जातीय तेढ प्रकरणी MIM नगरसेवक अटकेत, भाजपाच्या ५ नगरसेवकांवरही गुन्हा
औरंगाबाद
2018-08-18
व्हीएस न्युज - औरंगाबादमध्ये जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी एमआयएम नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. तर भाजपाच्या पाच नगरसेवकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल शुक्रवारी औरंगाबाद महानगर पालिकेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावावरून भाजपा आणि एमआयएम नगरसेकांमाध्ये हाणामारी झाली होती. यामध्ये महापालिकेत भाजपा नगरसेवकांनी एमआय़एमच्या नगरसेवकाला बेदम मारले होते. त्यानंतर बाहेर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेत्यांवर हल्ला केला होता. त्यामुळे काल शहरात तणावाचे वातावरण निर्णाण झाले होते.
भाजपच्या पाच नगरसेवकांविरोधात शुक्रवारी (ता.17) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयएम नगरसेवक सय्यद मतीनने यांच्या जबाबावरून हा गुन्हा नोंद करण्यात आल्याचे क्रांती चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादाराव शिनगारे यांनी सांगितले.