याने तोडगा काढून महानगरपालिकेने तुर्तास
मोरवाडी न्यायालयाजवळील रस्त्याचा वापर करावा. बीआरटीएस बससेवा सुरू झाल्यानंतर हिंजवडी,
वाकडकडे जाणे सोयीचे होणार आहे. तसेच, काळेवाडी, चिंचवडमधील मोहनगर, विद्यानगर, रामनगर,
मोरवाडी, शाहूनगर, संभाजीनगर, पुढे चिखली या भागात राहाणा-या सर्वसामान्य नागरिकांना या बससेवेचा
लाभ घेता येईल. तसेच, पिंपरी चिंचवड शहरात एकूण ४५ कि. मी. अंतरावर बीआरटीएस बससेवा पूर्ण
होणार आहे. तरी, तातडीने हा बीआरटीएस मार्ग सुरू करण्यासाठी महानगरपालिका बीआरटीएस विभागाला
सूचना द्याव्यात, असे अमित गोरखे यांनी निवेदनात म्हटले आहे.

...Read More

PIMPRI-CHINCHWAD WEATHER
.

ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad

CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002

    Thanks for Your update!